Skip to content

घरी नवीन सूनेबद्दलच्या अपेक्षा आधीच ठरवून ठेवत असाल तर….

घरी सून म्हणून एक मुलगी घरात आली की तिच्याबद्दलच्या सगळ्या अपेक्षा सर्वांनी आधीच ठरवून ठेवलेल्या असतात..


मेघना जोग


प्रत्येकाने स्वतःच्या मनात एक साचा ठरवलेला असतो तिच्या बद्दलचा… एक बायको म्हणून, सून म्हणून, वहिनी म्हणून, किंवा काकू, मामी म्हणून…
आणि प्रत्येकजण तिला आपल्या साच्यात ठेवण्याचा प्रयत्न करतो.. आणि मग तिची गफलत सुरू होते या सगळ्या नात्यांची…

ह्या सगळ्या आधी कुणी हा विचारच करत नाही.. की ती आधी माहेरच्या घरी एक मुलगी होती.. जास्तीत जास्त ताई किंवा आत्या… पण त्यात फार अपेक्षा नव्हत्या… आणि अशा घरातून आलेली मुलगी की जिच्यावर 24/25 वर्ष तिच्या घरचे संस्कार आहेत..लगेच 3/4 महिन्यात तुमच्या घरची कशी होईल??..

तिच्या घरात बोलले जाणारे विषय, भाषा, जेवणाची पद्धत, तिची स्वतःची आवड, तिचं शिक्षण, हुशारी.. सगळं सगळं ती एका दिवसात मागं टाकून येते..

आणि फक्त तीनं आडनाव बदललं की ती तुमच्या घरची कशी होईल??..
त्यातच तिला घर नवीन…अशा इतक्या परक्या लोकांच्यात तशाच जरा परक्या असणाऱ्या नवऱ्याशी शारीरीक जवळीक… की जो विषयही माहेरी फारसा बोलला गेलेला नाही.. त्याबद्दलचा नवऱ्याचा उतावळेपणा, त्यावरून केली गेलेली जवळच्या न वाटणाऱ्या लोकांनी केलेली थट्टा??…

किती परकं असतं हे सगळं??..
कुणी विचार करत का??…

चार सहा महिन्यात तिच्याकडून देव धर्म कुळाचार यांच्या सहभागाची अपेक्षा.. तिनं नोकरी पाणी सांभाळून करावं… आणि आपल्या घरी चालणाऱ्याचं प्रथेनं करावं.. ही अपेक्षा केली जाते…

कसं शक्य आहे??.. तुमचा मुलगा नवरा झाला. की जबाबदारीनं पिशवी घेऊन भाजी आणायला जातो का??.. पण हिनं मात्र सुई दोऱ्यापासून ते दळण संपलंय पर्यंत सगळं पहायचं असतं…

या संपूर्ण तिच्या मानसिक आणि शारीरीक प्रवासात जर नवऱ्याने साथ दिली तर उत्तमच.. नाही तर सासरबद्दलची कायमची अढी तिच्या मनात बसते.. आणि ती कमी व्हायला एक तर खूप काळ जावा लागतो.. अथवा ती निघतच नाही…

हाच नात्यांचा उतावळेपणा बाकीच्या नात्यांनीही जपायला हवा… कितीही झालं तरी तिला तुमच्या घरात रूळेपर्यंत तीचं माहेरचं जवळचं वाटणार आहे..

तिचा ओढा 2/3 वर्ष तिकडंचाच राहणार आहे.. हे लक्षात घ्यायला हवं..
थोडक्यात नातं फुलायला, प्रेम, थट्टा मस्करी, कौतुक, नात्याचा मान ठेवणं, आपुलकी आणि विश्वास यांचं योग्य खतपाणी हवं.. तरचं ते नातं बहरतं..

पहिली पाच वर्ष नवीन सुनेला द्या..
आणि पुढची पन्नास वर्ष सुखानं जगा.. हा सुखाचा मंत्र आहे..
नाही तर आहेतच सासू सुनांच्या कुरबुरी.. आणि त्रस्त संसार…

??


दैनंदिन जीवनाला त्रासले आहात का ?

क्लिक करा


आपले सुद्धा प्रेरणादायी लेख आम्हांला ९१३७३००९२९ या व्हाट्सएप क्रमांकावर पाठवा. आपल्या नावासकट अत्यंत नम्रपणे ते प्रकाशित केले जातील.

“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया !

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!