रिलेशनशिप मधून बाहेर पडायचंय, पण कसं पडू ? काही टिप्स वाचूया.
मयुरी महेंद्र महाजन,
पुणे
हल्लीची नाती -गोती ,मित्र-मैत्रिणी ,नातेवाईक, शेजारी-पाजारी, सर्वच एकंदरीत खूप काही बदल नातेसंबंधांमध्ये बघायला मिळतात ,परंतु याच पार्श्वभूमीवर माणसांना असलेला एकमेकांचा आधार, आणि मानवी मनाची ती गरज आजही आहे, बऱ्याच वेळा आपण असे ऐकतो, की पहिल्यासारखे आता नाते सुद्धा राहिले नाही, तर त्याला सुद्धा बरीच कारणे आहेत, आणि अजूनही नात्यांमध्ये प्रेम, आपुलकी, आणि गोडवा आहेचं…, पण फक्त तो काही मोजक्या ठिकाणीच अनुभवायला मिळतो…..,
जनरेशन बदलली, पोटात बाळ असतानाचं जेव्हा, तुला मुलगी झाली, तर मी माझ्या घरची सून करेनं…… असं म्हणून पोटाला कुंकू लावायचे, तिथपासून ते आज माझे या या मुलावरती प्रेम आहे ,आणि मी त्याच्याशीच लग्न करणारं, यापर्यंत बदलत गेलेली जनरेशन ,आणि या जनरेशन मध्ये असलेले लग्न करण्याआधीच असलेली दोघांची रिलेशनशिप ,आणि त्याला टिकून पुढे घेऊन जायचे, की ब्रेकअप करून फक्त हौसेपोटी हौस, संपली की पूर्णविराम देऊन मोकळे व्हावे,
या पर्यंतचा रिलेशनशिपचा येणारा प्रवास, आणि या सर्वांमध्ये रिलेशनशिप मधून बाहेर पडायचं ,पण कसं?????? हा पडलेला प्रश्न व त्याची उत्तरे कशी आणि कुठे शोधावी, याचा नसलेला अभ्यास व माहिती नसलेल्या आयुष्याचं ठिकाण ,रेटत राहायचा तो प्रवास असाच, मनासोबत मारत चालायचं, स्वतःलाही, असं रटाळवाणं जगणं, यापेक्षा आपण वेळेत घेतलेली आपली पडताळणी जास्त महत्त्वाची ……बघा पटतय का………!!!!!
एक – सर्वांत आधी हे समजून घ्यावे लागेलं, की रिलेशनशिप मधून आपल्याला बाहेर का पडायचे आहे ???????,कुठले कारण आपल्याला त्यासाठी परवानगी देतेयं, एक तर आपल्याला असं वाटतेय, की कोणीतरी आपल्याला काही सांगितले, म्हणून आपण रिलेशनशिप मधून बाहेर पडायचा विचार करतोय, हे तपासावे लागेलं….
दोन – जर आपल्याला का बाहेर पडायचे आहे, याचे उत्तर भेटले आणि ते जर वास्तवाला धरून असेलं, त्यात आपल्या मनाची परवानगी असेलं, तर ज्या पार्टनर सोबत तुमची रिलेशनशिप आहे, त्याची पूर्वकल्पना आपल्या पार्टनरला आणि त्यासोबत तुम्ही त्यातून बाहेर पडण्याची कारणे तुम्ही त्यांना सांगणे गरजेचे आहे,
तीन- जर तुम्हाला वाटत असेलं, की तुमच्या रिलेशनशिप चे भविष्य काहीच नाही, तर तुम्ही त्या ठिकाणी तुमची भावनिक गुंतवणूक थांबली पाहिजे, तुम्ही तुमच्या पार्टनर पासून तुमच्या काही गोष्टी लपवलेल्या असतील, तर ते सांगणे गरजेचे आहे, कारण खोटं बोलून नाते जोडण्या पेक्षा, खरं बोलून ते तुटलेले कधीही चांगलेचं…
पाच- जर तुम्ही तुमच्या पार्टनर वरती विश्वास ठेवू शकत नसालं, तर त्या रिलेशनशिपला पुढे नेण्यात अर्थ नाही, त्यासाठी त्यातून बाहेर पडण्यासाठी तुमच्या मनाची तयारी आणि त्यासोबत तुम्ही स्वतःचा आत्मविश्वास ढासळणार नाही, याची घेतलेली काळजी,…
सहा – कधी कधी तुम्ही ठरवलेले असते ,की यातून बाहेर पडायचे आहे ,पण तुम्ही हे जोडलेलेचं का होते, याचा विसर पडतो, आज उद्या वरती लोटात नेलेलं हे काम आपल्या अशा टप्प्यावरती येते,जेव्हा आपल्याला ते पूर्णपणे स्वीकारता पण येत नाही ,आणि सोडता पण येत नाही,
सात- उगाच टाइमपास म्हणून कोणाच्या भावनां सोबत खेळू नका ,कारण यामध्ये समोरच्या व्यक्तीपेक्षा आपण स्वतःलाचं जास्त फसवतो ,…
आठ- जर तुमच्या पार्टनरची भावनिक गुंतवणूक जास्त असेलं, तुमच्यापेक्षा ,आणि तुम्ही जर त्या वेळेस त्यातून बाहेर पडण्याचा विचार करत आहे, तर त्यामध्ये समोरच्या व्यक्तीच्या मनात यातना, दुःख यामध्ये तो स्वतःला सुद्धा संपवण्याचा विचार करू शकतो,….
नऊ- त्यामुळे जे आहे ते स्पष्ट आणि प्रामाणिक पणे समोरच्या व्यक्तीला सांगणे गरजेचे आहे,
दहा -जरं रिलेशनशिप एका कडूनच निभावत असेलं, तर त्यामध्ये दुसर्याचे नुकसान असते, कारण नाते कुठलेही असो ते एकतर्फी कधीच पुढे जात नाही, त्यामुळे कुणाचा हात हातात घेताना विचार करा, शेवटच्या श्वासापर्यंत त्याला न्याय देता येईल का????? त्यासाठी प्रयत्न करा,,,,,,,,,,,….. अन्यथा टाईमपास साठी तर खेळणी सुद्धा बाजारात मिळतात ,,,,,,,,,हे आयुष्य आहे…… येथे माणसे जिवंत आहेत …त्यांच्यासोबत खेळण्या प्रमाणे खेळू नका….!!!
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

