Skip to content

तिने शरीर विकलं, पण आपण तिचं अंग झाकू का शकलो नाही.

तिने शरीर विकलं, पण आपण तिचं अंग झाकू का शकलो नाही.


सोनाली जे.


मनुष्य असो किंवा प्राणी तो नारी करिता .स्त्री ला आपले करून घेण्याकरिता अनेक प्रयत्न करत असतो. अगदी बघा पक्षात ही जे नर पक्षी त्यांना सौंदर्य दिले आहे. मोर त्याला सुंदर आणि आकर्षक रंगाचा फुलणारा पिसारा .. बुलबुल पक्षी असेल त्याला सुंदर तुरा , कोंबडा असेल तरी त्याच्यावर छान तुरा आणि शेपटी .. कोकीळ असेल तर त्याचा आवाज सुमधुर .

या जोरावर ते मादी पक्षी ला आकर्षित करत असतात. तसेच आहे पुरुष हा स्त्री ला त्याच्या देखण्या उंच पुऱ्या , आकर्षक व्यक्तिमत्त्व असेल , भारदस्त आवाज असेल , आखीव रेखीव दाढी .. आणि झुपकेदार मिशी असेल , किंवा त्याच्या पुरुषार्थ जसा नोकरी , व्यवसाय , सामाजिक स्थान, आर्थिक सुबत्ता यातून त्याचे कर्तुत्व असेल या जोरावर स्त्री ला आपल्याकडे आकर्षित करत असतो .

स्त्री आपले शरीर असे सहजासहजी कोणाला देत नाही. अगदी शेवटपर्यंत ती तिचे शील जपत असते. जेव्हा ती कमकुवत पडते मग कधी शरीर असेल , मन असेल , कोणी आपल्याच माणसांनी जोर जबरदस्ती केली असेल, पर्याय च नसेल तर ती गोष्ट तिच्या मनाविरुद्ध च करते.
विवाह , मंगळसूत्र या सारख्या पवित्र बंधनात ती जेव्हा असते तेव्हा खरेच ती खूप secure असते. आणि ती ज्याला मनापासून आपले मानते त्यालाच आपले शरीर आणि मन दोन्ही ही देते. पण आजकाल विवाहित स्त्री वर ही सासरच्या लोकांच्या समतीने जबरदस्ती केली जाते ती गोष्ट वेगळी. त्यामुळे खूपदा सासरी ती secure आहे का असा प्रश्न पडतो.

अर्थात काही अपवाद ही असतात. High society मध्ये आपल्या दिसण्याचा , सौंदर्याचा उपयोग लोकांना जाळ्यात फासून , किंवा स्पष्ट विचारून त्यांच्याकडून उपभोग घेण्याकरिता करणाऱ्या स्त्रिया त्यांची mentality ही त्या सोसायटी नुसार असते. त्यांना त्यात गैर काही वाटत नाही.

सुगंधा अशिक्षित अतिशय गरिबीत वाढलेली. माहेर काय अन् सासर काय दोन्ही कडे तीच अवस्था. दिसायला अतिशय सुंदर , रूपवान , देखणी च , काळेभोर डोळे, नितळ कांती, आकर्षक बांधा , जणू काही एखादी अप्सरा , परी च . किती वर्ष झाकून झाकून घरी ठेवणार. मोठी होवू लागली तशी आई वडिलांना तिची जास्त काळजी वाटू लागली.

म्हणून आई वडिलांनी सुगंधा चे अठराव्या वर्षीच लग्न केलं. नात्यातला च मुलगा ., तो ही वडीलांसारखा कामावर बिगारी म्हणूनच काम करत होता. गरिबीत ही चांगला संसार सुरू होता. दीड वर्षातच घरी सुगंधा सारखीच सुंदर रूपवान मुलगी जन्माला आली. सगळे काही व्यवस्थित सुरू होते. आहे त्या गरिबीत आनंदात मीठ भाकरी खात होते. सुगंधा ची मुलगी दहा वर्षाची झाली .. शाळेत घातली होती. खर्च वाढत होते. अशातच सुगंधा चा नवरा कामावर असताना च कसा काय वरतून खाली पडला देव च जाणे. रोज काम करणारा पण वेळच खराब म्हणायची. !!

