स्त्रीला तिच्यावर लादलेल्या बंधनातून मुक्त करणं हे प्रत्येक नवऱ्याचं कर्तव्यच!
सोनाली जे.
स्त्री म्हणले की तिच्यावर बंधने ही जन्मतः च आली. आपल्या भारतामध्ये बहुतांशी पुरुष प्रधान संस्कृती आहे. काही मोजक्या ठिकाणी स्त्री प्रधान संस्कृती ही आहेच. पण फार कमी .
पूर्वी स्त्रीवर खूप जास्त बंधने होती. घर आणि संसार , अगदी सांगायचे झाले तर चूल आणि मूल हेच तिचे विश्व. हीच तिची मर्यादा होती. घरातून बाहेर पडण्यावर बंधने होती. शिक्षण घेण्यावर बंधने होती.
आनंदीबाई जोशी यांचे पती गोपाळराव जोशी. त्याकाळी म्हणजे १८६५ नंतर. मध्ये आनंदी बाई यांचे नवव्या वर्षी लग्न झालं. शिक्षण पूर्ण नाही. गोपाळ राव विदुर होते आणि त्यांच्यात २० वर्षाचे अंतर होते. त्यांना हे लग्न खरे तर करण्याची इच्छा नव्हती पण घरच्यांच्या पुढे त्यांनी ते स्वीकारले.मात्र समाज सुधारण्यासाठी . स्त्री शिक्षणाची सुरुवात करण्याकरिता त्यांनी आपल्या घरापासून सुरुवात केली.
स्त्री ने लग्नानंतर शिक्षण घ्यायचे नाही हे बंधनं त्या काळी त्यांनी मोडीत काढले. आणि आनंदी बाई या पहिल्या डॉक्टर झाल्या. त्याकाळी बोटीने सात समुद्रापार एकटीने गेल्या. स्त्री ने घरातून बाहेर पडायचे नाही ही बंधने असणाऱ्या आनंदी बाई केवळ नवऱ्या मुळे सगळ्या बंधनातून मुक्त होवून स्वतः गोपाळराव त्यांना अभ्यासाचे धडे देत. त्यातून परदेशी , अनोळखी लोक, परदेशी भाषा शिकून , आत्मसात करून डॉक्टरेट झाल्या. हे केवळ आणि केवळ गोपाळराव म्हणजे एका नवऱ्याने आपल्या बायकोला , तिच्यावर लादलेल्या बंधनाना मुक्त केले, तिला मुक्त केले त्यामुळे शक्य झाले.
आज बऱ्याच ठिकाणी नोकरी निमित्ताने , जागा लहान असते त्यामुळे किंवा स्वतंत्र विचारसरणी मूळे एकत्र कुटुंब पद्धती फार कमी आढळते.
याचाच अर्थ काय तर एकत्र कुटुंबाच्या बंधनातून नवऱ्याने जशी त्याची प्रगती केली तशी स्त्री ला सततचे सासू सासरे असतील किंवा इतर मोठी माणसं यांच्या सततच्या बंधनातून एक प्रकारे मुक्तता च दिली ना ??
वेगळे राहत असताना केवळ पुरुषी हेका चालू ठेवला नाही. तो म्हणेल तसेच वागायचे तसेच करायचे , स्वैपाक असेल , पोशाख असेल, मैत्री असेल , नोकरी असेल , विचार असतील, कुठे जाणे येणे असेल , वस्तू खरेदी असेल किंवा कोणाला काही देणे घेणे असेल ,अगदी सेक्स करायचे का नाही. त्यात ही तिची इच्छा बघून . तर मुलं होवू द्यायची का नाही ? आणि असेल तर कधी ? हा निर्णय सुधा ती घेवू शकते. सर्व काही स्त्री तिच्या चॉईस नुसार करू शकते. तिला ते स्वातंत्र्य च दिले गेले म्हणजे काय तिची अनेक बंधनातून मुक्तता च केली ना ??
