विवाहित जोडप्यांना १० वर्षानंतर जोडीदार बदलण्याचा ऑप्शन दिला तर काय होईल बघा.
टीम आपलं मानसशास्त्र
दोन भिन्न लिंगी व्यक्ती जरी विवाहाने एकरूप झाल्या. मग love असो किंवा arranged . दोन भिन्न व्यक्तिमत्त्व एकत्र येतात , कधी विचार पटतात , कधी नाही पटत. कधी आर्थिक चढ उतार , कधी नोकरी , व्यवसायात ले चढ उतार असतात.
सुरुवातीला सगळे गोडी गुलाबी मध्ये सुरू असतें. सतत गोडी गुलाबी टिकविणे हळूहळू कठीण जाते . मग कुठे तरी आनंद हरवला जातो.
प्रत्येकाची रूटीन यातून एकमेकांना वेळ कमी दिला जातो. संवाद कमी होतात. एकमेकांना समजून घेण्याची क्षमता कमी होते.
काही तडजोडी या कराव्याच लागतात. तर काही जोडपी खरेच खूप नशीबवान असतात.एकमेकांना समजून घेणारी असतात.त्यांच्यात उगीच वाद नसतात. आवडी निवडी जपतात. काळजी घेतात. काही कुटुंबे अतिशय आदर्श ही मानली जातात. आणि तशी ती असतात.
ज्या जोडप्या मध्ये पहिल्या दिवसापासून च काही कुरबुर नसते .त्यांच्या मधले ट्युनिंग चांगले जमले असते . त्यांना एक वर्ष असो अनेक तरी आपला हाच जोडीदार पाहिजे असे होते. तर काही जोडप्यांना सतत कुरबुर करण्याची सवय असते.
एकमेकांचे चांगले गुण दिसत नाहीत. पण सतत एकमेकांचे उणे धुणे काढणे सुरू असते. काही वेळेस एकमेकांच्या मधले दोष च दिसत असतात. हे नाही ते नाहीं.हे पाहिजे होते ते पाहिजे होते. आवडी निवडी भिन्न असतात. कधी एक अतिशय भावनिक तर एक अतिशय प्रॅक्टिकल असतो. काही वेळेस सेक्स बाबत ही एक उत्साही तर एक उदासीन असतो. त्यामुळे पाहिजे तसा आनंद मिळू शकत नाही .
विवाहित जोडप्यांना १० वर्षानंतर जोडीदार बदलण्याचा ऑप्शन दिला तर काय होईल बघा.
१. येरे माझ्या मागल्या कण्या भाकरी चांगल्या अशी अवस्था होईल : बरेचदा लग्नानंतर काही वर्षात जोडीदार एकमेकांना गृहीत धरून जात असतात. जसे नवरा निश्चिंत असतो आता कपडे धुतले जाणारच. इस्त्री करून आणले जाणारच. किंवा घरात आपल्या आईवडिलांची काळजी बायको घेणारच. महिन्याचे खर्च न सांगता नवरा भागवत असतो.
नवीन जोडीदारासोबत या गोष्टी करताना पुनश्च हरि ओम ..करावे लागते. आणि काही वेळेस ते नवीन जोडीदारांना जमत नाही. ते गृहीत धरलेल्या गोष्टी झाल्या नाहीत की परत चिडचिड होत राहते. कधी विकोपचे वाद ही. आणि त्यात बायको जर काम करणारी तर तिच्या ऑफिस वेळा यातून घरी वेळ देणे .मीच का करणे अशा गोष्टीतून वाद होणे स्वाभाविक असते.
काही वेळेस जे आपल्या जोडीदार , त्याच्या सवयी यांना कंटाळले असतील ते उत्साहाने नवीन जोडीदार मिळणार त्याची स्वप्ने बघेल पण प्रत्यक्षात जेव्हा संसार सुरू होईल तेव्हा ज्या अपेक्षा केल्या असतात त्या , किंवा बघितलेली स्वप्ने ही खोटी ठरतात. नवीन जोडीदाराशी परत पहिल्या पासून जुळवून घेताना जसा शिक्षणाचा श्रीगणेशा तशीच अवस्था होते.
