Skip to content

पत्नीची सकाळ आनंदीमय करायची असेल तर आदल्या रात्री हे करून पहा.

पत्नीची सकाळ आनंदीमय करायची असेल तर आदल्या रात्री हे करून पहा.


टीम आपलं मानसशास्त्र


पती -पत्नीचे नाते प्रेम, समर्पण आणि विश्वास, ओढ , आपुलकी , काळजी , एकमेकांची कायम साथ , प्रसंगी खंबीर आधार यावर अवलंबून असते. जेव्हा एखादा मुलगा आणि मुलगी वैवाहिक जीवनात प्रवेश करतात तेव्हा सुरुवातीला दोघांमध्ये सर्वकाही व्यवस्थित होते. दोघेही एकमेकांना समजून घेतात. एकमेकांच्या आवडी निवडींची काळजी घेणे. एकमेकांचा आनंद कशात आहे हे समजून घेणे , पण कालांतराने काही गोष्टी नात्यात हरवू लागतात. अशा परिस्थितीत समजूतदारपणा आवश्यक आहे.

रोज चे तेच तेच रूटीन , त्याच त्याच गोष्टी , सगळ्यांच्या आधी उठायचे सुट्टी असेल तर थोडा वेळ जास्त झोपता येते, परंतु दूधवाला , पेपरवाला , कचारेवला हे त्यांच्या वेळेत सकाळी लवकर येतात त्यामुळे घरच्या स्त्री ला पत्नी ला रूटीन मधून सुटका नसते. आदले दिवशी ऑफिस असो किंवा घर कामाचा केवढा ही ताण असो .

त्यामुळे नेहमी पतीने काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत की पती पत्नी मधील नातेसंबंध आनंदी ठेवण्यासाठी, रोजच्या त्याच रूटीन मधून सुरू होणारी एकच सुर असलेली सकाळ थोडी आनंदी , उत्साही करावी , पत्नी ची निदान आपल्या सुट्टी दिवशी तरी कटकट , त्रास नको आणि ते नसेल तरी अजून उत्साही , आनंदी ठेवण्याकरिता त्याकरिता , उद्याचा दिवस उद्याची पत्नीची सकाळ आनंदीमय करायची असेल तर आदल्या रात्री हे करून पहा. नेहमी काही गोष्टी लक्षात ठेवा.

१. समजून घ्या : – पत्नी आपल्याकरिता आणि आपल्या लोकांच्या करिता तिचे एव्हढे वर्ष आनंदाने घालविलेले आई वडील , भावंडे , इतर जवळचे नातेवाईक यांना कायमचे सोडून ती सासरी आलेली असते. सुरुवातीला सासरची लोकं , त्यांच्या सवयी , स्वभाव जुळवून घेताना खूप कष्ट पडतात.

पण हळूहळू नवऱ्या सकट सगळ्यांच्या सवयी , गरजा , पथ्य पाणी सांभाळायची जबाबदारी ती आनंदाने स्वीकारते. पुढे मुलांची ही जबाबदारी वाढते. काही वेळेस आजारी असताना ही सगळे घरचे सांभाळते. तर नोकरी करणारी असेल तर तारेवरची कसरत असते. सगळे वेळेत आवरून परत सगळीकडे आनंदी आणि उत्साही आणि कुठेच कामाची टाळाटाळ करता येत नाही.

अशावेळी एखादा दिवस तरी पती ने तिला समजून घेण्याचा प्रयत्न करावा. तिची रोजची धावपळ बघून आपली ही रविवारची सुट्टी असेल तर शनिवारी रात्री पासून तिला त्याच्या रूटीन मधून बदल द्यावा. अर्थात ती आपल्या सगळ्यांच्या करिता सतत राबत असते, सातत्य असते त्यात. स्वतः कडे जेवढे लक्ष देत नाही तेवढे कुटुंबा करिता वेळ देत असते. त्यामुळे तिला समजून घेणे गरजेचे असते. तू दमतेस , तू बस. , मी आहे सोबत असे प्रेमाचे , आधराचे शब्द हळुवार पणे मांडावेत.

