Skip to content

वय झाल्यावर बायकोच चांगली आहे, असा साक्षात्कार का होत असेल.

वय झाल्यावर बायकोच चांगली आहे, असा साक्षात्कार का होत असेल.


सोनाली जे


लग्न हा संस्कार किंवा बंधन , कायदा , समाज आणि नातलग यांच्या संमतीने एकदा संसार सुरू झाला की जोडीदार हे शरीर आणि मन याने एकरूप होतात च.

आपल्या संसाराची प्रत्येकाची काही स्वप्ने असतात. पती असेल तर आपल्या पत्नी , कुटुंबाला सुरक्षितता द्यावी हा त्याचा पहिला उद्देश असतो. त्याची जबाबदारी तशी मोठी असते. आर्थिक , सामाजिक , भौतिक , मानसिक सुरक्षितता आणि स्थिरता कायमस्वरूपी देणे हे तसे खरेच अवघड काम आहे. परंतु तो सतत काम करून पैसा साठवून , दैनंदिन खर्च भागवून , घर घेतो , गाडी असेल , रोजचे ही खर्च असतील . आजारपणे ..पुढील भवितव्य त्याकरिता पैसे साठवत असतो. गुंतवणूक करत असतो. पुढे जेव्हा मुले होतात मुलांची जबाबदारी वाढते. खर्च ही वाढतात.

अर्थात संसार हा सजविण्याकरिता दोघेही कष्ट करत असतात. काही अपवाद ही असतात. ज्यांना कष्ट करून यश मिळत नाही. किंवा काही असेही असतात की त्यांना आपला संसार , आपली पत्नी यांच्या करिता खरेच काही करण्याची इच्छा नसते. आवड नसते. किंवा काहीना शक्य नसते. त्यांच्या मर्यादा असतात. इच्छा असूनही तेवढी आर्थिक क्षमता नसते.

स्त्री मात्र खूप उत्साही असते. तिला आपले घर असे असावे. असे सजवावे या गोष्टी घ्याव्यात अशी स्वप्ने असतात. जशी जमतील तशी थोडी फार तरी पूर्ण करत असतातच. नाही जमले तर अट्टाहास नाही. भांडणे नाही. आहे त्यात adjust करून घेतात.

लग्नानंतर अनेक वर्ष जोडीदार हे एकमेकांच्या आवडीनिवडी , एकमेकांच्या गरजा , अपेक्षा समजून घेत असतात. आयुष्यातले चढ उतार असतील त्यात साथ देत असतात. कधी निराशा आली तर प्रेरणा देत असतात. आयुष्यात छोट्या नोकरी मिळकती पासून साथ देताना मोठ्या हुद्दयावर बढती असेल, आर्थिक बढती , परदेश दौरे यात छोट्या गोष्टी पासून अगदी बॅग आणण्यापासून , भरणे असेल , तिकडे जाताना खावू करून देणे असेल किंवा गरजेच्या वस्तू .किंवा स्वतः परदेशी सोबत जावून तिकडे adjust होणे असेल. या सर्व गोष्टी असतील यात एकमेक साथ देत असतात.

तर पत्नी करिता महिन्याचे प्रॉब्लेम्स असतील , किंवा बाळंतपणे असतील किंवा इतर आजारपणे असतील यात पती ची साथ असते.
तर रोज केलेले पदार्थ आवडीने त्याला रुचकर ही पावती देणारा पती असेल. एकमेकांना काय हवे नको असेल ते एकमेकांना पक्के माहिती असते.

एकमेकांच्या भावना , इच्छा , स्वभाव एव्हढे वर्षात एकमेकांना खूप परिचित पेक्षा अंगवळणी पडलेल्या असतात. झालेल्या असतात.

सर्वात महत्वाचे म्हणजे आयुष्यात कायम असणारी एकमेकांची साथ , सोबत आणि सवय ही एकमेकांना गृहीत धरण्यास भाग पाडते.
एखादी गोष्ट सापडतं नसेल तर ही कुठे आहे .ते papers कुठे ठेवले पासून शर्ट चे तुटलेले बटण पुढच्या वेळेस शर्ट घालताना आपोआप जाग्यावर असते कारण इतका बारकावा पत्नी कडे असतो.

