Skip to content

वैवाहिक आयुष्य उध्वस्त जरी झालं, तरी आपण उंच भरारी घेऊ शकतो!

वैवाहिक आयुष्य उध्वस्त जरी झालं, तरी आपण उंच भरारी घेऊ शकतो!


टीम आपलं मानसशास्त्र


जीवनगाणे गातच रहावे झाले गेले विसरूनी जावे पुढे पुढे चालावे..

आपले आयुष्य परिपूर्ण व्हावे असे प्रत्येकाला अपेक्षित असते. पण काही गोष्टी आपल्या हाताबाहेर असतात. किती ही प्रयत्न केले तरी टाळू शकत नाही. पण म्हणून हार मानायची नसते.

वैवाहिक आयुष्यात अनेक चढ उतार येतात. कधी अनेक अचानक येणाऱ्या संकटाना तोंड द्यावे लागते. कधी जोडीदाराशी पटत नाही. भांडणे , वादावादी , कधी काडीमोड , कधी जोडीदाराचे अचानक निधन , तर कधी अनपेक्षित आणि अचानक येणारे संकट म्हणजे जोडीदार mentally किंवा physically disabled .

आजच शेर शाह movie बघितली. कॅप्टन बात्रा कारगिल मध्ये शहीद झाले. पण त्यांची ही सत्यकथा आहे. लहानपणी परमवीर चक्र सीरियल बघत तेव्हापासून त्यांनी त्यांचे ध्येय पक्के केले होते की एक फौजी व्हायचे होते. त्यांची प्रेयसी डिंपल हिच्या सोबत त्यांनी फेरे घेवून तिला आपली बायको ही मानले होते. आणि तिनेही आपले पती मानले होते.

पण वैवाहिक जीवन दुर्लक्षित करून कॅप्टन बात्रा यांनी देशाच्या कर्तव्याला आधी प्राधान्य दिले. आणि ते कारगिल युद्धात आपले सर्वस्व पणाला लावून लढले . पण शेवटी त्यात शहीद झाले. पण जिंकून च.

वैवाहिक आयुष्य उध्वस्त जरी झालं, अर्थात इथे उध्वस्त का झाले तर देशाला प्राधान्य दिले. तरी त्यांनी उंच भरारी घेऊ शकतो हे त्यांच्याकडे बघून चांगले जाणविते. त्यांना परमवीर चक्राने सन्मानित करण्यात आले.

आणि समाज दृष्टिकोनातून नाही पण दोघांनी गुरुद्वारा मध्ये घेतलेले फेरे हे दोघांच्या दृष्टीने विक्रम बात्रा आणि डिंपल यांच्या दृष्टीने विवाह बंधन च होते. आणि त्या दोघांनी ही ते पाळले. डिंपल ने ही त्यांच्या पश्चात लग्न केले नाही. वैवाहिक जीवन उद्ध्वस्त झाले . शहिद झाले विक्रम बात्रा म्हणून तिने त्यांचे लग्न हेच खरे असेच गृहीत धरले असल्यामुळे ते वैवाहिक जीवन खरे तर फुलण्या आधीच कोमेजून गेले. उद्ध्वस्त झाले.

पण तरी जिद्दीने त्यांनी अनेक मुलांना घडविण्याची अवघड अशी शिक्षिकेची जबाबदारी स्वीकारली आणि आयुष्य कुठेही थांबू न देता हजारो विद्यार्थ्यांना घडविण्याची उंच भरारी घेतली.

असे आपल्या अवती भोवती अनेक लोक असतात. जे कोणत्याही परिस्थिती मध्ये मग वैवाहिक आयुष्य उद्ध्वस्त झाले तरी उंच भरारी घेत असतात.

माझीच एक मैत्रीण आहे. लग्न लवकर झाले २१ व्या वर्षीच . नवरा , सोन्या सारख्या दोन मुली. दोघी मुली मध्ये तीन वर्षाचे अंतर. लग्नाला फक्त दहा वर्ष च झाली. नवऱ्याला पोटात दुखण्याचे निम्मित झाले म्हणून admit केले आणि दोन दिवसात नवऱ्याचे अचानक निधन . तिला हा धक्का एव्हढा मोठा होता की ते सहन करणे खरेच अवघड होते. क्षणात आयुष्य संपले हीच भावना . सासरी कोणाचा ही support नाही. दिर आधीच गेले होते त्यामुळे मोठी जाऊ तिच्या माहेरी .तिची श्रीमंती ही खूप तिकडची.त्यामुळे तिला काही अडचण नाही आली .

