Skip to content

अनैतिक संबंधाबद्दल मानसशास्त्र काय सांगतं ??

अनैतिक संबंधाबद्दल मानसशास्त्र काय सांगतं ??


टीम आपलं मानसशास्त्र


नैतिक आणि अनैतिक , रूढी , बंधने , मर्यादा , कायदे या गोष्टी खरे तर मानसशास्त्रापेक्षा जास्त करून समाजशास्त्र आणि कायदा यावर जास्त आधारित आहे. अनैतिक संबंध म्हणजे काय ? नैतिक संबंध असून ही बाहेर ठेवण्यात आलेले संबंध. मग स्त्रि आणि पुरुष दोघेही आपले जोडीदार असताना ही पर स्त्री किंवा पर पुरुष यांच्या सोबत असलेले जास्त करूंन शरीर संबंध यात येतात. आपण भारतात राहतो आणि इथे नैतिक संबंध म्हणजे थोडक्यात विवाह मान्यता.

आणि ती ही नातेवाईक , समाज , आणि कायदा यांनी समंती दिलेले. विवाह या बंधनातून निर्माण झालेले संबंध मग शारीरिक असतील , धार्मिक गोष्टी करिता असतील किंवा आर्थिक हक्क असतील , अगदी मग भावनिक आणि मानसिक समजून घेणे किंवा सुरक्षितता किंवा आधार ही.

खरे तर खूप पूर्वी बहुपत्नीत्व , बहु पतित्व , ही प्रथा अस्तित्वात होती. अगदी आदिमानव असतील किंवा आदिवासी यांच्यात ही जरी विवाह झाले तरी आपण आपल्या आवडीच्या जोडीदारासोबत आवडत्या गोष्टी किंवा शरीर संबंध ही प्रस्थापित करू शकत होतो. राजे , सरदार यांची तर उदाहरणे बघितली आहेत अनेक राण्या असतं. आणि त्या शिवाय गणिका ही.

आता मानसशास्त्र काय म्हणते याचा थोडा विचार करूया. प्रसिद्ध मानस शास्त्रज्ञ डॉक्टर सिग्मंड फ्रॉईड यांच्या म्हणण्यानुसार. प्रत्येक स्त्री पुरुषाच्या मनात विरूद्ध लिंगी व्यक्ती विषयी एक विशिष्ट प्रकारचे आकर्षण असते. आणि खरे तर हे कायमच असते. अगदी बायको सोबत असेल तरी पुरुषाचे लक्ष समोरून येणाऱ्या एकदम छान फिगर आणि सौंदर्य असणाऱ्या स्त्री कडे सहजरीत्या जातेच.

किंवा स्त्री चे ही तसेच उंचापुरा , नाकेला किंवा छानसे जिम करून proper body तयार केलेल्या पुरुषाकडे अगदी सहजरीत्या स्त्री चे लक्ष जातेच. लग्न झालेले स्त्री पुरुष ही याला अपवाद नाहीत. लग्न झालेल्या ही स्त्री पुरुषांचे लक्ष एकमेकाकडे जात असते. आकर्षण निर्माण होत असते.

मानसशास्त्र म्हणले की वारंवार बदलणाऱ्या परिस्थितीत व्यक्तीचे वर्तन , त्याचे विचार , कृती याचे अध्ययन किंवा अभ्यास म्हणले तरी चालेल. आणि चिकित्सा करणारे शास्त्र. बदलत्या परिस्थिती मध्ये स्वभावात , वर्तनात होणारे बदल , कृती, आणि परिस्थितीला देण्यात येणारा response असेल किंवा कसे react होत असतील त्याचा अभ्यास. परिस्थिती मध्ये कशाप्रकारे समायोजन करते व्यक्ती या नुसार मांडले गेलेले काही नियम.

Freud यांच्या मते , अन्न , पाणी, झोप , लैंगिक संबंध , सेक्स या बेसिक needs आहेत. जसे भूक लागली की आपण खातो. अगदी कडकडीत भूक लागलेली व्यक्ती जे समोर असेल ते , मिळेल ते खाते, खाण्याची थोडी आवड असलेली व्यक्ती थोडा वेळ थांबते आणि त्यातल्या त्यात चांगले मिळेल ते खाते. खूपच आवड असलेली व्यक्ती मग प्रसंगी स्वतः साग्र संगीत जेवण मग अगदी जसे चटणी , लिंबू , भाजी , डाळ भात , पोळी , एखादा गोड पदार्थ , कोशिंबीर , ताक , पापड असे विविध पदार्थ असलेले ताट आवडीने आणि चवीने संपवेल.

