Skip to content

प्रेयसी खट्याळ चालेल पण बायको नको.. यामागे पुरुषांची काय मानसिकता असेल.

प्रेयसी खट्याळ चालेल पण बायको नको.. यामागे पुरुषांची काय मानसिकता असेल.


सोनाली जे.


प्रेयसी म्हणले की कशी मोकळेपणाने , मुक्तपणे , थोडी बिनधास्त अशी असतें . कारण काय होते की रोजचा सहवास , भेटणे , संवाद यातून एकमेकांशी जास्त जवळीक साधतात. एकमेकांचे स्वभाव खूप चांगले माहिती झाले असतात. आवडी निवडी माहिती झाल्या असतात. प्रेयसी बरेचदा खट्याळपणें वागते. कधी कधी चेष्टा मस्करी ही चालते.

कधी कधी लाडात , प्रेमात येवून बाहेर कुठे असेल तरी खट्याळपणा ने ती प्रियकराचा हात हातात घेईल , तर कधी जवळीक करेल तेव्हा कोणी बघते आहे का हे सुधा तिच्या लक्षात येणार नाही.

तर कधी कॉलेज चा अभ्यास करताना अचानक पुस्तके गुंडाळून ठेवून मस्त long drive करिता घेवून जाईल. नाही तर ऑफिस ला जायचे च नाही आज अख्खा दिवस एकत्र च घालवायचा म्हणून तसे आधी प्लॅन्स करून ठेवेल आणि तसेच करायला ही लावेल.

कधी मस्त पावसात स्वतः सोबत त्याला ही ती चिंब भिजायला लावेल. तर कधी एका ठिकाणी भेटायला बोलावेल आणि फोन करेल अरे मला अजून वेळ लागतो आहे. तुला थांबता येईल ना .. नाही तर नंतर भेटू ..असे बोलता बोलता अचानक समोर उभी राहून भौक करून दचकवून टाकेल नाही तर एकदम surprise देईल.

कधी नेहमीच्या पेहरावापेक्षा वेगळे काही तरी घ्यायला त्याला भाग पाडेल आणि मग त्याच्या ही लक्षात येईल की अरे हे छान दिसते की , आधी का नाही आपल्या लक्षात आले. आधी कधी च असे वेगळे काही try केले नाही आपण. असा बदल आवडतो.

कधी कधी चार चौघात खट्याळपणा ने प्रेयसी त्याच्या कडे बघून हलकेच डोळा मारेल . जे तो चाणाक्षपणे हेरेल. तर कधी एकटक डोळ्यात डोळे घालून बघत बसेल. अगदी तासंन तास.

तिच्या मनात येईल तसे करेल आणि करायला ही लावेल. कधी सगळ्या मित्र मैत्रिणी आणि तो मिळून दंगा मस्ती करतील . कधी उशिरापर्यंत रात्री बाहेर एकत्र असतील .

कधी रात्र रात्र फोन वर chat करेल आणि करायला ही लावेल. तर कधी एकत्र असताना त्याने मोबाईल मध्ये डोके. खुपसले तर तो मोबाईल काढूनच घेईल ..का तर तो सगळा वेळ तिच्या सोबत पाहिजे असतो म्हणून.

तर कधी बाहेर कुठे एकत्र असतील तर त्याचा शर्ट घालून बसेल. मस्त थंडीत त्याचे गरम , उबदार जॅकेट घालेल आणि तो मात्र बिचारा ती बोचरी थंडी सहन ही करेल . आणि मग नंतर सर्दी ने हैराण होईल.

अशी ही प्रेयसी कधी कुठे कसा खट्याळपणा करेल काही सांगता येत नाही. पण तरी तो मात्र तिच्या या खट्याळपणा ला कधी कंटाळत नाही.

मात्र हेच बायको ने असा खट्याळपणा केला की मात्र कधी तरी चालवून घेईल पण नेहमी असे घडू लागले तर चिडचिड करेल. जसे ऑफिस ला दांडी मारायला लावली तर एखाद्या वेळेस ठीक पण दोनदा तीनदा झाले तर स्पष्ट सांगेल मला काम करू देत. आणि तरी जरी नाही ऐकले ..हट्ट धरला तर चिडचिड करेल .बडबड करेल. काम सोडून दर वेळेस कसे जायचे सुचते.

अगदी रात्री उशिरापर्यंत बायको सोबत बाहेर फिरायला एकदा दोनदा तो तयार होईल पण नंतर मात्र चिडचिड करेल माझी झोप होत नाही .परत उद्या ऑफिस काम आहे. मीटिंग आहेत. विश्रांती ची गरज आहे.

काम करताना तिला वेळ पाहिजे म्हणून मोबाईल काढून घेतला तर महत्वाचे काम अर्धवट राहील म्हणून चिडचिड करेल. आणि या खट्याळपणा करिता काम बाजूला सोडणे प्रत्येक वेळी शक्य नाही याची जाणीव करून देईल. कामात ही काही कमिटमेंट असतात. त्या पूर्ण करणे गरजेचे असते.

अशा एक ना अनेक गोष्टीत प्रेयसी खट्याळ चालेल पण बायको नको.. मग यामागे पुरुषांची काय मानसिकता असेल.??

कसे असते की प्रेयसी ही आपल्या सोबत असावी , टिकावी असे मनापासून वाटत असते. प्रेयसी ही हक्काने किंवा लग्न या सारख्या बांधनाने कायदा , समाज याने बांधील झालेली नसते. कॉलेज असेल किंवा बाहेर तिच्या रुपावर , स्वभाव यावर भाळणारे इतर ही तरुण असतात. ते ही तिच्या कडे आपली व्हावी म्हणून प्रयत्न करत असतात.

