उपभोग घेतल्यानंतर ‘मला तुझी गरज नाही’ अशा तरुण-तरूणींची काय मानसिकता असेल.
हर्षदा पिंपळे
“आयुष्य खूप सुंदर आहे” फक्त ते भरभरून जगता आलं पाहिजे हे आपल्या सर्वांना माहीत आहे. पण हल्ली आपण आयुष्य जगायच सोडून केवळ त्याचा गरजेपुरता उपभोग घेतो असं वाटतं.आयुष्य ही केवळ एक उपभोगाची वस्तू झाली आहे असं सध्या तरी दिसून येत आहे.
पहा नं…सध्याची तरूणाई कोणत्या वेगळ्या विश्वात वावरते कोण जाणे…पण एवढ मात्र नक्की की “कामापुरता मामा” अशी या तरूणाईची सद्यस्थिती आहे. काम झाल्यावर मात्र आता मला काही गरज नाही अशी म्हणणारी ही तरूणाई कधी कधी फार विचार करायला लावते.खरच कळतच नाही ही तरूणाई अशी का वागते…?
अहो , माणूस म्हणजे काय वस्तू आहे का…? किंवा एखादं चॉकलेट आहे का….खाल्ल आणि कागद टाकून दिला…? खरतरं नाही.. माणूस म्हणजे एखादी वस्तू मुळीच नाही.. पण हल्ली तरी या तरूणाईच्या वागण्यातून असच दिसून येत आहे. एखाद्या वस्तूप्रमाणे एकमेकांना वापरणारी आणि वापरून झाल्यावर टाकून देणारी ही तरूणाई मनात अक्षरशः कोलाहल माजवते.
मैत्रीचं नातं असो वा त्याच्या पलिकडच….ही तरूणाई एखाद्या वस्तूप्रमाणेच या नात्याचा उपभोग घेताना दिसते.उपभोग घेऊन झालं की सरळ सरळ वाऱ्यावर सोडून देते.म्हणजे वेगवेगळ्या दृष्टीकोनातून पहायच झालं तर ही तरूणाई अनेकदा स्वार्थीपणाने विचार करताना दिसते.आणि हे असं करताना नक्की या मागे काय मानसिकता असु शकते याचा विचार करणे फार आवश्यक आहे.
कारण कोणत्याही पद्धतीने उपभोग घेऊन झाल्यानंतर “मला तुझी गरज नाही” ह्या शब्दांत ही तरूणाई एकमेकांना असं बोलूच कसं शकते….? नेमकं यामागे काय दडलं असू शकतं हे जाणून घ्यायला हवं…कदाचित बदलता आली ती मानसिकता तर चांगलीच गोष्ट आहे.
काही गोष्टींमधून आपण जाणून घेऊयात की अशा या कारणामागे या तरूण-तरूणींची नक्की काय मानसिकता आहे….?
*हल्लीच्या वाढत्या स्पर्धेमुळे पैसा म्हणजे मैत्री.. पैसा म्हणजे प्रेम…पैसा म्हणजेच सगळं काही असा समज कित्येक तरुण-तरूणींनी करून घेतलेला दिसून येतो.’जिथे पैसा तिथे मी’ ही त्यांची मानसिकता काही वेगळीच आहे. त्यामुळे जिथे पैसा आहे तिथे स्वतःहून जायच आणि पैसा संपला की तिथून स्वतःहूनच बाहेर यायच.नाहीतर मग जिथे पैसा जास्त तिथे वावर जास्त अशी ही पैशाच्या मोहामुळे तयार होत चाललेली मानसिकता…
एकदा का एकाकडचे पैसे संपले आणि दुसरीकडे या पैशाची सोय होत असेल तर त्या व्यक्तीला सोडायला तयार असणारी अशी ही मानसिकता… फक्त वापर करायचा.. अगदी पुरेपूर वापर करून कचरा टाकतो तसं टाकून द्यायचं. “याच्याकडचे पैसे संपले आता याचा काय उपयोग…..? याच्याशी चांगलं वागून तरी काय मिळणार आता…? असं म्हणून काही ना काही मुद्दाम काड्या करायच्या आणि तिथून पळ काढायचा हे या तरूण-तरूणींना अगदी सहज शक्य आहे असं दिसून येतं.
स्वार्थी/मतलबी वृत्ती…(स्वार्थी मानसिकता) याला नक्कीच कारणीभूत असणार यात शंका नाही. अनेकजण हे स्वार्थासाठी अगदी मधापेक्षाही मधाळ बोलतात आणि नंतर मात्र जखमा करून त्यावर स्वतःच मीठ चोळून जातात. हो…फक्त स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी संबंध जोडून..तो स्वार्थ पूर्ण झाल्यावर “तुझा माझ्याशी काय संबंध… तु निघ…मला काही तुझी गरज नाही…. ” वगैरे वगैरे बोलून त्या कागदासारखच एखाद्याला टाकून द्यायच हे हल्ली तर सर्रासपणे घडताना दिसतं.
कधी कधी कुणी तर स्वतःच्या फायद्यासाठी मुद्दामही दोन जणांमध्ये वितुष्ट आणण्याच काम करतात.
ही अशी स्वार्थी मानसिकता काय कामाची…?
इतकच नाही तर शारिरीक संबंध असो , मैत्री असो वा प्रेम ……यामध्ये केवळ फक्त गरजेनुसार, आपापल्या सोयीनुसार वागणारी ही तरूणाई किती विचीत्र मानसिकतेत जगते याचं फार वाईट वाटतं.
पैसा , स्टेटस , स्वार्थी वृत्ती , स्वार्थीपणा , पटलं नाही का भांडण करून सोडून देणे , स्वतःला वेळ घालवायला काही नाही म्हणून इतरांचाही वेळ वाया घालवणे….अशा विचीत्र प्रकारची ही मानसिकता आजकालच्या तरूण-तरुणाईमध्ये पहायला मिळते.
यामागे अजूनही काही कारणं नक्कीच असतील ती शोधायला हवीत…आणि ती शोधणं देखील तितकच “must” आहे. कारण ही अशी मानसिकता आपल्यालाच बदलायला हवी. स्पर्धा-स्टेटस यांच्या जगात ही विचीत्र मानसिकता तयार होतेय ही चांगली गोष्ट नाही.या अशा मानसिकतेला वेळीच आवर घातला पाहिजे नाहीतर त्याचे परिणाम हे कालांतराने खूप वाईट असतील. त्यामुळे स्वतःपासून सुरुवात करा….अशी मानसिकता असेल तर वेळीच ती बदलण्याचा प्रयत्न करा.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!



लेख खुप छान आहे