नवरा-बायकोचे भांडण रात्री बेडवर मिटते, ही सवय घातक आहे का?
सोनाली जे
नवरा-बायकोचे भांडण रात्री बेडवर मिटते, ही सवय घातक आहे का? असे विचार कोणी ही केले किंवा मनात आले तर खरे तर नाही असेच वाटते. कारण किती ही भांडणे झाली. वाद झाले तरी ते वाद बरेचदा इतर गोष्टीवरून , व्यक्ती वरून, हाता बाहेरच्या परिस्थिती वरून , आर्थिक गोष्टी वरून होत असतात. पण या सगळ्या गोष्टी सोडल्या तर त्यापलीकडे जावून नवरा बायको हे सगळे सोडून जे आपले सुख आहे त्याकडे लक्ष देण्यास केव्हाही तयार असतात.
बरेचदा तर नवरा – बायको नुसते बेडवर समोरासमोर बसले . जवळ आले , अगदी भले त्यांच्यात कोणतेही शारीरिक संबंध न होवू देत. पण तो त्यांचा एकांत. त्यांच्यातला मोकळेपणा ,नुसते जरी जवळ बसून सोबत आहोत हा दिलासा , आपुलकी , आपलेपणा , आश्वासन मिळत असतो. तर कधी डोके ठेवण्यास एक वेळीच दिलेला खांदा खूप रिलॅक्स करत असतो ..आपल्याला हक्काची साथ आहे हे जाणवून देत असतो. आणि त्यापुढे जावून एकत्र आले तर सगळे ताण , तणाव , वाद हे सगळे विसरून केवळ आनंद आणि सुख यांची देवाणघेवाण होते.एकमेकांची गरज एकमेकांना आहे याची जाणीव होत असते.
खरे तर नवरा-बायकोचे भांडण रात्री बेडवर मिटते, ही सवय घातक आहे का?तर नाही. कारण कोणतेही मतभेद , ताण , तणाव कधी कधी ऑफिस मधल्या गोष्टीवरून होणारी भांडणे तर कधी किरकोळ गोष्टीतून होणारे गैरसमज पण होणारे मोठे वाद हे विसरून जाण्याकरिता आणि परत आपण एकमेक एकरूप आहोत हे एकमेकांना शब्दातून एक्स्प्रेस करण्यापेक्षा बेड वर जेव्हा दोघेच असतात त्यात इतर कोणीही नसते केवळ त्यांचे विश्व असते , एकांत असतो तेव्हा जास्त चांगल्या रीतीने व्यक्त केले जातात.
शिवाय जे वाद , भांडण यातून harmonal changes झाले असतात. कधी levels high झालेल्या असतात त्या नॉर्मल होवून रिलॅक्स होण्याकरिता मदत होत असते.
याउलट ही विचार करून बघू . नवरा-बायकोचे भांडण रात्री बेडवर मिटते, ही सवय घातक आहे का? तर हो ..ती घातक सवय ही ठरू शकते . कारण काय की दोघांची मानसिकता तयार होत पक्की होते की आपण कसेही वागलो , काही ही बोललो, काही ही कृती केली , कोणत्याही गोष्टी मध्ये जोडीदाराचा विचार केला नाही. काही गोष्टी आधी सांगितल्या नाहीत आणि जर कुठून समजल्या जेव्हा गरज पडेल तेव्हा सांगितले , काही तरी पटवून सांगितले तरी चालते.
किंवा ज्या गोष्टी पटत नाहीत किंवा सांगून ही त्यात बदल होत नाही यावरून सतत भांडणे केली , वाद घातले तरी त्याचा फारसा परिणाम होत नाही कारण ही मानसिकता पक्की असते की आपण कसेही वागलो तरी बेडवर एकत्र आलो की जोडीदार माफ च करणार. सगळे सोडून त्यावर दुर्लक्ष करणार. त्यामुळे कितीही मनाविरुद्ध वागलो , चूक केली , तरी बेड वर सगळे वाद मिटणार ही बिनधास्त मानसिकता बेधुंद वागण्यास अजून प्रोत्साहित करते.
त्यामुळे खरेच कधी कधी नवरा-बायकोचे भांडण रात्री बेडवर मिटते, ही सवय घातक ही आहे. यातून भावना आणि व्यक्तीचा गैरफायदा घेण्याची मनोवृत्ती वाढीस लागण्याची शक्यता ही असते.
