Skip to content

सारखी तीच-तीच अपेक्षा ठेऊन आपल्या पत्नीला हैराण करू नका.

सारखी तीच-तीच अपेक्षा ठेऊन आपल्या पत्नीला हैराण करू नका.


टीम आपलं मानसशास्त्र


पती पत्नी म्हणले की एक जवळचे नाते असते. जे भावनिक आणि शारीरिक बंधनात गुंफले गेले असतात. असे कोणतेच दुसरे नाते नाही की जे शरीर ही एकरूप होते आणि मन ही. अर्थात मुले ही या एकृप्तेचा अंश झाली. पण पती पत्नी हे नाते म्हणूनच सर्वश्रेष्ठ मानले आहे की मन , शरीर , भावना , समाज , कायदा आणि नातेवाईक यांच्या घट्ट बंधनात बांधले जातात . अर्थात आता इतके एकरूप झाल्यावर एकमेकांच्या एकमेकांकडून अपेक्षा ही वाढतात.

आमच्या इथे शेजारी काका काकू राहतात. काकू सुगरण आहेत. अतिशय कष्ट आणि कामात बुडलेल्या असतात. ते काका मात्र त्या काकूंकडून खूपच अपेक्षा करत असतात. सतत हे असे कर ते तसेच कर अशी भुणभुण करीत असतात. हेच खायला कर. वेळेत च कर. घरी कोणी गेले की या काकांची गडबड हे खायला दे. पाणी दे. कॉफी दे. बायको ने सतत त्यांच्या तालावर नाचावे ही सततची अपेक्षा.

सारखी तीच-तीच अपेक्षा ठेऊन आपल्या पत्नीला हैराण करू नका . त्याकरिता काही टिप्स बघुयात.

१. पतीची अपेक्षा असते की , पत्नी ने आपल्याला वेळ द्यावा. सतत आपल्या आजू बाजूला असावे. एक वातावरण निर्मिती करावी. तिने आपल्याला उत्साही ठेवावे. परंतु पत्नीला हे सतत शक्य नसते. तिच्या जबाबदाऱ्या ही खूप असतात. घरची कामे , स्वच्छ्ता , स्वैपाक , घरातल्या वडीलधाऱ्या मंडळींची काळजी घेणे, मुलांची काळजी , मुलांचे आवरणे , त्यांचे अभ्यास , शिवाय ती जॉब करणारी असेल तर तिची कामे , बाहेरची कामे असतात. भाजी , वाणी सामान , इस्त्री , दळण असेल , मुलांचे शाळेचे , प्रोजेक्ट चे सामान घेवून येणे ..अशी बारीक सारीक , मोठी असंख्य कामे असतात .

आणि यातून वेळेत वेळ काढून इच्छा असूनही सतत पतीला वेळ देणे शक्य नसते. वडीलधारी मंडळी, लहान मुले किंवा वयात येणारी आपली मुले घरात असतात त्यामुळे स्त्री लज्जे खातर त्यावर मर्यादा येतात. म्हणूनच सतत ती सोबत असणे यासारखी तीच-तीच अपेक्षा ठेऊन आपल्या पत्नीला हैराण करू नका.

२. पती ची अपेक्षा असते की पती समोर असताना पत्नी ने सुंदर आवरलेले , एकदम फ्रेश असावे. आकर्षक कपडे , हलकासा मेकअप , हेअर स्टाइल असावी. आणि सुगंधित परफ्यूम .. नीट नेटके राहावे. फिगर मेन्टेन करावी . त्याकरिता प्रयत्न करावेत. परंतु पत्नी ही रोजच्या जबाबदाऱ्या , कर्तव्य पार पाडण्यात एवढी अडकून पडते की तिला बरेचदा याकरिता , स्वतः कडे लक्ष देण्याकरिता वेळ मिळत नाही.
पण पती ने ही लक्षात घेवून सारखी तीच-तीच अपेक्षा ठेऊन आपल्या पत्नीला हैराण करू नये.

३. पती बरेचदा कामाचा पडणारा जास्ती ताण , आर्थिक जबाबदाऱ्या पार पाडताना होणारी मानसिक आणि शारीरिक ओढाताण यातून येणारा थकवा दूर करावा आणि दुसऱ्या आपल्या आवडत्या गोष्टीत गुंतून आपली energy वाढविण्याकरिता , मन उत्साही होण्याकरिता, रिलॅक्स होण्याकरिता पत्नी ला सतत सेक्स करावे , अशी तीच तीच अपेक्षा ठेऊन आपल्या पत्नीला हैराण करू नका.

