शरीरसंबंध व्यवस्थित न होण्याचे मानसशास्त्रीय कारणे काय ??
टीम आपलं मानसशास्त्र
मानसशास्त्र म्हणले की , मन आणि वर्तन याचे शास्त्र . आता यात फक्त मन येते का ? शरीराला वेदना झाली ? तर मनाला ही वेदना होतेच ना !! चालता चालता काटा टोचला पायात तर पायाला दुखापत होतेच पण पुढे पाय नीट टेकवला जात नाही. आणि पुढे चालण्यास त्रास होतो . मग आपल्याच मनाला ही त्रास होतो की आपण एव्हढे अंतर ही चालू शकत नाही. ही हतबलता येते.
तसेच आहे शरीर आणि मन हे दोन्ही एकमेकांशी निगडित आहेत. शरीरसंबंध व्यवस्थित न होण्याची काही मानसशास्त्रीय कारणे बघू :
१. पूर्व अनुभव ..past experience :
शरीर संबंध करत असताना पूर्वीचे असे काही त्रासदायक अनुभव असतात. की एखादी गोष्ट मनासारखी घडत नाही. शरीर एकत्र येताना , मिलन होताना तो एक सुखद अनुभव असावा असे वाटत असतें. स्त्रिया या बाबत एकदम खूप भावनिक असतात. आणि काही अपेक्षा ठेवून असतात. त्यांचे मन आधी उत्साही , प्रफुल्लित असेल तर शरीर ही तसे छान साथ देते.
पण स्त्री चे मन , भावना , तिची नाजुक्तता , तिची इच्छा लक्षात न घेताच जर तिच्यावर जबरदस्ती केली किंवा तिला फुलवत न जाता कसे बसे एखादे काम उर्कायचे म्हणून तसे प्रयत्न केले तर ते तिच्या मनावर परिणाम करतात आणि पुढे ही जेव्हा शरीर संबंध करण्याची वेळ येते तेव्हा हे पूर्वानुभव डोळ्यापुढे येतात आणि त्याकरिता मन आणि शरीर दोन्ही साथ देत नाही.
२. भीती :
आज काल सोशल मीडिया वरून काही अर्धवट माहिती मिळत असतें , तसे काही बघून काही नवीन करण्याची इच्छा होते किंवा मग कोणी काही अनुभव सांगितले तर ते तसे करावे असे वाटते. आणि बरेचदा असे व्हिडिओज बघितले तरी ते तसेच नसतात त्यात काही एडिट करून ते व्हिडिओज केले जातात. ते खरे धरून काही नवीन करण्याची भीती असतेच आणि असे काही तरी जमेल का म्हणून ही भीती. किंवा तसे एकदा जमले नाही म्हणून जोडीदाराचे वर्तन चिडचिड , किंवा उलट परत परत प्रयत्न करण्याविषयी होते आणि त्यातून मनात एक भीती निर्माण होते ..
३. शारीरिक मर्यादा , इजा :
काही वेळेस शारीरिक त्रासदायक अनुभव , शारीरिक दुखापत , इजा होते आणि तो त्रास आठवला तरी ही शरीर आणि मन दोन्ही तयार होत नाही. वजन खूप वाढले असेल , इतर काही आजार असतील , तरी ही शरीरावर मर्यादा येतात. आणि आपल्या मनातून आपले शरीर जाड च आहे आपण हे करू शकत नाही ते करू शकत नाही असे विचार मनात येत असतात आणि आपणच आपल्या मनावर आणि शरीरावर limitations घालत असतो.
४. पेहराव आकर्षण , शारीरिक आकर्षण :
पूर्वी जो साज शृंगार हा शब्द सर्व परिचित होता तसे आकर्षक दिसण्या करिता व्यवस्थित राहणे असेल , आकर्षक पेहराव असेल याकडे लक्ष देत नसेल . कधी तरी सुंदर दिसणे , राहणे , आकर्षक पेहराव ही एकमेकांना आकर्षित करत असतो . आणि जवळीक वाढवत असतो. पण रोजच असेच अवतारात , असेच अगदी दमून थकून घामेजलेले असतील तर .. रोजचे असेच होत असेल तरी ही मन साथ देत नाही.
