पुरुषांना आकर्षित करण्यासाठी स्त्रिया खरंच नाना तऱ्हेचे मार्ग अवलंबतात का ??
सोनाली जे.
मी माझ्या लेखातून हा मुद्दा नेहमीच मांडत असते . चुंबक जसे असते. त्यात जसे दोन विरूद्ध पोल एकमेकांना attract करतात तसे स्त्री आणि पुरुष हे भिन्नलिंगी व्यक्तिमत्त्व एकमेकांकडे आकर्षित होतात.
मग एखादी स्त्री आवडली तर पुरुष तिला आपलेसे करून घेण्याकरिता जसे विविध गोष्टी करतो , तिच्या आवडी निवडी काय असतील ते विचारात घेतो , तसे स्त्री ही पुरुषाला आकर्षित करून घेण्यासाठी नाना तऱ्हेचे मार्ग अवलंबत असते.
पुरुषांना आकर्षित करण्यासाठी स्त्रिया खरंच नाना तऱ्हेचे मार्ग अवलंबतात का ?? तर नक्कीच हो. कोणते मार्ग बरे ? विचार करूयात हुं :
१. स्त्री तिचे बाह्य सौंदर्यात कशी आकर्षकता दिसेल याकडे लक्ष देते .
जसे की स्त्री चे सौंदर्य , रूप , तिची फिगर , केस हलकासा मेकअप याकडे ती जास्त लक्ष देते. जेणेकरून उठावदार दिसेल . तिची फिगर आकर्षक दिसेल. तिची केशरचना , एखादी हलकीशी बट तिच्या सौंदर्यात भर घालेल. काजल घातलेले पाणीदार डोळे अजून च मोहक आणि परत परत नजरेत नजर घालून बघण्याची ओढ वाढवतील.
एखादा सुवासिक परफ्यूम किंवा deo वापरेल जेणे करून वातावरण प्रसन्न होईल. आणि फ्रेश वाटेल .स्वतः आणि त्याला हि.. तिचे आकर्षक आणि फिटिंग मधले कपडे जेणेकरून ती अजूनच उठावदार दिसेल. याकडे ती नक्की लक्ष देते.
२. ती ज्या पुरुष , मित्र असेल , सहकारी असेल किंवा ओळखीचा , जवळपास राहणारा तर त्याचे लक्ष आपल्याकडे केंद्रित करण्याकरिता त्याच्या जवळच्या मैत्रिणी , मित्र यांच्या सोबत मैत्री वाढवेल. त्यातून त्याला भेटण्याची , बघण्याची , त्याच्या सोबत जास्त वेळ घालविण्याचा प्रयत्न करेल.
३. त्याच्या आवडी निवडी , छंद लक्षात घेईल आणि त्या संदर्भात बोलणे किंवा तशा गोष्टी करेल.
४. वाढदिवस , काही खास सण वार तेव्हा नक्की शुभेच्छा देईल .
५. काही खास पदार्थ स्वतः करून आणेल. त्यातून आवडी
६. खूप गोड बोलून , विविध विषयांवर खूप healthy गप्पा आणि गप्पामधून वैचारिक , तार्किक चर्चा वाढवेल ज्यातून एकमेकांची अचाट बुद्धिमत्ता लक्षात येईल. आणि ते बोलणे ही हवेहवेसे वाटेल.
७. मानसिक दृष्ट्या छोट्या छोट्या भावना प्रसंगानुरूप जपण्याचा प्रयत्न करेल.
८. कधी गोड बोलून तर कधी अधिकारवाणीने एखादी गोष्ट हक्काने एकत्र किंवा ग्रुप ने करण्यास सांगेल.
जसे एखादा सिनेमा , पिकनिक प्लॅन करेल .
९. वेळ प्रसंगी अभ्यास असेल , बाहेरची कामे असतील , घरात काही मदत , हॉस्पिटल मध्ये काही मदत , ऑफिस कामात मदत पाहिजे असेल तर आवरजून करेल कारण त्यातून आपलेपणा वाढतो.
१०. काही वेळेस पुरुष आकर्षित होण्याकरिता स्त्रियांना जेव्हा लक्षात येते की तो बघत आहे आपल्याकडे हे लक्षात आल्यावर त्याचे आकर्षण अजून वाढविण्यासाठी मुद्दाम दुर्लक्ष करेल की तो पुरुष अजून तिच्या मागे जाईल ..किंवा तिच्या संपर्कात येण्याकरीता प्रयत्न करेल.
११. त्याच्या घरचे असतील त्यांच्या बरोबर चांगलें सबंध प्रस्थापित करेल. त्यांना काही हवे नको बघेल.
१२. काही वेळेस आपला अभ्यास , ऑफिस काम , धाडसी कामे असतील , adventure असेल , ड्रायव्हिंग असेल computer mastery , एखाद्या विषयात एक्स्पर्ट असेल यातून स्त्री किती श्रेष्ठ आणि तिच्यात किती विविध गुण आहेत हे दर्शवित असते आणि स्त्री मधले विविध गुण हे सुधा पुरुषाला आकर्षित करतात.
१३. काही वेळेस मुद्देसूद वाद घालून ही तिच्यात जे कौशल्य आहे त्याची भुरळ पाडून आकर्षित करतात.
मुळातच स्त्री ची नजर ही खूप तीक्ष्ण असते. आणि कोण कुठल्या दृष्टिकोनातून बघते हे सहज लक्षात येते. त्यामुळे तिला जर एखादा पुरुष आवडला तर त्याला आकर्षित करण्यासाठी स्त्रिया खरंच नाना तऱ्हेचे मार्ग अवलंबतात . पण तसे सगळ्याच पुरुषांना आकर्षित करण्याकरिता फार कमी वेळा होते.
काही वेळेस अशा स्त्रिया , मुली असतात की सगळ्याच पुरुषांना आपल्याकडे आकर्षित करून घेणाऱ्या.. पण त्यात त्या त्यांच्या पेक्षा सर्व क्षेत्रात किती श्रेष्ठ आहेत हे दर्शवित असतात. किंवा कधी एखाद्या गोष्टीत सॉफ्ट कॉर्नर मिळवून त्या पुरुषांना आकर्षित करत असतात.
पुरुषांना आकर्षित करण्यासाठी स्त्रिया खरंच नाना तऱ्हेचे मार्ग अवलंबतात का ??
तर नक्कीच हो. पण कोणत्या कारणासाठी हे पण आहेच. जसे पुरुषाला प्रेमात पाडण्याकरिता असेल , मैत्री असेल , ऑफिस मध्ये उत्तम सहकारी असेल तरी त्याच्या संपर्कात राहण्याकरिता .किंवा स्वतः किती गोष्टीत वरचढ आहे हे दर्शवून इतरांचा केंद्र बिंदू बनण्याचा उद्देश असेल.
प्रत्येक वेळी उद्देश बदलत गेले की पुरुषांना आकर्षित करण्यासाठी स्त्रिया खरंच नाना तऱ्हेचे मार्ग अवलंबतात . ते मार्गही मग उद्देश अस्तेल त्यानुसार बदलत जातात.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


