Skip to content

वैवाहिक नात्यात जर एकमेकांचा Respect होत नसेल तर असले नाते अर्थहीनच!!

वैवाहिक नात्यात जर एकमेकांचा Respect होत नसेल तर असले नाते अर्थहीनच!!


प्रा. पुजा बोरा


“तदेव लग्नम सुदिनं तदेव ,तारा बलं ,चंद्र बलं तदेव “लग्न मंगलाष्ट ऐकताना आपण हे मंगलचरण बरेचदा बरेचदा ऐकतो ,पण आपण वैवाहिक जीवनात असे वागतो का ?म्हणजेच सप्तपदीं घेताना पती पत्नी आयुष्याचे सहप्रवासी म्हणून एकमेकांना काही मुख्य वचने देतात . पण मला असे नेहमी जाणवत आले आहे कि पती पत्नी यांच्या सप्तपदी या बरेचदा तप्तपदी होऊन बसतात .

म्हणजेच संसार सुरु होऊन नव्याचे नऊ दिवस संपले कि ,अपोपाप जीवनाकडचा दृष्टिकोन बदलतो. तो का बदलतो कारण लग्न या संकल्पनेत जोडीदाराने एकमेकांचं आदर करण हातांत आवश्यक आहे.जसे पाण्याशिवाय आपण जीवन जगू शकत नाहींतसेच एकमेकांना आदर नाही दिला तर ते नातं बहरू शकत नाही. .माणूस हा नातं या संकल्पनेशी खूप समरस आहे .

कारण तो समाजशील प्राणी आहे .त्यातही कुठल्याही नात्यापेक्षा लग्नीत ,समाजमान्य पती-पतीचं नातं हे सर्वात महत्वपूर्ण भूमिका बजावत .कारण या नात्यात जोडीदार हे त न आणि मन याने एकत्र येतात .या नात्यामुले जीवनाला परिपुर्णता प्राप्त होत्र.एक योग्य दिशा मिळून संसाराला खऱ्या अर्थाने सुरुवात होने अपेक्षित असते ,पण एकमेकांच्या काही साध्या साध्या शुल्लक चुका आपण मानवर घ्घेतो आणि या नात्याला जिथे आदरातून आधार देणं अपेक्षित असतं तिथे एकमेकां बद्दल अनादर आपण करत बसतो .

अगदी आपल्या रोजच्या धकाधकीच्या जीवनात आपण आपल्या पत्नीला बरेचदा गृहीत पकडतो कि तिने माझ्यासाठी हे केले पाहिजे ,ते केले पाहिजे पण जेव्हा आपली पत्नी आपल्याकडीन काही मोजक्या आणि नेमक्या अपेक्षा ठेवते तेव्हा बरेचदा पुरुष लोक हेउपकर केल्याचा भाव आणतांना ददिसतात.तुझे आहे तुजपाशी ,परी तू जागा चुकलासी ह्या उक्ती प्रमाणे भावनांचा गोंधळ होऊन बसतो आणि त्याचे रूपांतर एकमेकांच्या अनादर होऊन बसतो .

आजकाल ची तरुण पिढी अत्यंत प्रगत,समजूतदार आणि प्रगल्भ आहे. पण आजकाल बरेच लग्न ,लहान सहन कारणांवरून मोडतात.पण याला फक्त जोडीदारांनी एकमेकांना आदर,प्रेम ,विश्वास देणं आणि निभावणं खूप गरजेचं आहे. बरेचदा अहंकार मध्ये येतो पण अहंकारच जन्मच मुली आनंदरातून होतो हेच आपण विसरतो .प्रत्येक नातं जीवनात असलाच पाहिजे असे नाही,पण ज्या नात्यात जीवन आहे ते नातं तरी किमान समर्पित असणं महत्वाचं आहे . आपण ज्यांना अदाहर देतो त्यांच्यात आपले नितांत प्रेम असते ,कारण प्रेम मुळी दुसरी बाजू आहे.आणि नंतर विश्वास निर्माण होतो.

संसार हा एका रथा सारखा असतो ,पती आणि पत्नी हि संसाररथाची दोन चाके आहेत. एक चाक जर निसटले तरी रथ पुर्ण कोलमोडतो .,म्हणजेच पती पत्नी नि जर एकमेकांना समजून घेतले,आदर निर्माण होण्यासाठी एकमेकांना सांभाळून घेण्याची तयारी दाखविली ,तर हे सुंदर नातं आणखी सुंदर,उद्दात आणि समर्पित भावनेने म्हणेजच तू माझी आहे,किंवा तू माझा आहेस हि भावना निर्माण करून नात्याला जीवनाची भक्कम माजू बनवण्याचा प्रयत्न करा.

विश्वास निर्माण होऊ द्या ,आयुष्य सहज बनाण्यावर आणि समतोल जगण्यावर लक्ष केंद्रित करा.आदरातून आनंदकडे ,आणि एकमेकांचे आधार बना. सगळे जग हे आपल्याशी स्वार्थच,मतलब याने जोडलेलेअसले तरी वैवाहिक नातेच आपल्याला शे वटपर्यंत सुख -दुःखात प्रमाणिक साथ देते. हे उमगुनही जर आपल्या नात्यात आदर नसेल तर पूर्ण समर्पण होऊ शकणार नाही.

जीवनात कुठल्याही नात्यात आणि त्यातही वैवाहिक नात्यात कोणी आपला आदर करावा म्हणून जबरदस्ती करू नका स्वतः चा स्वाभिमान जपून आदर निर्माण करा.कारण आदर हा सुगांधासारखा असतो,फुलांचाच असुगंध हा डोळ्यांना दिसत नाही पण तो मनाला जाणवतो , आदर हा हि असाच असतो.

आपल्या रोजच्या जगण्यातील एक अनुभव पहा ,जर जोडीदार एकमेकांवर विश्वास ठेवत असतील,आदर देत असतील तर घरातील छोटी मुलेसुद्धा अदबीने आपली म्हणून आपल्याशी वागतात .त्यांच्या मनावर हे नमूद होतेकी हि व्याक्ती आपली आहे.म्हणजेच त्यांचं विश्व समृद्ध बनण्याचा आपल्या नात्याची फार मोठी भूमिका असते.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “वैवाहिक नात्यात जर एकमेकांचा Respect होत नसेल तर असले नाते अर्थहीनच!!”

  1. खरच आहे. खूप सुंदर लिहले.
    हे सगळ माहीत असूनही आपण चांगले का वागत नाही.

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!