वारंवार येणारं लैंगिक असमाधान आनंदी जीवन पोखरून टाकते ?
सोनाली जे.
आपल्याला कसे प्रचंड भूक लागली आहे आणि समोर सुग्रास आणि साग्र संगीत असे साधेच पण चविष्ट मग गरम वरणभात , त्यावर साजूक तुपाची धार असेल तरी ती आवडीने खाल्ले जाते पण सोबत पापड , चवीनं खाण्यासाठी लोणचे , भाजी , भरीत किंवा कोशिंबीर , ताक. पोळी . कधी एखादा गोड पदार्थ असेल तर जेवण जेवल्यावर एक प्रकारची तृप्तता मिळते.
तसेच आहे . लैंगिक समाधान . से_क्स pleasure प्रिंसीपल , अन्न म्हणजे भूक , तहान , झोप ही pleasure प्रिन्सिपल Freud यांनी मांडली तसेच सेक्स .. लैंगिक समाधान .
वारंवार येणारं लैंगिक असमाधान आनंदी जीवन पोखरून टाकते ? हो नक्कीच याचा परिणाम आपल्या आनंदी जीवनावर होत असतो.
लागलेली भूक पर्याय नसल्याने मारणे आणि आपला उत्साह , energy कमी करून घेणे , यातून पुढे शारीरिक थकवा येतो आणि मानसिक ही . कारण आपण आपली भूक भागवू शकत नाही ही मनोवृत्ती वाढत जाते.
तसेच इथे ही आहे , की लैंगिक सुख , समाधान मिळत नसेल , कारणे अनेक असतात जसे जोडीदाराला आवड नसणे , एका कोणात कमतरता असणे , जॉइंट family , जागेची कमतरता , लहान मुले असतील , किंवा कामानिमित्त दुरावा असेल . त्यामुळे वेळ , जागेचा अभाव आणि व्यक्ती ही समोर नसेल तर वारंवार लैंगिक गोष्टींवर बंधने येतात.
काही वेळेस जोडीदार दोघांपैकी एक कोणी तितके मोकळे नसेल ..दोघात वाद , भांडणे असतील , किंवा मुक्तपणे करू एवढी जवळीक च नसेल .
सतत पुढाकार मीच का घ्यायचा ? अशी मनोवृत्ती असेल तर इच्छा असून जवळीकता होवू शकत नाही. काही वेळेस मनाविरुद्ध पार्टनर ची ईच्छा म्हणून करायचे म्हणून करा असे विचार , मनोवृत्ती असेल तर वारंवार येणारं लैंगिक असमाधान आनंदी जीवन पोखरून टाकते.
त्यातून मिळणारा आनंद बाजूला च राहतो . आधी आणि नंतर होणारी चिडचिड , इच्छेविरुद्ध गोष्ट घडत असल्यामुळे निर्माण होणारे तसे त्रासिक भाव जोडीदाराला ही असंतुष्ट करतात. Discourage करतात. , आणि देण्यात येणारा त्रासिक , उत्साह कमी करणारा भाव , हे आनंद मिळण्यापेक्षा दुःख च जास्त देतात.
लैंगिक गोष्टी, सुख या एकमेकांनी आनंदाने दिलेली भावनांची , शरीर एकृप्तेची भावना असते , अनुभव असतो. दोघांकडून जर उत्स्फूर्त प्रतिसाद असेल तर दोघेही अजून उत्साही होतात. त्यांच्यात हार्मोन्स योग्य प्रमाणत स्त्रवतात. आणि मनावरचा ताण , शरीरावरचा ताण निघून जावून दोघेही एकदम रिलॅक्स होतात.
आणि attachment मग शारीरिक , भावनिक , मानसिक ही अजून जास्त जवळ घेवून येते , अजून energy create होते. नेहमीच्या रूटीन मधून , काम असेल त्याचे ताण तणाव , अनेक तणाव जे सहज लक्षात ही येत नाहीत ते सगळे त्रास , ताण विसरून लैंगिक जवळीकता , सकारात्मक विचार , भाव मनात येतात. लैंगिक सुख हे सुखाच्या परमोच्च बिंदू वर दोघांना पोहचवत असते. जर दोघांकडून तसेच आनंदी प्रतिसाद असतील तर.