काही लोक सारखे थोड्या थोड्या वेळाने खाणारे असतात. तर काही लोकं एकदा खाल्ले की एकदम रात्री च , तर काही एकच वेळ खाणारे ,. तर काही तीन वेळा खाणारे, यात ज्याची आवड जशी तसे खणारेन, जशी भूक तसे खाणारे असे विविध व्यक्ती असतात. तसेच आहे. सेक्स किंवा शरीर सबंध या बाबत , काही लोकांना सतत थोड्या थोड्या वेळाने पाहिजे , काही एकदा केल्यानं समाधान मानणारे , तर काही खूप विविधता आवडणारे.

आणि जेव्हा आपला जोडीदार विविधता देण्यात कमी पडतो. तेव्हा किंवा भूक जास्त असते आणि जोडीदार कमी पडतो तेव्हा ही भूक पूर्ण करण्याकरिता साहजिक च मार्ग शोधले जातात.

मग बाहेर असे जोडीदार शोधले जातात. कधी असे आवडी निवडी असलेले योगायोगाने भेटतात ही . आणि त्यांच्यात शारीरिक सबंध निर्माण होतात. पण त्यांच्या दृष्टीने नैतिक किंवा अनैतिक ही गोष्ट नसते तर आपल्या आवडी निवडी पूर्ण करणे , आपली शरीराची गरज , भूक भागविणे हा हेतू असतो . अनेकदा असे जोडीदार एकमेकांना खूप आनंद आणि समाधान देत असतात. अर्थातच ही गोष्ट दोघांच्या इच्छेने पूर्ण केली जाते.

नैतिक आणि अनैतिक या गोष्टी जसजसे समाजात काही चुकीच्या गोष्टी घडू लागल्या, खून , मारामारी , कारण आपली पत्नी आपला नवरा आपले आहेत, वारसा हक्क आपले आहेत , आपल्या मुलांचे आहेत यातून वाद , जीवघेणे प्रकार होवू लागले तेव्हा काही कायदे समाज आणि अर्थातच न्याय संस्थे ला करावे लागले.

पण आपली संस्कृती , नैतिकता , चांगुलपणा , लाज , सामाजिक नियम , बंधने , यामुळे अनेक जण आपल्या इच्छा , आकर्षण मनातल्या मनात दाबून टाकत असतात. लग्न झालेली मुले , मुली किंवा स्त्री पुरुष , यांना आपल्या जोडीदार त्याच्या मर्यादा लक्षात येतात, कधी लवकर लग्न झालेली असतात आणि तेव्हा खरेच आपल्याला काय हवे आपल्याला नंतर समजते .किंवा आपला पार्टनर आपल्याला योग्य साथ देत नाही हे नंतर समजते.

आपण सर्वात मोठी चूक ही करतो की सगळ्या गोष्टी एकाच व्यक्तीकडून आपल्याला मिळाव्यात याची अपेक्षा करतो म्हणजे प्रेम, भावनिक जवळीकता, लैगिंक सुख, पालनपोषणाची जबाबदारी, आर्थिक सपोर्ट यारख्या सगळ्या गोष्टी फक्त एकाच व्यक्तीकडून मिळायला हव्यात असं आपल्याला लहानपणापासूनच बिंबवलं जात जे की शक्य नसतं.

जेव्हा एखाद्या व्यक्तीच लग्न होत आणि त्या व्यक्तीला या सगळ्या गोष्टी एकाच व्यक्तीत मिळत नाही तेव्हा मात्र तो निराश होतो आणि याच गोष्टी ( ज्याची कमतरता वाटते) ती गोष्ट तो बाहेर शोधायला लागतो मग घरी स्वतःच्या पार्टनरकडून न मिळणार प्रेम वा लैगिंक सुख , आनंद , आपल्या इच्छा पूर्ण करण्याकरिता योग्य साथ , भावनिक जवळीकता वा आर्थिक मदत त्याला बाहेर मिळत असेल तर त्याला ते चुकीच नाही वाटतं शेवटी आपण सगळे मनुष्य आहोत. हो जरी ती पार्टनरशी केलेली प्रतारणा असली तरी त्याच्या दृष्टीने ते त्याला बरोबरच वाटतं असतं.

