Skip to content

भावनिक महिलांचं शरीर आकर्षणाविषयी नेमकी काय फिलॉसॉफी असते.

भावनिक महिलांचं शरीर आकर्षणाविषयी नेमकी काय फिलॉसॉफी असते.


सोनाली जे


खरे तर प्रत्येकजण भावनिक असते. पण त्याचे प्रमाण प्रत्येकात वेगवेगळे असते. काही प्रमाणात भावनिक असतात , तर काही जास्त भावनिक , तर काही भावनिक दृष्ट्या अती संवेदनशील असतात.

स्त्रिया या पुरुषांच्या पेक्षा जास्त भावनिक असतात. तशा त्या हळव्या ही असतात.

फिलॉसॉफी ..म्हणजे मनात बांधलेली तत्व…

जीवनाचा अर्थ शोधणाऱ्या तत्त्वांचा, श्रद्धांचा अभ्यास; तत्त्वज्ञान, दर्शन .

भावनिक महिलांचं शरीर आकर्षणाविषयी नेमकी काय फिलॉसॉफी असते.

मनात कोठुन तरी बघितलेल्या, वाचलेल्या आवडलेल्या कल्पना असतात त्या समोर दिसल्या की मन आकर्षित होत….त्या कल्पना शरीराच्या असतील तर शरीर ही .

जसे एखादा सुंदर व्यक्तिमत्त्व असलेला उंच ,तरतरीत नाक असलेला , आकर्षक दाढी , मोठी आणि पिळदार मिशी असलेला , त्याचा बांधा , त्याचे हसणे , बघणे , नजर असा handsome मुलगा , बघताक्षणी आवडतो. आपण त्याच्याकडे आकर्षित होतो. अर्थात हे चुंबकीय नियमानुसार opposite sex , म्हणजे विरूद्ध लिंगी व्यक्ती कडे स्त्री आकर्षित होत असते.

भावना निर्माण होण्यास सुरुवात कुठून होते ? तर आधी बाह्य व्यक्तिमत्त्व , शारीरिक आकर्षण वाढविते. भावना या डोळ्यातून आधी जास्त व्यक्त होत असतात. आधी या डोळ्यात आवडत्या व्यक्ती कडे चोरून बघताना लज्जा असते. आपलं हे चोरून बघणे इतरांच्या नजरेत येईल म्हणून एक हलकासा कटाक्ष टाकून परत लाज , शरम आणि इतरांची भीती यामुळे परत ती नजर हलकेच खाली बघण्यात गुंतविली जाते. ते डोळे आधी त्यांची भाषा बोलतात. त्यात खोलवर आपलेपणा रुजतो. याच नजरेतून एकमेकांना एकमेका बद्दल काही feelings निर्माण होतात. आणि जर दोघांची डोळ्यातून संमती मिळाली तर हळूहळू प्रेमात रूपांतर होते.

शरीर आकर्षण होण्याआधी मन आकर्षित होत ना !! तेच मन मग त्या व्यक्तीच्या विचारात गुंतते. आणि हे गुंतणे एकमेकांविषयी ओढ , आपुलकी , प्रेम निर्माण करते. पुढे जाऊन त्या व्यक्तीचा सहवास हवाहवासा वाटतो. सतत त्याचे समोर असणे , दिसणे , बोलणे , आवाज , हसणे असेल ते अजून आकर्षक वाटत जाते. आणि मनाने अजून जवळ आणत जाते.

आणि मनाने जवळ आलो की सहवास वाढतो आणि सहवासातून अनेक चांगल्या गोष्टी समजतात. आवडी निवडी , स्वभाव त्या व्यक्तीवर चा विश्वास वाढत जातो.

त्याचे बाह्य व्यक्तिमत्त्व ..त्याच बरोबर स्वभाव . समजून घेण्याची आणि सांगण्याची क्षमता. यातून हवी हवीशी वाटणारी सोबत. मग हलकासा स्पर्श ही खूप सुखावह असतो. सुरवातीला नकळत होणारा हा हलकासा स्पर्श पुढे हवाहवासा वाटू लागतो. ती भेटण्याची ओढ वाढते. उत्सुकता वाढते. नावीन्य वाढते. एकमेकांना अजून आनंद , सुख देता येईल याकरिता भावनिक गुंतवणूक वाढते आणि प्रयत्न ही सकारात्मक रीतीने केले जातात.