त्यामुळे प्रेयसी चा जो प्रियकर आहे तो कधीच प्रेयसी ला आपल्यापासून कोणत्याही कारणाने तिला दुखावत नाही. तिला चीडन्याची संधी देत नाही. कोणते वाद होतील असे वातावरण ठेवत नाही दोघात. तर आनंदी राहील वातावरण , ज्यातून दोघे उत्साही राहतील , अजून जास्त एकमेकांना समजून घेतील , गप्पा गोष्टी , विविध गोष्टींवर बोलणे . जवळीक साधत राहतील कारण काय तर प्रियकराला प्रेयसी ला गमवायची इच्छा नसते. त्यामुळे

प्रेयसी खट्याळ चालेल . तिची चेष्टा मस्करी खपवून घेईल तो. याउलट , प्रेयसी खट्याळ चालेल पण बायको नको..असे का वाटते ? अशी मानसिकता का तयार होते ?

तर बायको ने आता तरी mature झाल्यासारखी वागले पाहिजे ही अपेक्षा असते. शिवाय समाज , कायदा , लग्न याने ती आता त्याच्या बरोबर कायमची बंधनात अडकलेली असते आणि आता ती कायमस्वरूपी आपली आहे , काही ही झाले तरी आता ती आपल्याला सोडून दुसऱ्या कोणाचाही होणार नाही. मानसिकता त्याची असते.

आणि लग्नानंतर संसार , वाढते आणि न टाळता येणारे रोजचे खर्च वाढतात. जबाबदाऱ्या वाढतात. त्याकरिता नोकरी मधले सातत्य ठेवणे गरजेचे असते.

घरातल्यांना ही लग्न करून दिले आता तरी थोडा समंजसपणा येईल ही अपेक्षा असते. त्यामुळे घरात वडीलधारी मंडळी असतात त्यांच्या समोर असे खट्याळपणा कमी केला पाहिजे त्यावर बंधने पाहिजेत, मोठ्यांचे विचार करून आपण वागणूक ठेवली पाहिजे. अशी मानसिकता तयार होते.

बरं दुसरी गोष्ट प्रेयसी हीच जरी बायको झाली तरी लग्नानंतर तिने काही मर्यादा पाळल्या पाहिजेत , घरतल्यांचे विचार केले पाहिजेत अशी मानसिकता वाढते. पूर्वी दोघेच असतं . बाहेर भेटले तरी दोघेच .पण लग्नानंतर घरात इतर माणसे ही असतात आणि त्यांना आदर , मान , respect देणे , सांभाळून घेणे गरजेचे असते.

त्यामुळे त्यांच्यापुढे खट्याळपणा हा असभ्यतेचे लक्षण मानले जाते. आणि आपल्या बायको कडून असे इतरांना दुखवण्या चे , किंवा असभ्यतेचे लक्षण दिसू नये. तिने इतरांचा तसा इतरांनीही तिचा respect करावा ही इच्छा असते.

थोडक्यात प्रियकर आणि प्रेयसी असताना नाते केवळ दोघांपूर्ते मर्यादित असते. त्यामुळे त्यात फक्त एकमेकांचा आदर करणे , चेष्टा मस्करी , खट्याळपणा चालून जातो.

परंतु समाज , नातेवाईक , घरचे कुटुंबीय यांच्या मध्ये प्रत्येकाचे एक विशिष्ट स्थान असते.प्रत्येकाचे महत्व .आदर हा प्रत्येकाने ठेवावा लागतो. त्यात कधी तरी वेळ बघून चेष्टा मस्करी थोड्या प्रमाणे चालते.

पण प्रियकर प्रेयसी सारखे सतत राहून ही चालत नाही. लग्नानंतर ही थोड्या प्रमाणात राहावे तसे. पण त्या खट्याळपणा च रूपांतर नंतर maturity आणि कुटुंबातील responsible person मध्ये होणे हितावह असते. दोघांच्या पुरते नाते मर्यादित राहत नाही ते सर्वांच्या करिता निभवण्याची जबाबदारी असते.

विचारात , वागण्यात कुठे तरी प्रगल्भता यावी ही इच्छा असते. पुढे जावून मुले होतात तेव्हा मुलांना ही शिस्त लागावी , इतरांचा त्यांनी respect ठेवावा. याकरिता बायको कडून आधी तिने आदर्श कसे असावे मुलांच्याकरिता याकरिता तो खट्याळपणा थोड्या प्रमाणात अपेक्षित असतो. पण सतत नाही.

प्रेयसी खट्याळ चालेल पण बायको नको.. यामागे पुरुषांची काय मानसिकता असेल.तर आपल्या बायकोची जास्त काळजी , संसाराची काळजी , घरातल्या वडीलधाऱ्या व्यक्तींचा respect, एक आदर्श जोडपे , आदर्श मुलगा सून , आदर्श आई वडील म्हणून घरात आणि समाजात ही स्थान असावे.

शिवाय आपल्या बायकोची काळजी . तिच्यात आचरण , विचार यात प्रगल्भता येण्याकरीता प्रयत्न करणे ही मानसिकता. तिच्यात बालिशपणा टिकून असावा पण पोरकटपणा वाटायला नको. म्हणून लग्नापूर्वी हीच बायको प्रेयसी खट्याळ असेल तरी ते चालते पण लग्नानंतर बायको नको.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

.

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!