Skip to content

ज्यावेळी जोडीदारासोबत चर्चा करूनही काही उपयोग नसतो , तेव्हा काय करावे…?

ज्यावेळी जोडीदारासोबत चर्चा करूनही काही उपयोग नसतो , तेव्हा काय करावे…?


हर्षदा पिंपळे


“जोडीदार” या जोडीदाराला आयुष्यात एक वेगळच स्थान असतं.प्रत्येकाला आपल्या आयुष्यात एक हक्काचा जोडीदार असावा असं वाटत असतं.आपल्या कुटुंबाप्रमाणेच हा जोडीदारही आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग असतो.

हल्ली इतकं काही बदलत चाललय की काही विचारायला नको.आयुष्याचा जोडीदार म्हणजे आयुष्यभरासाठी जो आयुष्य्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सोबत आयुष्य घालवतो.पण हल्ली तर या क्षणभंगुर आयुष्याचा काही थांगपत्ता नाही.

कधी काय होईल ते सांगता येत नाही. तरीही या क्षणभंगुर आयुष्यात कितीतरी वेळा जोडीदार बदलायची वेळ येते.याच्याशी पटत नाही , त्याच्याशी पटत नाही.., ती असच वागते , तिच्यासारखी ‘life partner’ मला नकोय…

वगैरे वगैरे गोष्टींवरून अगदी सहज खटके उडतात.चर्चा , संवाद साधूनही कधी कधी काहीच उपयोग होत नाही. सगळं चांगलं चालू असताना अशा गोष्टी घडतात जेणेकरुन काही ना काही कुरापती दोघांमध्ये होतात.पण त्यांच्या या भांडणांनी , गैरसमजांनी अक्षरशः मर्यादा ओलांडलेली असते.

त्यावेळी ते थेट टोकालाच जाऊन पोहोचतात. निरर्थक गैरसमज किंवा अनावधानाने काही चूका होतात तेव्हा त्यावेळी कधीकधी चर्चा करून काहीच उपयोग होत नाही.अशावेळी दोघांनाही काय करावं तेच समजत नाही.

अशा वेळी काय करायच ते पाहूयात……..

मित्रांनो आयुष्यात केवळ संवाद असून चालत नाही. तर आयुष्यात संवादाऐवजी सुसंवाद हा अधिक महत्त्वाचा असतो. सुसंवादामुळे गोष्टी समजण्यास नी समजून घेण्यासही सोप्या पडतात. त्यामुळे शक्य होईल तितका सुसंवाद साधण्याचा प्रयत्न जोडीदाराने (दोघांनी) केला पाहिजे.

चर्चा म्हणाल तर चर्चा नको…कारण चर्चेत चर्चा नाही तर वादविवादच होण्याची शक्यता जास्त असते. त्या चर्चेच रूपांतर “Debate” मध्ये केव्हा होतं कळतही नाही. त्यामुळे चर्चा कमी नी सुसंवादाला प्राधान्य दिले पाहिजे.

दोष देणे बंद करा–
अनेकदा अशा वेळी आपल्याला कळत नाही की नक्की कुणाला दोष द्यायचा.नियतीला /जोडीदाराला / की अजून कुणाला…? अशा वेळी खरच कळत नसेल तर जोडीदाराला तर मुळीच दोष देऊ नका.”तुझ्या सोबत चर्चा करावी वाटलं सुटतील सगळे “problems” … पण कसलं काय…

तुझ्यामुळे तर अडचणी अजून वाढतच चालल्यात…” असं बोलून उगाचच जोडीदाराला कोणत्याही प्रकारचा दोष देत बसू नका.ती दोष देण्याची वेळ मुळीच नसते.ती वेळ खरतर एकमेकांना समजून घेण्याची असते.त्यामुळे एकमेकांना शक्य होईल तितक समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

नाही उपयोग न जोडीदाराशी चर्चा करून तर नसुद्या.त्याला थोडा वेळ द्यायला शिका.कारण बरेच प्रश्न हे वेळ न दिल्यामुळे सुटत नाहीत. म्हणूनच वेळेला प्राधान्य द्या.

अहंकार बाजूला ठेवून झालेला गुंता स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा.कदाचित हाती काही चांगल लागलं तर चांगलच आहे. नाहीतर कितीतरी वेळा अहंकारामुळेच गोष्टी विकोपाला जातात. त्यामुळे अहंकार टाळा.

कोणत्याही प्रकारची समोरून अपेक्षा न ठेवता स्वतः प्रयत्न करा.नातं वाचवायच असेल तर या नात्याची जबाबदारी कधीकधी स्वतःनेही उचलायला हवी.नाहीतर अपेक्षांच्या ओझ्याखाली भावना आपोआपच गुदमरल्या जातात. इतकच नाही तर अनेकदा तिसरा कोणी यामध्ये पडला तर उगाचच वितुष्ट आल्यासारखं वाटतं.

आपल्याला तिसऱ्या कोणी मध्यस्थी केलेली आवडतही नाही. म्हणून अनेकदा आपण मित्रमैत्रिणींशी शेअर करायचही टाळतो.घरच्यांना त्रास नको म्हणून घरच्यांशीही बोलायला आपण कचरतो.नको वाटतं घरच्यांनाही यात ओढायला.

पण हे प्रॉब्लेम्स काही सहज सुटतातच असं नाही. त्यामुळे इतर कशाचा काही उपयोग नाही झाला तर खरच एकदा तरी समुपदेशनाचा विचार करायला काहीच हरकत नसावी.त्यामुळे सरळ सरळ “counsellor” चा पर्याय निवडणं “must” आहे. यामध्ये कमीपणा वाटून घ्यायच मुळीच काही एक कारण नाही.

कारण समुपदेशन म्हणजे कमीपणा वगैरे असं काही नाही. खरतर समुपदेशन हा एक उत्तम मार्ग आहे. ज्यामुळे वाटा खरच स्पष्ट आणि मोकळ्या होण्याची शक्यता असते.एकदा का वाटा स्पष्ट झाल्या की निर्णय घेण्यात कोणतीही शंका वाटत नाही.कुठे थांबायच आहे आणि कुठे नाही याची योग्य दिशा या समुपदेशनामुळे नक्कीच मिळू शकते.

So…या गोष्टी करून पहा…कदाचित याचा उपयोग होऊ शकतो. आणि उपयोग झाला तर चांगलच आहे. कारण एकाच ठिकाणी अडकून पडण्यात काहीच अर्थ नाही. आयुष्य पुढे वाट पाहत असतं.त्यामुळे लवकरात लवकर निर्णय घेऊन पुढे जाणच “must” आहे.



तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!