Skip to content

उत्तम जोडीदार म्हणजे सर्वांसमोर कौतुक आणि एकट्यात चुका समजावून सांगणे.

उत्तम जोडीदार म्हणजे सर्वांसमोर कौतुक आणि एकट्यात चुका समजावून सांगणे.


सोनाली जे


आयुष्य परिपूर्ण असं कोणीच नसतं. आपल्या संस्कृतीप्रमाणे विवाह किंवा लग्न ही दोन विरुद्ध लिंगी व्यक्तींना एकत्र , एकरूप येण्याकरता समाज आणि कायदा यांनी दिलेली संमती जणू.

जरी विवाहाने दोन व्यक्ती एकत्र आल्या. तरीही दोन व्यक्तींचा व्यक्तिमत्व हे भिन्न असतं, त्यांच्या आवडीनिवडी या भिन्न असतात, विचार करण्याची पद्धत वेगवेगळी असते . समस्या सोडवण्याची पद्धत वेगळी असते. कोणी पटकन सोडवतो तर कोणी त्यातच अडकून पडतात. त्यातून मार्ग सापडत नाहीत. तर कोणाला उशिरा सापडतात. तर कोणाला मार्गदर्शनाची गरज पडते.

पण चारचौघांमध्ये आपण आपला जोडीदार कुठे कमी आहे असं कधीच दर्शवत नाही त्याला / किंवा तिला कुठे कमीपणा येवू देत नाही. चार चौघात उणीव जाणवू देत नाहीत .सांभाळून घेवून ज्या गोष्टी चांगल्या त्याचे नक्कीच कौतुक केले जाते.

जॉइंट family . सासू सासरे, दिर जावू , नणंद , नवीन लग्न होवून आलेली सून , अगदी love marriage असलेली. हुशार , दिसायला अतिशय सुंदर .नोकरी करणारी , चार चौघात तिचा नवरा आणि सासू सासरे तिचे खूप कौतुक करत . मोठी सून खूप मनापासून सगळ्यांच्या करिता करते. घरची जबाबदारी व्यवस्थित पार पाडते.

पण प्रत्यक्षात सगळे सासू घरचा स्वैपाक करायची. वाढणे , आवरणे ही सगळी कामे, घरातले बाहेरचे , आले गेले सगळे सासू च करत होती. सासू नसेल आणि कधी हिच्यावर करण्याची वेळ आली तर मात्र सुनेला हर्षदा ला करावे लागले की खूप चिडचिड , तणतणत करत होती. नवरा आणि सासू तिखट खात नसत. त्यांना त्रास होत असे. रोज ही त्या दोघांची भाजी , आमटी वेगळी काढली जात असे. पण हर्षदा जेव्हा करत असे तेव्हा मुद्दाम तिखट करत असे .

नवऱ्याला सांगत असे तुझी कमी तिखट भाजी काढली नाही. आता हीच खा. तरी बिचारी सासू आणि नवरा निमूटपणे खात असत. त्यांना नंतर त्रास ही होई. परंतु हिला स्वैपाक करावा लागला याचा राग म्हणून ती असेच तिखट देत असे खायला. तरी ही घरातले सगळे तिच्याशी अतिशय प्रेमाने , शांतपणे वागत.

हर्षदा चा वाढदिवस , सण वार असतील तर तिच्या माहेरच्या लोकांना , मित्र मैत्रिणी यांना बोलावून सुंदर भेट वस्तू , कपडे , ड्रेस , साडी घेत . कधी सोन्याचे दागिने. पण घेत . चार चौघात खूप कौतुक करत.