एवढेच काय मुल झाल्यानंतर स्त्री ला त्रास नको तिच्या शरीराची काळजी म्हणून पुरुष स्वतः नसबंदी करून घेतात. पूर्वी हे केवळ स्त्री वर बंधनकारक होते मात्र आता त्या बंधनातून आपल्या बायकोला मुक्त करणारे असेही काही पुरुष आहेत. आणि असेही नक्की आहेत की जे कसलीच जबाबदारी घेत नाहीत आणि काही करत ही नाहीत. पण बऱ्याच अंशी ही स्त्रीची सक्तीची बंधने नवरा कमी करत आला आहे .
पूर्वी पासून जे स्त्री ने स्वैपाक करायचा , मुलांचा सांभाळ स्त्री ने च करायचा , वेळ प्रसंगी चांगली नोकरी सोडून तिने घर मुले यांची जबाबदारी घ्यायची . यातून हळूहळू नवऱ्याने बायकोला मुक्त केले आहे.
मुलांची जबाबदारी , बाहेरून काही घेवून येणे असो , मुलंच अभ्यास , अगदी स्वैपाक ही स्वतः करू लागला आहे. घरची साफ सफाई , म्हणजे किती तरी गोष्टीतून बायकोची बंधनातून मुक्तता च केली आहे ना . !!
आजच एक लेख वाचला त्यात नवरा फारसा शिक्षण नाही , नोकरी नाही. केवळ ९ वर्ष बायको ला नोकरी वर सोडणे आणि घेवून येणे करत होता. बायको ला नोकरीचे पूर्ण स्वातंत्र्य दिले होते त्याने. ती jet airways ची employee होती. बायको कडून पन्नास हजार रुपये उसने घेतले आणि त्यातून बिझनेस सुरू केला.आज ९००० car चे मालक असलेले नीरज गुप्ता यांची ही कहाणी.
पण त्यांनी बायकोला घरात राहण्याची बंधने घातली नाहीत. स्वतः कमवत नव्हते म्हणून बायकोवर चिडचिड , संशय घेतला नाही. तिला उलट मदत करत होते. आणि त्याचमुळे बायको ने ही नवऱ्याला त्याच्या पायावर उभे राहण्याकरिता मदत केली.
स्त्री जॉइंट family मध्ये असेल तर अनेक लोकांचे अनेक विचार , काही वेळेस सगळ्या जबाबदाऱ्या सून म्हणून तिच्यावर पडतात.कामे करून ही परत बोलणी खाणे हा मानसिक त्रास ही पडतो. अशा वेळी नवऱ्यानेच तिच्या भावना , अडचणी समजून घेवून वेळीच इतरांना ही गोड बोलून समजावले किंवा कधी अधिकारवाणीने तर तिच्यावर जी ही कामाची , जबाबदाऱ्या यांची बंधने आहेत यातून ती मुक्त होईल. आणि अजून जास्त आनंदी राहील आणि घरातल्या सगळ्यांनाच अजून आनंदात ठेवेल.
कधी तिला सासरच्या बंधनातून माहेरी मोकळा श्वास घेण्यास बदल म्हणून पाठवावे. कधी त्यांना घरी बोलवावे. कधी मित्र मैत्रिणी यानाबोलवावे त्यांच्या सोबत बाहेर जावू द्यावे.
कधी सगळ्यातून मोकळीक म्हणून नवऱ्याने स्वतः बायकोला सहलीला , सिनेमा असेल , रोजच्या स्वैपाक करण्याच्या बंधनातून मुक्त म्हणून बाहेर जेवायला घेवून जावे. तिला जपावे.
नवऱ्याने स्त्री ला समजून घेणे गरजेचे आहे. तिच्यावर स्त्री म्हणून बंधने असतातच आणि ती थोड्या फार प्रमाणात असणे ही गरजेचे आहे आज कालच्या युगात. अगदी पूर्वी सारखे सातच्या आत घरात नाही पण वेळेत असेल किंवा चांगली संगत जरुरीचे. कारण स्त्री ला भावनिक गुंतवून , कधी शारीरिक जबरदस्ती ने काही धोका होवू नये म्हणून थोडे बंधन गरजेचे.
