तुमच्या मुलीला वयात आल्यानंतर होणारे शारीरिक-मानसिक बदल कसे समजावून सांगाल?
सोनाली जे.
पूर्वी आई मुलगी , बहिणी बहिणी, वडील आणि मुलगी यांच्यात तेवढे मोकळेपणाने बोलले जात नसे. पूर्वी मुलगी किंवा मुलगा वयात येताना त्यांच्या शरीरात होणारे बदल किंवा harmonal changes मुळे मानसिक , भावनिक बदल याविषयी घरच्यांना च तेवढे माहिती नसायचे तर ते कुठून मुलांना सांगणार ? कारण पिढ्यानपिढ्या संकोच , अज्ञान , गैरसमज , भीती , मोठ्यांचा मान ठीक पण बोलणे नाही. यात च पूर्वीच्या पिढी वाढल्या त्या काय योग्य ते मार्गदर्शन करणारं ?
परंतु आता परिस्थिती बदलली आहे. पालक आणि मुले यांच्यात खूप मोकळेपणाने संवाद साधला जातो.
तुमच्या मुलीला वयात आल्यानंतर होणारे शारीरिक-मानसिक बदल कसे समजावून सांगाल ?
खरे सांगायचे झाले तर मुली वयात येताना म्हणजे नेमके काय होते याची समज , माहिती ही आजकाल चौथी ते पाचवी पासून च मुलींना शाळेत , शिक्षिका , एखादी documentary व्दारे देण्यात येते.
शाळेत सगळ्या वंयोगटातल्या मुलींना एकत्र याची माहिती देण्यात येत असते. त्यामुळे मुली , मैत्रिणी , शिक्षिका यांच्यात त्यानंतर चर्चा ही होते. शिक्षिका परत परत मार्गदर्शन ही करत असतात.
त्यामुळे घरी आई , वडील किंवा बहीण यांना वयात येत असणाऱ्या आपल्या मुलीला , बहिणीला याविषयी माहिती देणे आणि वयात आल्यानंतर होणारे शारीरिक-मानसिक बदल समजावून सांगणे सोपे जाते.
स्नेहल ला दोघी मुलीचं . दोघित दोन वर्षाचे अंतर. एक आभा आणि दुसरी राधा. दोघींच्या सोबत स्नेहल चे अगदी मैत्रीपूर्ण नाते होते. कोणतीही गोष्ट असेल तर तिघी एकमेकांशी मोकळेपणाने बोलत . आज शाळेत काय झाले पासून मैत्रिणी , त्यांची भांडणे असतील किंवा बाहेर काही खाणे पिने. सगळे काही तिघी ही सांगत. स्नेहल पण तिच्या मित्र मैत्रिणी , त्यांचे गेट टुगेदर असेल किंवा बाहेर भेटणे , अगदी एकमेकात वाद झालेले सगळे सांगत असे. मुलींना ही कधी कधी ग्रुप सोबत घेवून जात असे.
स्नेहल ला आता आभा मधले बदल जाणवू लागले. ओठांवरती लव येवू लागली. अजून मुलींना अंघोळ मात्र स्नेहल स्वतः घालत होती कारण मुलींचे हे बालपण परत येणार नाही असे तिला नेहमी वाटतं असे. काही काही वेळा तर स्नेहल स्वतः मुलींच्या सोबत एकत्र आंघोळी करिता जात असे. अर्थात त्या अगदी लहान असल्यापासून कारण त्यांना कोण बघणार म्हणून बहुदा ही दोघींना आंघोळ घालून बाथरूम मध्ये टब मध्ये कोमट पाण्यात बसवून ठेवत असे. सोबत दोन चार खेळणी नाही तर बाहुल्या दोघींच्या म्हणजे त्या आंघोळी घालत बाहुलीला .तेवढ्यात स्नेहल आंघोळ करून तिच्या सोबत दोघींना बाहेर घेवून येत असे. त्यामुळे मुली आणि स्नेहल यांच्यात अगदी सुरुवाती पासून मोकळेपणा होताच.
आता मात्र आभाला आंघोळ घालताना तिच्या शरीरातले होणारे बदल स्नेहल ला जाणवू लागले. वयात येताना शरीराच्या नाजूक भागावर येणारी लव .हळू हळू दिसू लागणारी Breast मधली डेव्हलपमेंट , या वयात एक फिगर निर्माण होवू लागते. तशी..
