नातं सिद्ध करण्यासाठी नको त्या गोष्टी जगासमोर आणणे म्हणजे बावळटपणा!
सोनाली जे.
पूर्वी नाती कायमस्वरूपी टिकत. तडजोड , समजून घेणे , समजावून सांगणे , कधी मोठ्यांची . वडीलधाऱ्या मंडळींची मध्यस्थी , आणि दोघांपैकी कोणी चुकले तरी इगो न बाळगता , मी का किंवा मीच का असे विचार न करता माफी मागून परत गोडी गुलाबी ने एकत्र येत असत.
आज काल मात्र नाती टिकविणे हेच अवघड झाले आहे. आणि जी काही नाती आहेत ती सतत सिद्ध करावी लागतात. आणि बरेचदा नातं सिद्ध करण्यासाठी नको त्या गोष्टी जगासमोर आणाव्या लागतात. आणि उलट यातून ते नाते सिद्ध होण्याऐवजी लोक त्याकडे त्यांचा बावळटपणा म्हणून बघतात.
काही वेळेस खरेच मनापासून नाते जोडण्याचा प्रयत्न असतो आणि जोडलेले नाते टिकविण्याचा ही प्रयत्न असतो. त्याकरिता सतत पुरावे , खात्री द्यावी लागत असते.
आणि याची गरज का पडते ? बहुदा स्त्रियांना याची जास्त गरज पडते. कारण त्यांना commentment पाहिजे असते. Commitment नसेल तर ते नाते secure वाटत नाही त्यांना.
मध्यंतरी करीना कपूर आणि अर्जुन राजपाल यांचा आलेला सिनेमा यांचा सिनेमा ” हिरोईन Heroine ” . यात अर्जुन राजपाल म्हणजे आर्यन याचे लग्न झालेले असते . एक मुलगा असतो आणि त्याने divorce करिता case file केली असते. तर माही चांगली heroine आर्यन आणि माही यांच्यात संबंध .
ते लग्न ही करणार असतात आर्यन ला divorce मिळाल्यावर. पण माही प्रत्येक वेळी आर्यन वर संशय घेते. त्याच्याकडून तिला कमिटमेंट पाहिजे असते. ती तिचे त्याच्यावर प्रेम आहे हे अनेक प्रकारे सिद्ध करत असते. अगदी आर्यन फिल्म शूटिंग मध्ये असेल आणि एखादा बेड सीन असेल तरी माही तिथे जावून ऑब्जेक्शन घेते. आर्यन सोबत वाद घालते. सीन शूटिंग सुरू तिथे तिच्यामुळे शूटिंग थांबते. मीडिया मध्ये ही खबर लिक होवून दुसरे दिवशी पेपरची headline असते. माही मुळे शूटिंग थांबले याची.
थोडक्यात काय माही आर्यन बरोबर relationship मध्ये आहे पण लग्न करणार आहेत . हे नाते सिद्ध करण्याकरिता , जगासमोर आणण्याचा प्रयत्न च तर करते. पण त्यातून तिचा बावळटपणा ती जगासमोर आणत असते. आणि स्वतः चे हसे करून घेत असते. त्यातून मग सतत डिप्रेशन येवून त्याकरिता गोळ्या घेत असते.
आर्यन तिला वेळोवेळी सांगत असतो आपण थोडा ब्रेक घेवू . आपल्या नात्याला थोडा वेळ देवू. तोपर्यंत त्याचा divorce पण होईल. पण माही ला वाटत असते आर्यन मुद्दाम टाळतो तिला.
एकदा तर कहर होतो की ती आर्यन सोबतचे सेक्स व्हिडिओ रेकॉर्ड करते. आणि जेव्हा तिचा annie movie release होणार तो चालावा म्हणून ती आर्यन सोबत चे आपले व्हिडिओ viral करते.आर्यन टॉप चा hero असतो. त्याच्या बरोबर चे नाते जगापुढे सिद्ध करण्यासाठी नको त्या गोष्टी जगासमोर आणते आणि स्वतः मीडिया च विषय बनते. अर्थात तिची movie चालते पण आर्यन तिचा नंबर सुधा कायमचा delete करून टाकतो. म्हणजेच काय तर माही कायमचे आर्यनला गमावण्या चा बावळटपणा करते. !!