२. संध्याकाळी ऑफिस मधून येताना काही तरी snacks , juice असे घेवून यावे म्हणजे संध्याकाळी सगळे एकत्र बसून इन्स्टंट खावू शकतील. एकमेकांसोबत रिलॅक्स बसून खाता येईल. मग पार्सल मागविता येईल किंवा मग पत्नी ला स्वैपाक करण्यासाठी मदत किंवा एखादा वेगळा पदार्थ करता येईल. किंवा तिला पूर्ण आराम आपल्याला ही आराम पाहिजे असेल तर मस्त पैकी बाहेर dinner ला जाता येईल . असे प्लॅन्स करावेत.

मग काही वेळेस पत्नी ची अपेक्षा असते की दोघांनी च जावे. अशावेळी मुलांच्याकरिता आजी आजोबा यांच्या सोबत किंवा मग त्यांच्या मित्र मैत्रिणी किंवा घरात काही arrangements कराव्यात. आणि फक्त पत्नी ला वेळ द्यावा.

३. सिनेमा , नाटक , एखादा संगीत विषयी कार्यक्रम , किंवा मग आजकाल अनेक हॉटेल्स मध्ये ही काही खास programs रात्री असतात. कधी त्यात फ्लोअर डान्स असेल. अशा ठिकाणी घेवून जावे. रोजच्या कामातून रिलॅक्स होण्यास मदत होते. सगळा शीणवटा दूर होतो. छान शांत झोप लागते. मन ही फ्रेश राहते आणि शरीर ही . त्यामुळे दुसरे दिवशी ची सकाळ आनंदी आणि उत्साही उगवते. पत्नी खुश तर सर्व घर खुश.

४. पत्नी चे नातेवाईक , जवळचे मित्र मैत्रीण यांना बोलावून छोटे से get together घरी किंवा बाहेर surprise म्हणुन arrange करावे.
त्यामुळे पत्नी आपल्या जवळच्या लोकांना भेटून , त्यांच्या सोबत मोकळेपणाने काही क्षण आनंदाने घालवू शकेल.

५. एखादी one day picnic किंवा मग मोठी ट्रीप ही arrange करावी.
त्यातून निसर्ग , बाहेरचे वातावरण , कधी समुद्र , थंड हवेचं ठिकाण , डोंगर दऱ्या , कधी बर्फ असेल तर कधी पवित्र स्थान , मंदिर याठिकाणी जावे. ज्यातून मन उत्साही होईल. सगळे एकत्र असतील .आणि रोजच्या रूटीन मधून बदल होईल.

६. गरजा समजून घ्या : भावनिक , शारीरिक जवळीकता या तिच्या गरजा समजून घेणेच आहे. कधी कधी मन आनंदी राहण्याकरिता पती पत्नी यामधील प्रेमाचे संबंध वाढवावेत , कधी भावना समजून घेता घेता एकमेकांच्या शारीरिक गरजा ही समजून घ्याव्यात. आणि शारीरिक संबंध म्हणजे केवळ शरीराची भूक भागविण्यााठी बका बका खाणे नव्हे तर चवीने पण रुचकर असे अनेक पदार्थ किंवा मोजके त्यात रस घेवून खावेत. तसे भावना समजून घेवून हळुवार एकमेकांना जास्त समजून घेत जवळीक निर्माण करणे .

यातून शरीर आणि मन ही फ्रेश होते. काही वेळेस स्त्री ला शारीरिक जवळीक म्हणजे सेक्स च नको असते. तर तिला केवळ पती सोबत खूप बोलायचे असते. काय काय घडते आहे. काय प्रॉब्लेम्स आहेत. काय achievements आहेत .मुलांचे प्रॉब्लेम्स , ऑफिस मधल्या गोष्टी, मुलांची प्रगती आपली प्रगती , घरतल्या इतर व्यक्तींविषयी , तर कधी काही ताण असतील तर ते सांगून मन मोकळे करायचे असते.

७. Periods काळात समजून घेणे : इतर आजारपणात काळजी घेणे. पतीने आणि घरच्यांनी ही पत्नी चे periods काळजी पूर्वक लक्षात घेवून त्यावेळी तिला होणाऱ्या harmonal changes मधुन होणाऱ्या त्रासात आराम द्यावा. तिची काळजी घ्यावी. इतर आजारपणे काही असतील तर वेळीच डॉकटर कडे घेवून जावून औषाधोपचार करणे , खाण्या पिण्याची काळजी घेणे.