पण या अनैतिक संबंधात मर्यादा असतात. त्यामुळे होणारे मानसिक त्रास ही जास्त असतात. आणि त्यांना गैर वाटत नसेल तरी इतरांना ते वर्तन चुकीचे वाटते. आणि हे संबंध. एकमेकांना खरेच योग्य स्थान देवू शकत नाहीत. चोरुन , लपून छपून च या गोष्टी केल्या तरी इतरांच्या लक्षात येतात च आणि अजून सर्व परिवार , समाज आणि त्यांच्या कडून परत त्रास वेगळाच.

निखिल आणि ईशा आपल्या पार्टनर सोबत खुश नव्हते . आणि त्यातून ते एकत्र आले. त्यांनी लग्न ही केले पण त्याला समाज किंवा नातेवाईक यांची मान्यता नव्हतीच. आणि ते समाजाला माहिती नव्हते.म्हणजे त्यांच्या दोघांपूर्ते मर्यादित. सुरुवातीला दोघे खूप आनंदी , मन , भावना ही समजून घेणारे , शरीर आणि भावना यांचे केमिकल मस्त जमलेले. एकमेकांना आनंदी , शांत करणारे , समाधान देणारे. ईशा चा पार्टनर अगदीच अरसिक , आर्थिक दृष्ट्या ही स्थैर्य नसलेला .त्यामुळे ईशा नोकरी करत होती. दोन्ही बाजूने चेपलेली. एकही बाजू धड नाही. अशात निखिल चे भेटणे , बोलणे आवडले. एकमेकांना दोघे जपत होते.

पण ईशा ची नोकरी गेली आणि मग तिचे आर्थिक बाबतीत डळमळीत होणे सुरू झालं ईशा चा नवरा ही तिची जबाबदारी घेत नव्हता निखिल ही नाही. तिच्या गरजा काय कोणीच समजून घेत नव्हते अशात ईशा चे मोठे आजारपणं . यात ही दोघांपैकी कोणी तरी आधार देईल अशी अपेक्षा पण कोणीच भार उचलला नाही. ईशा तिची investment जी मुलींच्या करिता थोडीफार केली त्यामधूनच खर्च भागवत होती. छोटे मोठे काम करून थोडे फार खर्च भागत होते.

निखिलने केवळ त्यांच्या संसार , त्याची प्रगती याकरिता प्रयत्न केले. तो त्याची family सगळे आनंदात होते. आता फक्त सेक्स याकरिता ईशा आणि तो एकत्र येत त्यात ही प्रत्येक वेळी वाद होत . ईशा ला जाणवू लागले पूर्वीसारखे इतर आनंदात आपण कुठेच नसतो. निखिल चे काही अडत ही नाही . जिथे एकमेकांच्या आवडी निवडी जपत होते. नोकरी होती तेव्हा ईशा जमेल तेव्हा त्याच्या करिता काही ना काही आवडीच्या गोष्टी घेत असे. त्यालाही आवडत पण हळूहळू त्याचे शॉपिंग त्याचे तो करू लागला , त्याचे मित्र , कुटुंब यात आनंदी होता.

धार्मिक ठिकाणी , समाज इथे आपली हक्काची बायको च लागत असे. ईशा ला खूप असुरक्षित वाटू लागले . जे आपण आपले सर्वस्व दिले , कधीच कोणत्या गोष्टी ची पर्वा केली नाही. आपुलकी , प्रेम , त्याग सगळे केले. आणि मुलींकडे ही दुर्लक्ष केले. कधी घरचे काही म्हणतील , समाज याची पर्वा केली नाही पण निखिल च असे वागू शकतो . त्याला आपले असणे नसणे याने फरक पडत नाही, कोणतीच जबाबदारी घेवू शकत नाही.

