मी मनापासून त्याच्यावर प्रेम करत होते, अन तो सारखा लॉजवर जाण्याच्या गोष्टी करायचा.
सोनाली जे.
मी मनापासून प्रेम करते त्याच्यावर. अग , ही तुझी बाजू झाली. पण त्याचे काय ? त्याचे ही तुझ्यावर तेवढेच प्रेम आहे का ग ?
स्वाती आणि नेहा दोघी बोलत असतात. स्वाती आणि नेहा अगदी बाल गटात असल्यापासून एकत्र . दोघी ही हुशार. दोघींनी engineering केले. चांगल्या IT company मध्ये दोघी ही जॉब करू लागल्या. मस्त सुरू होते. फक्त दोघींची company वेगळी . पण वेळ मिळेल तेव्हा भेट , रोज फोन हा व्हायचा म्हणजे व्हायचा.
नेहा च्या ऑफिस मध्ये प्रतीक आणि तिचे बरेचवेळा बोलणे होत असे. एकाच प्रोजेक्ट वर होते दोघे. मीटिंग , कॉल , decision कधी दोघे मिळून काम करत होते. जेवण ही एकत्र. दुपारचा चहा एकत्र . हळू हळू मैत्री वाढू लागली. ऑफिस मधून जाताना मग एकत्र जावू लागलें . तसे घर एकमेकांचे जवळ नव्हते पण प्रतीक तिला घेवून यायचा ..सोडायचा. हळूहळू ऑफिस कामा व्यतिरिक्त चांगली मैत्री होवू लागली. आकर्षण वाढू लागले. आणि त्याचे रूपांतर प्रेमात. म्हणजे नेहा हे प्रेमच समजू लागली. आणि मग एकमेकांच्या शिवाय दिवसच जात नसे. Gifts , movies , पिकनिक वाढू लागले. प्रतिक ही सारखा फोन करत असे. दोंघांच्या मध्ये प्रेमाचे संवाद वाढू लागले.
नेहा मनापासून प्रतीक वर प्रेम करत होती. ध्यानी मनी तोच . फोन का नाही आला . मेसेज का नाही आला.व्हॉटसॲप वर ऑनलाईन आहे अजून मेसेज read नाही केला . का बरे . असे विचार सतत पछाडत. आणि कधी एकदा त्याचा मेसेज फोन येईल अशी आतुरतेने वाट बघत असायची.
ऑफिस मध्ये जाताना आपल्यासोबत प्रतीक चा ही डबा घेवून जायची. काही नवीन नवीन पदार्थ स्वतः वेळेत वेळ काढून करायची. त्याच्या आवडी निवडी काय हे समजून घेत होती. आईच्या हे लक्षात येत होते. आईला तिने तशी कबुली ही दिली होती प्रेमाची. त्याच्याबद्दल मनापासून feelings होत्या तिला. ओढ होती. आपुलकी होती. त्याची काळजी होती.
प्रतिक तसा खूप साधा राहत होता. कशावर ही काही घालायचा. त्याने neat राहावे , व्यवस्थित दिसावे म्हणून त्याला साजेसे कपडे असतील , किंवा त्याला एखादा मस्त deo असेल . परफ्यूम. अगदी बेल्ट पासून shoes , सॉक्स पर्यंत सगळे काही. मग हेअर स्टाईल असेल. तिने त्याचा लूक ही एकदम बदलून टाकला होता. खूप handsome आणि स्मार्ट दिसू लागला होता तो आता.
एकदा प्रतीक आणि नेहा महाबळेश्वर ला गेले होते. खूप धमाल करत गेले . एकमेकांच्या सहवासात , प्रेमात , डोळ्यात डोळे घालून , तो हलकासा स्पर्श . महाबळेश्वर ला स्ट्रॉबेरी तोडताना आनंद. त्या मस्त निसर्गरम्य वातावरणात , बोचऱ्या थंडीत ती मिठी . त्या धुंद
वातावरणातून बाहेर पडावे असे वाटत नव्हते. त्या दिवशी त्यांचा अचानक तिथे राहूया असा प्लॅन झाला. दोघेही खुश होते. आनंदी होते. आणि एकमेकांचा सहवास संपू नये असेच वाटत होते. त्यांनी घरी फोन आणि आज इकडे राहणार आहोत सांगितले.