तर बाहेरून औषधे वेळेत घेवून येणे आणि वेळेत देणे हे पती करत असतो. अशी अनेक उदाहरणे मी बघितली आहेत. माझे आजी आजोबा , आईबाबा यात आजोबा बाबा कायम आजी ची काळजी घ्यायचे. औषधे घेवून येणे ती वेळेत देणे. तर आजी आणि आई प्रत्येक गोष्ट या पुरुषांना वेळेत देण्याची सवय. ताजे आणि पौष्टिक अन्न असेल तर प्रत्येक गोष्टींची काळजी . त्यांचे कपडे , वस्तू जागच्या जागी ठेवणे .

स्त्रिया खरे तर लवकर थकतात. कारण ठराविक वयानंतर त्यांचे काही ना काही दुखणी सुरू होतात. याची कारणे ही तशीच असतात कारण स्त्री खूप सगळ्या जबाबदाऱ्या , कामे पहिल्यापासून करत आलेली असते. आणि त्यात कुठेही खंड पडत नाही. बरे नाही म्हणून पडून राहणे शक्य होत नाही तिला. तर बरे नसताना औषध घेवून ती कामाला लागते. त्यात वेळीच विश्रांती मिळत नाही.

बाळंतपणे यात हाडे ठिसूळ होणे . लक्ष दिले नसेल .व्यायाम नसेल तर जाडी वाढते. त्यातून निर्माण होणारे प्रॉब्लेम्स हे स्त्री ला सहन करावे लागतात. पण तरुण असताना ती ते सहज सहन करते .पण थोडे वय झाले की मर्यादा येतात. तेव्हा पुरुष मदत करत असतात.

तसेच सेवा निवृत्त झाल्यावर .किंवा वयस्क झाल्यावर पुरुष निवृत्त होवून घरी राहतात. तेव्हा त्यांचे नेहमीचे रूटीन ही बदलते. तरी ही पत्नी त्यांच्या सवयीने प्रत्येक गोष्ट वेळेत करत असते. नेहमी च्याच वेळेत जेवण , खान , कपड्यांची काळजी , धुणे , इस्त्री , घड्या करून जागच्या जागी ठेवणे , इतर वस्तू सगळ्या नीट ठेवणे. खूप काळजी घेत असतात.

शिवाय निवृत्ती नंतर घरी असतील .पेन्शन असेल नसेल तरी आर्थिक गोष्टीवरून रखरख करत नाहीत. वाद घालत नाहीत. मोकळे च असता. हे करा ते करा असे तगादे नसतात. किंवा त्यांच्या सारखे मी पण आता आराम करणार . इतकी वर्ष केलं मी आता ते घरीच आहेत करू देत आपले आपले असेही कुठे विचार येत नाहीत ..

तर अजून जास्त मन , शरीर आणि भावना जपल्या जातात. इतकी वर्ष कामाचा ताण पडलेला जाणवत असतो म्हणून बायको ही खूप सांभाळून घेते. आवडते छंद जपण्यात मदत करते. येणारे मित्र मंडळी यांचे आदरातिथ्य असेल.

शरीर , मन , भावना आणि आर्थिक गोष्टी , नातेवाईक , शेजारी , या सगळ्या गोष्टींचे ताळमेळ कसे घालायचे हे पक्के गणित जमले असतें .
एकमेकांची chemistry पक्की झालेली असते.

मुले मोठी होत असतात .त्यांचे शिक्षण पूर्ण होवून नोकरी , त्यांचे जोडीदार बघणे . किंवा त्यांनी पसंत केले असतील तरी अनुरूप आहे ना जोडी याची शहानिशा करणे आणि त्यांची लग्ने , पुढे त्यांच्या जबाबदाऱ्या म्हणजे नातवंडे सांभाळणे. यात दोघेही रमून जातात. किंवा पर्याय नसेल तरी करतात.

