Skip to content

दोघांनीही दोघांसाठी कुटुंबाशिवाय थोडा वेळ काढायला हवा.

दोघांनीही दोघांसाठी कुटुंबाशिवाय थोडा वेळ काढायला हवा.


सोनाली जे


अकेले है तो क्या गम है ! चाहें तो हमारे बस मैं क्या नहीं ! फिर नहीं टूटेगा, हम पे कोई तूफ़ान साजना … हो … देखना हर तूफ़ां का मैं करूंगा सामना, बस इक ज़रा …

अगदी योग्य गाणे आहे हे.

कुटुंबाची सुरुवात ही दोघां पासून होत असते. दोनाचे चार हात होतात . सुरुवातीला सगळे दोघांच्या भोवती फिरत असते. जसे आनंद , दुःख , गरजा , एकमेकांच्या आवडी निवडी , स्वभाव संभाळून घेणे. हे नैसरगिरित्या होतच असते. हळूहळू जबाबदाऱ्या वाढू लागतात आणि पूर्णपणे कुटुंब आणि त्याकरिता पार पाडाव्या लागणाऱ्या जबाबदाऱ्या यात अडकून पडायला होते. आणि मग दोन मुख्य व्यक्तीचं एकमेकांना वेळ देण्यास कमी पडू लागतात.

कुटुंबाच्या जबाबदाऱ्या पार पाडताना , त्यांच्या करिता धडपड करीत असताना दोघांनीही दोघांसाठी कुटुंबाशिवाय थोडा वेळ काढायला हवा…हो नक्कीच काढायला पाहिजे.

कारण काय होते की यात बरेचदा दोघांना असे वाटू लागते की आता आपण तेवढे महत्वाचे नाही राहिलो . आपली मुले हीच जास्त महत्वाची आहेत आता. परंतु तसे नाही . आपल्या दृष्टीने एकमेक ..जसे त्याच्या दृष्टीने ती आणि तिच्या दृष्टीने तो आजही तितकेच महत्वाचे आहेत. हे एकमेकांना समजून देण्याचे किंवा एकमेकांनी समजून घेण्याचे मार्ग म्हणजे काय तर एकमेकांना वेळ देणे. सुसंवाद असेल .

कधी सकाळचा गरम वाफाळता चहा निवांत बसून दोघांनी गप्पा टप्पा मारत घेणे असेल , किंवा नेहमी तिचं चहा करते तर कधी तरी त्याने तिच्या करिता चहा करून ती ला ही रिलॅक्स करावे. तिची काळजी आहे. तिच्यावर आणि तीने ही त्याच्यावर प्रेम आहे हे कृती आणि भावना यातून दाखवून द्यावे.

जसे सुरुवातीला दोघेच होते आणि सगळे दोघे मिळून एकत्र गोष्टी, निर्णय घेत होते. छोट्या गोष्टी असोत किंवा मोठ्या गोष्टी एकमेकांना विचारून , एकमेकांचे निर्णय, मत त्याला Respect देवून गोष्टी पुढ जावून एकत्र रित्या करत .. ते respect .. महत्त्व , निर्णय स्वातंत्र्य तसेच कायम टिकवून ठेवायचे. त्यात कोणीच किती ही बाकी व्यक्ती आयुष्यात आल्या तरी बदल घडवू नयेत. तर तो एकमेकात विश्वास अजून दृढ होतो. आणि respect वाढतो. Attachment आणि आपलेपणा ही वाढतो.

दोघांनी ही कुटुंबा शिवाय त्यांचे दोघांचे विश्व टिकवून ठेवणे तेवढेच महत्वाचे असते. एकमेकांच्या गरजा , भावना , अडचणी समजून घेणे ही महत्वाचे असते. शिवाय पूर्वीचे च भाव टिकवून आहेत दोघे. जसे एकमेकांची साथ , प्रेम ,आपुलकी तीच involvement , एकमेकांच्या आवडी निवडी जपण्याची मानसिकता, काही गोष्टी दोघांनीच एकमेकांच्या करिता करणे . त्यातन पूर्वीचे प्रेम , आपलेपणा टिकून राहतोच पण कोणतीही परिस्थिती असो. किंवा दिवस पुढे जावोत. नाती जुनी होवू देत . पण त्या दोघांच्या नात्याचे बंध अजून जास्त घट्ट आहेत .. त्यांच्यात तीच ओढ टिकून राहते.