हो पण हे जर भिन्न लिंगी व्यक्ती बाबतीत असेलतर ती ओढ वाढते ते केवळ शारीरिक आकर्षणामुळे च होते…

हे सगळं पुरेशा बाबतीत घडतं कारण शारीरिक आकर्षणामुळे मनात येतात हे भाव..

स्त्री ला पुरुषा विषयी जेव्हा खात्री वाटते . पटते, जेव्हा मन एकरूप होते आणि मनाची ओढ वाढते. कधी कधी हळूवार छोटे नकळत होणारे शरीर स्पर्श यातून वाढते. आणि मग तो हलकासा स्पर्श अजून हवाहवासा वाटू लागतो. तो रोमांचित करत असतो. ती ओढ अजून खोलवर रुजते. आणि मग शारीरिक आकर्षण वाढू लागते.

हो खरेच असच घडते , म्हणूनच पुरुषाने पुढाकार घ्यायचा असतो आणि स्त्रीच्या मनात शरीरात ती ओढ तयार करायची असते…कारण स्त्री मूलतः नैसर्गिक नाजूक आणि लाजाळू असते..

हळूहळू ही ओढ लग्नसारख्या सुंदर बंधनात बांधली जाते. आणि मग प्रेम , आपुलकी , विश्वास , खात्री , आपलेपणा , अधिकार , या भावना वाढीस लागून भावनिक जवळीकता तर निर्माण होतेच परंतु शारीरिक ओढ ही निर्माण करते. शारीरिक आकर्षण वाढून ते रूपांतर एकरूपते मध्ये होते. ती स्वतः ही त्यात पूर्ण involve होते आणि आपल्या जोडीदाराच्या आवडी निवडी ही लक्षात घेवून मग तसे ही करते. मग स्वतः चा पेहराव असेल , साजशृंगार असेल , किंवा एखादी सुंदर साडी ही दोघांच्या पसंतीची असेल.

किंवा वातावरण मुग्ध करणारा सुवासिक परफ्यूम किंवा अत्तर असेल. एकमेकांच्या भावना जपणे , समजून घेणे . भावना बोलून दाखवून त्यांना वाट मोकळी करून देणे असते. आपण जेवढे जोडीदाराला समजून घेवून त्याला ही काय पाहिजे याची जाणीव ठेवून आपल्याकडचे चांगल्यात ले चांगल्यात देण्याचा प्रयत्न असतो . देण्याची भावना असते. कारण आपण जेवढे देवू त्याच्या कैकपटीने आपल्याला मिळणार असते याची खात्री असते. आणि ते दोघेही सुखाच्या परमोच्च बिंदुचा अनुभव घेत असतात. सकारात्मक भावना या अजून उत्साही ठेवत असतात. नावीन्य निर्माण करीत असतात.

काही वेळेस याउलट ही होवू शकते. अति भावनिक , संवेदनशील स्त्री , महिला कधी कधी अपेक्षित असलेल्या गोष्टी घडल्या नाहीत, थोडे काही मनाविरुद्ध घडले , तर निराशा , उदासीनता ही पदरी पडते. कधी कधी एकमेकांच्या वागण्यात विश्वास कमी पडला तर कायम अविश्वास , किंवा वर्तनावर शंका घेतली जाते. वाद विवाद ही होतात.

त्यातून भावनिक, मनाचा आणि असलेली शारीरिक जवळीकता ही शरिरक आकर्षण वाढविण्या ऐवजी दुराव्या मध्ये रुपांतरीत होते. काही वेळेस क्षणिक दुरावा असेल तर काही वेळेस दीर्घकालीन दुरावा . तर काही वेळेस कायमचा दुरावा निर्माण होतो. नकारात्मक भावना वाढीस लागतात. आणि शारीरिक आकर्षण नकोच असे वाटते. तर कधी मनात भीती ही निर्माण होते की परत तसेच काही नकारात्मक घडले तर ? एकमेकांवरील विश्वास डळमळीत होतो.

प्रत्येक भावनिक महिलांमध्ये वेगवेगळ्या भावना असतात. कोणाच्या अती संवेदनशील असतात. त्याची महिलांचं शरीर आकर्षणाविषयी त्यांच्या भावना जशा निर्माण होतील तशी किंवा जे वाचण्यात , बघण्यात आले असेल.अनुभव असतील, ज्याची कल्पना केली असेल तशी फिलॉसॉफी असते…किंवा तशी फिलॉसॉफी बनते.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “भावनिक महिलांचं शरीर आकर्षणाविषयी नेमकी काय फिलॉसॉफी असते.”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!