पण हिला माहेरी ही कोणी नाही . आणि सासरी एकट्या सासू बाई. त्यामुळे सगळी जबाबदारी हिच्या एकटी वर पडली. नवऱ्याच्या जाण्याने वैवाहिक जीवन उद्ध्वस्त झाले होते. पण मुलींना घडविणे हे एक ध्येय तिला होते. आणि ते ध्येय पूर्ती करिता ती जिद्दीने परत उभी राहिली. तिचा बिझनेस उभा केला. सासू बाईना खंबीर पाठिंबा दिला . साथ , आधार दिला आणि आज तिने स्त्री महिला उद्योजक म्हणून अनेक पुरस्कार ही मिळविले आहेत. आणि अनेक महिलांना तिने आधार ही दिला आहे.

तिची आधाराची फांदी तुटली म्हणून तिला ही उंच भरारी घ्यावीच लागली.

असेच आहे आयुष्य कोणाचे असणे , नसणे , कोणाची कायम साथ ही लाभणे अशक्य असते. चिरंजीवी कोणी नाही .किंवा काही गोष्टी किती ही प्रयत्न केल्या तरी थांबवू शकत नाही. जसे घटस्फोट असेल , निधन असेल त्या आपल्या हातात गोष्टी नसतात. त्या स्वीकारून पुढे जावे लागते. आपल्या स्वतः ला उभे राहावे लागते. मग कधी ते आपल्या स्वतः करिता असेल , मुले मुली यांच्या करिता , कुटुंब असेल त्याकरिता.
जगाच्या , सृष्टीच्या नियमाप्रमाणे पुढे जावेच लागते. दुःख , संकटे , त्रास जरी आले तरी ते सहन करून , त्यातून मार्ग काढून पुढे वाटचाल घ्यावी लागते.

भा. रा. तांबे यांनी म्हणले तसे जन पळ भर म्हणतील हाय हाय. जवळचे सगळे क्षणिक दिलासा देतील आणि आपल्याला आहे त्या परिस्थिती मध्ये ठेवून निघून जातील. पण आपल्याला खंबीर उभे राहावे लागते.

आपल्या पंखा मधले बळ वाढवून उंच भरारी घेतली की ते मुक्तपणे विहार करताना ही एक आनंद , उत्साह , नवनिर्मिती चा आनंद , सुख मिळतें . मोकळेपणा मिळतो.

आयुष्य सुंदर आहे. वैवाहिक आयुष्य उध्वस्त जरी झालं, तरी आपण उंच भरारी घेऊ शकतो! घ्यावी लागते. कारण आपल्याला जगायचे असते. आणि ते दुसऱ्यावर अवलंबून न राहता आपल्या पंखांमधली ताकद ओळखून ते सामर्थ्य आपण वाढवून , आपली कामे आपण करून , आपले खर्च असतील , जबाबदाऱ्या आपण पार पाडाव्या लागतात.

आयुष्यभर काय पण काही क्षण ही इतर कोणी आपली जबाबदारी घेत नाही. त्यामुळे कोणतीही परिस्थिती असो आपण सुरुवातीला हळूहळू पण मग उंच भरारी ही घ्यावी लागते. त्याकरिता आपली मानसिकता तशी strong घडवावी लागते. अनेक गोष्टी स्वीकारून पुढे वाटचाल करावी लागते.

वैवाहिक आयुष्य उध्वस्त जरी झालं, म्हणून हताश , निराश होवून थांबू नका. सगळे संपले असे विचार करू नका. सकारात्मक विचार करा. जे आहे ते स्वीकारा. आपल्यातले सामर्थ्य ओळखा आणि स्वतची ओळख बनवा .तयार करा. आणि दाखवून द्या जगाला , आपल्या लोकांना की तरी आपण उंच भरारी घेऊ शकतो!

रुक जाना नहीं… तू कहीं हार के
काँटों पे चलके मिलेंगे साए बहार के
रुक जाना नहीं तू कहीं हार के…


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

2 thoughts on “वैवाहिक आयुष्य उध्वस्त जरी झालं, तरी आपण उंच भरारी घेऊ शकतो!”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!