अनेक विवाहित महिलांना नवऱ्याची बेडवरची मर्जी मनमारुन सांभाळावी लागते.
टीम आपलं मानसशास्त्र
लग्न , विवाह हा खरे तर कायदा आणि समाज, नातेवाईक यांनी रीतसर बंधनाने शारीरिक गरजा पूर्ण करण्याकरिता , तसेच वंश वृध्दी करिता एकत्र येण्याची परवानगीच जणू.
आपण जर आपल्या देशाचा विचार केला तर अजूनही आपल्या इकडे स्त्री , पुरुष यांची शरीर रचना कशी असते. वयात येताना होणारे बदल , शारीरिक असतील , मानसिक असतील , किंवा harmonal बदल ही असतील , त्याविषयी , शारीरिक संबंध याविषयी , किंवा शास्त्र शुद्ध पद्धती , एकत्र येण्यापूर्वी आणि नंतर घेण्याची काळजी , सूचना याविषयी मुक्तपणे चर्चा केली जात नाही. संवाद साधला जात नाही.
अनेक विवाहित महिलांना नवऱ्याची बेडवरची मर्जी मनमारुन सांभाळावी लागते. याविषयी काही मुद्दे मांडणार
आहोत.
मुळात च स्त्री ही या विषयावर बोलण्यास किंवा कृती करण्यास लाजत असते. मर्यादाशिल असते. त्यामुळे सुरुवातीला लग्नानंतर नवऱ्याला च पुढाकार घ्यावा लागतो. हळूहळू त्याला जेवढी माहिती असेल तेवढी देवून , पुढाकार घेवून जे काही त्याला माहिती मिळाली असेल , सांगितले असेल , किंवा इतरांचे अनुभव ऐकून तो ते प्रयत्न करतो.
पण बरेचदा काय होते की स्त्री ही एकदम बेडवर सगळ्याचा शेवट करण्याच्या प्रयत्नात नसते. किंवा तशी तिची मानसिकता तयार होत नाही आणि शरीर रचना ही नसते. त्यामुळे स्त्री ला आधी भावनिक गोष्टी , थोडे इतर आवडत्या गोष्टी वर बोलून , एखादी गमतीशीर किंवा वातावरण निर्माण होईल अशी घटना , गोष्ट, संवाद साधून, वातावरणातला तणाव हलका करून , एकमेकात मोकळेपणा आणून , थोडेसे हलके स्पर्श असतील. रोमान्स असेल अशा वातावरणातून फुलवत जाणे अपेक्षित असते. आणि तशी ती हळूहळू तयार ही होते.
जे खरेच उत्साही, समजूतदार पुरुष आहेत , ज्यांना खरेच आनंद आणि सुख मिळवायचे ही आहे आणि द्यायचे ही आहे ते नक्कीच तसे प्रयत्न करून आपल्या बायकोची ही बेड वरची मर्जी सांभाळत असतात.
परंतु बरेचवेळा असेही पुरुष असतात. की जे खूप कष्टाची कामे करून मग ते शारीरिक असतील किंवा मानसिक ते करून दमून भागून येतात. आणि थोडे रिलॅक्स होण्याकरिता बेड हे माध्यम वापरतात. पण त्यात आपल्या बायकोला काय पाहिजे , तिला आनंद मिळतो का याचे विचार करणारे फार कमी लोक असतात. किंवा अजून या गोष्टी डोक्यात येत नाहीत. त्यांची गरज भागली संपले. असे वागणारे ही आहेत आणि नंतर ढुंकून न बघणारे ही आहेत.
तर काही जी काही सुरुवाती ला पद्धती वापरली तीच बरोबर असे समजून कायम तसे करण्याचा प्रयत्न करतात.
बरेचदा ते स्त्री ला , बायकोला गृहीत धरतात. आणि त्यांना पाहिजे तेच करतात. यात मर्यादा असल्यामुळे स्त्री ही मोकळेपणाने बोलत नाही आणि मन मारून या गोष्टी पतीच्या मर्जी करिता करते.
तर कधी कधी पती मध्ये काही तरी कमतरता असते. त्यावर अनेक वेळा बोलून , वाद घालून , डॉक्टर चे सल्ले घेवू हे सुचवून ही आपल्यात काही कमी असेल याचा स्वीकार नसतो. त्यामुळे स्त्री ही समाधानी नसेल तरी पुरुषाच्या मर्जी खातर तिला मनमारून या गोष्टी कराव्या लागतात. आणि सगळ्यात यात वयाने मोठे असणारे किंवा बरोबरीचे घरातले कोणतेच मार्गदर्शन करत नाहीत किंवा तुमच्या नात्याबद्दल काही विचारणा करत नाहीत. सगळ्या गोष्टी गृहीत धरून जातात. त्यामुळे आपल्या अडचणी कोणाला सांगणार असे प्रश्न स्त्री ला पडतात आणि ती चुपचाप , मनमारून या गोष्टी करते. की नवऱ्याची मर्जी सांभाळावी .त्याला खुश ठेवावे. आणि कदाचित आपल्या या गोष्टीमुळे त्याच्यात काही बदल घडेल ही अपेक्षा ही असते.
