Skip to content

तुमच्या मुलांना एका कॉउन्सिलरची गरज आहे, हे कसे ओळखावे ??

तुमच्या मुलांना एका कॉउन्सिलरची गरज आहे, हे कसे ओळखावे ??


गीतांजली जगदाळे

(मानसशास्त्र विद्यार्थिनी)


तुमच्या मुलाच्या व्यक्तिमत्त्वातील बदल पाहून तुम्हाला प्रश्न पडू शकतात, “माझ्या मुलाला थेरपीची गरज आहे का?” काहीवेळा हे बदल एखाद्या वाईट घटनेनंतर झालेले असतात, तर इतर वेळी ते आपल्या डोळ्यांसमोर तरी असं काहीच घडलेलं नसत आणि तरी देखील ते बदल झालेले दिसून येतात.

कारण काहीही असो, या बदलांकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे कारण ते तुम्हाला तुमच्या मुलासाठी समुपदेशन करावे का आणि करायचे असल्यास कधी आणि केव्हा करावे हे निर्धारित करण्यात मदत करू शकतात.

तुमच्या मुलांच्या आयुष्यात असे बरेच टप्पे येतात जे तुम्ही एक पालक म्हणून अगदी सहजपणे हाताळता. पण काही वेळा काही मुलांच्या आयुष्यात असेही टप्पे येतात जे आपण पालक म्हणून हाताळू शकत नसतो आणि त्याला एका therapist ची गरज असते.मानसिक आजार किंवा समस्या या सर्व वयोगटातल्या लोकांच्या आयुष्यात येत असतात.

बऱ्याच वेळा असे दिसून येते की अगदी लहान मुलांच्या आयुष्यात देखील चिंता, नैराश्य येत असते. पण लहान मुलांना या भावना किंवा आणखी काही गोष्टी share करता येतीलच याची शक्यता कमी असते. एकतर मुळात ते या सगळ्या गोष्टी समजण्यासाठी फार लहान असतात, आणि त्यात बऱ्याचदा त्यांच्या वागणुकीला त्यांना आपण रागवत असतो, ओरडत असतो त्यामुळे त्यांना जी भीती वाटत असते त्यामुळे देखील ते अशा गोष्टी सांगणं टाळत असतात.

पण जर याच सर्व गोष्टी तुमची मुले एका थेरपिस्ट कडे बोलू शकत असतील, तर त्याला काहीच हरकत नसावी. कारण एक प्रोफेशनल थेरपिस्ट नक्कीच ती विशिष्ट लक्षण समजून घेऊन योग्य ती थेरपी तुमच्या मुलाला देऊ शकतील. तर आपल्या मुलाला थेरपिस्ट ची गरज आहे की नाही हे ओळखण्यासाठी पुढे काही लक्षण दिलेली आहेत-

१. वर्तनातील बदल:-

जर तुम्हाला तुमच्या मुलांच्या वागणुकीत काही बदल जाणवत असेल जो विचित्र वाटत असेल, त्याच्या खाण्या-पिण्याच्या सवयी , म्हणजे नीट खात नसेल किंवा नीट झोपत नसेल, आणि झोपला तरी दचकून जागा होत असेल तर खाण्याच्या किंवा झोपेच्या आजारानिगडीत काही असण्याची शक्यता असू शकते. तरी तुम्ही ते मूल का कमी जेवत असेल याचा शोध घेण्याचा प्रयत्न करा. झोपेचा प्रॉब्लेम नक्की कशामुळे होत आहे, आपलं मूल कशाला घाबरत असेल तर ते माहित करून घ्या.

२. कारण नसताना नाराज राहणे, दुःखी होणे:-

आपले मूल आपल्या खूप जवळ असूनदेखील कधी कधी आपल्याला त्याच्या संबंधी काही गोष्टी माहित नसतात. जस की, शाळेतल्या स्पर्धांमुळे, अभ्यासामुळे त्याच्यावर जास्तीचा ताण येत असेल, किंवा शाळेत कोणी त्याला त्रास देत असेल तर या गोष्टी मुले बऱ्याचदा स्वतःपाशी ठेवतात ,कारण त्यांना या गोष्टी सांगायला लाज वाटत असते. पण आपण अशा गोष्टी शोधून काढू शकता. कारण अशा गोष्टींमुळे चिंता, एकटेपणा, सतत उदास राहणं, कशातच मन न रमण अशा गोष्टी होत असतात.

३. स्वतःला एकटं ठेवणे:-

आपल्या वयाच्या मुलांपासून, आजूबाजूच्या लोकांपासून, आणि पालकांपासून जेव्हा मुले एकटी राहायला लागतात, तेव्हा नक्कीच काहीतरी बिनसलंय किंवा चुकीचं घडतंय असं असण्याची शक्यता असते. आणि असं एकटं राहण्याचं कारण जर मुलं पालकांसोबत share करत नसतील, तर अशावेळी पालकांनी नक्कीच थेरपिस्ट ची मदत घ्यावी.

४. मृत्यूचा वारंवार उल्लेख करणे:-

बऱ्याच लहान मुलांना जीवन आणि मृत्यू या विषयांबद्दल उत्सुकता असते. पण मुले जेव्हा अशा विषयांवर बोलत असताना त्यांचा स्वर (tone) कशापद्धतीचा आहे, तो विषय ते किती वेळा काढतात आणि कोणत्या प्रकारची माहिती घेण्याचा प्रयत्न करतात यावर लक्ष द्यावे. तुमचं मुलं जर आत्महत्या किंवा खून याबद्दल फार वेळा बोलत असेल तर तुम्हाला थेरपिस्ट ची मदत घेणे गरजेचे आहे.

५. आरोग्याच्या तक्रारी:-

तणाव आणि नैराश्यामुळे देखील आरोग्याच्या तक्रारी उद्भवू शकतात जस की डोकेदुखी, पोटदुखी, पॅनिक अटॅक इत्यादी. यासाठी नेहमी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. पण डॉक्टरांचे उपचार होऊन सुद्धा या गोष्टी थांबत नसतील तर थेरपिस्ट ची मदत घ्यावी.


आजच मुलांचं योग्य करीअर कॉउन्सिलिंग करून घ्या. यासंदर्भात खालीलप्रमाणे संपूर्ण माहिती नमूद करण्यात आलेली आहे. Online Career Counseling द्वारे निरनिराळ्या मानसशास्त्रीय किंवा करिअर चाचण्या घेऊन मुलांची योग्य करिअरची दिशा ठरवूया. Online असल्याने पालकांना आणि मुलांना कोठेही यायची-जायची गरज नाही.


Online Career Counseling साठी !

👇👇

क्लिक करा



करीअर काउंन्सिलिंगचा नेमका अर्थ समजून घ्या!


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!