स्त्री आणि पुरूष यांनी लग्नानंतर मैत्री करावी का ?
सोनली जे.
मैत्री ही हा शब्द ही खूप जवळचा वाटतो. कोणत्याही वयात कोण ही बरोबर कोणाची ही मैत्री होवू शकते. बागेत भेटणारे आजोबा हे छोट्या मुलांचे ही मित्र होत्तात. तर कधी एका ऑफिस मध्ये काम करणारे मित्र मैत्रिणी यांच्यात ही मैत्री होते. आणि अतिशय सुंदर मैत्री होते.
झिम्मा सिनेमा मध्ये जशा लंडन ट्रीप करिता एकत्र गेलेल्या सगळ्या वयो गटातल्या स्त्रिया त्यांची तर मैत्री होतेच.
पण त्यांची टूर organizer कबीर त्याच्या सोबत ही या सगळ्यांची चांगली मैत्री होतेच की ..आणि ती ट्रीप पुरती नाही तर पुढेही राहते. त्यात लग्न झालेल्या विवाहित , लग्न न झालेल्या अविवाहित , ठरलेल्या , आणि नवरा नसलेल्या ही मुली , स्त्रिया होत्याच की. पण त्यामुळे त्यांच्या मैत्री मध्ये कुठे काही फरक पडला का ? नाही ना ?? नाहीच..
आता मैत्री मध्ये ही हा विषय विचारात घेवू यात की ,
स्त्री आणि पुरूष यांनी लग्नानंतर मैत्री करावी का ?
स्त्री आणि पुरुष यांनी विवाहित असतील तरी नक्कीच मैत्री करावी.
खरे तर मैत्री ही कधी ठरवून होत नाही.. आणि ठरवून तोडली ही जात नाही. आता विवाहित स्त्री पुरुष म्हणतो तेव्हा त्यांचा परिचय होण्याची शक्यता कुठून होते ? तर एकत्र ऑफिस असेल , रोज ची बस एक असेल , स्टॉप एक असेल , कॅब एक असेल तर सहज रित्या बोलणे हे सुरू होते.
मग रोज एकत्र असतील . तर गप्पा होतात. Office मध्ये काही प्रॉब्लेम्स असतील तर ते discuss केले जातात. एकाच ऑफिस मध्ये काम करणारे एकत्र काम आणि काही वेळेस प्रेझेंटेशन . ग्रुप डिस्कशन , प्रोजेक्ट यातून एकमेकांच्या संपर्कात येवून एकमेकांचे स्वभाव आवडतात, मदतीचे nature आवडते, बरेचदा विचारांची देवाण घेवाण होत असते. कधीं कामाचे सेलिब्रेशन , birth day party यातून मैत्री होत जाते.
कधी ऑफिस पिकनिक असते. त्यावेळी ग्रुप ने जाताना मैत्री होवू शकते. कधी पिकनिक किंवा ऑफिस activities मध्ये , cultural program मध्ये एकत्र भाग घेतला असेल तरी मैत्री होते.ऑफिस मधले नसतील तरी रोज भेटण्यातून , बस मध्ये असतील एकत्र येवून मैत्री होतेच . जवळीकता वाढते. किंवा ज्यांची आधी पासून च खूप चांगली मैत्री आहे पण लग्न दुसऱ्या बरोबर झाले असेही लग्नानंतर मैत्री टिकवत असतात.
किंवा पडलेला मैत्रीचा खंड लग्नानंतर परत चागल्या मैत्री मध्ये रूपांतर होते. शाळेत , कॉलेज मध्ये आवडणारा मुलगा , मुलगी काही कारणाने प्रेम व्यक्त करू शकत नाहीत. मैत्री व्यक्त करू शकत नाहीत त्यांच्या मध्ये सोशल मीडिया मधून अनेक वर्षानंतर ही मैत्री होवू शकते.
विवाह झाल्यावर ही दोघांच्यात चांगली मैत्री ही असू शकते. कारण दोघेही विवाहित असतात. काही वेळेस घरच्या समस्या जास्त चांगल्या शेअर केल्या जातात. मुलांच्या समस्या त्यावर तोडगा ही निघतो. कधी इतर काही मार्गदर्शन असेल .किंवा आपल्या जोडीदाराला गिफ्ट देताना स्त्री चा मित्र नक्की सांगू शकतो की पुरुषांना काय आवडते. काय गिफ्ट द्यावे .त्या करिता तो मदत ही करतो .याउलट स्त्री मैत्रीण पुरुष मित्राला त्याच्या बायकोला कशी साडी घ्यावी , कोणता मेकअप ब्रँड घ्यावा हे सुचवतेच की.