आणि हे टाळायचे असेल तर प्रत्येक स्त्री ला स्व संरक्षणाचे शिक्षण , धडे दिले पाहिजेत.माहेरी नसतील तर सासरी आल्यावर नवऱ्याने ते आवर्जून पुढाकार देवून हे शिक्षण देण्याकरिता प्रयत्न करावेत.
स्त्री ही एक माणूस च आहे. तिला ही माणसासारखे वागवा. माणूस म्हणून जगू द्या. तिच्यावर सतत बंधने टाकून , बंधनात ठेवून मानसिक , भावनिक आणि शारीरिक कोंडमारा करू नका.
लग्नात जसे पुरुष स्त्री ला चारही धर्म, अर्थ , काम , मोक्ष या चारही धर्माचे वचन देतो. तसे त्याने स्त्री ला नको त्या बंधनात बांधून न ठेवता बंधनमुक्त करण्याचे ही वचन दिले पाहिजे.
आयुष्य सुंदर आहे. एकमेकांनी एकमेकांना समजून घेणे गरजेचे आहे. स्त्रीला तिच्यावर लादलेल्या बंधनातून मुक्त करणं हे प्रत्येक नवऱ्याचं कर्तव्यच! नवऱ्याच्या जीवावर , त्याच्या विश्वासावर स्त्री आपले सर्वस्व , माहेर आपली लोक , आपल्या गोष्टी , आपल्या आवडी निवडी सोडून सासरच्या रूढी , प्रथा , परंपरा , माणसे , त्यांचे स्वभाव हे सगळे स्वीकारत असते. त्यामुळे पदोपदी नवऱ्याने तिला साथ दिलीच पाहिजे. अजून बऱ्याच ठिकाणी हे होत नाही. पण निदान काही ठिकाणी हे नक्कीच होत आहे. समाज सुधारत आहे. नवऱ्याची समजून घेण्याची मानसिकता वाढत आहे.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


पुरुषावर सुधा तेवढेच अन्याय होतात ..स्त्रिया जेवढ्या चांगल्या तेवढ्या खराब असतात .जसे आपण पुरुष बद्दाल समजतो .परंतु फक्त स्त्रीला फुलासरखा जपला पाहिजे दिवसभर काम ना करता फक्त टीव्ही पाहायला दिले पाहिजे खूप नाजूक असतात ना त्या .आणि जेव्हा बरोबरीने हक्क देन्यची भाषा बोलली जाते तेव्हा स्त्री कमजोर नाही कणखर आहे mhanycha म्हणजे दोन्हीकडून वाजवायचे.खरे तर पुरुष जास्त जबाबदारी घेऊन वागतो या समजात आईवडील लेक्र बाळ आणि बायकोचे हट्ट पुरवतो तो नवरा असते एकडी बायी असते ती पुरुषाला आर्थिक मदत करते, पण हे प्रमाण भारतात फार कमी आहे
पुरुषाला पण स्त्रीने तेवढाच समजून घ्यावे फक्त स्त्री विषयीं जपणारे पोस्ट कायदे आहेत पुरुषांचे काय? जेव्हा स्वातंत्र्य ,समान आधिकर यांचा संबंध येतो तेव्हा स्त्रीला बरोबरीने हक्क हवेत तशी मागणी सुधा केली जाते .बरोबर आहे परंतु जेव्हा पुरशावर अन्याय होते खूप तेव्हा त्याचेबद्दल काय कायदे नाहीत ना त्याचे मन कुणी समजून घेत नाही फक्त जिकडे तिकडे स्त्रीला जपा ..का तेवढी ती कणखर नाही का ? संकटांना तोंड denya yevdha nusta बोलून काय उपयोग मग