सुगंधा कडे हॉस्पिटल करिता कुठून आणणार पैसे. ..ती स्वतः ज्यांचे काम करत होता नवरा तिथला मुकादम त्याच्याकडे गेली . तुम्ही खर्च केला पाहिजे ..तो स्पष्टपणे हात वर करून मोकळा. एवढेच काय तुझा नवरा माझ्याकडे कामाला नव्हताच म्हणाला. रडकुंडीला आली .रोज हाता पाया पडत होती. पण काही उपयोग होत नव्हता. तिच्या कडे रोज कामावरचे लोक त्यांचे परिवार बघत होते. पण कोणीच काही करू शकत नव्हते.

रोजची कसरत .. घरचे बघायचे दवाखाना . वयात येत चालली होती मुलगी . तिच्याकडे बघायचे. एकदा इमारती चा मुख्य बिल्डर साईट वर गेला तेव्हा सुगंधा तिथं मुकादम आणि ती बोलत होते. ती गयावया करत होती. त्याने तिला हटकले. ती गेल्यावर बिल्डर ने चौकशी केली आणि सुगंधा ला मी पैसे देतो म्हणाव , पण माझी अट आहे की तिने दररोज तीच शरीर मला दिले पाहिजे. तो बिल्डर सुगंधाच ती देखणे आणि आकर्षित रूप बघून तीच्याकरीता वेडा झाला.

सुगंधा या गोष्टी ला नाही म्हणाली . पैशाची गरज असेल तरी ती तिचे शरीर देण्यास तयार होईना. तेव्हा बिल्डर, त्याचे लोक यांनी सुगंधा आणि तिच्या मुलीला त्रास द्यायला सुरुवात केली. त्या दोघींना उचलून घेवून गेले. सगळे आजू बाजूचे लोक , बायका , कमावरचे लोक , मुकादम बघत होते . पण कोणी विरोध केला नाही. सुगंधा ला आपल्या पेक्षा मुलीची काळजी वाटू लागली. ते घाणेरडे लोक , त्यांची मुलीकडे बघण्याची नजर ,. किळस वाटत होती सुगंधा ला. दोन दिवस टिकला तिचा विरोध . मुली जवळ तो बिल्डर स्वतः येवू लागला तशी सुगंधा म्हणली , माझ्या मुलीला काही करायचे नाही. तिला सोडून द्या त्या बदल्यात माझ्या शरीराचे काही ही करा.

असे म्हणून सुगंधा ने मुलीला सोडून देण्याच्या बदल्यात स्वतः चे शरीर त्या बिल्डर ला विकले. हो विकलेच म्हणायचे ते. कारण अशा निर्दयी लोकांना विसर पडतो की त्यांना ही आया , बहिणी , मुली आहेत .

त्या बिल्डर कडे काम करणारे ही हे लोक पोटासाठी , आपल्या संसारा करिता च या गोष्टी करत होते ना ? प्रत्येकाच्या घरी आया , बहिणी , मुली , बायको होती ना . बघत बसले . पण एकाने हा विचार केला नाही की या जागी आपल्या घरची कोणी स्त्री असती तर ?

दुःखाचे डोंगरांवर डोंगर पडत असलेल्या या सुगंधाने आपल्या पोरी साठी ..तिच्या भविष्यासाठी , तिचे शील रक्षण व्हावे म्हणून तिने शरीर विकलं, काय हो पण त्या बदल्यात काय पैसा च हवा होता का तिला ?? नाही हो !! तिला तिची मुलगी तशीच निरागस , निष्कलंक , हसताना , बागडताना , शिकताना बघायची होती. म्हणून केवळ तिने तिचे शरीर विकले.