वय झाल्यावर बायकोच चांगली आहे, असा साक्षात्कार का होत असेल. तर तिला खूप सारे बारकावे माहिती झाले असतात एवढी वर्षात. अगदी चहात साखर जास्त लागते किंवा बिन साखरेचा इथपासून काय गोष्ट आवडते आणि काय नाही ..काय खाणे पचते आणि काय नाही. कोणत्या आवडत्या आणि कोणत्या नावडत्या गोष्टी आहेत.

वर्षानुवर्ष एकत्र असल्याने हवामान बदलले , ऋतू बदलले तर होणारे त्रास असतील त्यावर औषधोपचार असतील सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टीं तोंडपाठ अगदी झोपेत सुधा सांगू असे. आणि वस्तू जागच्या जागी असणार.

स्वभावाचे कांगोरे भिनल्लेले असतात. कोणत्या क्षणी कसे react होतील याची मानसिकता तयार झालेली असते. अनेक वर्ष केलेले त्याग असतील , एकमेकांनी सहन केलेली दुःख असतील , अतिशय आनंदाचे क्षण असतील , जपलेली आपली नात्यातली असतील किंवा जोडीदाराच्या नाती , मित्र मैत्रिणी एकमेकांनी सांभाळून घेतली असतात. प्रत्येक अडी अडचणीच्या काळात दिलेला आधार असतील. तर छंद जोपासना करताना दिलेले प्रोत्साहन असेल.

पूर्वी केलेली उत्कृष्ट पेंटिंग आता नव्याने परत छंद जोपासताना थरथरणारे हात असतील किंवा त्यात अधिक दृढ झालेला विश्वास आणि बदल असेल त्याची तारीफ करून अजून motivate करणे ज्यातून पती ही परत उत्साहाने नव्या गोष्टी करताना नाविन्याचा अनुभव घेत असतो. आणि जगण्याची उर्मी , उत्साह वाढवत असतो. Energy जशी खर्च होते तशी मिळत ही असते.

वय झाल्यावर बायकोच चांगली आहे, असा साक्षात्कार का होत असेल. आणि कधी तर जेव्हा शरीर थकते. मन जरी उत्साही असेल तरी शरीराच्या मर्यादा आहेत. आणि शरीराच्या मर्यादा आल्या. डायबेटिस असेल , b.p. इतर काही आजार असतील . किंवा organs थकले . स्त्री पुरुष संबंध ..शारीरिक ही त्यात ही वयोपरत्वे limitations आले तरी बायको काही सोडून जाणार नाही.

उलट कोणतीही जाणीव न होवू देता ती मानसिक आधार देईल. इतर अनेक गोष्टीतून आनंद कसा वाढवायचा ते नक्की करेल . इतक्या वर्षात जी wish list पूर्ण करण्याची राहून गेली ती सगळी एक एक करून पूर्ण करेल .. आनंदी राहण्याकरिता प्रयत्न करेल. कारण तेव्हा एका ठराविक वयानंतर पैसा असला तरी सोबत मुले किंवा इतर कोणी नसते. मित्र मैत्रिणी ही हळूहळू त्यांच्या विश्वात रमतात. त्यांच्या ही मर्यादा त्यांना येतात. त्यातले कोणी जिवंत असतात. नसतात. तरी त्यांच्या घरचे कसे वातावरण त्यावर भेटी गाठी , बोलणी अवलंबून असतात.

त्यामुळे बायको ही आपली हक्काची ती कायम साथ देत आलेली याची पूर्ण खात्री पटलेली असते. सगळ्या गोष्टी एकमेकांना माहिती असतात. सगळे व्यवहार एकमेकांना माहिती असतात. मदत करणे असेल किंवा औषधे , डॉक्टर वेळीच बोलावणे असेल किंवा एखादा सण आनंदाने साजरा करणे असेल . नाही तर मस्त फिरायला जाणे .लाँग ड्राईव्ह ..गाडी चालवणे शक्य नसेल तर ड्रायव्हर किंवा. इतर कोनिंसोबत घेवून जाणे ..