यावरून तिने ठरविले की आता दोघींनाही समजून सांगण्याची वेळ आली आहे. दोघी मुलींना जवळ घेवून शांतपणे स्नेहल ने समजावले. सुरुवात करताना म्हणले की शाळेत तुम्हाला काही गोष्टीबद्दल माहिती दिली च आहे. जसे good touch , bad touch. तसे तुमच्या शरीरात होणारे बदल याची माहिती दिली ना तुम्हाला. ?
तरी मी थोडी जास्त deep मध्ये माहिती देणार आहे. आपण लहान बाळ असताना कसे होतो. मग पहिले तीन महिने मान ही धरता येत नव्हती तेव्हा पूर्ण पाठीवर झोपून. मग हळूहळू शरीरात .. मानेत ताकद येवू लागल्यावर मान धरू लागल्यावर मग पालथे पडणे , पुढे सरकणे , रांगणे , हळूहळू बसायला लागणे , मग धरून उभे राहायचे. मग सुटे उभे राहायचे. सुरुवातीला एक पावूल पुढे टाकून चालायला शिकायचे.हळूहळू थोडे अंतर चालणे .छान balance करून चालणे , पळणे असा progress होत असतो. तसे आपले शरीर आणि मन यांची ही वाढ होत असते.
एखादे झाड लावायचे ठरविले तर आधी खड्डा खणून घ्याल , चांगल्या प्रतीची माती घेवून याल. चांगल्या प्रती चे बीज म्हणजे ही . ते बी पण्यात भिजवून ठेवाल. मग ते दुसरे दिवशी त्या खड्ड्यात पेराल आणि त्यावर माती पसरून टाकालं.आणि रोज थोडे थोडे पाणी त्यावर घालत राहाल. आठवडाभरात छान कोंब फुटेल. कोंब वाढीस लागेल. एखादे पान फुटू लागेल .. मग छोटे रोपत्यात रूपांतर होते. हळूहळू ते झाड वाढू लागते.
मग त्याला कळी येवू लागते. कळीचे रूपांतर फुलात होते आणि फुलाचे रूपांतर फळात होतें . छोटे फळ असते ते वाढू लागते आधी कच्चे असते. ते हळूहळू पक्व होवु लागते. ते झाडावर तसेच राहिल्यावर मग ते फुटून परत त्याच्या बिया इकडे तिकडे पडून परत नवीन रोप तयार होते.
हे अगदी सहज समजले दोघींना. मग स्नेहल ने सांगण्यास सुरुवात केली . आपले शरीर ही असेच हळूहळू develop होत असते. आपल्यात ही असेच नैसर्गिक बदल घडत असतात. आणि हे घडलेच पाहिजेत. त्या त्या वयात ती ती डेव्हलपमेंट होणे गरजेचे.
आपल्याला फक्त बाह्य बदल जाणवत असतात. जसे उंची वाढणे , जाडी किंवा फिगर , तसे पूर्ण शरीर आतून आणि बाहेरून ही बदल घडत असतात. अंतर्गत बदल ही घडत असतात. हार्मोन बदलत असतात. त्यामुळे शरीरावर लव दिसू लागते. आणि वयात आल्यानंतर त्या त्या काळात सुरुवातीला शरीर जड वाटणे , डोके दुखी , मळमळ , पाठदुखी, कंबर दुखी , पोट दुखणे हे कधी कधी जाणवू शकते. तर कधी खूप झोप येते. थोडा थकवा , अशक्तपणा येवू शकतो.
पण एक परिपूर्ण स्त्री घेण्याकरिता या basic गोष्टींची गरज असते. यातूनच वयात येणे म्हणजे मासिक पाळी .चक्र सुरू होते. त्यात दर महिन्याला बीज निर्मिती होत असते. आता ही सुरुवात असते. त्यामुळे कधी महिना , दोन महिने असे अनियमित ही सुरुवात होते. पुढे regularise होवू लागते. पण ही सुरुवात पुढे जावून आपल्याला मातृत्व येण्याकरीता उपयोगी असते. आणि स्त्री त्या बाबत नशीबवान आहे की तिला ही निसर्गदत्त देणगी मिळाली आहे. मुळात स्त्री खूप सहनशील असते. त्यामुळे प्रत्येक गोष्ट ती सहज सहन करू शकते.
