लग्नानंतर दुसऱ्याशी प्रेम जुळत असल्यास, तो प्रसंग कसा हाताळावा.
सोनाली जे.
पहिली गोष्ट लग्नानंतर दुसऱ्याशी प्रेम का जुळेल ? काय कारण असेल ?
लग्नानंतर काही दिवस सुरळीत जातात असे वाटत असते. पण खरे तर हे एकमेकांचे अंदाज घेणे , स्वभाव समजून घेणे , आवडी निवडी समजून घेणे , बारकावे समजून घेणे, मग आर्थिक स्थिती , मानसिक स्थिती असेल , व्यावसायिक असेल, नोकरी मध्ये कोणत्या प्रकारचे काम , तसेच घरी स्वैपाक , टापटीप इतर गोष्टी मधले बारकावे .
आपल्या माणसांना देण्यात येणारी वागणूक असेल किंवा स्वतः ला असेल. किंवा जोडीदारां मधले संबंध .याची जाणीव सुरुवातीच्या काही दिवसानंतर खूप clarity येते. पण लग्नानंतर त्यात बदल करणे अवघड असते. तरी ही जुळवून घेण्याचे , एकमेकांना संधी देण्याचे खूप प्रयत्न केले जातात. पण कुठे तरी या क्षमता संपतात.
मग कुठे तरी आपला आनंद आणि सुख शोधण्याचा प्रयत्न केला जातो.
बरेचदा लग्नानंतर दुसऱ्याशी प्रेम जुळत असते. त्यात ही बरेचदा लग्नापूर्वी आवडणारी व्यक्ती असेल , संपर्कात , मैत्री मध्ये असेल, काही वेळेस प्रेम व्यक्त करायचे राहून गेले असेल तर ती व्यक्ती. काही वेळेस शिक्षण , नोकरी यातून दूर गेलेली व्यक्ती परत आल्यावर ही मग हे आकर्षण वाढून प्रेमात रूपांतर होते. मुळात प्रेमात रूपांतर होते पेक्षा जुने प्रेम परत गवसते.
तर काही वेळेस लग्नानंतर आधी माहिती नसणारी पण तेव्हा संपर्कात येणारी , जीचे बोलणे , कधी दिला जाणारा सॉफ्ट कॉर्नर , भावनिक दृष्ट्या ओळख आणि मग तेव्हा दुःखावर मारलेली फुंकर असेल , किंवा रोजचा ऑफिस , घरात सहवास . यातून एक आकर्षण निर्माण होते आणि त्याचे रूपांतर प्रेमात होते.
लग्नानंतर दुसऱ्याशी प्रेम जुळत असल्यास, तो प्रसंग कसा हाताळावा.
१. अर्थातच लग्नानंतरचे प्रेम जेव्हा होते , ते अविवाहित पुरुष असो , अविवाहित स्त्री बरोबर असो किंवा विवाहित. यात मर्यादा या नक्कीच येतात.कारण कायदा , समाज , नातेवाईक , सासर , माहेर हे महत्वाचे या सगळ्यांपासून लपून छपून या गोष्टी कराव्या लागतात. मग एकमकांच्या बरोबर बोलणे असो , भेटणे असो, सहवास असो , किंवा त्यापलीकडे जावून शारीरिक आकर्षण आणि शारीरिक संबंध . जरी ते आधीच्या पार्टनर पेक्षा आनंदी आणि सुखकारक असतील तरी या गोष्टी चोरून कराव्या लागतात.
त्यात ही मर्यादा , बंधने असतात. एकमेकांच्या नोकरी , व्यवसाय , प्रायोरिटी , आधी त्यांचे कुटुंब येते त्यांच्या गरजा त्यांच्या करिता वेळ , त्यांच्या करिता कर्तव्य केली जातात.
काही वेळेस पुरुषाचे त्याच्य बायको सोबत चांगले नाते , शारीरिक संबंध ही असतात. पण प्रत्येक पुरुषाला नाविन्याची ओढ ही असतेच. त्यात नवीन कोणी आली तर. तिच्या बरोबर संबंध येतात तेव्हा अनेक वेळा गोष्टी लपविणे अवघड जाते. जसे बायको सोबत नाते चांगले असते त्यामुळे आधी पासून सगळ्या गोष्टी तिला माहिती असतात. जसे ऑफिस वेळ , सुट्ट्या , मित्र मैत्रिणी , ऑफिस ची कामे ..कधी यापूर्वी टूर नसते मग अचानक का सुरू झाली. कपडे धुताना बारकाईने लक्ष असते. त्यातून ही असे काही अचानक लक्षात येते.
मोबाईल वर लक्ष असते. मोबाईल वरचे मेसेज वाचले जातात . अशावेळी शंकेचे रूपांतर खात्री मध्ये होते. त्यामुळे लग्नानंतर दुसऱ्याशी प्रेम जुळत असल्यास, तो प्रसंग हाताळणे तसे अवघड असते.