कारण ती ही दिवसभर सततची कामे , जबाबदाऱ्या पार पाडून थकत असते. काही वेळेस मानसिक असेल तर काही वेळेस शारीरिक थकवा ही जाणवत असतो. तिला ही समजून घ्या. कधी तरी विश्रांती द्या. विसावा द्या . तिच्या आवडत्या गोष्टी करा. फिरायला घेवून जा. तिला ही थोडे मानसिक आणि शारीरिक आराम द्या. जेव्हा ती छान फ्रेश मूड मध्ये असेल .तिची ही गरज शारीरिक जवळीकता करण्याची असेल. ती ची संमती असेल ..उत्साही असेल ती त्याकरिता अशा वेळी ती गोष्ट आपणहून नैसर्गिकरीत्या आवडीने होत असते. पण सतत / सारखी तीच-तीच अपेक्षा ठेऊन आपल्या पत्नीला हैराण करू नका.

४. काही वेळेस रोज स्वैपाक काय करायचा आणि लवकर वेळेत कामे उर्कण्या करिता सहज आणि सोपे जमणारे पदार्थ स्त्रिया करत असतात. काही वेळेस तब्येत बरी नसते. Periods मध्ये त्रास होत असतो.

अशावेळी पतीने सतत तेच तेच पदार्थ करण्यापेक्षा सारखेच चमचमीत , वेगळे पदार्थ करण्याची मागणी केली.अपेक्षा केली तर तिचा त्रास अजून. वाढतो आणि मानसिक तसेच शारीरिक तणाव निर्माण होतो. म्हणून बायकोला समजून घ्या. तिच्या अडचणी लक्षात घ्या.
सारखी तीच-तीच अपेक्षा ठेऊन आपल्या पत्नीला हैराण करू नका.

५. पत्नी ही मुलांना वळण , शिस्त लावण्याचा प्रयत्न करत असते. त्यांनी नियमित अभ्यास करावा म्हणून ओरडत असते किंवा सांगत असते. त्यावरून बरेचदा पती आणि पत्नी मध्ये वाद होतात. पती ला मुलांना ओरडणे आवडत नाही . त्यामुळे पत्नी ने मुलांना ओरडू नये. धाकात ठेवू नये अशी अपेक्षा पती करत असतो आणि त्यावरून पत्नीला सतत रागवत असतो. आणि पत्नी ने त्याला समजून घ्यावे ही अपेक्षा असते.
एक गोष्ट की पत्नी मुलांच्या फायद्या करिता हे करत असते. त्यामुळे तिने मुलांना न ओरडण्याची , सारखी तीच-तीच अपेक्षा ठेऊन आपल्या पत्नीला हैराण करू नका.

खूप छोट्या छोट्या गोष्टी असतील किंवा मोठ्या जसे पैशाची बचत असेल , सततची ड्रेस किंवा गरजेच्या सोडून इतर भौतिक वस्तूंची च खरेदी असेल. बाहेर सतत जेवण असेल किंवा मोठ्या वस्तू गरज नसताना .चांगली गाडी असताना दुसरी घेण्याची, चांगला मोबाईल असताना नवीन model येतात तसे सतत बदल करण्याची, दिवस रात्र घर सोडून बाहेर मित्र मैत्रणी यांच्यात असेल तर मात्र हे खर्च कमी करण्याकरिता, बचत करण्याकरिता सारखी तीच-तीच अपेक्षा ठेऊन आपल्या पत्नीला हैराण करणे म्हणा सूचना देणे गरजेचे आहे .
कारण पैशाचा ताळमेळ लावताना पैशाची सोंगे नाही आणता येत.

मात्र छोट्या छोट्या गोष्टीतला आनंद मात्र हिरावून घेवून त्यात ही बचत करण्याची सतत ची अपेक्षा ठेवून हैराण करू नये.

आयुष्य सुंदर आहे. पती पत्नी यांचे नाते पाण्यात पाणी , रंग मिसळून जावून किंवा दुधात साखर असा दुग्ध शर्करा योग . एकरूप होवून जाणारे सुंदर सत्य आहे.. जे दोघांनी खूप समजुतीने , एकमेकांना सांभाळून घेवून , आवडी निवडी विचारात घेवून , गरजा लक्षात घेवून , एकमेकांना साथ देवून , विश्वास देवून , वेळीच गैरसमज दूर करून उत्तम आणि आदर्श नाते वृध्दींगत करणे गरजेचे असते.

सारखी तीच-तीच अपेक्षा ठेऊन आपल्या पत्नीला हैराण करू नका.तिच्या जागी स्वतः ला ठेवून तिच्या भूमिकेत शिरून बघा. सुंदर असणारे आयुष्य अजून सुंदररित्या फुलवा.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!