Skip to content

स्त्रीची चूक माफ करून पुढे चालणारे असंख्य पुरुषही आहेत!!

स्त्रीची चूक माफ करून पुढे चालणारे असंख्य पुरुषही आहेत!!


टीम आपलं मानसशास्त्र


आजकाल परिस्थिती बदलत आहे. स्त्री आणि पुरुष यांना बरचीशी समानता मिळत आहे. सगळीकडे नाही पण बर्याच ठिकाणी.
शाळा , कॉलेज , ऑफिस येथे ही स्त्री पुरुष , मुले मुली सर्व एकत्र असतात. अभ्यासात , कधी कामात समजावून सांगणारे , मैत्रिणी ला मदत करणारे मित्र हे पुरुषच असतात. कामाच्या ठिकाणी कामात चूक झाली तर ती समजावून सांगून , समजून घेवून , कधी दुरुस्त करून काम पुढे नेणारे पुरुष च असतात.

Office , college मधुन काम , अभ्यास यातून उशिरा आल्यावर , घरी उशिरा येण्याची चूक माफ करणारे वडिल असतात . किंवा पाठीशी घालणारा भाऊ असतो. मुलींना समजून घेणारी आई ही असते. पण मोठ्या चुका हे घरातले पुरुष मंडळीच माफ करून संधी देत असतात.
आपली मुलगी पर प्रांतीय मुला बरोबर प्रेमात पडते , लग्न करू इच्छिते तेव्हा समाज आणि इतर नातेवाईक यांच्या विरोधात जावून आपल्या मुली ची पसंत , आवड आणि कदाचित तिची चूक ही माफ करून तिला खंबीर आधार देणारे समाजाविरुद्ध ढाल म्हणून उभे राहणारे वडील च असतात. भाऊ त्याचे मित्र संरक्षणासाठी च असतात .

चूक आणि बरोब्बर हे खरे तर प्रत्येकाचा बघण्याचा दृष्टीकोन असतो. काही वेळेस जी व्यक्ती चूक आहे असे समजतो ती तिच्या दृष्टीने बरोबर असते. माफ करा इथे कोणाची मने दुखावण्याचा हेतू नाही. फक्त मोकळेपणा ने विषयावर चर्चा करण्यासाठी एक गोष्ट सांगते.

ओशो यांनी ही कथा त्यांच्या शब्दात मांडली आहे. थोडी फार इकडे तिकडे होईल पण आशय आपल्या विषयाला धरून आहे. कबीर तर घरोघरी परिचित आहेत. त्यांच्या कडे येणारे कायम तृप्त पोटाने आणि मनाने जात. येतील त्यांना जेवण देत असत. एकदा असेच त्यांच्याकडे बरेच लोक येतात. कबीर सगळ्यांना जेवणास थांबण्याचा आग्रह करतात. कबीर यांच्या पत्नीस सांगण्याची गरज नसते. ती आपणहून स्वैपाक करण्याच्या तयारी ला लागत असते. ती बघते तर घरात काहीच सामान शिल्लक नसते. आधीच खूप उधारी ही झालेली असते. वाणी सामान देणारा व्यापारी मागच्या वेळी च सामान देत नव्हता ..

आता काय करावे असा विचार आला. तिच्या मनात. कबीर त्यांना ती काही सांगू शकत नव्हती कारण त्यांच्या समोर लोक बसले होते .ते उपदेश करत होते. मग ती धाडस करून व्यापाऱ्या कडे गेली. त्याला सामान मागितल्यावर तो नाहीच म्हणाला , ती खूप गयावया करू लागली .या वेळी तेवढे दे मी पुढच्या वेळी पैशाची काही तरी व्यवस्था करते. तेव्हा आधीच कबीर यांच्या पत्नीवर नजर ठेवून असलेला हा व्यापारी तिला म्हणतो की मी तुला पाहिजे ते सामान देतो पण तू त्या बदल्यात काय देणार ? तेव्हा ती म्हणते काय पाहिजे ? त्यावर तो व्यापारी म्हणतो आज रात्री तू माझ्या कडे छानसे आवरून येशील . आणि मला सुख देशील . ती बरं म्हणते. सगळे सामान घेवून घरी जाते .कबीर आणि त्यांच्या समवेत जमलेल्या सगळ्या लोकांना जेवू घालते.

