लेखक,
नितेश राऊत
काही वर्षापुर्वी वारंवार बैंकेत जाणे व्हायचे. काचाआड असलेला कैशियरचा चेहरा चांगलाच ओळखीचा झाला होता. तरुण कैशियर शांतपणे काम करणारा आणी सोज्वळ होता.
एके दिवशी त्या काचाआडचा चेहरा बदलला. आता त्या ठिकाणी निव्रुत्तीच्या जवळपास आल्यासारखे वाटत असलेले एक वयस्कर ग्रुहस्थ दिसायला लागले, प्रचंड गंभिर चेहरा आणी त्यावर नेहमी तणावग्रस्त भाव. छोटीशी ओव्हर रायटींग जरी दिसली तरी ते चेक अंगावर भीरकावुन दील्यासारखे करायचे.
एकदा त्यांना सहजच वीचारले,
एकदा त्यांना सहजच वीचारले,
” सर ते अगोदरचे कैशियर कुठे गेले? ”
सर वस्सकन खेकसले,
सर वस्सकन खेकसले,
” ही चौकशीची खीडकी नाहिये, काम पुर्ण करा आणी नीघा.. गोष्टी करत बसायला माझ्याकडे वेळ नाही “
मी रपकन थोबाडीत बसल्यासारखा चेहरा करुन आजुबाजुला पाहीले, रांगेतले इतर कस्टमर चेहऱ्यावर सहानुभूतिचे भाव आणून माझ्याकडे बघत होते.. कसाबसा दाटुन आलेला आवंढा गीळत मी बैंकेतुन बाहेर आलो.
पुढल्यावेळी जेंव्हा बैंकैत गेलो, काम पुर्ण झाल्यावर मी त्याच डेंजर कैशियरला हसुन ‘धन्यवाद सर’ म्हटले . त्यांनी माझ्याकडे न बघता ” हुं ” असा खरखरता आवाज बाहेर काढला..
मग प्रत्येक वेळी काम संपल्यावर मी त्यांना हसुन कधी थैंक्यु कधी धन्यवाद म्हणु लागलो. चारपाचदा असे झाल्यावर त्यांच्या वागणुकीत बदल व्हायला लागला. ते सुद्धा हसुन थैंक्युचे उत्तर द्यायला लागले.
एकदा त्यांनी मला आवर्जुन सांगीतले,
“अगोदरचे कैशियर हे नागपुरला बदलुन गेले आहेत काही काम असेल तर माझ्याकडे मोबाईल नंबर आहे.”

मी स्मित करुन बोललो,
” असं विशेष काही नाही, बस त्यांना थैंक्यु म्हणायचे होते. ”
हे ऐकुन काचाआडचे डेंजर कैशियर खळखळुन हसायला लागले…
मी पहिल्यांदा त्यांना एवढे दिलखुलासपणे हसतांना पाहात होतो..
मी सुद्धा नकळत त्यांच्या हास्याच्या गडगडाटात शामिल झालो..

‘आपलं मानसशास्त्र’ या अधिकृत फेसबुक समूहाला भेट द्या आणि सामील व्हा !
https://www.facebook.com/groups/aapall.manasshastra
लेख कसा वाटला, हे खाली ‘Comment’ करून जरूर कळवा !
“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”