नेहा ची आई थोडी काळजी करत होती. तिने सांगितले ही जपून रहा. हो म्हणली नेहा पण ती वेगळ्या विश्वात होती.
तिथल्याच छान निसर्गरम्य हॉटेल मध्ये राहिले. रात्री जेवण झाल्यावर एकत्र फिरून आलें . प्रतिक आज फारच मूड मध्ये होता. सतत नेहाच्या केसातून हात फिरवत , हलकेच जवळ ओढत होता.
रात्री फिरून येताना मस्त फ्रेश स्ट्रॉबेरी आइस क्रीम ही खाल्ले. रूम एकच बुक केली होती. नेहा म्हणाली मी इकडे एक extra बेड लावून घेते आणि झोपते. ते ही झाले. पण अचानक प्रतीक खूप जास्त जवळ आला. आणि नेहा त्याच्या सोबत बोलू लागली. आपण आता future plans केले पाहिजेत. लग्न .. तू काय ठरविले . घरच्यांना मी सांगितले तू सांगितले का .. असे तिचे बोलणे सुरूच. पण प्रतीक अजून अजून जवळ येत गेला आणि शेवटी दोघांच्या मधला दिवस भरात जो सहवास वाढला होता तो . आजपर्यंतच्या रोजच्या गप्पा ..मग प्रेमाच्या ..कधी हलके flying kiss ,आपुलकी , ओढ ..अजून जास्त वाढत गेली. त्यापलीकडे शरीराचे आकर्षण वाढू लागले.
तरी ही नेहा प्रतिक ला समजावत होती प्रतीक आपण हे लग्नानंतर केले तर जास्त आवडेल रे. आणि तोपर्यंत थोडी हुरहूर राहू देत. ओढ वाढू देतं . आणि लग्नानंतरच्या गोष्टी तेव्हा करण्यात मजा ना रे.
पण प्रतीक खूप वेगळ्या मूड मध्ये होता आणि तो सतत नेहा ला जवळ घेत होता. आणि शेवटी दोघांचा ही तोल गेला.
सकाळी जेव्हा जाग आली तेव्हा नेहा ला खूप guilty वाटू लागले. पण प्रतीक काही नाही एकदम शांत. तिला उलट समजावत होता. ठीक आहे ग . त्यात काय हे होणारच होते ना कधी तरी ..आता झाले. त्यातली मजा , सुख हे बघ ना . असे म्हणून परत त्या सकाळी ही त्याने नेहा सोबत रात्री केले तेच केले. त्याला त्यात आनंद आणि सुख मिळत होतें . पण नेहा चे मन मात्र खात होते.
महाबळेश्वर वरून आल्यावर ती थोडी डिस्टर्ब होती. पण घरी तसे काही दाखविले नाही. स्वाती ला मात्र ताबडतोब भेटली आणि सगळे सांगितलें . स्वाती म्हणली आता शांत हो. स्वाती मानसिक दृष्टीने तिला आधार देत होती. रोज तिच्या सोबत वेळ घालवत होती.
इकडे प्रतीक ही पूर्वीसारखाच वागत होता . कुठेच बदलला नाही. तसेच तिच्याशी प्रेमाने वागत होता. नेहाही थोडी नॉर्मल झाली. एकमेकांचे प्रेम आहेच तर आता लग्न करूयात म्हणून त्याच्या मागे लागली. तो ही करूया म्हणत होता .. पण पुढे काहीच नाही. ऑफिस कामे एकत्र , meetings एकत्र सुरू होते काम. भेटत होते. बाहेर जाणे . Gifts , movies सुरूच होते. पण आता प्रतीक सारखेच तिला बाहेर जावूया म्हणून मागे लागत होता.