संध्याकाळ नंतर मुसळधार पावूस पडू लागतो. तरी कबिरांची पत्नी छान सारखे आवरून , साज शृंगार करून तयार असतें . आणि बाहेर जायच्या तयारीत असतें . तेव्हा कबीर तिला विचारतात , इतनी रात को सज् धज के कहा जा रही हो?

तेव्हा ती त्यांच्या पासून कोणतीच गोष्ट लपवीत नाही. जी घटना घडली ते सगळे सांगते. व्यापाऱ्याला तिने दिलेला शब्द सांगते. कबीर तिला मोठ्या मनाने माफ करतात. समजून घेतात. एवढ्या भर पावसात तू कशी जाणार ? तू पूर्ण भिजून जाशील , असे म्हणून ते तिला म्हणतात मी तुला छत्री तून सांभाळून घेवून जातो . तू पूर्ण भिजून गेलीस तर ते बरे दिसणार नाही. आणि ते योग्य नाही. आणि रात्री एवढ्या पावसात , अंधारात तू कशी जाणार त्यापेक्षा मी सोबत येतो . असे म्हणून ते छत्री मध्ये आपल्या पत्नीला भिजणार नाही याची काळजी घेवून त्या व्यापारी असतो त्याच्या घराच्या दारात सोडतात. आणि तिला सांगतात. मी इथे च बाहेर या आडोशाला आहे. तुझे झाले की तू बाहेर ये. एवढ्या रात्री परत पावसातून तू एकटी कशी येणार . त्यापेक्षा मी इथेच बाहेर थांबतो.

त्यांची पत्नी जेव्हा व्यापाऱ्याच्या घराचा दरवाजा टकटक करते . दरवाजा उघडल्यावर व्यापारी आश्चर्यचकित होतो. त्याला विश्वास बसत नाही की ती खरी खरी आली. त्याला वाटले असते वेळ मारून न्यायची म्हणून ती हो म्हणाली असेल.

आणि त्याहून आश्चर्य त्याला या गोष्टीचे वाटते की एवढ्या पावसात ही ती थेंबभर भिजली नाही. तेव्हा असे कसे काय ? ती म्हणते तुम्हाला जे काही करायचे असेल ते लवकर करा. मला या भर पावसात कबीर स्वतः घेवून आले आहेत आणि ते आडोषात थांबले आहेत. मी परत कशी जाणार पावसात या काळजीने ते थांबले आहेत.

कबीर बाहेर थांबले आहेत. आणि कबीर यांच्या मनाचा मोठेपण बघितला आणि जाणविले की आपण कोणतीही अट घातली असेल तरी कबीर यांची पत्नी ते हो म्हणाली होती आणि तिने ते सांगून ही कबीर यांनी ती चुकली , काय हे केले असे कोणतेही दोष आरोप करत न बसता तिच्या काळजीपोटी स्वतः घेवून आले तिला. हे बघितल्यावर तो लटपट करू लागला. त्याची हिम्मत ही झाली नाही कबीर यांच्या पत्नी कडे बघण्याची . व्यापारी पळत पळत बाहेर गेला त्याने कबीर यांचे पाय धरले. माफी मागितली. कबीर यांनी ही त्याला माफ केले आणि तुझा दोष नाही परिस्थिती चा आहे. असे समजवून सांगितले.

सांगायचे तात्पर्य काय की कोणतीही परिस्थिती स्त्री वर कधी ही उद्भवत असते. कधी तिची चूक असेल तर कधी तिची चूक नसेल ही. कधी आपल्या शिक्षण , नोकरी संसार , मुले यांच्या करिता पुढे पावूल उचललेले असते. कधी बरोबर असते तर कधी तरी चुकते ही. पण कोणती परिस्थिती आहे हे समजून घेणे गरजेचे असते.

आजकाल स्त्री स्वातंत्र्य या नावाखाली अनेक स्त्रिया नवऱ्याच्या पैशावर , जीवावर ऐश करत असतात. त्यांना पाहिजे तसे वागत असतात. कपडे खरेदी , बाहेर फिरणे , मित्र मैत्रिणी यांच्या समवेत बाहेर जाणे ,. खाणे पिणे .कशावरही कंट्रोल नसतो. विचार नसतो. आपण नसलो तर घरचे खाण्या पिण्याची काय सोय करतील हे विचार नसतात. नुसते स्वतः सुंदर दिसणे .त्याकरिता खर्च करणे याकडे लक्ष.