५. तोचतोचपणा :
शरीर अथवा मन जवळ येताना तोच तोचपणा असेल तरी ही त्यातला इंटरेस्ट कमी होत असतो . आणि जरी सुरुवातीला उत्साही असतील की काही तरी नावीन्य नसेल आणि तोच अनुभव आला तरी ही सुरुवातीला उत्साही असणारे मन नंतर साथ देत नाही.
६. दोघांच्यात ले सततचे वाद :
मतभेद , भांडणे कधी कधी मारहाण याचा परिणाम मनावर होवून शरीर आणि मन यांचा दुरावा येतो. कारण मनावरचा परिणाम ब्रेन मध्ये साठून राहत असतो . नकारात्मक घटना ब्रेन शी connect होत असतात आणि ब्रेन आपल्या शरीराला ही साथ देत नाही .
७. जागा :
जागा पुरेशी नसेल , एकमेकांना privacy नसेल , सगळे एकत्र असतील, मुले , वडीलधारी . तर मोकळेपणा नसतो. त्यांना काय वाटेल ? मुलांना समजले तर ही भीती असतेच . शिवाय यातून पुरेसा वेळ ही देवू शकत नसतील तर मनावर परिणाम होतोच. किंवा बंदिस्त जागा , वातावरण प्रसन्न नसेल तरी ही त्याचा परिणाम मनावर होत असतो.
८. शारीरिक कमतरता :
कोनामध्ये ही शारीरिक उणिवा , कमतरता असतील तर ते अनुभव मनावर कोरले जातात आणि त्यातून शरीर संबंध याकरिता मन साथ देत नाही.
९. जोडीदाराला आवड नसणे : एखाद्याला खरेच या गोष्टीची आवड नसते .त्यामुळे ही मन साथ देत नाही.
१० .एखाद्याची गरज , भूक. जास्त तसे.. ;
एखाद्याने किती ही खाल्ले तरी त्याला अजून भूक असते. किंवा परत परत खाण्याकडे आकर्षित होत असतो .परंतु तसे जोडीदाराची गरज नसेल तर जोडीदाराला सारखे असेच वाटत राहते याशिवाय दुसरे काही सुचत नाही . असे म्हणून दुर्लक्ष ही केले जाईल. किंवा. जोडीदार त्या दुसऱ्या जोडीदाराची गरज , भूक लक्षात घेणार नाही.
११. ऑफिस , घरकाम , व्यवसाय , मुले , आर्थिक गोष्टी , कर्ज यांचा ताण तणाव , अती विचार , स्ट्रेस , धावपळ याचा शरीर आणि मन दोन्हीवर परिणाम होत असतो
१२. अपुरी झोप :
दिवसभराच्या शारीरिक , मानसिक कष्ट यानंतर थकल्यावर , दमणूक झाल्यावर झोपेची नितांत गरज असते. पण दुसऱ्या करिता जरी प्रयत्नपूर्वक साथ देण्याचा प्रयत्न केला तरी ही , थकवा ,अपुरी झोप ही मनाला फ्रेश ठेवत नाही. सतत डोक्यात मला झोपायचे आहे .झोप हवी या विचाराने लक्ष विचलित होते.
१३. शरीर संबंधात काही गोष्टींनी व्यत्यय आला, फोन असेल, कोणी आले , : तरी ही परत मन परत ती गोष्ट करण्याकडे तयार होत नाही.
