प्रत्येक निर्णय माहेरी विचारून घेतला जात असेल तर..हा धोका आहे का?
सोनाली जे
आपल्या पुरुष प्रधान संस्कृती प्रमाणे लग्नानंतर स्त्री ही तिचे माहेर सोडून कायमचे सासरी राहण्यास येते. अर्थात जन्मापासून ते लग्नापर्यंत जो काळ आहे , मग ,,२५ वर्ष असतील किंवा आजकाल लग्नाचे वय वाढलं आहे कारण शिक्षण पूर्ण करून नोकरी लागून म्हणजे साधारण ३० वर्ष धरले तरी एवढी वर्ष आपल्या लोकांचा सहवास असतो.
सुख , दुःख , छोटे मोठे निर्णय सगळ्यांनी मिळून घेतले गेले असतात. जरी घेतलेले निर्णय बरोबर असतील तरी साथ असते सगळ्यांची. आणि त्यातून निर्णय चुकले तरी ते निर्णय बदलून , परिस्थिती बदलण्यासाठी घरच्यांचे मार्गदर्शन आणि support असतो. आर्थिक मदत असेल किंवा मानसिक आधार असेल किंवा कोणत्याही परिस्थिती मध्ये आम्ही पाठीशी आहोत हा खंबीर आधार असतो.
त्यामुळे बिनधास्तपणे पुढे पावूल उचलले जाते. स्वतः मधला आत्मविश्वास दृढ होत जातो. आणि त्याचमुळे प्रत्येक निर्णय सगळ्यांनी एकत्र घेवून ते जबाबदारीने एकत्रितरित्या पार पाडण्याचे सगळेच प्रयत्न करत असतात. जिथे कमी तिथे मदतीला यांची कायम साथ , मार्गदर्शन , लाभत असते.
त्याचमुळे लग्नानंतर सासरी गेल्यावर प्रत्येक निर्णय माहेरी विचारून घेतला जात असेल तर..हा धोका आहे का?हा प्रश्न निर्माण होतो. पण तसे विचार करता सासरी आलेल्या मुलीला सासरच्या लोकांची तेवढी माहिती नसते. त्यांची विचार करण्याची , निर्णय घेण्याची पद्धत नवीन असते. आणि आजपर्यंत माहेरची लोक कोणताही निर्णय घेताना सल्ला असेल , मदत असेल , मार्गदर्शन असेल किंवा निर्णय चुकला तरी मदतीला धावून येणार याची खात्री असते.
काही वेळेस सासरचे असे ही म्हणतात तुझे तू बघ . अशावेळी संभ्रम निर्माण होतो. कोणाचा तरी आधार पाहिजे असतो तेव्हा आपसूकच निर्णय घेताना बाहेरच्या लोकांना विचरण्यापेक्षा आपल्या घरातल्यांना , माहेरच्यांनी निर्णय प्रक्रियेत मदत करणे योग्य वाटते. आणि छोटे छोटे निर्णय घेण्याची क्षमता प्रत्येकात असते च. विषय कधी निर्माण होतो जेव्हा मोठे निर्णय , मग जॉब बदल असेल , मुल होवू द्यायचे का तेव्हा ? त्याचा सांभाळ ? किंवा मोठी आजारपणे असतील , कधी घर किंवा मोठ्या वस्तू घेताना माहेरी चांगले अनुभव असतात. माहेरच्या वस्तू ही चांगल्या लागल्या असतात. म्हणून ते कोणाकडून घेतले. मदत काय घेतली , कागदपत्र काय लागतील , loan घेणे असेल किंवा त्याकरिता procedure यांची माहिती नसते त्यामुळे ही पुढे जाताना , काही निर्णय घेताना माहेरी विचारून निर्णय घेतले जातात.
