Skip to content

मुला-मुलीपेक्षा होणा-या सासू-सुनेची कुंडली जुळणे महत्त्वाचे.

मुला-मुलींपेक्षा होणा-या सासू-सुनेची कुंडली जुळणे महत्त्वाचे.


श्वेता पेंढारकर


मुलगा काय लग्नानंतर कसाबसा जुळवून घेतोच.

हे वाचल्यावर वाटलं खरच गरज आहे का याची…नवऱ्याची कुंडली जुळून देखील किती %मध्ये दोघांचे पटते..मतभेद असणं वेगळं एकमेकांच्या आवडीनिवडी न जुळणे वेगळे ते तर आई आणि मुलांच्याही जुळत नाही..हाताची पाची बोटे सारखी नसतात पण कुटूंबात एकाच प्रकारची माणसे कशी असतील…घरात केलेल्या भाजीला जर वेगवेगळी पसंद असेल तर स्वभावाला अनेक कंगोरे आहेत…शेवटी तुम्ही कोणत्या नजरेने पाहता त्यावर सगळं अवलंबून आहे..सासू सुनेकडे अगदी मुलगी म्हणून नाही पाहू शकली किंवा सून सासू ला आई नाही समजू शकली तरी निदान मैत्रीण समजू शकतात ना..

एखादी सासू ही आदी त्या घरची सूनच असते तिने त्रास सहन केला म्हणून सव्याज तिने सुनेला द्यावा का??मन ,स्वभाव जुळायला लागतो वेळ थोडा पण प्रत्येक गोष्ट नीट समजून उमजून केली की होत सगळं व्यवस्थित..सासू ने सोयीने वागू नये एकतर लग्न झाले म्हटल की आपल्या मुलाचे नवीन आयुष्य सुरू झालेय लक्षात घ्यावे..आणि त्यांनी देखील जिथं मने नाराज होण्याची शक्यता आहे तिथे ती बाजू सावरावी ..

सासू ने आई वडील सोडून आलेली मुलगी लगेचच तुमच्या घरात रुळेल ही अपेक्षा सगळ्यात पहिल्यादा सोडावी..अगदी उठण्यापासून ते खाण्यापर्यंत तिच्या सर्व सवयी वेगळ्या असतात तिला थोडा वेळ द्या..तुमच्या चाली रिती ,परंपरा ती पाहून आत्मसात करेलच आता ती तुमची आहे वेळ द्या,हळूहळू शिकवा ,”पि हळद आणि हो गोरे” असे नाही हो होत…मुलींना वेळ द्या आत्मसात करण्याची कला त्याच्यात जन्मात असते..पाहून त्या शिकतात..पण तुम्ही समजून घेऊन शिकवले तर आयुष्यभर त्या लक्षात ठेवतील..लादण्याची सवय सोडा..केलेच पाहिजे,झालेच पाहिजे,आलेच पाहिजे चा अट्टहास सोडा…

तुमच्या तरुण पणीचे म्हणजे सून म्हणून आल्याचे दिवस आठवा.. आल्या आल्या तुम्ही लगेच शिकला होतात का काही???आमच्यावेळी नव्हते बाई असे काही..आम्ही नाही वागलो असे,आम्ही पहा कसे केले…तुम्ही केले मग त्यांनी ही तसेच केले पाहिजे का??एकमेकांची मने सांभाळली,गोड वागलं,संभाळून घेतलं तर अवघड काहीच नाही..भांड्याला भांड लागतेच ,लागाव की नक्कीच पण त्याचा आवाज किती होऊन द्यायचा ते आपण ठरवावे..

कुठल्याही नात्यात पत्रिका पाहण्यापेक्षा दृष्टिकोन बदलणे गरजेचे असते तो बदला ग्रह तारे आपोआप आपली जागा बदलतील….


दैनंदिन जीवनाला त्रासले आहात का ?

क्लिक करा


आपले सुद्धा प्रेरणादायी लेख आम्हांला ९१३७३००९२९ या व्हाट्सएप क्रमांकावर पाठवा. आपल्या नावासकट अत्यंत नम्रपणे ते प्रकाशित केले जातील.

“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया !

1 thought on “मुला-मुलीपेक्षा होणा-या सासू-सुनेची कुंडली जुळणे महत्त्वाचे.”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!