स्वतः वर चांगले संस्कार नसतात .देवाचे करणे म्हणजे काय तर संस्कृत उच्चार जीभ वळत असतें . त्यातून निघणारे ध्वनी , नाद शांतता पसरवीत असतात. पाठांतर , पठण यातून एकाग्रता वाढवीत असतात . स्वतः आईच जर हे करत नसेल तर मुलांकडे दुर्लक्ष होणारच ना ?? तरी ही पुरुष सांभाळून घेतात. स्त्रीची चूक तिथेच सोडून पुढे जात असतात.

अनेक स्त्रिया धड कशातच लक्ष नसते. स्वैपाक उर्कायचा म्हणून उरकून कसा बसा करून मोकळे व्हायचे . मलाच करायला लागते . मीच का असे रडत खडत करत असतात. कधी मीठ कमी , तर कधी चव च नसते. तरी ही पुरुष या चुका माफ करतात , दुर्लक्ष करतात कारण त्यांना बाहेरच्या खाण्या पेक्षा घरचे सात्विक खाणे आवडत असते. बाहेरचे तेलकट , तिखट , मसालेदार अन्न खाण्यापेक्षा घरचे खाणे पसंत करतात. आणि मग छोट्या छोट्या चुका स्त्रियांच्या माफ करतात. समजून घेतात. आणि पुढे जात असतात. उद्या काही तरी बदल घडेल या आशेवर.

तर कधी स्त्रिया सतत तुलना करणाऱ्या असतात. त्यादुसऱ्या स्त्री कडे बुध्दी , तिचे शिक्षण याची तुलना नसते कधी याउलट तिच्याकडे हे आहे ते आहे , दागिने , साड्या , वस्तू , भांडी , घर. याच वस्तू मध्ये बहुदा त्या अडकून आपल्या कडे जे नाही त्याचा पाढा सतत पुरुषानं पुढे वाचत असतात. सतत तक्रारीचे सुर असतात. त्यावरून वाद , रुसवा फुग्वा असतो तरी पुरुष या चुका दुर्लक्षित करून तिला खुश ठेवण्यासाठी शक्य असेल त्या वस्तू , घर, साड्या जे शक्य असेल ते घेत असतो. आणि जर त्याच्या capacity मध्ये नसेलच तर शांत राहुन सगळे सहन करत असतो. अजून धडपड करून पैशाची जुळवाजुळव करत असतो. पण ती चुकीची आहे, तिचे विचार , निर्णय चुकीचे असे म्हणून तिला दोष देत नाही तर तिला माफ करून पुढे जात असतो.

बहुदा स्त्रियांना समजून घेणारे पुरुष च असतात. शाळा , कॉलेज , ऑफिस असो घर असो. पुरुष मदत करणारे आणि चुका माफ करून पुढे जाणारे असतात. याउलट स्त्री असेल तर ती दुसऱ्या स्त्री ला आपली प्रतिस्पर्धी समजत असते. तिच्याकडे सौंदर्य असेल , हुशारी असेल , वस्तू असतील , टापटीप असेल , पती समजून घेणारा , कौतुक करणारा असेल तर याचे कौतुक राहिले बाजूला ती जळफळाट करत असते. कारण त्या गोष्टी तिच्याकडे नसतात.

याउलट पुरुष कधीच दुसऱ्या पुरुषावर जळफळाट करत नाही. उलट इतर पुरुष असतील , स्त्रिया त्यांना समजून घेवून मदत करण्याचा प्रयत्न करतात.नाही तर आपण भले आपले काम भले असे असतात.