अगदी बाहेर गावी कुठे नाही जमले तर इथेच दिवसभर लॉज मध्ये एकत्र थांबू. दिवसभर थोडे change आणि आपल्याला एकमेकांच्या सहवासात राहता येईल. तरी तेव्हा नेहा ने टाळले पण त्याच्या पुढच्या आठवड्यात त्याने बुक केलेच आणि तिला एकदम surprise दिले तिकडे गेल्यावर. नेहा ने मनाला बजावले होते की आज मर्यादा नाही ओलांडायची. पण मागच्या वेळी सारखेच हळूहळू भावना , एकत्र सहवास , जवळीक यातून तेच झाले.
नेहा स्वाती ला सांगत होती आज की , मी मनापासून त्याच्यावर प्रेम करत होते, अन तो सारखा लॉजवर जाण्याच्या गोष्टी करायचा.
मी परवा खूप स्पष्ट विचारले तू काय ठरविले आहेस लग्नाचे , आपल्या future चे , मला हे असे अधांतरी नाही राहता येणार तुझ्या सोबत. मला आई बाबांच्या बरोबर बोलताना ही guilty वाटते. त्यांनी माझ्यावर एव्हढा विश्वास ठेवला आहे. अगदी तुझ्या वर ही. आणि दरवेळी आपण मर्यादा सोडतो आहोत.
तेव्हा आज काय तो निर्णय पाहिजे मला. त्या वेळीही प्रतीक अतिशय शांतपणे म्हणाला, मला आता लगेच लग्न करणे शक्य नाही. मला आता करियर महत्वाचे. आणि पुढच्या महिन्यात मी प्रोजेक्ट करिता कॅनडा जाणार आहे. तिकडे किती काळ थांबावे लागेल मला माहिती नाही. आणि तिकडे मी अजून काही चांगल्या opportunity मिळतील का तेही search करणार आहे . त्यामुळे आता मला लग्नात नाही अडकायचे.
त्याक्षणी नेहा ने सांगितले ठीक आपण थांबू. तो ही तेवढ्या cool पने बरं म्हणाला.
नेहा हे जेव्हा सांगत होती स्वाती ला तेव्हा ढसाढसा रडत होती. असा कसा ग हा प्रतीक त्याला काही भावना नाहीत का .. त्याच्यावर मी खरेच प्रेम करत होते आणि याला सारखे माझ्याकडून त्या सुखाची अपेक्षा होती. अन तो सारखा लॉजवर जाण्याच्या गोष्टी करायचा.
मी एक स्त्री आहे ग . माझे सर्वस्व दिले मी. माझे मनापासून प्रेम होते ग त्याच्यावर. पण त्याला जरा ही काहीच वाटले नाही. इतका कसा ग तो अलिप्त होवू शकतो.
स्वाती तिला समजावत होती. नेहा अग ठीक आहे. विसरून जा . माहिती आहे विसरणे शक्य नाही. कारण तू खरेच मनापासून प्रेम केलेस ग. पण आता तू स्वतः ला तुझ्या आवडत्या गोष्टी मध्ये गुंतवून टाक. नेहाला थोडा बदल म्हणून स्वाती तिला घेवून दोन दिवस त्यांच्या दुसऱ्या कोकणातल्या मैत्रिणीकडे घेवून गेली. तिला त्यातून जेवढे सावरता येईल तेवढे प्रयत्न करत होती. आणि भावनिक दृष्ट्या ही खंबीर बनवत होती.
प्रत्येक मुलिकरिता हेच सांगणे आहे , हाच सल्ला आहे. की तुमचे प्रेम आहे म्हणजे समोरच्याचे ही प्रेम च आहे का याची अतिशय चोखंदळपणे खात्री करून घ्या.
प्रेम हे भावनिक , मानसिक आणि तुमच्या मधल्या गुण , वैशिष्टय यावर आहे का , जसे गुण तसे दोष ही असतात. त्यासह तो कायम साथ देणार आहे का ? का दोष समजल्यावर गुणाकडे दुर्लक्ष करून मध्येच सोडून देणार आहे का ? मग इथे तो असेल किंवा ती. तरी दोघांनी ही खूप विचार केले पाहिजेत.खात्री केली पाहिजे.