यात विवाहित असतील दोघे तरी मैत्रीच्या मर्यादा या असतात. बरेचदा काय होते की विवाहित असून ऑफिस , काम , टूर या निमित्ताने जास्त काळ हे एकत्र ही असू शकतात. त्यामुळे या मैत्रीचे रूपांतर हळूहळू पुढच्या स्टेप मध्ये होते. बरेचदा ते त्यांनाही समजत नाही. पण एकमेकांच्या मध्ये आकर्षण निर्माण होते.
एकमेकांची समजून घेण्याची आणि समजून सांगण्याची क्षमता एकत्र काम करण्यात वाढलेली असतें . रोज जेवण,खाणे पिणे एकत्र .कधी शॉपिंग यातून एकमेकांच्या आवडी निवडी ही चांगल्या माहिती झालेल्या असतात. तर एकमेकांचे राहणीमान ही आवडते.
कधी जर दोघांचे जोडीदार कटकटी , कोणत्या गोष्टीची आवड नसणारे , साथ न देणारे , समजून न घेणारे असतील तर त्यावर बोलणे होते , चर्चा होते. घरात काही बिनसले तरी मग मूड बिघडलेला असतो की साहजिकच सोबत असणारा मित्र किंवा मैत्रीण ते ओळखून काय झाले याची विचारपूस , कधी त्यातून मार्ग तर कधी त्यांच्या पार्टनर चे कसे चुकले यावर बोलणे होते.
यातून ही कळत नकळत एकमेक आधार देत असतात. कधी विचारपूस तर कधी सहानुभूती . तर कधी काळजी करू नको असे सांगताना हळुवार पण हातावर ठेवला गेलेला हात.
बराच काळ एकत्र असल्याने अनेक गोष्टी जसे बोलणे , हावभाव , विचार करण्याची पद्धत ही आवडू लागते. त्याची सवय होते. आणि सदैव सतत असल्यामुळे ती ओढ वाढू लागते. आकर्षण वाढते. कधी पेहराव ही , कधी साडी नेसली तर ..तर कधी पुरुषाचे त्याचे व्यक्तिमत्त्व आकर्षित करणारे सुट असेल नाही तर मस्त फिटिंग चा टी शर्ट असेल, कधी त्याची सुंदर रेखीव वाढलेली दाढी आणि मिषांचा झुपकेदार पणा असेल.
तर कधी स्त्री ने मोकळे सोडलेले सुंदर केस .तर एखादा परफ्यूम आवडून जातो. हे एकमेकांना आकर्षित करतात च.आणि सहजच एकमेकांना दाद ही दिली जाते.मग पुढच्या वेळी लक्षात ठेवून आठवणी ने या गोष्टी केल्या जातात. आणि आपल्याला घरातून बाहेर पडल्यावर हक्काने बघणारे ही कोणी आहे याची सुखद जाणीवही होते.
बरेचदा या केवळ निरागस, निःस्वार्थी मैत्री मधुनच मग विवाहित स्त्रि आणि पुरुष यांच्या मधल्या मैत्रीचे आकर्षणात रूपांतर होते. साहजिक आहे , चुंबका चां नियम इथेही लागू पडतो. विरूद्ध लिंगी आकर्षण च . ओढ निर्माण होते. मग ही मैत्री केवळ मानसिक पातळीवर राहत नाही . तर हळूहळू याचे रूपांतर शारीरिक आकर्षणात ही होवु लागते.
त्यात एका कोणाचा पार्टनर अरसिक असेल तर नक्कीच हे शारीरिक आकर्षण त्या पुढची पातळी गाठते. याचे रूपांतर शरीर संबंधात ही होतें . सुरुवातीला थोडे काही चुकतो आहोत असे किंवा घरी आपल्या जोडीदाराला फसवित आहोत असेही वाटते.
पण रोज एकत्र असल्याने भावनिक , वैचारिक आणि आता शारीरिक पातळीवर ही जवळ आल्यावर आणि जोडीदार आणि त्यांच्या संबंध यापेक्षा हे अधिक समाधान आणि सुख , आनंद देणारे असेल तर हळूहळू मैत्रितला सहवास अजून जास्त वाढतो.
