Skip to content

‘ती मला आकर्षित करतेय’ अशा भ्रमात अनेक पुरुष का राहत असतील…?

‘ती मला आकर्षित करतेय’ अशा भ्रमात अनेक पुरुष का राहत असतील…?


हर्षदा पिंपळे


‘आकर्षण’ ….आता आकर्षणालाही आयुष्यात वेगवेगळी वळणं प्राप्त झालेली आहेत. वेगवेगळ्या प्रकारचं आकर्षण हे प्रत्येकाला असतं.
केवळ आपल्यालाच नाही तर प्राण्यांनाही आकर्षण असतं.आणि कुणाला कोणत्या गोष्टीच आकर्षण असू शकतं ते आपण सांगू शकत नाही. कारण कुणाला मार्केटमध्ये येणाऱ्या नवीन बाईक्स , कार्स च आकर्षण असतं तर कुणाला फुलांवर भिरभिरणाऱ्या फुलपाखराच, गुणगुणाऱ्या भुंग्याच आकर्षण असतं.

आणि आकर्षण असणाऱ्या गोष्टींकढे आपला ओढा हा जास्त प्रमाणात असतो.इतकच नाही तर आकर्षण म्हणजे आपल्याला सुखावणारी गोष्ट वाटते.कधी कधी ती सुखावणारी असतेही.कारण प्रत्येक आकर्षण हे वाईट असतच असं नाही. आणि आकर्षण वाटणं हे स्वाभाविक आहे.एखाद्या गोष्टीबद्दलच नाही तर एखाद्या व्यक्तीबद्दलही आपल्याला आकर्षण हे वाटत असतं.कधी हे आकर्षण स्वाभाविक असतं , शारीरिक , आणि भावनिकही असतं.साध्या शब्दांत सांगायच झालं तर आपल्या डोळ्यांना क्षणात जे भारी वाटतं ते म्हणजे आकर्षण…!

स्त्री-पुरुष/तरूण-तरूणी एकमेकांकडे आकर्षित होणे अगदी नैसर्गिक आहे.आता अस नाही की केवळ पुरूषांनाच स्त्रियांविषयी आकर्षण वाटतं.स्त्रियांनाही पुरूषांविषयी आकर्षण हे वाटत असतं.

पण विषयाला धरून लिहायचं झालं तर…….

‘ती मला आकर्षित करतेय’ अशा भ्रमात अनेक पुरुष राहत असतात. पण ते का राहत असतील त्या भ्रमात याचा विचार आपण सहसा करत नाही. त्याच्यामागची कारणंही आपण सहसा शोधायचा प्रयत्न करत नाही.मुळातच ते आकर्षण शारीरिक असतं की भावनिक की अजून कोणत्या प्रकारचं असतं हेही शोधायचा प्रयत्न अनेकदा राहून जातो.तेव्हा फक्त’आकर्षण’ हा एकच शब्द आपल्याला पुरेसा वाटतो.

पण आता स्त्री-पुरुष म्हणाल तर निसर्गाने दोघांना नितळ अशी कांती प्रदान केली आहे.ज्याप्रमाणे निसर्ग त्याच वेगळेपण हे जपत असतो अगदी तसच प्रत्येकाच्या कांतीच स्वरूप हे वेगवेगळ आहे. ते निसर्गनिर्मित सहज सुंदर आहे. आणि आपल्याला नेहमीच वेगळेपण हे भावतं , किंवा डोळ्यांना ते सुखावतं.कदाचित हेच स्त्रियांच वेगळेपण पुरूषांना आकर्षित करत असावं.स्त्रि जेव्हा तीचे लांब काळेभोर केस बांधलेले असताना जेव्हा अलगद सोडते , तेव्हाच्या त्या तिच्या त्या मोहक अदांमुळे पुरूषांना वाटतं की ‘ती’ आपल्याला आकर्षित करतेय.

पहायला गेलं तर निडरपणे नजरेला नजर मिळवणं, विचारांनी बोल्ड , बिंधास्त , स्मार्ट असणाऱ्या स्त्रिया पुरूषांना आवडतात. किंवा पुरुष अशा स्त्रिकडे जास्त आकर्षित होतात. पण मग ज्यावेळी आजुबाजुच्या स्त्रिया/ तरूणी अशा वागतात किंवा त्यांच वागणं-बोलणं हे असं असलं की पुरूषांना असं मनात कुठेतरी सतत वाटत रहातं की ती ती स्त्री आपल्याला आकर्षित करतेय.

आता सगळ्याच तरूणी किंवा स्त्रिया या काही नजरेला नजर देत नाहीत , किंबहूना त्या स्मितहास्य देखील लवकर करत नाहीत. आणि नेमकं अशातच एखाद्या तरूणीने किंवा स्त्रिने स्मितहास्य केलं , नजरेला नजर दिली की त्यांच्या मनात कळत नकळतपणे आकर्षण हा भ्रम निर्माण होतो.ति आपल्याकडे आकर्षित होतेय, आपल्याला ति तिच्या या वागण्याने , हसण्याने आकर्षित करतेय असा समज आपोआपच तयार होतो.

इतकच नाही तर बेसिकली कसं होतं तर स्त्रियांच्या मनाच्या कोपऱ्यात दडलेलं हळवेपण याला कुठेतरी कारणीभूत ठरत असतं.अनेकदा कुणालाही / किंवा एखाद्या पुरूषाला/तरुणाला थोडं काही ठसका लागला , इंज्युरी झाली तर काळजी करणं हा स्त्रिचा अगदी मायाळू स्वभावच जणू..!

कधी कधी हाच स्वभाव , हीच काळजी पुरूषांना आकर्षित करत असते. हे आकर्षण कधी शारीरिक कधी भावनिक असतं. यामागे अशी असंख्य कारणं आहेत.आपण अशी उदाहरणं पाहतो किंवा स्वतः अनुभवतोही.

आणि आजुबाजुला अशा गोष्टी घडतात. कदाचित त्यामुळेच ‘ ती मला आकर्षित करतेय’ असं अनेक पुरूषांना वाटत असेल.काही पुरुष याला अपवाद असतीलही.कारण इथे प्रत्येकजण वेगळा आहे. प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत , प्रत्येकाला वाटणारं आकर्षण सुद्धा अगदी वेगवेगळं आहे.

आकर्षण मुळातच नैसर्गिक गोष्ट आहे. त्यामुळे आकर्षण वाटणं साहजिकच आहे. फक्त ते समजून घेता आलं पाहिजे. त्याचा व्यवस्थित उलगडा करता आला पाहिजे. नाहीतर उगाचच आकर्षणाच्या मर्यादा ओलांडल्या जातात आणि निरर्थक गोष्टी घडत जातात. त्यामुळे आकर्षण समजून घ्यायला शिका, उमजून घ्यायला शिका..!


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!