आई-बाबांचे चुकून पाहिलेले नैसर्गिक संबंध, याचा मुलांच्या व्यक्तिमत्वावर होणार परिणाम..
सोनाली जे.
मध्यंतरी व. पु. काळे यांच्या पुस्तकात या धर्तीवर एक गोष्ट वाचली होती. त्यात नवरा बायको सकाळी पासून कुजबुज सुरू असते. बायको म्हणते हो त्याने नक्की बघितले हो त्याने . काय विचार करत असेल आता तो आपल्या बद्दल.
नवरा तिला समजून सांगतो अग नाही ग त्याने तसे काही बघितले नसेल . . नवरा म्हणाला त्याला बदल म्हणून मी सचिन सोबत आज बाहेर बिच वर प्पाठविले . तिकडून तो हॉटेल मध्ये घेवून जाणार आहे त्याला. दिवसभर थोडे वेगळे विश्व मिळेल त्याला तरी तो दिवसभराच्या गमती जमती मध्ये रमून जाईल तो.
असे तो जरी तिची समजूत घालत होता तरी मनातून त्याला ही थोडे अस्वस्थ होत होते. मध्येच सचिन ला फोन करून विचारले की काय कसे काय आहात ..काय सुरू .मग समुद्रकिनारी मजा करतो . आनंद खरेच खूप आनंदात आहे हे समजल्यावर त्याला थोडेसे हायसे वाटले.
संपर्ण दिवस ती मात्र त्याच विचारात होती.
आई-बाबांचे चुकून पाहिलेले नैसर्गिक संबंध आणि मुलांच्या व्यक्तिमत्वावर होणार परिणाम..हा गुंता कसा सोडवावा , आणि खरेच त्याने पाहिले का याची खात्री ही नाही . या विचारात असताना आई वडिलांनी मार्ग काढला की घरी राहिला , आपल्या समोर असला तर आपल्या मनात सारखी. धास्ती आणि मग आपण थोडे वागणे बदलणार त्यापेक्षा त्याच्या ही डोक्यातले जर त्याने काही बघितले असेल तर बाहेर गेल्यावर , नवनवीन गोष्टी बघताना , आनंद घेताना त्याला कालच्या घटनेचा विसर पडेल हीच मानसिकता होती त्यांची.
आई-बाबांचे चुकून पाहिलेले नैसर्गिक संबंध आणि मुलांच्या व्यक्तिमत्वावर होणार परिणाम..काय होत असतील परिणाम ?
हा गुंता कसा सोडवावा.?
खरे तर आई आणि बाबा जर खरेच खूप मोकळेपणाने एकमेकांशी. , घरात सगळ्यांशी , मुलांसोबत बोलत असतील , वागत असतील . तर त्यांच्या सगळ्यांच्या मध्ये नाते खूप दृढ असते. अर्थात एव्हढे ही मोकळे नको की पाश्चात्य संस्कृती प्रमाणे मुलांसमोर सगळेच . तसेही नको.
पण कधी तरी बायकोला सर्वांच्या समोर छान केलेस म्हणून पाठीवर थाप , थोडेसे सर्वांच्या समोर जवळ घेवून कौतुक करणे. यातून मुलांना ही थोडी सवय होते किंवा त्यांची मानसिकता तयार होते तशी की आई बाबा यांच्यातल्या स्पर्शाची जाणीव पण ती healthy दृष्टीने होते. त्यात गैर काही वाटत नाही.
पण जर मुलांना असे काही माहिती नसेलच . आणि चुकून त्यांनी आई बाबांचे नैसर्गिक संबंध बघितले तर त्यांना ती माहिती नसते. अर्धवट वय असेल तर तशी अर्धवट माहिती असतें . आणि लहान असतील तर तेवढी समज नसते. नक्की काय आहे आणि हे असे कसे म्हणून काही वेळेस मुले घाबरून ही जातात. कारण आई बाबांच्या मध्ये नेहमी पेक्षा काही तरी वेगळे सुरू असे वाटते.
काही वेळेस त्याचा परिणाम मुलांवर एव्हढा होतो की त्यांना तो धक्का बसल्यासारखे वर्तन करू लागतात. बेचैन होतात. एकलकोंडी होतात. तर काही वेळेस अर्धवट माहिती असताना असे काही निदर्शनास आले तर मग त्यांच्यातली जिज्ञासा वृत्ती वाढू लागते. मग त्यांना अजून जाणून घेण्याची इच्छा होते.