बरं पुरुष त्याचा संसार व्यवस्थित पार पाडत असतोच. त्याच्या बायको मुलांचे खर्च , त्यांच्या गरजा , कर्तव्य यात कुठे कमतरता ही पडू देत नाही. कारण त्याची ही स्त्री मैत्रिणी ही कमावती असते त्यामुळे खूप मोठा आर्थिक बोजा त्याच्यावर पडत ही नाही आणि जरी चुकून या मैत्रिणी ची नोकरी गेली तरी ही तो तिची आर्थिक जबाबदारी स्वतः हुंन घेत ही नाही. आणि त्यात अडकत ही नाही.
कारण कायदा आणि समाज याने तो तिच्याशी कुठेही बांधील नसतो. आणि तो तसे आपल्या अंगावर तिची जबाबदारी घेत ही नाही. स्त्री ही फारसे आर्थिक भार उचलू शकत नाही. मर्यादित उत्पन्न असेल . किंवा इतर खर्च.
पुढे कधी या दोघांच्या मैत्रीत वाद झालेच. अर्थात वाद होण्याची कारणे ही स्पष्ट असतात की घरी गेला की पुरुष बाहेर चे सगळे विसरून फक्त आपला संसार ,मुले बायको , आई वडील , नातेवाईक यात असतो. बहुतेक वेळा बाहेरचे काही घरी माहित ही नसते त्या बाबत ते खूप चोखंदळ आणि काळजी घेणारे असतात. शंका येवू नये. मग अगदी फोन number ही दुसऱ्या नावाने सेव्ह करतील , घरी गेल्यावर मेसेज ही करणार नाहीत. फोन नाही.
पण स्त्रीचे तसे नसते. ती पूर्ण त्यात गुंतलेली असते. भावनिक असते. त्यामुळे कधी तरी मेसेज करावा , फोन करावा ही अपेक्षा असते. संवाद त्यात अंतर पडले की तिला असुरक्षित वाटू लागते.भावनिक दृष्टया संवेदनशील असते.काहीवेळेस पुरुष ही असतात. पण ते खूप व्यवहारी असतात. त्यामुळे ते अडकून पडत नाहीत.
थोडक्यात काय की सतत कुठे ना कुठे या मैत्री मध्ये भले अगदी शारीरिकदृष्ट्या एकत्र येवून ही दोघांच्या मध्ये मर्यादा आहेत आणि त्या कायम राहणारच याची जाणीव पुरुष मित्र करून देत असतात.
सुरुवातीच्या काळात एकमेकांना समजून घेणे , वारंवार संधी देणे या गोष्टी घडत असतात. पण जेव्हा वारंवार वाद होवू लागतात तेव्हा या मैत्री मध्ये दुरावा येतोच.
शिवाय नातेवाईक , मित्र मंडळी , समाज यात ही या दोघांच्या मैत्री हूंन पुढे गेलेल्या नात्याला मर्यादा येते. आणि ती कायमची असते. हे समजायला यांना वेळ लागतो त्यामुळे बरेचदा मानसिक त्रास होतो.
स्त्री आणि पुरूष यांनी लग्नानंतर मैत्री करावी का ? नक्की करावी पण अगदी सुरुवातीपासून मैत्री मधल्या मर्यादा समजून घ्याव्यात आणि त्या पाळाव्यात.
आयुष्य सुंदर आहे .आज असे अनेक मित्र मैत्रिणी लग्नानंतर ची मैत्री टिकवून आहेत , एकत्र सहल , फिरणे , गाणी , आपले छंद जपणे , painting , movie , हॉटेलिंग एकत्र करतात. अतिशय मोकळेपणाने बोलतात . गप्पा मारतात. पण ते त्यांच्या मर्यादा नक्कीच पाळत असतात.
स्त्री आणि पुरूष यांनी लग्नानंतर मैत्री करावी पण कुठेही शारीरिकदृष्ट्या गुंतू नये. भावनिक , आर्थिक , शारीरिक कष्ट याची मदत करावी. कधी वेळ प्रसंगी मदत , सल्ला यापूर्ते मर्यादित.
मर्यादा ओलांडल्या की ती निखळ , निरागस मैत्री कोणाची च राहत नाही. मग पुरुष मित्र मित्र असोत किंवा स्त्री मैत्रिणी असोत.
मर्यादा हा सुखी मंत्र लक्षात ठेवून जे करणे शक्य ते नक्की करा. आयुष्य सुंदर आहे. मैत्रीच्या अमृताने अजून सुंदर बनवा.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


Nice