तिने त्याचे हे प्रेम आहे का फक्त शारीरिक आकर्षण आहे का ” physical lust ” याचा विचार केला पाहिजे.. ते जाणून घेतले पाहिजे. खात्री करून घेतली पाहिजे. कधी त्याच्या कळत नकळत त्याची परीक्षा घेवून ..त्याला नक्की प्रेम आहे का . आणि त्याचे रूपांतर दीर्घकालीन किंवा आयुष्यभर साथ देणारे आहे का.. का जसे आयुष्यात चढ उतार येत गेले की तसे नात्यात ही येणार ? अर्थात दोन भिन्न व्यक्तिमत्त्व विचार , आचार , आवडी निवडी भिन्न असणार त्यानुसार खरेच कायम जमणार आहे का ? गुण दोष असतील तरी साथ कायम असणार का ? याची खात्री ..
सगळ्यात महत्वाचे शारीरिक आकर्षण. , Physical lust हे म्हणजे प्रेम नव्हे. हा फरक समजून घेणे गरजेचे.
आयुष्य सुंदर आहे. चुकीची निवड करून आपल्या प्रेमावर अन्याय करून घेवू नका. प्रेम हे फक्त शरीर नाही तर मन , भावना , गुण , दोष या सर्वावर आहे का बघा.
अनेक असेही लोक आहेत जे एव्हढे प्रेम करतात की जरी शारीरिकदृष्ट्या एकत्र आले नाहीत तरी ते प्रेम कायम राहतें . अगदी भेटले नाहीत तरी. काही लोक तर आपले प्रेम हे लग्नात रूपांतर होवू शकले नाही म्हणून आयुष्यभर बॅचलर , अविवाहित राहिले आहेत कारण काय तर त्यांनी मनापासून प्रेम ज्या व्यक्तीवर केले त्या व्यक्ती शिवाय ते दुसऱ्या कोणाचाही विचार ही करू शकत नाहीत. आणि लग्न झाले नाही म्हणजे प्रेम का कमी व्हावे ? भेटलो नाही म्हणून प्रेम का कमी व्हावें . एक टक्का जरी मनापासून प्रेम करत असाल तर ते प्रेम कायम साथ राहील.
फक्त शारीरिक आकर्षण आयुष्यभर पुरत नाही. आयुष्यात अनेक भावनिक प्रसंग येतात. कायमच सगळे गोडी गुलाबी मध्ये होत नाही ना. कधी वाद , भांडणे ही होणारच . जवळच्या लोकांचे आजारपणं , मृत्यू , कधी नोकरी मध्ये चढ उतार , आपली आजारपणे , accident . कधी आनंदाचे क्षण , नोकरी मध्ये बढती. नवीन मोठे घर घेताना , गाडी घेताना येणाऱ्या अडचणी ,येणारी इतर संकटे, काही महत्वाचे निर्णय अशावेळी साथ देणारी व्यक्ती पाहिजे. तो आधार कायम साथ देणारा पाहिजे. तेव्हा साथ सोडून देणारा नको.
अर्थात हे असे सहज समजणे ही शक्य नाही पण थोडा सहवास .मधून मधून थोडी पारख , परीक्षा यातून च नक्की. प्रेम आहे का फक्त शारीरिक आकर्षण , वासना नको.
नाती दीर्घकाळ टिकवायची असतील तर शारीरिक आकर्षण ही महत्वाचे पण शरीर सौंदर्य हे वयानुसार कमी होणार. आपले अवयव थकणार तेव्हा तुमच्या मधल्या चांगल्या गोष्टी , गुण , तुमच्या मधले bounding महत्वाचे आहे . भावना समजून घेणारी आपली व्यक्ती .जी कायम साथ देईल ती महत्वाची. तर क्षणिक गोष्ट झाली सोडून गेली अशी नको.
आयुष्य सुंदर आहे खरे प्रेम तुम्हाला मन , शरीर दोन्ही ही देणारच आहे.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


