Skip to content

घरी सुंदर बायको किंवा नवरा आहे, तरी बाहेर संबंध का ठेवले जातात??

घरी सुंदर बायको किंवा नवरा आहे, तरी बाहेर संबंध का ठेवले जातात??


मयुरी महेंद्र महाजन

पुणे


तसं पाहिलं तर विषय खूप पर्सनल आहे, प्रत्येकाचं आपलं आपलं आयुष्य आहे, आणि ते कसं जगायचं याचा संपूर्ण अधिकार प्रत्येकाला आहेचं, तरी मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून जर आपण या गोष्टींचा विचार केला, तर असे का होत असावे, की घरी सुंदर बायको व नवरा आहे, तरी बाहेर संबंध ठेवले जातात?

सिग्मंड फ्रॉइड यांनी आपल्या मनोलैंगिक विकासाच्या पाच अवस्था मांडलेल्या आहेत, त्यामध्ये सायको सेक्सुअल डेव्हलपमेंट मध्ये प्रत्येक मानवात जन्मतः या अवस्था असतातच, फक्त वयाच्या वाढणाऱ्या प्रत्येक टप्याबरोबर त्या सुखावस्थेची पूर्तता वेगवेगळ्या पद्धतीने होत असते ,जसे बाळ जन्मल्यावर सर्वात आधी आईचे स्तनपान करते ,म्हणजेच मुखावस्थेमध्ये ते बाळ आपली सुखाअवस्थेची अनुभूती घेत असते ,त्याच प्रमाणे वयाच्या प्रत्येक टप्प्यावरती व्यक्ती आपली प्रत्येक अवस्था पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत असतो,….

जेव्हा दोन व्यक्ती लग्नाच्या पवित्र बंधनात एकत्र येतात, तेव्हा नवरा-बायको या नात्याने दोघांनाही तो अधिकार असतो, समाजाच्या दृष्टीने सुद्धा …..म्हणून लग्नाच्या नंतर जर बायको किंवा नवरा बाहेर संबंध ठेवत असतील ,तर ते चुकीचे ठरवले जाते ,सामाजिक दृष्टिकोनातून सुद्धा आणि मानवतेच्या नैतिक दृष्टीने सुद्धा, परंतु आपण शोध घेणार आहोत, तो म्हणजे घरी सुंदर बायको व नवरा आहे, तरी बाहेर संबंध का ठेवले जातात???? त्यामागे कारणे आहे ,मित्रांनो कारण की विनाकारण या जगात काहीच घडत नसतं,…..

सर्वात आधी आपण बघून कि ज्या दोघांचे लग्न झाले आहे, त्यांचा इतिहास काय आणि कशा पद्धतीचा होता, हे खूप महत्त्वाचे आहे ,कारण या आधी जर या दोघांपैकी कुणा एकाचे कुणावरती प्रेम असेल, आणि त्या व्यक्तीने त्यामध्ये स्वतःची भावनिक गुंतवणुक करून ठेवलेली असेल, तर मात्र त्याला ते सोडणे कठीण जात असते ,…..

कुठेतरी जोडीदारासोबत मन मोकळं बोलायची किंवा भावना व्यक्त करायची मोकळीक नसेल, तर बाहेर अन्य कुणी ही मोकळीक देत असेल,” तुला काही प्रॉब्लेम असेल ,तर तु मला सांगू शकते….!” मी नक्कीच तो प्रॉब्लेम सोडवण्याचा प्रयत्न करेल, असे घडत असेल तर घरातल्या हक्काच्या व्यक्तीपेक्षा बाहेरच्या व्यक्तीवर विश्‍वास वाढत जातो, आणि आपली प्रत्येक समस्या तो किती किंवा ती किती छान पणे समजून घेते, असे वाटून त्या व्यक्तीविषयी जवळीक वाढू लागते, परिणामी ती व्यक्ती प्रत्येक वेळी योग्य वाटते आणि जोडीदारासोबत अविश्वासाला प्राधान्य मिळत जाते….,

एक जोडीदार म्हणून नवर्याने आणि बायकोने सुद्धा एकमेकांच्या गरजा ओळखून त्यांची पूर्तता करणे आवश्यक आहे, मग त्या मानसिक स्तरावरच्या असतील किंवा शारीरिक स्तरावरच्या कारण की दोघांनाही दोघांकडून असणाऱ्या अपेक्षा पूर्ण होत नसतील ,तर व्यक्ती नकळतपणे बाहेर डोकावतो आहे, त्याचे त्याला सुद्धा कळत नसते…,