बरेचदा अशीच नाती सिद्ध करण्याची गरज भासते जी समाज , कायदा , नातेवाईक यांच्या दृष्टीने अजून एकरूप झालेली नाहीत. आणि त्यामुळेच ती नाती असुरक्षित वाटतात. त्यात कमिटमेंट असणे जरुरीचे वाटते. अगदी भावनिक आणि शारीरिक दृष्ट्या एकत्र येवून ही त्यात ती टिकतील याची खात्री नसते. मग अगदी मैत्री सुधा. कारण आपल्या सारखी इतर कोणाबरोबर मैत्री असूच शकत नाही हा आपला गैर समज असतो किंवा आपल्या मनात काही तरी भलते असते. किंवा मग मैत्री मध्ये आपण स्वार्थी असतो.
कारण बरेचदा आजकालचे रिलेशनशिप , त्यात पटले तर टिकवायचे नाही तर नाही .., अनैतिक सबंध , पण जो , जी भावनिकदृष्ट्या खूपच गुंतलेली असतात त्या एका कोणाला तरी मानसिक त्रास होत असतो. ती मानसिक स्थैर्य आणि कमिटमेंट , सुरक्षितता याकरिता धडपड करत असते. थोडक्यात ते तिचे behaviour obsessive होत जाते. आणि मग आपले नाते prove करण्याची गरज पडू लागते ..
मग कधी जोडीदार किती आवडतो याकरिता त्याला सतत i love you म्हणणे असेल तर कधी त्यांचे नाते सिद्ध करण्याकरिता अगदी आत्महत्या प्रयत्न असेल जगासमोर त्यातून नाते आले तरी वाईटपणा च येणार आहे. आणि सगळ्यात जर दोघे जोडीदार च एकमेकांना समजून घेत नसतील .
त्यांच्यात ते bounding कायमचे नसेल .तर दुसऱ्या कोणी किती ही प्रयत्न केले त्यांचे नाते टिकावे म्हणून तर ते व्यर्थ असतात.
जगा समोर तुम्ही तुमच्या नात्याचे तमाशे करता. हसू करून घेता, तर कधी कधी सहानुभूती मिळविता की अरे रे किती हे प्रयत्न नाते सिद्ध करण्याचे.
त्यापेक्षा ज्यांचे खरे नाते , प्रेम आहे आणि जेव्हा लक्षात येते की आता आपल्यात परत परत नाती सिद्ध करण्याचे प्रयत्न ही असफल होत आहेत. आणि एकमेकांना किती ही सांगून , बोलण्याचा प्रयत्न करून , समजावून सांगून ही ते नाते अधांतरी असते. आणि एक अशी वेळ येते की दोघांनी दोघांना त्यांची space देणे गरजेचे असते.
सतत एकत्र , जवळ राहून , त्याच त्याच अपेक्षा करून , तेच वातावरण , तेच विषय राहून वाद आणि दुरावा येण्यापेक्षा थोडा काळ दोघांनी mutually आपल्या नात्याला वेळ द्या, स्पेस द्या. मोकळेपणाने जगू द्या एकमेकांना. सतत एकमेकांचा वॉच एकमेकावर असल्या सारखे वागू नका आणि वागवू ही नका. कारण तुमच्या प्रमाणे इतर ही नाती जपायची असतात. त्यांना ही वेळ देणे गरजेचे असते. काही कर्तव्य पूर्ण करणे गरजेचे असते.
