Skip to content

संसारासाठी बायको कशी असावी ??

संसारासाठी बायको कशी असावी ??


मयुरी महेंद्र महाजन

पुणे


“अरे संसार संसार, जसा तवा चुल्ह्यावर ,

आधी हाताला चटके ,मग मिळते भाकर ,”

बहिणाबाईंच्या ओळी आठवल्या घर संसाराला सांभाळून सुद्धा बहिणाबाईंनी आपली उपजत कला अशिक्षित असून सुद्धा कायम जोपासली,
आपल्या आजच्या तरुण पीढी समोर जर कुठला यक्षप्रश्न असेल, तर तो आहे लग्नासाठी मुलगी मिळेल का ?मिळाली तर ती कशी असेल? तिला सगळं जमेल का? जमलं तर टिकवता येईल का?

अशा कितीतरी प्रश्नांमुळे तरुणाईच्या मनात भीतीचे सावट बघायला मिळते, परंतु या सर्वांमध्ये प्रश्न येतो तो म्हणजे संसारासाठी बायको कशी असावी कारण की संसार रथाची दोन चाकं स्त्री आणि पुरुष यांचा विचार केला तर पाळण्याची दोरी व पुरुषांच्या बरोबरीने केलेली उभारी कायम संसार फुलवण्यासाठी हातभार लागत असतो.

सर्वात आधी आपण हा विचार स्वीकारायला हवा या जगात प्रत्येक व्यक्ती एक दुसर्‍यापेक्षा वेगळा आहे, त्याची बायको कशी
छान सगळं घर सांभाळते, नोकरी करते तरी सुद्धा किती छान पणे सर्व काही पार पाडते, आणि एक तू आहे जिला धडं काही काम करायचे म्हटले तरी जीवावर येते…..

या संवादामध्ये कुठेतरी व्यक्ती दुखावली जाते, अपमानित होते ,आणि मनाला लागलेली शब्दांची जखम कायम राहते… त्या ऐवजी आपण सांगू शकतो, पसारा कितीही असू दे, ठरवलं तर तू काही मिनिटांच्या आत सगळ आवरुन मोकळी …ही तुझ्यात जादूच आहे असे म्हणावे लागेल ,गती नसलेल्या तिच्या कामाला गती येईल आणि तासावर होणारी कामे मिनिटांवर होऊ लागतील….,

बायको कशी असावी ,याचा जेव्हा तुम्ही विचार करालं त्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असणारी एक गोष्ट सांगावीशी वाटते ते म्हणजे तुमची परिस्थिती कशीही असू द्या, ती शेवटच्या श्वासापर्यंत तुमची साथ देणारी असावी, एकमेकांचे वाभाडे काढण्यासाठी किंवा वर्मावर चोची मारण्यासाठी संसार करायचा नसतो जिथे जोडीदार कमी पडेल तिथे आपण उभे राहायचं ….

संसार दोघांचा असतो, तो दोघांनी मिळून पार पाडायचा असतो, एक बायको पणात पदार्पण करताना तिला तिच्या जबाबदाऱ्यांची जाणीव असावी, घेतलेली जबाबदारी आनंदाने पार पाडण्याकडे कल असावा, त्यात कमीपणा मानू नये ,जे आपलं असतं, त्याला आपण सांभाळायचं असतं ,ती कमवत असली तरी घरासाठी पै -पै साठवणारी असावी, नवरा बायको म्हणून मिरवत असली तरी प्रत्येक नात्याला आदरातिथ्य देणारी असावी, कप आणि बशी ला नवरा-बायकोच्या नात्याची उपमा दिली जाते… एकातून सांडलं तरी दुसऱ्याने ते सावरायचे असते, या अर्थाने …

तिच्यामुळे घराला घरपण असावं, तिच्यामुळे घराला घराच्या अबोल भिंती बोलक्या वाटाव्या, तिच्या असण्याचे मोलं कुणी जाणत नसलं, तरी तिच्या नसण्याची उणीव सगळ्यांना भासावी, शिक्षित नोकरदार असली तरीही संस्काराचा वारसा हक्क पुढे घेऊन जाणारी असावी, माणसाला माणूस म्हणून जोडत आपल्या माणसांवर जीव ओवाळून टाकणारी असावी, वेळप्रसंगी चुकलच काहीतरी तेव्हा मोठ्या मनाने माफी मांगायची तयारी सुद्धा असावी, इतरांच्या विचारांना प्राधान्य देतं, स्वतःच्या विचारांनाही परखडपणे मांडणारी असावी,

सर्वच बाबतीत सर्वच परफेक्ट नसतात काही कमी असेल, काही जास्तीचे असेल, परंतु प्रत्येक ठिकाणी उणीदुणी काढत नसेल, तर सुखाचा संसार प्रेमाने फुलवता येतोच …फक्त एकमेकांकडे बोट न दाखवता एकमेकांचा हात हातात धरून चालण्याची धमक असावी,काळी असेलं ,गोरी असेलं ,तिच्यासारखी तीच असेलं ,तिच्या त्यागाला तिच्या समर्पणाला सगळ्यांची दाद असेलं.

संसारासाठी बायको कशी असावी नवरा-बायको म्हणून दोघांनी एकमेकांची नेहमी काळजी घ्यावी, भांडणे होऊ द्या काही अडचण नाही परंतु त्याच प्रेमाने आपल्या प्रीतीसाठी संध्याकाळी एका ताटात मिळून जेवण व्हावी, असेल रुसवा फुगवा काही मनात बोलून मोकळं व्हावं ,अबोल होऊन नात्याला फक्त अबोल करू नये, इतकेचं…,

नाजूक असतात नाती त्यांना तितक्याच नाजूकपणे सांभाळावे लागते क्षणोक्षणी, जेवणाच्या डब्या पासून ते रात्रीच्या बिछान्यापर्यंतचा तीचा प्रवास तिला एक नोकर म्हणून नव्हे तर आदराची भूमिका देऊन,सन्मानाचा असावा, बंगल्याच्या नोकराणी पेक्षा तुमच्या झोपडीची राणी होणे,ती पसंत करेलं.

कारण गरिबीत संसार होऊ शकतो, परंतु गैरविचारात कधीच नाही ,संसारात बायकोची भूमिका सर्वात महत्त्वाची असते, ती सोबत असेल तर प्रत्येक संकट पेलून धरण्याची ताकद येते, म्हणून तिच्या असण्याला गंध माझ्या प्रितीचा, प्रीतीचा गंध फूलतो आनंद गोकुळाचा,
चालत राहो आयुष्य सारे असाचं सोहळा आनंदाचा…!!!


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!