अगदी पारखून , ठरवून जरी नवीन जोडीदार निवडला तरी सुधा प्रत्यक्षात काही वेगळेच होते. आधीचा जोडीदार निदान काही असेल तरी समजून घेत होता. आणि जरी नसेल पटत तरी एकमेकांची स्पेस एकमेकांना दिली होती .त्या एका ठाम निर्णयावर आणि मग आधीच्या जोडीदार बरा होता अशी अवस्था होईल.
२. अहंकार जपले जातात . जेव्हा दहा वर्षानंतर जोडीदार निवडीचा ऑप्शन दिला जातो तेव्हा अर्थातच दोघांच्या ही खूप काही अपेक्षा असतात एकमेकांपासून . पण मी आधी जोडीदार समवेत adjust केले होते आता मी का करू .. मला हा नवीन chance मिळाला आहे माझ्या मनाप्रमाणे वागण्याचा.मग मी माझ्या आवडी निवडी , सवयी जपणार .परत नवीन जोडीदाराच्या सवयी का जपू ..असा अहंकार नक्कीच बाहेर येतो आणि एकमेकांशी समायोजन होणे अवघड जाते.
३. शरीर संकोच .. किंवा मग मर्यादा.. दहा वर्ष एकच पार्टनर त्याच्या सोबत जे काही असेल त्यात शरीर संकोच मिटलेला असतो.
आणि जर पहिल्या जोडीदारासोबत शारीरिक संबंध चांगले असतील आणि इतर गोष्टी उण्या असतील तरी एक सुख आनंद आणि समाधान आयुष्यात असते.
याउलट दहा वर्षानंतर निवडलेल्या जोडीदारासोबत परत शरीर संबंध यात काही वेळेस मर्यादा ही येतात. संकोच ही निर्माण होतो. बहुतेक वेळी बऱ्याच स्त्रिया तर काही पुरुष ही गोष्ट दुसऱ्या कोणाशी करण्यास सहजा सहजी तयार होत नाहीत ..तिची ती मानसिकता नसते. त्याची ही नसते. त्यामुळे पुरुष किंवा स्त्री जरी नवीन उत्साहाने .किंवा त्याच्यात मुळातच आवड असेल आणि त्या आवडी तून जवळ आला/ आली , त्याला त्याची खूपच जास्त आवड असेल ..त्याला /तिला सतत ते पाहिजे असेल तर नक्कीच परत दोघांची नाती बिनास्तात. आणि परत त्या शरीर मर्यादा आणि नात्यातल्या ही मर्यादा निर्माण होतात.
४. Comparision : आधीचा जोडीदार आणि आताचा नवीन जोडीदार यात मनात सतत comparison सुरु होते आणि मनाची दोलायमान अवस्था होते. सतत आधीचे आणि आताचे जोडीदार यांचे विचार असोत , राहणीमान असो , सेक्स असो , व्यवसाय , नोकरी , हुशारी , बुद्धिमत्ता , अनुभव , personality यांची comparision सुरू होते.
आणि आपण बरेचदा present मधले जगणे सोडून past मध्ये च जगत असतो.त्यामुळे present मधला आपला आणि नवीन जोडीदाराचा आनंद ही गमावतो.
५. तर काही वेळेस खरेच हा बदल पाहिजे असे होते .कारण लग्न जुळविताना बरेचदा आपली मानसिकता वेगळी असते. बरेचदा आपले निर्णय आपल्या घरातले वडीलधारी घेतात . आणि आपल्याला समाज , कायदा , नातेवाईक यांच्या बंधनात अडकल्या सारखे होते. तेव्हा आपल्याला कसा पार्टनर पाहिजे हे आपल्यालाच माहिती नसते. त्यामुळे मोठ्यांचे ऐकून , किंवा बाह्य सौंदर्य .. वरवरच्या गोष्टी पडताळून , शिक्षण आहे का हे बघून निर्णय घेतला जातो.
