Skip to content

Online to offline school .. मुलं आणि पालकांची मानसिकता .

Online to offline school .. मुलं आणि पालकांची मानसिकता .


सोनाली जे.


भारतात २०२० पासून आलेल्या corona सारख्या व्हायरस ने खरेच खूप नुकसान केले आहे . सुरुवातीला बरेच परिणाम झाले सामान्य लोक असतील , शाळा , विद्यार्थी , शिक्षक , कॉलेज , ऑफिसेस.यात फायदेशीर ठरले ते ज्यांचे आधी पासून काम ऑनलाईन सुरू होतें . अशा IT company , Recruitment company , यांना उलट फायदाच झाला. पेट्रोल बचत , वेळ बचत , घरात बसून काम , त्यांना पैशाची ही कधी झळ पोहचली नाही.

पण सर्वसामान्य लोकांना खूप अडचणी आल्या. पण यात शालेय विद्यार्थी , कॉलेज विद्यार्थी यांचे बरेच नुकसान झाले. सुरुवातीला अचानक आलेले हे corona संकट आणि सुरू असलेल्या शाळा अचानक बंद कराव्या लागल्या. मार्च मधला ऐन परीक्षेच्या काळात एकदम शाळा बंद. तेव्हा सगळी मुले एकदम खुश झाली. शाळेला सुट्टी म्हणून आनंदात. नंतर समजले परीक्षा होणार नाहीत .

मग काय मुलांच्या आनंदाला उधाण च आले. वार्षिक परीक्षा न देताच परीक्षेमध्ये उत्तीर्ण ही झाली मुल. नंतर सुट्टी . पण असे शाळा बंद ठेवून कसे चालणार होते. काही तरी पर्याय शोधणे गरजेचे होते ना .. मुलांचे किती नुकसान होते याची जाणीव आणि काळजी शिक्षक आणि पालक वर्गाला जास्त होती.

म्हणून सगळ्यांनी प्रयत्न करून , शिवाय टेक्निकल टीम ने support देवून , efforts घेवून शाळा ऑनलाईन सुरू करण्यात आल्या.
पण तेव्हा मुलांना ऑनलाईन शिक्षणाची सवय नव्हती. त्यांची ती मानसिकता नव्हती.

शाळा म्हणले की वर्ग , teacher , बोर्ड , शिस्त , युनिफॉर्म , आणि वर्गात त्या त्या तासाला येवून तो तो विषय शिकविणारे शिक्षक. आणि कधी समजून सांगणारे , कधी रागावून सांगणारे तर कधी विषयात मास्टरी असते त्या नुसार वेगवेगळ्या पद्धतीने समजून सांगणारे. वर्गात अनेक मुलं असतील तरी कोणाला समजले आणि कोणाला नाही हे लगेच लक्षात येणारे टीचर. आणि वेळेत अभ्यास पूर्ण करणे हा टीचर चा धाक , भीती , ही मुलांची मानसिकता.

ऑनलाईन शिक्षणात एकावेळी सगळ्या मुलांकडे तसे personally लक्ष देणे ही अवघड . कारण त्यांचे व्हिडिओ , ऑडियो बंद असतात. इकडे शिक्षक शिकवत असतात तेव्हा अनेक विद्यार्थी अशा बिनधास्त मानसिकतेमध्ये असतात की , आडवे पडून , लोळत , तर मोबाईल वर chat करत , इतर मित्र मैत्रीणीना प्रायव्हेट मध्ये मेसेज करून टाईम pass करण्याची mentality वाढली मुलांची.

बरं अभ्यास pdf वरून येतो तो रोजच्या रोज ही करत नाहीत कारण काय तर कंटाळा आणि जेव्हा check करणार तेव्हा करू पूर्ण असे म्हणून टाळाटाळ. याउलट you tube , mobile games, अगदी ludo सारखे गेम्स ही मग मोबाईल वर खेळत.

या ऑनलाईन शाळेचा गैरफायदा घेण्याची सवय , वृत्ती वाढली की presenty लावली की संपले. काही करा. हो आणि परीक्षा त्या काय ऑनलाईन. त्यात पण पर्याय निवडा MCQ हे असेच होते . त्यामुळे सोपे असते म्हणून तेवढ्याच पुरते वाचन ..लिखाणाची सवय सोडाच कंटाळा करायचा. आणि बरेचदा अनेक मुले ऑनलाईन exam देताना पुस्तकात बघून , विचारून , ऑनलाईन मित्र मैत्रिणी ना विचारून लिहीत होते. त्याला काय होते कोणाला समजते एव्हढा बिनधास्तपण होता.

आता परत ऑफलाईन शाळा सुरू झाली तशी ज्या मुलांना मनापासून शाळा आवडते ते खूप उत्साही झाले , पूर्वी पेक्षा अजून जास्त आनंदाने शाळेत जाण्यास तयार होवू लागले. तर काही मुलांची शाळेत जाण्याची मनापासून तयारी आणि इच्छा असून ही ती जावू शकत नाहीत कारण पालकांची मुलांना पाठविण्याची , रिस्क घेण्याची मानसिकता नाही.