आर्थिक गोष्टी ही परत नियंत्रणात ठेवणे .कारण retirement नंतर , वय झाल्यावर पेन्शन असेल तर ठीक नसेल तर आहे त्यात manage करणे . तरी कसली उणीव जाणवू न देणे.

शरीर आणि मन , शेजारी पाजारी , नातेवाईक तेव्हाही जपणे ..कारण पुरुषांना हे फारसे जमत नाही. स्त्री मात्र सहजी या गोष्टी करत असते.
बायको मधले वर्षानुवर्ष टिकवून ठेवलेले सातत्य , प्रेम , वेळप्रसंगी बायको ही नवऱ्याची ही आई होते तर मुलांची ही. तर कधी नवऱ्याची मैत्रीण ही होते. तर काळजी घेणाऱ्या ..हाक्काने‌ दटावणारी बहीण असते तशी.

तीच्यातले चांगले असणारे गुण बरेचदा कामाच्या गडबडीत , घरा बाहेर कामासाठी असल्याने दुर्लक्षित केले गेले असतात. किंवा झाले असतात. परंतु जेव्हा सगळ्यातून मोकळीक मिळते तेव्हा ते माहिती असलेले , दुर्लक्ष झालेले गुण नव्याने समोर येत असतात. आणि तिचा चांगुलपणा प्रत्येक गोष्टीत जाणवत असतो.

तिची सहनशक्ती , सोशिकता , घरासाठी ची आपुलकी , आवड , मग कधी ती स्वतः cook , chef , तर कधी बागेला पाणी घालणारा, बागकाम करणारा माळी असेल .तर एखाद वाद्य उत्कृष्ट रित्या वाजवत असेल .शिवणकाम असेल . तर वाचन , लिखाण असेल , पुढारी वृत्ती असेल आनंद देण्याची आणि घेण्याची वृत्ती असेल तर झाकली मूठ सव्वा लाखाची ठेवण्याचा स्वभाव असेल , बचत असेल . किंवा तिची नॉनस्टॉप बडबड असेल. अनेक गोष्टीला नव्याने बघता येते.

इतर कोणी कायम साथ देणारे नसते. मित्र मैत्रिणी असतील , नातेवाईक तेवढ्या पुरते .वर वर दाखवितात. पण प्रत्यक्षात करणारी .साथ देणारी ही बायको च असते. आयुष्य सुंदर आहे. वय झाल्यावर बायकोच चांगली आहे, असा साक्षात्कार अनेकांना होत असेल. तेव्हा तुम्ही तुमचा ही चांगुलपणा दाखवत असता आणि तो अजून वाढविण्याचा प्रयत्न करा.

स्त्री ही खूप छोट्या गोष्टीत ही आनंद मानणारी आणि इतरांना आनंद देणारी , स्वतः सुखी रहाणारी आणि इतरांना ठेवणारी , आपल्यापेक्षा इतरांना जपणारी , भूक , झोप याची तिला अधिक जाण असलेली ..

आपल आयुष्य घडविणारी , गृहीत असलेली आणि कायम मदत करणारी. कोणत्याही परिस्थिती मध्ये साथ न सोडणारी अशी असते.
तिला ही अपेक्षा अशीच कायम साथ असण्याची .secure life ची असते.तिचे स्थान ध्रुव ताऱ्या सारखे असावे अशी अपेक्षा करणारी . वाद , भांडणे झाली तरी ती वेळीच सावरणार , किंवा गप्प बसणार. नाही तर नंतर येवून तिची चूक आपणहून कबूल करणारी.

नवऱ्याची चूक असेल तर क्षमा ही करणारी, शेवटी सगळेच दोघानी मिळून एकत्र जमवले असते. सजवले असते .आता तशी काही इच्छा ही नसते , तेव्हा ती निस्वार्थी , आपल्यापेक्षा नवऱ्याला जपणारी अशी ही बायको वय झाल्यावर ही बायकोच चांगली आहे, असा साक्षात्कार अनेकांना होत असेल.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!