आयुष्य सुंदर आहे. स्त्रीची चूक माफ करून पुढे चालणारे असंख्य पुरुषही आहेत!!आणि ते खरेच स्त्रीचा सन्मान करत असतात. प्रेम करत असतात. मान देत असतात. कारण प्रत्येक वेळी तेही लक्षात ठेवतात आपल्याला नवू महिने पोटात सांभाळणारी , जपणारी आणि कळा सोसून जन्म देणारी आपली आई ही एक स्त्री च आहे. आणि आपल्या मुलांना जन्म देणारी आपली पत्नी ही एक स्त्री च आहे. त्यामुळे आई काय किंवा इतर कोणतीही स्त्री तिच्याविषयी नक्कीच आदर असतो. स्त्रीच्या शारीरिक रचना ज्या आहेत त्या थोड्या नाजूक प्रकारच्या असल्याने तिची काळजी असते. तिला जपत असतात.समजून घेवून पुढे जात असतात.

मुळात पुरुष हा जरी भावनिक असला तरी त्याला रडत बसण्याची मान्यता समाजानं दिली नाही . त्यामुळे प्रसंगी पुरुषाला खंबीरपणे उभे राहावे लागतेच. स्वतः स्वतचा आधार आणि घरातली आई, स्त्री , पत्नी असो बहीण असो ,किंवा मुलगा ही असो . तर कधी पिता ही असो असो त्यांचा खंबीर आधार बनावे लागते.

व्यवहारी जगात खंबीर राहून व्यवहारीक बनावे लागते. आजकाल परिस्थिती ने कधी नवऱ्याचे , वडिलांचे अकाली निधन , घटस्फोट , वाद , पटत नाही यातून स्त्रिया ही कणखर बनत आहेत. व्यवहारी बनत आहेत. पण ते प्रमाण खूप कमी आहे.आणि आता स्त्री जशी बाहेर पडू लागली तशी दुसऱ्या स्त्रिया ना ही बऱ्यापैकी समजून घेवून पुढे जावू लागली आहे.

स्त्रीची चूक माफ करून पुढे चालणारे असंख्य पुरुषही आहेत!! पण बरेचदा समाज असे म्हणायला ही कमी करत नाही की त्याच्यातच काही तरी कमी असेल , त्याच्यातच हिम्मत नसेल ,म्हणून स्त्री ची चूक माफ करून पुढे जातो. असे म्हणणारे ही लोक आहेत.

एक खरी घटना सांगते. नवरा इंजिनिअर असून काही करत नाही. बायको नोकरी करून, घरचे सांभाळून , दोन छोट्या मुली त्यांची काळजी , त्यांचे शिक्षण करत होती. पुरुष असून नवरा घरी बसून पण मुलींची ही काळजी घेत नव्हता. सतत दारू पीवून तेही बायकोच्या जीवावर.
आणि परत बायको काही म्हणली की तीच्य शी भांडणे . वाद ..मारामारी. खूप वैतागली होती त्यातून तिच्या ऑफिस मधल्या एका पुरुष सहकारी होता त्याचा आधार मिळू लागला सुरुवातीला भावनिक , नंतर शारीरिक ही . पण त्याने ही हीचा गैर फायदा घेतला. आणि तिच्याकडून सगळे फायदे घेवून तिला शरीर आणि पैसा या दोन्हीकडून लुबाडले.

तिने हे सगळे नवऱ्याला सांगितले त्याने तिची ही चूक माफ ही केली आणि ते आजही एकत्र आहेत. अर्थात काही अंशी त्याची ही चूक होती. पण तिची जास्त कारण स्वतः वरचा कंट्रोल कोणत्याही परिस्थिती मध्ये ढळू देवू नये. पण त्याने ही तिला माफ केले. एकत्र राहतात. मुलींना त्रास होवू नये. त्यांच्यावर परिणाम होवू नये. म्हणून त्याने ही तिची चूक माफ करून संसार तसाच पुढे चालू ठेवला आहे.

जसे स्त्री ची चूक माफ करून पुढे चालणारे असंख्य पुरुषही आहेत!!तसेच अनेक स्त्रिया ही आहेत. आणि सुरुवातीला जरी त्रास करून घेतला असेल , दिला असेल तरी नाते नेटाने जपणाऱ्या स्त्री या खरेच आहेत.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “स्त्रीची चूक माफ करून पुढे चालणारे असंख्य पुरुषही आहेत!!”

  1. Darudya engineer la bayko la maaf karna shivay tyachya kade kahi paryaay hota ka ?????? Fukat chi daaru pyayla bayko shivay kon paise DENAAR yacha maar kon khanaar ???????

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!