असं काय घडतं की त्यावेळी चेहरे सुद्धा अजिबात पहावेसे वाटत नाहीत.
सोनाली जे.
Title बघितले आणि आठवण झाली ती ” दिलं चाहता है ” या सिनेमाची. तीन अतिशय बेस्ट फ्रेंड्स.. सिद , आकाश , समीर . . कायम एकत्र. कोणतीच गोष्ट एकमेकांना सोडून करत नसतात. सिद आणि तारा खूप जवळ येतात. सिद आकाश आणि समीर ला सांगतो की त्याला तारा सोबत प्रेम आहे. सिद : मैं नहीं चाहता की वोह मेरी बन जाये , मैं उससे शादी करू ऐसी कोई उम्मिद नहीं रखता ! अगर वो मुझसे प्यार ना भी करें तो भी ठीक है !
तेव्हा आकाश सिद ला गमती गमती मध्ये म्हणतो मग ठीक आहे. तशी ही तारा अनुभवी..experienced आहे. अकेली रहती है, तुझे तिच्या कडे रोज जाणे येणे आहे. त्याच्या म्हणण्याचा रोख असतो. की तारा सिद पेक्षा वयाने खूप मोठी असते.आणि त्या दृष्टीने तिला तो फक्त सेक्स पॉइंट of view विचारात घेतो आणि सिद ला तसे समीर समोर तारा वरून बोलतो . समीर ला एव्हढे पण म्हणतो देख और कुछ सिख ..
सिद ला ही गोष्ट खूप hurt होते . तो आकाश ला त्यक्षणी एक कानाखाली वाजवितो. आणि म्हणतो तेरीसोच इतनी घटिया है ! आणि म्हणतो अरे तुला मी सांगतो की माझे तिच्यावर खरे प्रेम आहे आणि तू खरे प्रेम समजणार नाही. त्यात हे वयाचे अंतर याने काही ही फरक पडत नाही. वो कुचा
त्यानंतर बराच काळ आकाश आणि सिद एकमेकांबरोबर बोलत ही नाहीत. अनेकवेळा आठवण आली तरी त्यावेळी चेहरे सुद्धा अजिबात पहावेसे वाटत नाहीत.
आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी ही घटना घडत असते. बहुतेक वेळा जे भावनिकदृष्ट्या , शारीरिकदृष्ट्या , जवळ असतात. त्यांच्यात कधी ना कधी गैरसमज असतील, अविश्वास असेल , इतर कोणाकडून काही समजले तर आपल्या व्यक्ती विषयी आपण जवळ असून ही आपल्याला दुसरीकडून समजते याचे वाईट वाटते आणि दुःख जरूर होतेच. भांडणे , वादावादी असतील ती अगदी टोकाची झाली .विकोपाला गेली .
आपण आपली व्यक्ती बाबत इतकी खात्री बाळगून असतो की कोणत्याही परिस्थिती मध्ये ती कशी वागणार याची खात्री असते आणि काही वेळेस आपल्या अपेक्षा काही वेगळ्या आणि ती व्यक्ती वेगळी वागते. त्यामुळे आपल्यात वातावरण बिघडते. आणि एकमेकांना त्यावेळी किती ही समजून सांगितले तरी समजून घेण्याची क्षमता च संपते. ज्याचीन आणि एकमेकांशी बोलणे तर दूरच पण एकमेकांचे चेहरे ही बघावे असे वाटत नाही.
स्वप्नील आणि स्नेहा यांच्यात मुलांच्या अभ्यासावरुन कायम भांडणे होत. स्वप्नील कायम स्नेहाला मुलांच्या समोर ओरडत असे. त्यांच्या मागे अभ्यासावरुन का लागते म्हणून स्नेहावर भडकत असे. त्यातून स्नेहा ने काही सांगण्यासाठी तोंड उघडले तरी मग अजून जास्त भडकत असे.
एकदा क्लास चे शिक्षक घरी फोन करून मुलांच्या कडे अभ्यासावर लक्ष देण्यास सांगतात . त्यावरून स्नेहा मुलांना समजून सांगत असते. तरी त्यावरून स्वप्नील स्नेहा वर भडकला. भांडला ..काही ऐकून घेण्यास तयार नव्हता . तेव्हा मग स्नेहा चा ही पारा चढला.
आणि त्याक्षणी दोघेही त्यांचे कॉलेज पासून चे प्रेम , चांगल्या आठवणी , एकत्र घालवलेले सुंदर क्षण , अनेक गोष्टी एकत्रित रित्या केल्या होत्या. काही creativity. त्याच बरोबर सुख दुःखात एकमेकांनी दिलेली साथ ही विसरले.
