Skip to content

एका उत्तम भावी आयुष्याचं स्वप्न प्रत्येक जोडीदाराने पहायला हवं…!!

एका उत्तम भावी आयुष्याचं स्वप्न प्रत्येक जोडीदाराने पहायला हवं…!!


मयुरी महेंद्र महाजन

पुणे.


जेव्हा दोन व्यक्ती स्वच्छेने एकत्र येतात, त्यावेळी ते एकमेकांत गुंतून आपले सुख दुःख, आपल्या भावना मांडत जातात, जस जसे एकमेकांना समजू लागतात, एकमेकांच्या जवळ येऊ लागतात, एकमेकांचे स्वभाव ओळखून लागतात, एकमेकांना जिवापाड जपतात, काळजी घेतात, भांडतात, रुसतात, एकमेकांशी अबोला धरतात, परंतु एकमेकांना गमवण्याच्या भीतीपोटी ती परत आपले नाते पूर्वपदावरती आणताना दिसतात,

तसे तर प्रत्येकासाठीच आपला जोडीदार खूप खास असतो, मग नवऱ्यासाठी बायको असेलं किंवा बायको साठी नवरा असेलं, जरी काही जोडप्यांमध्ये तू माझ्यासाठी खूप खास आहेस, माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे, असे शब्दांच्या रूपाने जरी दोघांमध्ये संवाद झालेला नसेलं, तरीसुद्धा प्रत्येकीसाठी तो आणि प्रत्येकासाठी ती महत्त्वाचे आहेत, कधी कधी तो प्रवास एका नजरेने सुरू झालेला असतो ,तर कधी लग्नाच्या पवित्र बंधनात दोघे एकमेकांना नव्याने समजून घेण्यापासून ते आयुष्याच्या कितीतरी टप्प्यांवरती एकमेकांना साथ देण्या पर्यंतचा प्रवास……

लग्न होऊन नवीन दांपत्य घरात प्रवेश करतात, तेव्हा ती गालावरची खळी, गुलाबी स्वप्नांची एक हुरहुर आणि बरच काही…. यामध्ये भावी आयुष्याची एकमेकांची स्वप्न, एकमेकांच्या आशा, अपेक्षा, अशा कितीतरी गोष्टी एकमेकांसोबत जोडल्या जातात, त्यामध्ये प्रत्येक जोडीदाराने आपल्या उत्तम भावी आयुष्याचे स्वप्न पाहायला हवं…

जेव्हा दोन व्यक्ती जोडीदार म्हणून एकमेकांच्या सोबत उभे असतात, त्यावेळी त्या दोघांचाही आनंद एकमेकांमध्ये असावा, तसे तर प्रत्येक जोडीदार आपल्या भावी आयुष्याला सुखकर करण्याचा प्रयत्न करतोचं… पण प्रत्येकाच्या क्षमता वेगळ्या असतात, वैचारिक भिन्नता असते, परंतु आपापल्या परीने प्रत्येक जण जितके देता येईलं, ते देण्याचा प्रयत्न तर करायलाचं हवा ….

आता भावी आयुष्य उत्तम असावे, म्हणजे नेमके कसे असावे??? जोडीदारासोबत आपले नातेसंबंध ,आपला परिवार, कुटुंब ,यांच्या बरोबर परस्परांमध्ये प्रेमाचे ,सलोख्याचे बंध राहतील, एकमेकांशी कितीही टोकाची भांडणे झाली ,तरी कधीच एकमेकांची साथ न सुटता , ती कायम असावी, झालेल्या भांडणाचा कुठलाही परिणाम नात्यावर होता कामा नये,

सकाळी भांडण केल्यावर संध्याकाळी एका ताटात जेवावे, भांडणांमध्ये चूक कोणाची होती, यावर चर्चा न करता झालेली चूक लक्षात कशी घेता येईलं, त्यासाठी प्रयत्न करावे, एकमेकांच्या गरजा सुद्धा लक्षात घेणे गरजेचे आहे, जिथे आपला जोडीदार कमी पडत असेलं, तेथे आपल्या जोडीदाराला साथ देणे ,धीर देणे, हे सुद्धा महत्त्वाचे आहे, एकमेकांशिवाय दोघेही अपूर्णचं असतात ,परंतु नात्याची गरज तुला आहे, मला नाही , असा भ्रम ठेवून जगू नये,