शाळेच्या मर्यादित बस , शाळेच्या van बंद , रिक्षा बंद त्यामुळे रोज शाळेत सोडणे आणणं तेही आपल्या कामातून वेळ काढून हे पालकांनाही झेपत नव्हते त्यामुळे ते ऑनलाईन ला preference देत होते. त्यामुळे मुले अजून नाराज झाली आणि त्यांचा उत्साह कमी झाला. अजूनच ती ऑनलाईन शाळे कडेदुर्लक्ष करू लागली.

शिक्षक त्यांची ही मानसिक कसरत . की ऑफलाईन वर्गात ही शिकवा आणि ऑनलाईन ही ..त्यामुळे दोन्हीकडे लक्ष देणे परत ऑनलाईन technical गोष्टी हाताळणे यात त्यांना मानसिक थकवा येवू लागला.

ऑफलाईन ज्या मुलांना जाणं शक्य शाळेत ती मात्र खूप आनंदी झाली. शाळेत जाणार .परत सगळे मित्र मैत्रिणी , आपलावर्ग , शिक्षक , शाळेच्या गमती जमती , अभ्यास , pt परत अनुभवायला मिळते म्हणून परत उत्साहाने अभ्यासाला लागले.

काही मात्र ऑफलाईन जायचे म्हणले की टाळू लागले . कारण आरामात , आडवे पडून शाळा ऑनलाईन शिकणारी मुले ही होतीच. आता शाळेत एका जागी एव्हढा वेळ बसायचे , लिहायचे , शिक्षक समोर असणारी याचा कंटाळा वाटू लागला. त्याची टाळाटाळ ते करू लागले.

काही मुलांना ऑनलाईन ..काहीना ऑफलाईन शाळा आवडते . त्यात प्रत्येकाचे अनुभव , अभ्यास क्षमता , भावनीक्तता ही प्रत्येक विद्यार्थ्याच्या पूर्व अनुभवावर, घेत असलेल्या अनुभवावर अवलंबून आहे . तो विद्यार्थी सापेक्ष आहे.

ऑनलाईन शाळे मूळे विद्यार्थ्यांना ही जाणवू लागले आहे की त्यांचे खूप मोठे नुकसान होत आहे. अभ्यास कच्चा राहत आहे. Base कच्चा राहत आहे. पुढे जावून कसे होणार याची ही चिंता त्यांना सतावत आहे. जे खरेच खूप sincere student आहेत त्यांना पाहिजे तेवढं अभ्यास मिळत नाही , guidance मिळत नाही. त्यातून न्यूनगंड ही निर्माण होत आहे.

ऑनलाईन off line शाळा दोन्हीचे फायदे आणि तोटे आहेत. त्यामुळे मुलांची मानसिकता खूप बदलत आहे. मुले एकाकी राहू लागली आहेत. आत्मविश्वास कमी झाला आहे .. आणि कंटाळा करू लागली आहेत. कोणतेच discipline नाही राहिले. कधी ही झोपा , कधी उठा . अभ्यास करताना आडवे पडून करा , अंघोळ करा अगर नका करू ..तसेच आळसात शाळेत बसा. अशी मनोवृत्ती . काही केले नाही तरी पुढच्या वर्गात जातो हा बिनधास्त पण आला आहे.

पालकांनी ही थोडे कष्ट घेवून , त्यांची मानसिकता बदलून मुलांना ऑनलाईन असो किंवा ऑफलाईन शिक्षण घेण्याचा seriousness , शिक्षणाची आवड , शिस्त आणि ओढ निर्माण करणे गरजेचे. प्रसंगी स्वतः मुलांना शाळेत सोडणे घेवून येणे याची जबाबदारी घेणे गरजचे. .

मुलांना निराशा , हताश जीवन जगू देण्यापेक्षा उत्साही बनवा. त्यांच्यातला आत्मविश्वास हा अभ्यासाने आणि आजू बाजूच्या वातावरणातून वाढू देत. मुलांच्या आणि स्वतः ही मनाची काळजी घेणे गरजचे.


आजच मुलांचं योग्य करीअर कॉउन्सिलिंग करून घ्या. यासंदर्भात खालीलप्रमाणे संपूर्ण माहिती नमूद करण्यात आलेली आहे. Online Career Counseling द्वारे निरनिराळ्या मानसशास्त्रीय किंवा करिअर चाचण्या घेऊन मुलांची योग्य करिअरची दिशा ठरवूया. Online असल्याने पालकांना आणि मुलांना कोठेही यायची-जायची गरज नाही.


Online Career Counseling साठी !

👇👇

क्लिक करा



करीअर काउंन्सिलिंगचा नेमका अर्थ समजून घ्या!


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!