आणि मग ते इतर वेळी ही नकळत अजून जास्त लक्ष ठेवून असतात आई बाबांवर. त्यांच्या हालचालींवर . अशा वेळी आई बाबा काही बोलत असतील मुलासोबत तर तो एकदम घाबरल्या सारखे दिसतो.
आई-बाबांचे चुकून पाहिलेले नैसर्गिक संबंध आणि मुलांच्या व्यक्तिमत्वावर होणार परिणाम..हा गुंता कसा सोडवावा.
१. मुले एक तर घाबरतात. अशावेळी त्यांना वाटते की आई वडील यांच्यात काही फार वेगळे घडत आहे. कदाचित कधी बघितले नसते त्यामुळे ती भांडणे ही वाटू शकतात. किंवा काही तरी वेगळे आहे. आणि हे आपण बघितले याची भीती त्यांना जास्त वाटते. आणि मग ती डिस्टर्ब होतात. एकटी राहणे पसंत करतात. काही वेळेस आई बाबांना त्यांचा वेळ मिळावा म्हणून ही मुले एकटी राहतात.
अशावेळी आई वडिलांनी मुलांना खूप समजून सांगितले पाहिजे की हे natural आहे. यात आमच्या दोघात जे आहे ते natural आहे. मग शारीरिक बदल . मातृत्व . याविषयी थोडी माहिती. त्यांना समजेल अशा आणि त्यांच्या वयानुसार माहिती देणे गरजेचे.
लग्नानंतर प्रत्येकाच्या आयुष्यात जोडीदार येतो. याची माहिती देणे गरजेचे. शिवाय समाज आणि बंधने .
मुलाने एकटे राहू नये म्हणून त्याच्या सोबत बाकी ही विविध विषय बोलावें. भीती जावी आणि त्याचे व्यक्तिमत्त्व मोकळेपणाने घडावे याकरिता स्पष्ट आणि वयात आल्यावर घडणाऱ्या बदलांची माहिती करून देणे गरजेचे असते.
२. मुले एकदम introvert होतात. कोणाशी बोलणे नाही. आणि स्वतच्या विश्वात दंग होतात. अशावेळी जरी introvert होणे ही चांगले पण म्हणजे काय हे समजावून सांगणे गरजेचे असते. एकटे राहणे म्हणजे introvert नाही. तर आपल्या मधल्या चांगल्या गोष्टी , क्षमता यांची जाणीव आणि आपल्यातल्या उणिवा , कमतरता यांची माहिती करून घेणे तसेच दुसऱ्या बद्दल माहिती करून घेणे .
तर ते व्यक्तिमत्त्व प्रगल्भ होण्यास मदत होते.
३. मुलांचा एकलकोंडेपना वाढू नये म्हणून त्यांच्या सोबत वेळ घालवावा. कधी खेळ , त्यांचे छंद , अभ्यास , मनोरंजन यातून जास्तीत जास्त वेळ त्यांच्या सोबत घालवावा.
४. मुले जर लहान असतील काही समजणे अजून शक्य नसेल तेव्हा त्यांना काहीच सांगू नये. शांत राहावे . पण वेळ मात्र त्यांना ही द्यावा. अनेक activities मध्ये ,outdoor games मध्ये , मित्र मैत्रिणी यांच्या सोबत वेळ घालवू द्यावा. त्यांची memory इतर गोष्टीत बिझी ठेवता येतील असे खेळ द्यावें .
प्रत्येकाच्या आयुष्यात नैसर्गिक संबंध या गोष्टींची माहिती ही मिळणार असतेच. माहिती होणार असतेच. पण ती त्या वयात होणे गरजेचे असते. याकरिता आई बाबांनी ही खूप जपून वागावे. मुलांना कुठे एकटे आहोत अशी जाणीव होवू देवू नये. आणि खूपच सावध राहून गोष्टी केल्या पाहिजेत. अर्थात हे सगळे नैसर्गिक असल्यामुळे काही वेळेस त्यावर आपण खरेच त्यावर नियंत्रण ठेवू शकत नाही. पण काळजी घेणे जरुरीचे.
आजच मुलांचं योग्य करीअर कॉउन्सिलिंग करून घ्या. यासंदर्भात खालीलप्रमाणे संपूर्ण माहिती नमूद करण्यात आलेली आहे. Online Career Counseling द्वारे निरनिराळ्या मानसशास्त्रीय किंवा करिअर चाचण्या घेऊन मुलांची योग्य करिअरची दिशा ठरवूया. Online असल्याने पालकांना आणि मुलांना कोठेही यायची-जायची गरज नाही.


लेख आवडला