जसे ऑफिस मधून नवरा परस्पर च बाहेर मित्रांसोबत पार्टी , जेवायला गेला सांगितले नाही तर घरी बायको स्वैपाक करून वाट बघत असते. जेवायची थांबते. वाट बघून ही वेळेत आले नाही आणि आल्यावर जेवून आलो हे सांगितल्यावर अशावेळी चिडचिड तर होतेच पण रागारागाने स्वतः ही जेवत नाही. अन्न ही वाया जाते. पण ती वेळ नवरा सांभाळून नेतो. गोड बोलून चुकले पुढच्यावेळी असे होणार नाही असे म्हणून बेड वर एकत्र येवून भांडण मिटवून टाकतो.
पुढच्यावेळी असेच परत घडते तो परस्पर बाहेर जेवून येतो, परत तसेच समेट घडवून आणतो. नंतर नंतर तर एव्हढे होत जाते की मला उशीर झाला म्हणजे तुला समजायला पाहिजे मी जेवायला नाही. बाहेर गेलो असेन .. प्रत्येकवेळी काय सांगायचे असे ही उलटे. आणि तरी परत बेडवर आलो की होईलच शांत हीच मानसिकता तयार होते नवऱ्याची आणि त्याचे वागणे बिनधास्त होते.
मुळात नवरा बायको जरी असतील तरी ती भिन्न व्यक्तिमत्त्व आहेत. प्रत्येकाचे विचार , भावना , अनुभव , अपेक्षा वेगळ्या असतात. जोडीदार असेल तरी वागण्याची पद्धत वेगळी असते. सहनशीलता , सोशिकता वेगळी असते. मुळात भांडणे कोणत्या गोष्टीवरून होतात हे समजणे जास्त गरजेचे असते.
काही कारणे अशी ही असतात की ती विशिष्ट परिस्थिती , सवयी या कोणत्याही परिस्थिती मध्ये बदलू शकत नाहीत..आणि तेव्हा भांडण झाले आणि बेड वर एकत्र येवून तात्पुरते ते विसरून नंतर परत भांडणे करत राहणे हे चुकीचेच आहे. पण अनेकदा बेडवर एकत्र असताना बाकी सगळे विसरले जाते .परंतु नंतर परत परत त्याच गोष्टीवरून वाद , भांडणे होत राहतात. कारण शरीर एकत्र येवून किंवा क्षणिक जवळ येवून काही गोष्टी विसरण्याचा प्रयत्न केला तरी काही गोष्टींचे आघात मनावर खूप खोलवर जखम करत असतात
ज्या जखमा तात्पुरती खपली धरतात परंतु परत जरा कुठे हलकासा धक्का लागला तरी जखमेतून परत जसे भळाभळा रक्त वाहू लागते तसे नवरा बायको रात्री बेडवर एकत्र येवून तात्पुरती भांडणे , वाद मिटत असतात पण परत थोडे अंतर आले किंवा सकाळ झाली की त्याचं रूटीन मध्ये अडकून काही वेळेस परत तीच भांडणे डोके वर काढतात.
म्हणून वाद कायमचा मिटण्या करिता मनातले गैरसमज वेळीच दूर करावेत. शक्यतो नवरा बायको मध्ये सर्वच गोष्टीत पारदर्शकता हवी. एकमेकांच्या विषयी माहिती पाहिजे. मग ती छोटी गोष्ट असेल अथवा मोठी. काही तणाव असतील मग कधी बाहेरील गोष्टी मुळे तर कधी घरच्या इतर व्यक्ती त्यामुळे ते वेळीच सुसंवाद साधून , मार्ग काढून , स्पष्ट बोलून त्यावर पर्याय , मार्ग शोधून कायमचे दूर करणे हा जास्त चांगला उपाय . परंतु खरेच जर सगळे विसरून नवरा-बायकोचे भांडण रात्री बेडवर मिटत असेल , तर ही सवय सर्वांच्या दृष्टीने चांगली आणि हितकारक च आहे.
आयुष्य सुंदर आहे. प्रत्येक गोष्ट आपल्याच मनासारखी होणार ही अपेक्षा सोडून , वादाचे मुद्दे वेळीच मिटवून नवरा बायको ने बेड असो किंवा रात्र असो किंवा दिवस एकमेकांना जेव्हा गरज आहे तेव्हा साथ दिलीच पाहिजे . भांडणे सुरू होताच त्याचे मुळ कारण काय हे लक्षात घेवून त्यावर तोडगा काढून ती कायमची मिटवली पाहिजेत.
भांडणात वेळ आणि energy घालवण्यापेक्षा अनेक आनंदाच्या आणि सुखाच्या गोष्टी केल्या पाहिजेत.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