प्रत्येक वेळेस परिस्थिती सारखीच असते, असे नाही, त्यावेळेस आपल्या परिस्थितीनुसार काही गोष्टी सहन करायला शिकायला हवं ,हल्ली नाती जोडायला वेळ लागत नाही, परंतु नाती टिकवायला मात्र वेळ लागतो ,तसे बघितले तर नाती टिकवण्यापेक्षा नाती जपायला शिकले पाहिजे, आपण नवरा म्हणून,किंवा बायको म्हणून, आपली भूमिका पार पाडण्यासाठी सक्षम नसालं, किंवा त्यासाठी वेळ घ्यावा असे वाटत असेलं, तर आपण तेथे थांबणे गरजेचे आहे…

प्रत्येक जोडीदाराच्या उत्तम भावी आयुष्याचं स्वप्न म्हणजे केवळ मुल-बाळ होण्या पर्यंतच मर्यादित असते, असे नाही, आई -बाप होण्यासारखं, सुख दुसरे नाही, परंतु ते क्षण आणि ते सुख अनुभवायला बऱ्याच गोष्टींचे नियोजन असणेही गरजेचे आहे, जसे की आर्थिक विषय ,आणि एकमेकांप्रती विश्वास असणे, येणारी चिमुकली पावलं कधी नशिबाचा रेखा बदलून टाकतीलं, सांगता येत नाही, म्हणून भावी आयुष्याची आपली स्वप्न रंगवताना, ती जगता सुद्धा आली पाहिजे, स्वप्न रंगवताना जितकी छान वाटतात, तितकीचं ती जगतांना खूप सुखद आनंद देणारी असतात….

प्रत्येक जोडी दारासमोर आपल्या भावी आयुष्याचा प्रश्न असतो,? त्यामध्ये कधी आर्थिक अडचणी येतात, कधी सामाजिक, तर कधी शैक्षणिक ,यामध्ये दमछाक होते, परंतु एकमेकांमध्ये असलेले प्रेम, जिव्हाळा, माणसाला लढण्याचं बळ देतात, पुढे जाण्यासाठी प्रेरणा देतात, चुकलेली वाट सुद्धा लक्षात घेऊन, आपल्यासाठी योग्य असलेल्या वाटेचा वाटेकरी होतात ,तेच खरे एकमेकांचे साथी असतात ,कारण चुकलो म्हणून साथ सोडणारे बरेचं असतात, परंतु झालेली चूक समजून घेऊन, साथ देणारे खूप कमी असतात,

आपले भावी आयुष्य उत्तम असावे, यासाठी प्रत्येक जोडीदाराने आपापली जबाबदारी ओळखणे ,आणि तसे वागणे गरजेचे आहे ,आपल्याकडून आपल्याला काय देता येईलं, यासाठी प्रयत्न करावे ,की ज्यामुळे आपले नाते बहरणारचं नाही, तर आनंदाने डोलेलं, आपण आपल्या जोडीदाराला समजून घेणे, आणि आपली मते समजून सांगणे देखील महत्त्वाचे आहे,

जर जोडीदाराची सुबत्ता तुम्हाला ऐशोआराम द्यायची नसेलं, पण कष्टाने ,घामाने कमवून, चटणी-भाकरी घालुन पोट भरण्याची सुबत्ता असेलं, आणि तुम्हाला राणीसारखी ठेवण्याची धम्मक असेलं, तर तुमच्या भविष्याला नेहमीचं एक प्रेमाच्या मायेचा ओलावा असेलं, बाकी तर आयुष्यात पैसा तुम्ही कधीही कमवू शकालं…, त्यात शंका नाही …..!!!


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!