चार चौघात आपण आपले नाते बायको म्हणून समोर आणू शकत नाही आणि निखिल ची कुठेच आपण priority नाही. यातून ती च मानसिक आघात सोसू शकली नाही. मूड swings , सगळ्यांपासून दूर एकटेच राहणे , काहीच आनंदाच्या गोष्ट न करणे . निखिल सोबत भांडून त्याला समजावून ही काही फरक पडले नाहीत तेव्हा मात्र ईशा सगळ्यातून अलिप्त होवून तिने तिचा आनंद छोट्या छोट्या गोष्टी मधून शोधायला सुरू केला. आवडते छंद , स्वतः ची तब्येत जपणे , त्याकरिता exercise, मुलींना वेळ देणे , ज्या गोष्टी शिकायच्या राहिल्या त्या शिकणे यातून तिची ऊर्जा मिळवू लागली.

सांगायचे तात्पर्य काय नैतिक आणि अनैतिक गोष्टी या मनावर असल्या तरी समाज , कायदा याची बंधने तोडता येत नाहीत. आणि त्याविरुद्ध वागले तर अनैतिक संबंध यातून मानसिक त्रास , समाजाची , कायद्याची भीती , आणि तो किंवा ती त्यांचें संसार सुरू असतात. मग आपले स्थांन डळमळीत असतें ती असुरक्षितता.

कोणत्याच गोष्टी करिता मदत नाही कारण शेवटी तो त्याचा संसार त्याचे खर्च बघणार हीची कोण जबाबदारी घेणार ? यातून आर्थिक पेक्षा मानसिक असुरक्षितता येते कारण जो आर्थिक गोष्टीत ही विचार करत नाही तो बाकी गोष्टी त ही सुरक्षितता देवू शकत नाही. आणि पुढे जावून यातून जर मुले झालीच तर त्यांची जबाबदारी कोण स्वीकारणार ? नाव कोण देणार ? जिथे दोघात च मतभेद , आणि अंतर असेल , जबाबदाऱ्या पार पडल्या जात नसतील तर मानसिक त्रास , चिंता , निराशा , औदासीन्य येणारच ना ??

अशाश्वती येणारच कारण तारुण्य कायम टिकणारे नाही. किंवा शरीर कायम साथ देणारे नाही. अशावेळी काय ? हे अनेक प्रश्न आहेत. पण मानसशास्त्र हे सांगते की आपल्या गरजा , तृप्ती काय आहे हे समजून घेणे महत्वाचे आणि त्यातून आपल्या वासना , गरजा या शेवटपर्यंत राहणारच. माणूस जसा शेवटपर्यंत पाणी पित असतो , भूक लागली की अन्न खातो मग जसे मिळेल तसे.

तसेच शरीर संबंध , त्याच्या गरजा पूर्ती बाबत ही आहे. त्यात नैतिक आणि अनैतिक खूप नंतर येते. कोणाला दुखावणे किंवा चुकीचे सांगणे नाही. किंवा उगीच कोणाला समाज कायदा याविरुद्ध जाण्यास प्रेरणा देणे हे सुधा नव्हें .

आपल्याला ज्या गोष्टी जमणार असतील. ज्या शेवटपर्यंत निभावता येतील . आणि समाज , कायदा , नातेवाईक यांना सांभाळून जे करता येईल ते नक्की करा. कधी कधी आपल्याच पार्टनर ला आपल्याला काय पाहिजे ते समजत नाही तेव्हा आपली गरज काय ते सांगा तरी ही पूर्ण होवूच शकत नसेल तर एक तर आपल्या इच्छा दाबून ठेवाव्या लागतात. नाही तर मग इतरांच्या दृष्टीने अनैतिक मार्ग. पण जे आपल्याला तसे वाटत नाहीत. कारण आपल्या गरजा पूर्ती आणि आनंद मिळवत असतो.

आयुष्य सुंदर आहे. आपल्या मनाचा आणि वर्तनाचा आधी अभ्यास करा.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

4 thoughts on “अनैतिक संबंधाबद्दल मानसशास्त्र काय सांगतं ??”

  1. खूपच छान,
    पण नैतिक किंवा अनैतिक संबंध यात जर तो किंवा ती आपल्या पार्टनर विषयी आपल्याला सिक्युरिटी वाटत नसेल म्हणजे तो किंवा ती आपल्याला कधीच अंतर देणार नाही तर काय करावे.?

  2. Very good article after all it’s character which is most important, but society is suffering due to misunderstanding and understanding the others.

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!