पण आपण तिचं अंग झाकू का शकलो नाही. कारण काय तर तिच्या अवती भोवती असणारे तिच्या सारखे लोक आपले आहे हे काम जाईल या भीतीने , तर आपल्या घरच्या बायकांना काही होईल या भीतीने , तर आपले काही बरे वाईट झाले तर आपल्या कुटुंबाचे काय या भीतीने , तर कशाला नसत्या भानगडीत पडायचे हा विचार करून गप्प बसले.

तर इकडे बिल्डर चे लोक त्याच्या जीवावर जगत होते म्हणून तोंड बंद ठेवून होतें . त्या बिल्डर ला साथ देत होते. आपण तिचं अंग झाकू का शकलो नाही याची खंत असेल ही मनात त्यांच्या पण कृतीने मात्र ते खरेच सुगंधाने शरीर विकलं, पण तिचं अंग झाकू शकले नाहीत.

आयुष्य आपल्या करिता जसे सुंदर आहे तसे ते इतरांच्या ‌करिता ही तितकेच सुंदर आहे असा विचार करून निदान अशा कठीण प्रसंगी तरी आपल्या घरातली स्त्री समजून आणि स्त्रियांनी एक स्त्री चा आदर केला पाहिजे असे समजून , आणि आज विरोध केला तर उद्या कोणाची हिम्मत होणार नाही स्त्री कडे वाकड्या नजरेने बघण्याची याची जाणीव ठेवून अन्याया विरूद्ध लढले पाहिजे.

सुगंधा च नाही तर तिच्या सारख्या अनेक आहेत जिने , तिने , त्यांनी शरीर विकलं, पण आपण तिचं अंग झाकू का शकलो नाही.तर आपल्यातला दुबळेपणा , भीती , आपल्यातली कमकुवतपणा , आपल्या भविष्याची काळजी , आपल्या जीवाची काळजी, आपल्या संसाराची काळजी , आपल्या नोकरी ची काळजी.

केवळ प्रत्येक वेळी आपण आणि आपला विचार करू नका मित्रानो आणि मैत्रिणींनो.. मनापासून विनंती करते की ज्या समाजात राहता तिथल्या लोकांच्या करिता , मानसिक संरक्षण असेल , शारीरिक संरक्षण असेल एक सुजाण नागरिक म्हणून स्त्री असो वां पुरुष अन्याया विरूद्ध आवाज चढवला पाहिजे. लढले पाहिजे. एक पुढे आला / आली तर हजारो लोक पुढे येतील. मी कसे म्हणून मागे राहिलात.मला कसली झळ नाही बसली तर मी का पुढे होवू असे म्हणून मागे राहिलात तर सगळेच जण हाच विचार करून मागे राहतील. क्रांती घडायची असेल तर कोणी तरी पुढाकार घ्यावा लागतो. कोणाचे तरी योगदान महत्वाचे असते.

प्रत्येकाला निर्धास्त आणि भितीमुक्त जीवन जगण्याचा अधिकार आहे. आणि त्याकरिता पुरुषांना च बाळकडू पाजले पाहिजे की प्रत्येक स्त्री चा आदर केलाच पाहिजे. तिचे संरक्षण ही प्रत्येक पुरुषाची जबाबदारी आहे.

तर नक्कीच सुगंधा आणि तिच्या सारख्या अनेक जणींना आपलीं शरीर विकावी लागणार नाहीत. आणि कधी असा नराधम भेटलाच त्यांना तर त्यांना त्या क्षणी प्रोटेक्शन देवून अंग झाकणारे / झाकणाऱ्या ही नक्कीच मदत करतील.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “तिने शरीर विकलं, पण आपण तिचं अंग झाकू का शकलो नाही.”

  1. खूप छान आहे जगातील सर्वच पुरुषाने हा विचार केला तर ही परिस्थिती श्री वर येणार नाही.

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!