सत्र सोळावे :- जुगार खेळणे (Pathological Gambling)
भारतासारख्या विकसनशील देशात अत्यंत दारिद्रय पासून ते श्रीमंत आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना सुद्धा या विकृतीने पछाडलेले आहे. मनावर नियंत्रण नसल्याने अक्षरशः या विकृतीने ग्रस्त असणाऱ्या व्यक्तींचा टक्का हल्ली वाढतोय. जुगार खेळणारी व्यक्ती जेव्हा स्वतः च्या मनावर ताबा ठेवू शकत नाही, जुगारामध्ये खर्च होणारा वेळ व पैसा यावर नियंत्रण ठेवू शकत नाही व त्यामुळे गंभीर समस्या उद्भवतात, त्यावेळी त्याचे रूपांतर या विकृतीत केले जाते. म्हणजेच जुगार खेळण्याची समस्या अतिशय तीव्र झाल्यास ती एक प्रकारची मनोविकृती समजली जाते.
२) घरच्यांपासून, मित्रमंडळींपासून जुगाराचा खेळ लपवण्याचा व्यक्ती प्रयत्न करते, त्यासाठी अनेकदा व्यक्ती खोटेही बोलते.
३) त्रस्त व्यक्तीला मनात वारंवार जुगारासंबंधी विचार येत राहतात. कधी त्याबाबतचे पूर्वी आलेले अनुभव, घडलेल्या घटना आठवतात, तर कधी जुगाराशी निगडीत दिवास्वप्नेही व्यक्ती पाहत असते.
४) वारंवार प्रयत्न करूनही जुगार खेळणे बंद करण्यात व्यक्ती असमर्थ ठरते.
५) जुगारात झालेले नुकसान भरून काढण्यासाठी व्यक्ती अधिकाधिक प्रमाणात जुगार खेळात राहते.
कारणे :
१) या आजाराने ग्रस्त व्यक्ती बरेचदा विस्कळीत कुटुंबात, हिंसक वातावरणात लहानाचे मोठे झालेले असतात. अशा परिस्थितीत भावनिक पातळीवर गोंधळ होऊन जुगाराला बळी पडण्याची दाट शक्यता असते.
२) झटपट पैसे कमविण्याची तीव्र इच्छा बाळगणाऱ्या व्यक्ती या आजाराला पटकन बळी पडतात.
३) घरामध्येच गुन्हेगारीचे वातावरण असल्यास अशा व्यक्ती या आजाराला बळी पडतात.
४) मेंदूतील नॉरएपिनेफ्राईन व्यतिरीक्त सिरोटोनिन या रसायनांच्या कमतरतेचाही ही विकृती होण्यामागे संबंध असू शकतो.
५) समोरच्याला कमी लेखणे, इतरांपेक्षा स्वतःला श्रेष्ठ समजण्याची इच्छा ठेवणे तसेच पैश्याला अवाजवी महत्व देणाऱ्या व्यक्तींना हा आजार होण्याची चिन्हे जास्त असतात.
उपचार :
१) या आजाराने ग्रस्त व्यक्तींसोबतच त्यांच्या कुटुंबाचे सुद्धा समुपदेशन केले जाते.
२) तीव्र भावनिक गुंतता असल्याने परिस्थितीकडे पाहण्याचा तार्किक दृष्टिकोन याविषयी व्यक्तीला प्रशिक्षण दिले जाते.
३) CBT ही सायकोथेरपी खूप फायदेशीर ठरू शकते.
४) काही औषधोपचारांचाही परिणाम या व्यक्तींवर होत असतो.
टिप : तज्ञांच्या योग्य सल्ल्याशिवाय कोणतीही उपचार पद्धती वापरणे धोक्याचे आहे. कारण आजाराचे निदान (Diagnose) यावर संपूर्ण उपचार पद्धती अवलंबून असते
फ्री हेल्पलाईन – ९१७५४२९००६ / ९१३७३००९२९ (वेळ सायंकाळी ५ ते ६)
धन्यवाद !