कोणत्याही संकटात आपल्याला आपल्या या व्यक्तीची साथ नक्कीच आहे हे गृहीत धरले असते. आपला हा आधार कायम स्वरुपी आहे याची खात्री असते. एक secure feeling असते. जसे ध्रुव तारा त्याची जागा कायमस्वरूपी फिक्स आहे तसे आपले स्थान त्याच्या किंवा तिच्या आयुष्यात फिक्स आहे ही जाणीव खूप सकारात्मक राहण्यास मदत करते. आणि नाती लाँग term करिता आनंदाने पुढे निभावली जातात.

बरेचदा कसे होते की इतर कुटुंबीय समोर असतात त्यामुळे एकमेकांच्या भावना व्यक्त करणे जमत नाही. आणि आतल्या आत भावनांचा कोंडमारा होतो. आणि मग सततचा कोंडमारा एक तर मोठा स्फोट घडवून आणतात किंवा मग दुरावा निर्माण करतात. म्हणूनच कुटुंबासोबत ही वेळ घालवा पण दोघांनी ही दोघां करिता वेळ काढला पाहिजे . मोकळेपणाने सुसंवाद साधला पाहिजे , एकमेकांच्या काहीं अडी अडचणी असतील तर त्या अशा आपल्या वेळात , एकांतात खूप मोकळेपणाने मांडल्या जातात. आणि बरेचदा एकमेका सोबत बोलण्यातून ही अनेक समस्या , अडथळे दूर करण्यासाठी मार्ग सुचत असतात.

मुख्य आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर एकमेकांची काळजी घेणे मग मानसिकदृष्ट्या असेल किंवा शारीरिकदृष्ट्या असेल . ती घेणे जरुरी असते. नाही तर एकाकी पणाची भावना वाढीस लागते.

दोघांनी एकमेकांच्या आवडी निवडी , छंद ओळखून ते जोपासणे गरजेचे असते. काही गोष्टीत नाविन्याचा शोध घेतला पाहिजे. एकमक कोणत्या इच्छा आणि अपेक्षा आहे ते ओळखून घ्यावें .
सुरुवातीपासून चे नात्यातले freshness जपावे. कोणतेही गैरसमज करून energy आणि वेळ वाद. भांडणे यात घालवण्यापेक्षा चांगल्या गोष्टी , सकारात्मक गोष्टी करण्यात घालवाव्या.

कधी कुटुंब आणि जबाबदाऱ्या पार पाडताना स्वतः साठी जगायचे विसरून च जाते. त्यापेक्षा जबाबदाऱ्या अजून आनंदाने पार पाडत असताना अजून जास्त उत्साह यावा याकरिता एकमेकांचा सहवास हवाच. कुटुंबासोबत वेळ घालवा च पण आपला ही एकमेकांचा वेळ एकमेकांना द्या. कधी दोघेच सहल , फिरायला जा. कधी सिनेमा , कधी bdy celebration असतील anniversary असेल एकांत ही द्या . हलकासा स्पर्श असेल किंवा निरोगी विचार आणि सुखी , आनंदी ठेवणारे शारीरिक संबंध हे तुम्हाला सगळे विसरून अजून जवळ आणत असतात. आणि एकमेकात ओढ टिकवून ठेवत असतात.

अनेक आर्थिक गोष्टी , महत्वाचे निर्णय , काही वैयक्तिक गोष्टी कुटुंबा समोर मांडता येत नाहीत कारण त्याचे दडपण इतरांना नको म्हणून अशा वेळी एकमेकांनी आपली स्पेस घ्या आणि एकमेकांना सगळ्या गोष्टी शेअर करा. एकमेकांमध्ये पारदर्शकता असणे जरुरीचे. आणि आयुष्याच्या चढ उतार यात प्रत्येक क्षणी एकमेकांनी खंबीरपणे दिलेली साथ याची जाणीव कायम ठेवा. आणि तसे व्यक्त ही करा.
यातून जुन्या दिवसांची जोड ही कायम नवीन गोष्टी करण्यास प्रोत्साहित करत असते.

आयुष्य खूप सुंदर आहे. दोघांनी एकमेकांना वेळ च नाही . बोलता ही येत नाही मोकळेपणा नाही ही करणे दूर करून दोघांनीही दोघांसाठी कुटुंबाशिवाय थोडा वेळ काढायला हवा.आणि आयुष्य अजून सुंदर , आनंदी आणि उत्साही ठेवावे.

 


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!