नाते जर मनापासून असेल तर त्याला सिद्ध करण्याची गरज नसते. ते आपले मानले तर कायम आपलेच आहे. भले काही क्षण , काही काळ परिस्थिती , वेळ यानुसार त्यात अंतर येईल पण ते तुटणार नाही. त्यामुळे सतत नाते सिद्ध करण्याकरिता नको त्या गोष्टी जसे एकमेकांना मधली जवळीकता , , दोघांचे एकांतात ले क्षण , अगदी सोशल मीडिया वरचे बोलणे असेल किंवा chat , याच जगाला प्रदर्शन करू नका. एकत्र असतानाचे फोटो , videos , काही funny movements या दोघांच्याही पूर्त्या मर्यादित ठेवा. secure life करिता त्याचा डिस्प्ले करू नका. जगा पुढे बावळटपणा सिद्ध करू नका.
ज्या गोष्टी दोघात खूप strong आहेत त्याचे प्रदर्शन जगापुढे मांडून त्या कमजोर बनवू नका. किंवा त्यातून एकमेकां मधला विश्वास गमावू नका. काही गोष्टी , क्षण हे एकमेका करिता खरेच खूप खास असतात ते दोघात ठेवण्यात अजून जास्त मजा आहे. त्या जगापुढे मांडून त्यांना तुमच्या नात्यातली गहनता , त्यातल्या उत्कट भावना , आनंद या कधी ही समजणार नसतात. कारण तुम्ही त्या स्वतः जगले असतात.
तुमच्या करिता त्या खूप deep आणि strong असतात. पण परक्या माणसांना त्या कधीच जाणवू ही शकणार नाहीत कारण ते क्षण ते कधीच जगलेले नसतात. दुसऱ्या कोणाची मध्यस्ती ही नाती strong बनवू ही शकत नाहीत. कारण प्रत्येकाच्या भावना , ओढ ही त्याचे चांगले वाईट अनुभव , मन , हृदय आणि समजून घेण्याची क्षमता ,आपुलकी यावर अवलंबून असते. मेंदू पर्यंत जर भावना , संवेदना पोहचल्या नाहीत तर action होणार च नाही ना. ??आणि मेंदू पर्यंत पोहचविण्यासाठी त्या तेवढ्याच ताकदीच्या ही पाहिजेत ना. .? कमजोर असतील तर कशा पोहचणार ? किंवा विस्कळीत असतील तरी कसे पोहचणार ?
आयुष्य सुंदर आहे. नातं सिद्ध करण्यासाठी नको त्या गोष्टी जगासमोर आणणे म्हणजे बावळटपणा करून आपले सुंदर नाते कोमेजून टाकू नका. त्या ऐवजी निरोगी आणि सुंदर नाते बहरण्या करिता एकमेकांना वेळ द्या. समजून घ्या. आणि आपल्या अपेक्षांचे ओझे टाकू नका. Possessiveness करू नका. अती प्रेमाने जीव गुदमरून टाकू नका. त्याला ही भरभरून मोकळा श्वास घेवू देत.
आणि जिथे नाती परत परत सिद्ध करावी वाटतात. म्हणजे जर पटत च नसेल तर तुम्ही किती ही डोकेफोड केली , दुसऱ्याचे मन वळविण्याचा प्रयत्न केलात किंवा अगदी स्वतः चा जीव घेण्याचा प्रयत्न केला तरी त्या व्यक्ती मध्ये बदल होत नाही. कारण त्याचे ही काही विचार असतात. मत असते. भावना असतात आणि काही अपेक्षा असतात. त्या त्याला ही पूर्ण व्हाव्या असे अपेक्षित असते.
ओढून ताणून कोणती नाती टिकत नाहीत. ती टिकवायची गरज ही पडत नाही जर ती आतून , हृदयातून आली असतील . मन , शरीर एकरूप असेल. आणि वाद कोणात होत नाहीत ? प्रत्येक व्यक्ती भिन्न आहे . प्रत्येकाचे व्यक्तिमत्त्व भिन्न आहे. प्रत्येकाची मते वेगळी आहेत. विचार वेगळे आहेत. म्हणून कधी ही सामंजस्य , तडजोड ही महत्वाची असते. दुसऱ्याला समजून घेणे गरजेचे असते.
आयुष्य सुंदर आहे. नाती सिद्ध करत बसण्यात वेळ घालविणे व्यर्थ आहे त्या ऐवजी नाती फुलविण्याचा प्रयत्न करा.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