१४. संस्कृती , संस्कार , समाज याची भीती : काही वेळेस बाहेर कुठे गेलो मोकळेपणा मिळण्याकरिता तरी संस्कार , समाज याच्या काही मर्यादा असतात त्यातून एक घर सोडून बाहेर सध्या एव्हढे काही घडत असतें .hidden camera किंवा इतर ही फसवणूक अशा गोष्टींचा परिणाम मनावर होत असतो
१५. अहंकार :
एकमेकांना समजून न घेता मी श्रेष्ठ अशी भावना प्रत्येकवेळी येत असेल. माझ्या वाचून अडते ही भावना असेल . किंवा पुरुषी अहंकार असेल किंवा स्त्री चा ही . गरजेपुरते समजून घेणे असेल आणि जवळीकता असेल तर एकमेकांना समजून घेणे ही दुरावते. अहंकारात चांगल्या गोष्टीकडे दुर्लक्ष होते. प्रत्येकवेळी मीच का पुढाकार घ्यायचा ?हा सुधा अहंकार च . त्यातून अडथळे जास्त येतात.
१६. जोडीदार व्यसनी असेल किंवा बाहेर चुकून काही प्रेम प्रकरण असेल :
जोडीदार दारू , सिगारेट किंवा इतर गोष्टी करिता व्यसनी असेल तरी त्याचा परिणाम मनावर आणि शरीरावर होत असतो. तर बाहेर कोणाचे काही असेल तर डोक्यात ती भावना असते. तुलना ही होत असते त्यामुळे मन तयार होत नाही. किंवा जोडीदाराला प्रेम प्रकरणाची माहिती असेल तर जोडीदार मानसिक दृष्ट्या अलिप्त होतोच तीच अलिप्तता शारीरिकदृष्ट्या ही येते. चुकला असेल जोडीदार म्हणून माफ करण्याची क्षमता नसते. आणि पुढं जाण्याची तयारी नसते.
१७. मोकळेपणा नसतो . संवाद नसतो :
एकमेकांना काय पाहिजे आहे. गरज काय आहे. अपेक्षा काय आहेत हे बोलून सांगून मोकळेपणा निर्माण होत नाही त्यामुळे मन आणि शरीर ही तशी मोकळेपणाने साथ देत नाही.
१८. Harmonal changes :
स्त्री मधील मॉनोपोज यामुळे काही वेळेस शरीरावर बंधने येतात. आणि स्त्री मधील मॉनोपोज म्हणजे तिचे स्त्रीत्व संपणार यासारखे गैरसमज , काही भावना त्रासदायक ठरत असतात. त्यामुळे आपण शरीर संबंध ठेवण्यास असमर्थ आहोत हे चुकीचे विचार , गैरसमज डोक्यात पक्के होतात. Periods मध्ये ही शरीरातले होणारे बदल हे मन स्वीकारत नाही त्यामुळे त्यावेळी करण्याची मानसिकता नसते. बाळंतपण यातून शरीराच्या मर्यादा , काही अज्ञान, मोठ्यांचे चुकीचे सांगणे यातून मन साथ देत नाही शरीराला .
शरीरसंबंध व्यवस्थित न होण्याचे मानसशास्त्रीय कारणे काय ? तर हे प्रत्येकाच्या अपेक्षा , अनुभव , मर्यादा , आजूबाजूचे वातावरण , आवड निवड , शरीर निरोगी , मन निरोगी, असेल तर, गरज ही गोष्ट ही महत्वाची . आणि समजून घेवून समजून देणारी साथ ही महत्वाची. शरीर ही निरोगी किंवा याउलट शरीर निरोगी तर मन ही निरोगी राहते.
शरीरसंबंध व्यवस्थित न होण्याचे मानसशास्त्रीय कारणे काय ?
तर एकमेकांबद्दल प्रेम , आपुलकी , ओढ , आकर्षण, विश्वास टिकवून ठेवू शकत नाहीत. याचा अभाव असतो. इगो महत्वाचा असतो. किंवा एकमेकांची आवड , गरज समजून घेवून साथ देण्याची मनाची तयारी नसते.
आयुष्य सुंदर आहे. छोट्या त्रास , घटनांचा मनावर परिणाम होवू न देता. समस्येवर मार्गच नाहीत म्हणून हतबल होण्यापेक्षा मार्ग शोधत रहा.मोकळेपणा ठेवा. संवाद साधा.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