परंतु बरेचदा लग्नानंतर समजते की आपल्याला जसे वाटले होते तसा आपला पार्टनर नाही. त्यामुळं खरेच विवाहित जोडप्यांना १० वर्षानंतर जोडीदार बदलण्याचा ऑप्शन दिला तर काही जोडपी आनंदाने त्याचा स्वीकार करतील . मारून मुटकून जगण्यापेक्षा आपल्याला अपेक्षित , साजेसा असा , आवडी निवडी मिळत्या जुळत्या असणारा , आधी बोलून , भेटून एकमेकांना शारीरिक गोष्टी मधले आकर्षण , भावनिक दृष्ट्या जुळते का ? शैक्षणिक पातळी आणि काही ध्येय असलेली.आर्थिक सक्षम, स्वैपाक , खाण्याची आवड , एकमेकांना करून घालण्याची आवड , वेगवेल्या गोष्टी try करण्याची इच्छा . असे जोडीदार समजून घेवून पुढे येतील आणि खरेच आनंदी ही राहतील.
६. लग्नानंतर दहा वर्षांनी जर ऑप्शन दिला तर दहा वर्षात ज्यांची मुले आहेत ,त्या मुलांचे वय , कळते असतील तर आई वडील च बदलणार हा बदल मुले कशी स्वीकारणार ? बरेचदा. ती accept करत नाहीत. त्यांच्यावरचे संस्कार तसे नसतात. आणि मुले यातून नवीन आई किंवा वडील जे असतील यांच्या पासून दुरावतात .त्यांच्या विषयी नकारात्मक विचार कायम राहतात. आणि आपली आई बाबा यांना आपल्यापासून दूर केले म्हणून त्या नवीन पालक जे असतील त्यांच्या विषयी राग , द्वेष यांची भावना निर्माण होते.
७ . जसे मुलांची प्रतिक्रिया तशीच वडीलधारी आणि समाज , नातेवाईक यांची ही अनेकदा नकारात्मक प्रतिक्रिया होते. पण खरेच जर आपल्या नात्यातली जवळची मुलगी किंवा मुलगा यांचा संसार त्रासदायक असेल , कोणी एक मानसिक , शारीरिक छळ करणारे असेल तरी यातून त्यांची सुटका व्हावी असे वडीलधारी मंडळी आणि नातेवाईक , समाज यांनाही वाटत असते. आणि त्यावर ते खुश होतात.आनंदी होतात . सुटले एकदाचे जाचातून अशी ही प्रतिक्रिया होते.
विवाहित जोडप्यांना १० वर्षानंतर जोडीदार बदलण्याचा ऑप्शन दिला तरी ही एकमेकांना सांभाळून घ्यावेच लागते. प्रसंगी तडजोड ही करावी लागतेच.
पण जसे फायदे आहेत तसे नक्कीच तोटे ही आहेत. आयुष्य सुंदर आहे. पण परिपूर्ण असा कोणीच नाही. कुठे तरी उंनिस बिस असणारच. प्रत्येकात काही गुण आणि दोष असणारच. आणि जोपर्यंत आपण तन आणि मन याने एकत्र येत नाही तोवर आपल्याला दुरून डोंगर साजरे च वाटणार. त्यात आकर्षण वाटणार. आपल्याला ही असा जोडीदार पाहिजे होता ही तुलना होत राहणार . पण विचार , संस्कार आणि शिक्षण , आवडीनिवडी यात फारच तफावत असेल .आणि रोजची कटकट होत असेल , विकोपाचे वाद , भांडणे होत असतील तर नक्कीच वाटते कशाला याला / हिला हो म्हणले त्यापेक्षा खरेच असा जोडीदार बदली चा ऑप्शन पाहिजे होता.असे विचार मनात येत राहतात.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!



मुळात मानवी आयुष्यात जर तर ला काही स्थान नाही. विवाह किंवा त्यानंतरचे नाते हा विषय जर तरच्या कक्षेत येऊच शकत नाही.. आपण भारतासारख्या देशात राहतो हा काही युरोप नाही जिथे नात्यांच्या बाबतीत वरील प्रसंग वारंवार घडतात. विवाह झाल्यानंतर भारतीय समाजात तो शक्यतो टिकविण्याकडे कल बघावयास मिळतो.
काय आहे हा सगळं पैश्या चा माज आहे जसे जिभेचे चोचले पुरवतात तसे शरीराचे चोचले पुरवण्यााठी आजच्या तरुण पिढीला असेल पर्याय पाहिजे……..