आणि त्या क्षणिक गोष्टी ज्या घडल्या. त्याला त्यांनी दिलेली प्रतिक्रिया आणि दिलेला प्रतिसाद . React आणि response यातून परिस्थिती , मनस्थिती बिघडली . प्रेम , माया , आपुलकी , सुख , आनंद या सगळ्या भावनांची जागा क्षणात केवळ रागाने घेतली आणि दोघे ही एव्हढे धुमसत होते की त्यावेळी चेहरे सुद्धा अजिबात पहावेसे वाटत नव्हते. पुढचा कित्येक वेळ ते त्याच विचारात की स्वप्नील मुलांच्यापुढे मला असे का बोलला ? मला घालून पाडून बोलला. माझे ऐकून घेतले नाही.
हे सगळे नकारात्मक विचार आणि प्रतिक्रिया डोक्यात येत होत्या. तसे कारण खूप छोटे पण त्यावर समस्या शोधणे राहिले बाजूला. निराकरण करणे राहिले बाजूस , आणि त्या वरून अनेक गोष्टी तून तू असेच वागतो .तू अशीच वागते. हे मनात कुठे तरी सुप्त दडलेले विचार पुढे येत जातात. आणि मग इतर वेळी किती ही चांगले असणारे relations बिघडत जातात. एकमेकांविषयी आदर कमी होवून तिरस्कार वाढत जातात.
कोणत्याही दोन व्यक्ती असतील त्यांच्यात वाद , गैरसमज , अविश्वास निर्माण झाला किंवा खरेच कुठे फसगत झाली. व्यवहारात असेल किंवा नात्यात असेल . एखाद्याने भागीदारी केली आणि ठरल्या प्रमाणे दुसऱ्याला फायदा किंवा त्याचा हिस्सा दिला नाही तर व्यवहारामुळे , त्यात झालेली फसगत असेल , किंवा दिलेला शब्द पाळला नाही म्हणून मैत्री मध्ये , भागीदारीत कायमची कटुता येते. आणि एकमेकांचे तोंड बघण्याची इच्छा होत नाही.
तसेच आहे नात्यात तुम्ही काही गोष्टी करण्याची हमी देता. आश्वासन देत असता. आणि काही काळानंतर विसरून जाता. टाळाटाळ करता. किंवा इतर गोष्टींना जास्त महत्व देता तेव्हा आपण महत्वाचे नाही ही नकारात्मक भावना वाढीस लागते.
सुर्यवंशी सिनेमा मध्ये वीर सूर्यवंशी त्याची बायको रिया आणि मुलगा आर्यन बाहेर गेलेले असतात. आणि ते जिथे असतात तिथून जवळच सेंट्रल मॉल मध्ये आतंकवादी येणार असतात बॉम्ब प्लांट करणार असे समजते म्हणून वीर सुर्यवंशी वेळ वाचविण्यासाठी आपल्या फॅमिली सकट तिथे मॉल जवळ जातो आणि त्यात ते आतंकवादी त्याच्या गाडीवर हल्ला करतात आणि वीर सुर्यवंशी चा मुलगा आर्यन याला गोळी लागते. तेव्हा रिया ही एक आई ..आणि तेवढीच चांगली बायको ही असणारी वीर चे धाडस सहन करू शकत नाही आणि त्यात कुटुंबाचा विचार केला नाही म्हणून वीर चे तोंड कधी बघणार नाही असे ठरविते. आणि मुलाला ही त्याच्या पासून कायमचे दूर घेवून जायचे ठरविते.
असं काय घडतं की त्यावेळी चेहरे सुद्धा अजिबात पहावेसे वाटत नाहीत. जरा नीट विचार केला तर नक्की जाणवेल की परिस्थिती, व्यक्ती , भावना या हाताबाहेर जातात. आपला स्वतः वर आपला कंट्रोल राहत नाहीं. तात्कालिक , क्षणिक परिस्थिती ला आपण React आणि रिस्पॉन्स करत असतो. आणि नकारात्मक भावना वाढीस लागतात.
हेच घडत ..हीच करणे असतात. तार्किक क्षमता संपते. बुध्दी पेक्षा भावना वरचढ होतात. आपण आपले पेशंस घालवून बसतो. चांगल्या गोष्टी , क्षण , अनुभव विसरून वाईट गोष्टीचं पकडुन ठेवतो ..त्याच त्याच रिपीट करतो . त्यामुळेच तिरस्कार वाढतो. तो क्षणिक असतो पण वाढतो . आणि त्यावेळी चेहरे सुद्धा अजिबात पहावेसे वाटत नाहीत.
आयुष्य सुंदर आहे. आपल्या भावना , अनुभव , क्षणिक गोष्टी यावर मनाचे आणि भावनांचे नियंत्रण ठेवण्यास शिका आणि आपल्या आवडत्या व्यक्ती सोबत अजून सुंदर आयुष्य घालवा.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