पण बरेचदा अशावेळी हार्मोन्स मधले बदल , मासिक चक्र अनियमित असणे याला कारण हार्मोन्स असते. मग कधी कधी आपण फ्रेश राहावे , सगळे त्रास जसे पाठदुखी असे होत असतात. पोटदुखी तेव्हा डॉक्टर ना विचारून योग्य औषधोपचार करता येतात. म्हणून होणारे त्रास हे नेहमी observe करायला शिकले पाहिजे. Dates ची नोंद ही ठेवणे जरुरी.
त्रास होत असेल तर विश्रांती घेणे जरुरी असते. भावनिक बदल म्हणजे उगीच चिडचिड होतें . काय कटकट आहे, उदास वाटते. निराश वाटते , असे होते. कधी तरी चेहऱ्यावर येणारे फोड , पिंपल्स याची सवय नसते. ते त्रासदायक वाटू लागते. पण त्यावर ही घरगुती उपाय ही असतात किंवा डॉक्टर औषधे सुचवितात.
फक्त आपल्या मनात आणि शरीरात होणारे बदल लक्षात घेवून त्रास असेल तर तो मोकळेपणा ने सांगणे गरजेचे आहे. मेडिकल सायन्स प्रगत झाले आहे . बरेच उपाय सहज available आहेत.
आणि सगळ्यात महत्वाचे हे शरीर आणि मन यात होणारे बदल मोकळ्या मनाने स्वीकारा. प्रत्येक स्त्री ला हे चक्र पार पाडावे लागतेच. फार काही वेगळे आपल्याच बाबत होते हे मनातून पूर्णपणे काढून टाका दोघींनी. आपण जसे रोज सकाळी उठल्यावर दात घासतो. वॉश रूम ला जातो..अंघोळ करतो .तसेच हे routine आहे असेच समजा. आणि फार काही वेगळे घडते हे मनातून काढून टाका.
सगळ्या गोष्टी पूर्वी प्रमाणेच मनमोकळेपणे करा. त्यात कुठेच काही अडचणी येत नाहीत.
तुमच्यात जसे बदल घडतात तसे मुलांच्यात ही घडतात . त्यांना मिशा , दाढी येते. आवाज घोगरा होवू लागतो. बरेचदा हा बदल माहिती नसतो त्यामुळे मुले बोलायला ही लाजतात. कमी बोलतात.
उलट हे नैसर्गिक बदल मुलींमध्ये घडून येणे ही चांगली sign आहे. उगीच च आता माझ्यावर बंधने येणार या गोष्टी डोक्यातून काढून टाका. जिथे आहेत ती बंधने वयानुसार सांगेन आता त्याचा विचार करू नका. आणि मी तुमच्या सोबत आहे ना काही ही असेल तरी मी आहे . हा विश्वास असे स्नेहल ने मुलींना समजावले. मुलींना विश्वास दिला . तर आभा आणि राधा यांनी आईला घट्ट मिठी मारली. तू आई नाहीस आमची बेस्ट friend आहेस.
तेव्हा स्नेहल म्हणाली प्रत्येक आई हे आपल्या मुलींना समजून सांगत असतेच. जसे आईचे कर्तव्य तसे वडील ही मुलींना हे सांगतात बरं . माझे आणि माझ्या बाबांचे नाते खूप मोकळेपणा चे होते त्यामुळे त्यांनी स्वतः या गोष्टी मला सांगितल्या आहेत. त्यात लाजण्यासारखे . लपविण्यासरखे काही नाही. आपल्या बाबांना हे माहिती असतेच. आणि वेळप्रसंगी ते आपल्याला मदत ही करतात. फक्त मोकळेपणाने सांगत जा. मी असतेच पण कधी नसेन तर बाबा हे आपलेच असतात . बहीण आहे . तिला सांगायचे. आभा आणि राधा ही दोघी एकमेकींच्या गळ्यात पडल्या.
आयुष्य सुंदर आहे. नैसर्गिक बदल होणार ते स्वीकारून मोकळेपणा ने अजून सुंदर जगा.
आजच मुलांचं योग्य करीअर कॉउन्सिलिंग करून घ्या. यासंदर्भात खालीलप्रमाणे संपूर्ण माहिती नमूद करण्यात आलेली आहे. Online Career Counseling द्वारे निरनिराळ्या मानसशास्त्रीय किंवा करिअर चाचण्या घेऊन मुलांची योग्य करिअरची दिशा ठरवूया. Online असल्याने पालकांना आणि मुलांना कोठेही यायची-जायची गरज नाही.


best