अतिबंधनात ठेवल्याने जोडीदार बाहेर प्रेम शोधायला सुरुवात करतात.
हर्षदा नंदकुमार पिंपळे
“बंधन” आयुष्यात बंधन या शब्दाला दोन्ही अर्थाने वापरले जाते.एक बंधन म्हणजे आपल्यावर असलेली बंधनं तर दुसरा अर्थ म्हणजे आपली एकमेकांची मनामनाने जुळली गेलेली बंधनं.थोडक्यात सांगायच झालं तर…. “Bonds and restrictions” या दोन्हींचा अर्थ प्रत्येकाला व्यवस्थित माहीत असेल यात काही प्रश्न नाही. तर हा बंधन शब्द दोन्ही अर्थाने आपल्या आयुष्यात वापरला जातो. आपण अनेकदा बोलताना सहज बोलतोही की “आमच एक हळवं बंधन आहे…प्रेमाच नी मायेचं…”
आणि आपण असही बोलतो की “माझ्यावर खूप बंधनं आहेत गं , मला नाही करता येणार ते”….वगैरे वगैरे गोष्टी आपल्या सर्वांच्याच ओळखीच्या आहेत. तर यातील बंधन अर्थात “restrictions” आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असतातच. परंतु वैवाहिक आयुष्यातही ही बंधनं असतात. आणि त्याचा एक वेगळाच परिणाम आपल्याला पहायला मिळतो.
एका मर्यादेपर्यंत बंधनं असणं ठीक आहे परंतु जेव्हा ही बंधनं ती मर्यादा ओलांडतात तेव्हा मात्र नकोनकोसं वाटतं.एखादी व्यक्ती जेव्हा आपल्यावर जास्तीची बंधनं टाकते तेव्हा काय वाटतं किंवा काय होतं हे कुणाला वेगळं सांगायला नकोच. अगदी असच अतिबंधनात ठेवल्याने जोडीदार बाहेर प्रेम शोधायला सुरुवात करतात…… पण हे किती खरय आणि किती नाही हे आपण पाहूयात.
खरच असं होतं का…? अतिबंधनात ठेवल्याने जोडीदार बाहेर प्रेम शोधायला सुरुवात करतात का..?
तर याचं उत्तर हो आणि नाही असं दोन्हीही आपण देऊ शकतो.
आपल्याला वाटतं की बंधनं टाकली तर आपला जोडीदार नियंत्रणात राहू शकतो.नाहीतर आपला जोडीदार असच हाताबाहेर जाईल. आणि नंतर आपल्या जोडीदाराला समजावणं आपल्याला कठीण जाईल. त्यापेक्षा आधीच त्याच्यावर बंधनं लादली तर तो नियंत्रणात राहील. परंतु हा समज खूप चुकीचा आहे.
आपण बंधनं लादतो पण ती अतिप्रमाणात लादत असतो.त्यामुळे त्या अतिरिक्त बंधनांचा नंतर त्रास होऊ लागतो.अशामुळे कोणतच बंधन हे नकोनकोस होतं.या बंधनांतून कधी एकदाच मोकळं होतय असं जोडीदाराला वाटत असतं.कारण असं एखाद्या बंधनात किती दिवस अडकून राहणार… ते बंधन म्हणजे एखाद्या पिंजऱ्यासारख वाटतं.
कुणीतरी आपल्याला त्या पिंजऱ्यात बंद करून ठेवलय असच वाटत रहातं.आणि दिवसेंदिवस घुसमट ही वाढत जाते. आणि त्या बंधनांचा हळुहळू त्रास होत जातो. बाहेर जाताना सांगून जाणे हे अगदी साध सरळ आहे. परंतु कधी कधी आपल्याकडून सांगायच राहून जातं.मग अशावेळी काय होत….तर तु मला नेहमी सांगूनच जायला हवं ,काय कुठे कधी येणार याचे सगळे डिटेल्स मला समजलेच पाहिजे.तु हे अस नाही करायच…मी सांगेन तसच करायच…, माझ्या मनाविरुद्ध एकही गोष्ट करायचा तुला काही एक अधिकार नाही… तु हे करायच नाही …तु ते करायच नाही… तु असच करायच…तसच करायच…
वगैरे वगैरे अशी अनेक प्रकारची बंधन जोडीदारावर घातली तर तो वैतागून हा बाहेरचा मार्ग शोधतो.म्हणजे कित्येकजण अगदी या बंधनांना कंटाळलेले असतात. यातून बाहेर कसं पडायच हे अनेकांना कळत नाही. त्यामुळे कित्येकजण तर असच बंधनात आयुष्य जगत असतात. आणि काही जणं मात्र सरळ सरळ बाहेरचा रस्ता निवडतात.त्या अतिरिक्त बंधनांमुळे जोडीदार”frustrate” होतो.मग अशा परिस्थितीत अनेकदा त्यांना कुणीतरी आपलस हव असतं म्हणून ते कळत नकळतपणे हा मार्ग निवडतात.
इतक्या अतिरिक्त बंधनात जगणं मुश्कील होऊन जातं. स्वतःचीच घुसमट होऊन ती व्यक्त करायला कुणीच नसतं अशा वेळी जोडीदार बाहेर प्रेम शोधताना दिसतो.तर काही जण याला अपवादही असतात. काही जणं सरळ सरळ दुर्लक्ष करून आपल्या स्वतःच्या विश्वात रमण्याचा प्रयत्न करतात.कारण अशा अतिरिक्त बंधनांमध्ये जगणं म्हणजे आयुष्याचा कोंडमारा वाटतो.
आणि असं कोंडलेल आयुष्य जगण्यापेक्षा बाहेर तो मोकळं आयुष्य जगता येईल म्हणून प्रेम शोधताना दिसतो.बाकी यात जे काही होत असेल त्याला ती अतिरिक्त बंधनांमुळे तयार झालेली मानसिकता जबाबदार असते. त्यामुळे ही बंधनं कुठेतरी कमी व्हायला हवीत जेणेकरून जोडीदार बाहेर प्रेम शोधण्याचा प्रयत्न करणार नाही.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