नवरा नंतर सगळे झाले की शांतता पूर्ण वातावरणात तिला खूप समजावून सांगत असे. अग , आईला काही काम असेल तरच ती बाहेर जाते. आज इतकी वर्ष ती आनंदाने सगळ्यांचे करत आली आहे. कधी चिडचिड नाही . रागावणे नाही. करावे लागते म्हणून त्रासिक चेहरा नाही. कायम आनंदी , उत्साही , इतरांच्या करिता धडपडणारी . तू ही तिची थोडी काळजी घे. समजून घे तिला. तिला तिखट खाल्ले तर त्रास होतो

पण ती तुला तरीही कधीं बोलत नाही. पण आपल्या लोकांची आपणच काळजी घेणे गरजेचे असते. हर्षदा कायम वेगळे राहायचे म्हणून तगादा लावत असे. सासू सासऱ्याना ही तसे तोंडावर म्हणत असे. चारचौघात नवरा आनंद अतिशय उत्तम जोडीदार असल्याने सगळ्यांना कौतुकाने सांगत असे. मात्र हर्षदा आई बाबांना सांभाळून असते. त्यांची काळजी घेते असे सगळ्यांना सांगत असतो. स्वतः आई बाबांच्या करिता भेटवस्तू आणली तरी हर्षदा ने आणली असे कौतुकाने सांगत असे.

एकांतात जेव्हा जेव्हा हर्षदा वेगळे राहायचे विषय काढत असे तेव्हा तेव्हा आनंद तिला समजावून तिची चूक सांगत असे. अग , आई बाबा एव्हढे वर्ष केवळ घर , आम्हा मुलांच्या करिता कष्ट करत आले आहेत. आता मोठे झाल्यावर त्यांना थोडी तरी विश्रांती द्यावी असे वाटते ग. त्यांना आराम देता येईल तर देवू , काळजी घेवू. त्यांना आता म्हातारपणी आपली गरज आहे. आपण त्यांना उत्तम सांभाळू. त्यांचे आनंद देवू. थोडे सुखी ठेवण्याचा प्रयत्न करू. हे अनेकदा दोघेच असताना समजून सांगत असे.

त्यामुळे तरी हर्षदा सगळ्यांच्या सोबत जुळवून घेत राहत होती. त्यांच्या समोर कौतुक करायचा आनंद म्हणून शांत राहत होती. दोघेच असताना मला सगळ्यांशी जमवून घ्यावे लागते असे म्हणून सारखी आनंद बरोबर वाद घालायची. मग आनंद प्रत्येक वेळी तिच्या विचार करण्याची पद्धत कशी चूक हे सांगत असे. त्याच्या आई बाबांच्या जागी तिचे आई वडील आहेत त्यांची ही आपण किती काळजी घेतो हे दाखवून देत असे. त्यांच्या छोट्या अडचणीत उपयोगी पडतो .तसेच आहे तुझे काय माझे काय आई वडील आपलेच आहेत.
सुसर बाई तुझी पाठ मवू. असे सारखे म्हणावे लागे.

अर्थात असे जरी असेल तरी हर्षदा वेळेला नक्कीच मदत करत असे. सासूबाई हॉस्पिटल गाडीतून घेवून जाणे. औषधे वेळेत देणे. खाणे पिणे..

उत्तम जोडीदार जो असतो तो आपली जोडीदार चुकली / चुकला तरी चार चौघात घालून पाडून बोलत नाही. त्यावरून तमाशा करत नाहीत तर तिथे चूक सांभाळून घेत असतात. आणि एकांतात ती चूक सांगत असतात.

घरी पाहुणे अचानक येणार असतील तरी ही बायको ने गडबडीत केलेला स्वैपाक आपणहून नवरा कौतुकाने सांगेल खूप गडबडीत केला पण मस्त झाला आहे की पाहुणे ही तारीफ करतात. ते गेल्यावर मग हळूच नवरा मसाले भाता मध्ये थोडे मीठ चालले असते. पण छान झाला होता.

आयुष्य खूप सुंदर आहे . असे अनेक उत्तम जोडीदार म्हणजे सर्वांसमोर कौतुक आणि एकट्यात चुका समजावून सांगत असतात म्हणून संसार आनंदाने पुढे जातो. प्रत्येकात कमी जास्त काही ना काही असते. एकमेकांनी सांभाळून घेणे आणि काही adjustments करणे गरजेचे च असते.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!