अनेकवेळा सासरी ती सून आहे म्हणून थोडे अंतर ठेवून वागविले जाते. कारण फार जवळीक केली तर डोक्यावर चढून बसेल ही मानसिकता असते. तर काही सासरचे लोक असेही विचार करतात किंवा काही विचारले की त्यांच्यावर काही येईल , सगळे त्यांना करावे लागेल किंवा काही झाले तर रिस्क नको म्हणून ही काही मदत करत नाहीत.
काही वेळेस सल्ला विचारला सासरच्या लोकांना तर आम्हाला कोण होते सल्ला देणारे? आमचे निर्णय आमच्या हिमतीवर च घेतले आम्ही असे ऐकविनारे असतात. तर काही वेळेस सून आणि सासरचे यांच्यात तेवढा मोकळेपणा नसतो त्यामुळे कसे विचारू ? कसे सल्ला घेवू ? या थोड्याशा संकुचित वृत्ती मुळे ही सासरी काही सल्ले विचारले जात नाहीत. मोकळेपणाने विषय मांडले जात नाहीत.
काही वेळेस खूप मोकळेपणा असतो सासरी , मदत करणारे असतात तेव्हा नक्कीच त्यांचे सल्ले निर्णय घेताना विचारात घेतले जातात.
शेवटी जिथे प्रेम , आपुलकी , आपलेपणा आहे, कोणत्याही परिस्थिती मध्ये ही व्यक्ती आपली आहे आणि आपण मदत करणारच ही भावना असते . तिथे मग वयाने लहान असो किंवा मोठ्या व्यक्ती यांचे नक्की च सल्ले घेवून , यांच्या सोबत विचारविनिमय करून निर्णय घेतले जातात.
काही वेळेस स्त्री फक्त आपल्या माहेरचे आपले असे गृहीत धरत असते. फक्त स्वार्थी विचार . सासरचे किती ही चांगले असतील तरी ते आपले नाहीत . परके आहेत. आपले लोक फक्त माहेरचे अशी ही मानसिकता असते. जी चुकीची आहे हे माहेरच्यांनी समजून सांगायला पाहिजे .
काही वेळेस माहेरचे सांगतात पण ते मुलीला पटत नाही. तर काही वेळेस माहेरचे च लोक आपल्या मुलीच्या मनात सासरच्या लोकांविरुद्ध कान भरवतात. त्यांच्या बरोबर अंतर ठेवून वागण्यास सांगतात. तर काही वेळेस माहेरचे लोक असेही भरवतात मुलीच्या मनात की , आपल्या सगळ्या गोष्टी , investment , खाजगी गोष्टी सगळे सासरी सांगू नये. आपल आपले गुपित ठेवावं यातून मुलीच्या मनात सासरच्या लोकांविषयी उगीच काही तरी विरूद्ध गोष्टी भरविल्या जातात.
प्रत्येक निर्णय माहेरी विचारून घेतला जात असेल तर..हा धोका आहे का? खरे हो म्हणले तरी चालेल . कारण मग अगदी फालतू गोष्टीत ही जर सल्ले घेतले जात असतील जसे आज कोणती भाजी करू . किंवा ही कशी करायची भाजी . त्यापेक्षा सासरच्या लोकांना काय आवडते , कशी आवडते भाजी हे विचारून केले तर अजून जास्त जवळीक निर्माण होईल. तेही आपली तशीच काळजी घेतील.
याउलट सतत माहेरच्यांनी मुलगी आपली आहे , आपले हक्क आहेत तिच्यावर अस म्हणून लुडबुड केली तर तो धोका आहे. किंवा मुद्दाम सासरच्यांना कारण मुलगी मग नवरा असेल किंवा सासरची वडीलधारी मंडळी यांचे मत , सल्ले , अनुभव विचारात घेत च नाही.
अशावेळी सासरी एकमेकांच्या मध्ये आपुलकी , आपलेपणा , bounding निर्माण होण्यास प्रोब्लेम येतात. आणि कदाचित नाती अंतर ठेवून वागू लागतात.