प्रत्येक पावूल खूप काळजीपूर्वक आणि डोळसपणे उचलावे लागते. अन्यथा एकदा का खात्री पटली की मग परत विश्वास पटवून देणे अवघड नाही अशक्य असते. म्हणून खूप जपून किंवा मर्यादा ठेवूनच पुढे जावे लागते.
२.लग्नानंतर दुसऱ्याशी प्रेम जुळत असल्यास, तो प्रसंग कसा हाताळावा. तर आपल्याला जेव्हा जाणीव होवू लागते की आपले लग्नानंतर दुसऱ्याशी प्रेम जुळू लागले आहे. तेव्हा त्याचं क्षणी स्पष्ट सांगून दूर व्हावें .. कारण त्या क्षणिक गोष्टीत अडकून पुढे जाण्याचे निर्णय घेतले तरी practically हे नाते कधीच पूर्णत्वास येणे शक्य नसते.
व्यवहारीक , मानसिक , कौटुंबिक , शारीरिक दृष्ट्या विचार केला तर स्पष्ट जाणवेल की आपल्याला एकमेकांना पाहिजे तेव्हा वेळ देणे ही शक्य नाही ..अशक्य गोष्ट आहे . स्वतः ची जबाबदारी सोडून प्रत्येक वेळेस भेटणे , बोलणे , शारीरिक संबंध हे कोणी accept करणार नाहीत. आणि रोज या गोष्टी शक्य नाहीत .. किती ही जवळ आले तरी दूर जाणारच. दिवसभर एकत्र असतील तरी रात्री घरी जाणारच. आज नाही तर उद्या तरी ..या मर्यादा.
शिवाय आर्थिक भार ही कोण उचलणार ? नोकरी नसेल , व्यवसायात तोटा असेल , गृहिणी असेल तर पैशाच्या जबाबदाऱ्या कोण घेणार ? आणि का ? पुरुष त्याच्या घरी बायको करिता करेल .तिला महिन्याच्या महिन्याला पैसे देईल खर्चाला पण या दुसऱ्या स्त्री ला तो का देईल ? घर चालवणार बायको. मुले त्यांचे खर्च याची जबाबदारी असताना त्यांच्या सुखाचा विचार करणार .. तो सोडून किंवा त्यात काटकसर , बचत करून या प्रेमात पडलेल्या स्त्री ला तो कधीच पैसे देणार नाही खर्चाला. . तो विचार ही येणार नाही. कृती तर दूरच.
सगळ्याच गोष्टींचा मर्यादा असतील तर मग मात्र लग्नानंतर दुसऱ्याशी प्रेम जुळत असल्यास, तो प्रसंग हाताळताना भावनिक , किंवा शरीर आकर्षण याचे विचार न करता केवळ व्यवहारीक गोष्टी , तार्किक गोष्टी वर भर द्यावा. आणि पुढे जाण्यापूर्वीच तिथेच थांबावे. अंतर ठेवावे.
३. लग्नानंतर दुसऱ्याशी प्रेम जुळत असल्यास आधीच काही गोष्टी खूप स्पष्टपणे बोलून घ्याव्यात. उगीच जमणार नसतील त्या गोष्टींना होकार देवू नाये. Clarity असेल तर त्यामुळे त्यातल्या मर्यादा , बंधने आणि भावना यावर नियंत्रण ठेवण्यास मदत होते.
आणि अवास्तव अपेक्षा वाढत नाहीत.
४. अवास्तव अपेक्षा न ठेवता जेवढी नेमून दिलेली भूमिका असेल तेवढीच पार पाडावी. म्हणणे सोपे असते परंतु समजणे आणि जमणे त्याहून खूप अवघड.
५. लग्नानंतर दुसऱ्याशी प्रेम जुळत असल्यास, आणीं घरी कोणतेही बदल घडणे शक्य नसल्यास सरळ सर्वांना विश्वासात घेवून स्पष्ट आहे ते सांगावे. त्याचे खरे कारण ही सांगावें . त्यावरून घरचे जो निर्णय घेतील त्यानुसार वागावे. जसे त्यांना माहिती असते . की काही झाले तरी हे लग्नानंतर चे प्रेम टाळता येणे शक्य नाही.
ते नाते खूप पुढे गेले आहे तेव्हा स्पष्टता , पारदर्शकता ठेवा. तो प्रसंग कसा हाताळावा यावर ही आहे. कदाचित अपमान होईल, घरातून बाहेर काढले जाईल , घटस्फोट .किंवा मग आहे हे असेच चालू ठेवायचे पण कोणतेही नाते नाही .मग physically असेल किंवा मानसशास्त्रीय दृष्ट्या .जे त्याक्षणी एकमताने निर्णय होतील ते स्वीकारले पाहिजे.
कोणताही प्रसंग हाताळताना सारासार विचार , प्रॅक्टिकल गोष्टींचे विचार , आणि बरेच छोट्या मोठ्या विचारांना प्राधान्य देवून ते हाताळावे लागतात.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


Barobar ahe…❤️
माझ्या जीवनातील सत्य घटना आहे..