याउलट जर वारंवार येणारं लैंगिक असमाधान आनंदी जीवन पोखरून टाकते . कारण नकारात्मक भाव वाढीस लागतात. एकमेकांच्या प्रती काही तरी कमतरता आहे , उणीव आहे हीच गोष्ट डोक्यात राहून पुढे ही तशीच प्रतिक्रिया आणि प्रतिसाद दिला जातो.
ताण विसरण्याऐवजी , रिलॅक्स होण्याऐवजी अंतर वाढते. आणि एकमेकांपासून दुरावा वाढतो. अंतर ठेवण्याची इच्छा होते.
बरेचदा आवडी निवडी ही लक्षात घेतल्या जात नाहीत . तेवढा पुरेसा वेळ ही दिला जात नाही. शरीराची रचना काय , गरज काय या गोष्टींचे विचार ही केले जात नाहीत आणि मग निराशा पदरी पडते. निरुत्साही होत जातात. काही वेळेस एकलकोंडी वृत्ती होत जाते.
काही वेळेस व्यसनाधीन ही होतात. तर काही वेळेस वारंवार येणारं लैंगिक असमाधान हे आपल्याला बाहेर हे सुख शोधण्यास भाग पाडतात. त्यातून परत जोडीदार आणि घरचे , समाज यात मतभेद , कुजबुज ऐकून घ्यावी लागते. त्यातून सततचे वाद च वाढीस लागतात. आणि क्षणिक सुख मिळत असेल तरी नंतरचा मानसिक त्रास जास्त होतो तो सहन होत नाही.
त्यामुळे कोणत्याच प्रकारे सुख आणि आनंद कोणालाच मिळत नाही. वारंवार येणारं लैंगिक असमाधान असेल तर पर्याय ही आहेत. एकमेकांशी मोकळेपणाने बोला.वैद्यकीय सल्ला घ्या . कौन्सेलर बरोबर बोला.
आयुष्य खूप सुंदर आहे . खूप गोष्टी एकत्र करा. बाहेर जा . फिरा. आवडी निवडी , छंद जोपासा. संगीत , कला आपल्या गोष्टी एकमेकांच्या समजून त्यांना तशी साथ द्या. कधी painting करताना नवऱ्याला साथ द्या तर कधी स्वैपाक करताना बायको ला हाथ द्या. जवळ येण्याचे , एकमेकांना समजून घेण्याचे अनेक मार्ग आहेत. आनंदी गोष्टी दोघांच्यात कॉमन काय त्या शोधा ..अजून कसे आनंद वाढविता येतील ते शोधा.
वारंवार येणारं लैंगिक असमाधान आनंदी जीवन पोखरून टाकते ते अजून जास्त पोखरून टाकू नका. तर ते पोखरू नये याकरिता आनंदाची, सुखाची भर टाका. एकमेक साथ आहोत कायम हा विश्वास द्या. भरभरून जगा. तृप्तता मिळवा.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


लेख आवडला
पती पत्नीनी सेक्स विषयी मोकळेपणाने चर्चा केली पाहिजे काय केल्याने बरं वाटलं/वाटतं
व बरं वाटलं नाही हे एकमेकांस सविस्तर सांगावं.सेक्स करीत असताना आपापल्या आवडत्या हिरो/हिरोईन बरोबर आपण कामसुख घेण्यात रत आहोत अशी फॅटसी करावयास हरकत नाही कारण प्रत्यक्ष असा अपराध घडत नसतो असे पाश्चात्य सेक्सोलोजिस्त सांगतात. पुरुषाने सेक्स क्रिया संपताच बाजूला दूर न जाता तिला आधकाधिक जवळ घेत आश्र्वासित करीत रहावं. स्त्रियांना संवाद साधायला फार आवडते भले त्यातून त्यांना इप्सित साधले नाही तरी चालेल. या उलट पुरुषाला संभोगाची वारंवारता हवी असते.