जोडीदारासोबत होणाऱ्या भांडणांचा कौल जर त्या प्रेमापेक्षा जास्त असेल, आणि त्याच्या किंवा तिच्या प्रेमाला अन्य कशासोबत याची तुलना केली जात असेल, तर निव्वळ याठिकाणी प्रेमाच्या ऐवजी फक्त अपेक्षांचे ओझे आहे, असे वाटू लागते…., येथे प्रत्येक व्यक्ती वेगळी आहे त्याचे किंवा तिचे आपल्याशी पटत नसेल ,तर आपण तिच्याशी किंवा त्याच्याशी त्याच्या पद्धतीने पटवून घ्यायला काय हरकत आहे, ही भूमिका आपल्या प्रेमाला पालवी फुटेल अशीचं….,

कधीकधी जोडीदार मानसिक समस्यांनी जखडलेला असतो, त्यामध्ये स्वतःला असे का होत असावे ,??याचे उत्तर त्याला स्वतःलासुद्धा देता येत नसते ,त्या ठिकाणी त्याच्यावर किंवा तिच्यावर आरोप करून तिला/ त्याला चुकीचे न ठरवता त्यासाठी योग्य समुपदेशकाची मदत घेऊन आत्म विश्लेषण करणे गरजेचे आहे,….

जोडीदार म्हणून एकमेकांची काळजी घेणे ,एकमेकांना जीवापलीकडे जपणे, त्यामुळे नातं बहरतं ,,,जोडीदाराचे कितीही हाल झाले, सोसावे लागले ,तरी त्याकडे कानाडोळा करणे ,यामुळे तिची किंवा त्याची नसलेली काळजी प्रेमाला मारत जाते,,,, आणि अन्य कोणी आपली काळजी करत असेल,, तर त्यासाठी प्रेम वाटू लागते,,,…

सुख दुःख वाटून घेणे, जोडीदार म्हणून एकमेकांची सुखदुःखे वाटून घेणे गरजेचे आहे, सुख-दुःखात आपला जोडीदार कायम आपल्यासोबत असावा, असे वाटते परंतु जोडिदार साथ देत नसेल,तर त्या प्रेमाच्या नात्याचंही ओझं वाटू लागतं ….,

नातं मग ते कुठलेही असो त्याची गरज एकाला असून चालत नाही, ती दोघांनाही असावी लागते, अन्यथा एकाची गरज दुसऱ्याचे ओझे वाढवू शकते….

प्रेम ही भावना असली तरी ती एक प्रकारची भक्ती आहे, अखंड विश्वास आणि निस्वार्थ प्रेम यांनी मिळून बनते ती प्रेमभक्ती, आणि जो प्रेमाची भक्ती करतो तो कधीच प्रेमाला दुसरी वाट पडू देत नाही…,

प्रेम हे सर्व बंधनांनी मुक्त असावे, कारण बंधनात ठेवून जरं व्यक्ती आपली होत असती, तर सर्वच नात्यांना बंधन लावावी लागली असती ,मोकळं सोडलेलं वासरू सुद्धा मायेने जवळ येऊन चाटत असते, तेव्हा ते प्रेम शब्दांपलीकडचं असते…..,

प्रेम करण्याची किंवा मिळवण्याची गोष्ट नसून प्रेम हे कमावण्याची गोष्ट आहे ,जी व्यक्ती आपल्यावर खरं प्रेम करते, ती आपल्याला आपल्या गुण-दोषांसकट स्वीकारते, आपल्या जोडीदारावर असलेल्या प्रेमाचा आपण सन्मान करायला हवा, तिसऱ्या व्यक्तीने लाख प्रयत्न केले तरी दोघांच्या नात्याला टिचंसुद्धा जायला नको, असा अखंड विश्वास आणि त्या विश्वासाला पात्र ठरणारी आपली पात्रता, आपल्याचं नजरेत आपल्या प्रेमाला उंच पाहण्याची असावी…, या कारणांपैकी काही कारणे आपल्याला आढळत असतील तर आपण वेळेस त्याला थांबवू शकतो…

“” कमीयाँ मुझमें भी है,
कमियाँ तुझमें भी है,
कोण हे यहाँ जो हर तरहँ
से परीपूर्ण है…..!!! “”
जे आपलं असतं त्याला आपणच सांभाळायचं असतं सावरायचं असतं.. !!!


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!