प्रत्येक निर्णय माहेरी विचारून घेतला जात असेल तर..हा धोका आहे का? घ्यावा सल्ला. विचार विनिमय करावा . पण त्यांनी मुलीच्या संसारात हस्तक्षेप करू नये. आणि उगीच तिच्या सासरच्या लोकात सततची ढवळाढवळ करून त्यांचे relations कमकुवत करू नयेत. किंवा शंका निर्माण होवून अंतर च कायम राहील असे वागू नये.
सतत माहेरचा पगडा राहण्यापेक्षा आपणहून मुलीला तेही आपलेच आई वडील आहेत असे समजून वागण्यास मदत करावी. सल्ला द्यावा. किंवा आपल्या सोबत सासरच्या लोकांना ही एकत्र बोलावून , त्यांचे मत ही विचारात घेवून , बाकी गोष्टींवर ही विचार विनिमय करून निर्णय घेण्यास प्रोत्साहन द्यावे. किंवा कधी कधी सासरच्या लोकांसोबत बोलून निर्णय घे असे स्पष्ट राहावे.
लग्नानंतर ही मुली ला पूर्णपणे आपल्यावर अवलंबून राहण्यास मदत करू नये. तर ती तिचे स्वतः चे विचार , अनुभव , आणि सासरच्यांनी साथ , मते याचा ही विचार करून निर्णय घ्यावा असे ठाम राहिले आणि कधी कधी खूपच त्रास , ताण असेल तर नक्की मदत , सल्ला द्यावा , निर्णय घेण्यास मदत करावी.
पण माहेरच्यांनी आपल्या मर्यादा सांभाळून सततचे छोट्या मोठ्या गोष्टीत आपले अस्तित्व दाखवू नये. सासरच्या नात्यावर कोणती गदा आणू नये. प्रसंगी स्वतच्या बाबतीत जर सुनेने असे वागले तर आपल्याला ही चालणार नाही याचा विचार करून मुलीला ही जर भावजय अशी वागली तर तुला चालेल का ? नाही ना .. तुझ्या आई वडिलांना , भावाला डावलून भावजय जर तिच्या माहेरच्या लोकांच्या सल्ल्याने सतत वागली तर तुला जसे चालणार नाही. त्रास करून घेशील आणि तिला त्रास देशील . तसा इतरांच्या भूमिकेत जावून विचार करण्यास शिकवावा.
आयुष्य सुंदर आहे. कठीण प्रसंगी , वेळप्रसंगी सासरचे आणि माहेरचे दोघेही सल्ला देण्यास आणि निर्णय घेण्यास समर्थ असतील तर सर्वत्र वातावरण खेळीमेळीचे आणि आनंदी राहील. सासरचे ही आपलेच लोक आहेत .. ही मानसिक भावना वाढवली तर त्यांना ही नक्कीच विचारात घेतले जाईल. महत्व दिले जाईल. आणि माहेरचे ही वेळप्रसंगी सोबत असतील.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!



हो बरोबर आहे..मुलीच्या संसारात माहेरच्यांनी लुडबुड केली नाही पाहीजे.माझ्या लग्नाला ११ वर्ष झाली अजून दोघांत विचार विनिमय नाहीत…दोघांचे निर्णय एकमैकांना माहीत नसतात..तु माहेरी विचार…मी माझ बघतो…त्यामुळे माझ लक्ष आता दुसरीकडे वळायला लागलय..आपल्या मुलीच्या संसारात ढवळाढवळ केल्याने काय परिणाम होणार आहे हे अजून कस कळत नाही..
खूप सुंदर….माहेरच्यांना मुलीच्या संसारात लुडबुड करायची खूप सवय असते….माझ्या लग्नाला ११ वर्ष झाली पण अजून दोघांत विचारविनिमय नाहीत…त्यामुळे बाहेर माझं लक्ष वाढायला लागलं आहे