स्त्री घरकाम करून , जॉब करणारी असेल तर घरची आणि ऑफिस ची जबाबदारी , मुलांची जबाबदारी आणि घरचे मोठे यांच्या जबाबदाऱ्या , कामे पार पाडताना थकून भागून जाते. तिला वेळेत काम पूर्ण करावी लागतात त्यामुळे पहाटे पासून रात्री पर्यंत अविरत तिची कामे सुरू असतात. झोपेची ही गरज असते , कामे आणि त्यातून मानसिक आणि शारीरिक थकवा येतोच. आणि मग तिची इच्छा नसताना जर नवऱ्याची इच्छा असेल तर त्याला नाराज करायला नको म्हणून ती या गोष्टी करते.
काही वेळेस आपली भूक जशी असते थोड्या थोड्या वेळाने अन्न , पाणी खावे , प्यावे वाटते तसे . पुरुषांची गरज असते. पण स्त्री थकवा , दमणूक यातून याकरिता सतत तयार होत नाही आणि तरी ही पुरुषाची , नवऱ्याची मर्जी सांभाळावी या हेतूने ती आपले मन मारून ही गोष्ट करते.
काही अतिशय आनंदी , सुखी आणि उत्साही जोडपी ही आहेत . जी एकमेकांचे विचार करून , गरजा लक्षात घेवून एकमेकांना प्रेरणा देवून , विविधता , नावीन्य यांची सांगड घालून स्त्री ला प्रसन्न ठेवून energy वाढवून एकमेकांना अजून आनंद देत असतात.
सध्या मात्र असंच अगदी उलटं सुद्धा होत आहे. अनेक विवाहित पुरुषांना ही बायकोची बेडवरची मर्जी मनमारुन सांभाळावी लागते. कारण काय तर आता बायका ही थोड्या धाडसी झाल्या आहेत. थोड्या जागरूक झाल्या आहेत. त्यांच्या गरजा त्यांना समजू लागल्या आहेत. आणि लव्ह मॅरेज सारख्या कॉन्सेप्ट मधून आपल्याला समजून घ्यावे आणि आधी पासून माहिती असल्यामुळे गृहीत धरून मोकळेपणाने या गोष्टी करिता पुढाकार घेतात परंतु अशावेळी पुरुष ही प्रवास असेल , कामाचे दडपण यातून थकला असेल त्याची इच्छा नसेल तरी बायको करिता मन मारून ,कारणे बाजुला ठेवून या गोष्टी करत असतात.
खरे तर काय कारण असेल बरे ? अनेक विवाहित महिलांना नवऱ्याची बेडवरची मर्जी मनमारुन सांभाळावी लागते.? थोडेसे मानसिकदृष्ट्या विचार केला तर स्त्री हा विचार करते की आपण कमी पडलो तर आपला नवरा दुसऱ्या स्त्री कडे जावू नये. मनातून ही कायम insecurity असते. याचे कारण ही तसेच strong आहे. कारण स्त्री चे सर्वस्व ती जेव्हा नवऱ्याला देते तेव्हा तो आपला आहे .त्याच्यावर आपला हक्क आहे , possessiveness समजून ती हे करते.
परंतु काही कारणाने आपण जर नाही देवू शकलो या गोष्टी. तर पुरुष दुसऱ्या स्त्रीचा विचार नक्की करेल .कारण स्त्री सारखं तो भावनिक कमी आणि प्रॅक्टिकल जास्त असतो. त्याला त्याग , सर्वस्व या गोष्टी खरे तर समजत नसतात. त्याला फक्त त्याच्या इच्छा , गरजा समजत असतात. आणि त्या पूर्ण नाही होवू शकल्या तर पर्यायी मार्ग तो शोधत असतो. त्यामुळे मानसिक दृष्ट्या विचार करता स्त्री कायम पुरुषाची मर्जी सांभाळण्याचा प्रयत्न करत असते. मग तेव्हा तिच्या इच्छा , गरजा यांचा ती विचार ही करत नाही.
अनेक विवाहित महिलांना नवऱ्याची बेडवरची मर्जी मनमारुन सांभाळावी लागते. आयुष्य सुंदर आहे जर खरे सुख समाधान मिळवायचे असेल दोघांनाही तर खरेच कधी तरी विचारा ना आपल्या जोडीदाराला की बेडवरच्या नात्यातून आनंद आणि सुख मिळते ना.. इच्छा असताना होते ना.. आवड आहे ना. काही कमतरता असतील तर त्यावर ही चर्चा करावी . एकमेकांना समजून घेणे आणि देणे यातून पुढे जाताना आनंद आणि सुख आहे.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