८. वेळ देणे : कधी तरी मध्ये सुट्टी काढून एकमेकांना surprise देणे आणि तो वेळ सोबत घालविणे. त्यातून आपली सोबत , साथ ही समजते. आणि इतर वेळी ही आपल्याला वेळ देवू शकतो आपला नवरा याचे समाधान आणि आनंद मिळतो.

९. सणासुदीला थोडे जास्त काम पडत , देवाधर्माच्या करण्यात वेळ आणि अनेक गोष्टी करताना तारांबळ उडते.. अशावेळी बाहेरची जी कामे असतील , काही आणून देणे , सामान , वस्तू , साहित्य , पूजे करिता आवश्यक गोष्टी बाहेरून आणून द्याव्यात .तेवढे च काम हलके होतें मदत होते. नैवैद्य झाला की पाने वाढण्यास , इतर गोष्टी आवरून जागच्या जागी ठेवण्यास मदत करावी. प्रेमाने पत्नी ला ही गरम गरम जेवण्यास वाढावे.

१०. रोजची थोडी मदत करावी. येता जाता रोजची ताजी भाजी आणावी , कधी रात्री ही जेवणे एकत्र करावीत. वाढण्यास मदत . किंवा नंतरचे आवरणे करावे. सगळ्यांचे हात लागले की पटापट अवरून थोडा निवांत वेळ मिळतो.

११. रात्री जेवल्यावर पत्नी ला घेवुनथोडे बाहेर फिरून यावे .. रोजच्या धावपळीत पत्नी ला तिच्या व्यायाम आणि इतर गोष्टी करिता वेळ मिळत नाही अशावेळी जेवल्यावर शत पावली करण्याकरिता जावें . नाही तर कधी तरी गाडी वरून , गाडी तून मोकळ्या हवेत फिरून यावे.

१२. जेवल्यावर सगळ्यांनी एकत्र बसून मनोरंजनाचे कार्यक्रम बघावेत , ऐकावे , घरात वादक , गायक असतील तर छोटीशी संगीत मैफिल रांगवावी. पत्ते किंवा कॅरम असे गेम खेळावेत. किंवा कधी badminton असेल . कधी मस्त कॉफी चा आस्वाद घेत आरामात , निवांत बसावे. कधी गच्चीत जावून रात्रीच्या चांदण्या ,तारे , चंद्र यांची आकाशात ली हजेरी आणि नजाकात टीपावी.

१३. पत्नी चे आवडते छंद जपावेत. तिला त्याकरिता प्रेरणा द्यावी ,प्रोत्साहन द्यावे. आणि तिच्या कलेची कदर करावी. कौतुकाची थाप पाठीवर द्यावी.

१४. कधी गमत म्हणून भेटवस्तू , तर तिच्याकडे काय नाही त्या तर कधी गरजेच्या गोष्टी तिची पसंत लक्षात घेवून आणाव्यात तर कधी आपल्या पसंतीचे आणावं. कधी एखादा सुवासिक सुगंध पसरवणाऱ्या मोग्र्याचा गजरा आणावा. तर कधी प्रेमाचे प्रतीक असलेला गुलाब भेट द्यावा.
तर कधी वातावरण आणि आसमंत प्रसन्न करणारा , मंद दरवळ असलेला परफ्यूम गिफ्ट द्यावा. कधी एखादा ड्रेस , कधी साडी तर कधी रोजच्या गरजेचे कपडे लक्षात ठेवून घेवून द्यावे

१५. एखाद्या जिम ची membership .. पत्नी चे शरीर आणि मन याची काळजी घेणे आपले कर्तव्य असते .त्याकरिता शरीर आणि मन निरोगी असणे गरजेचे. म्हणून मग एखाद्या जिम ची , योगा क्लास ची membership घ्यावी.

१६. वाहन , दळण वळणाची साधने : रोजच्या तिच्या गरजा ..बाहेर वेळेत जाणे याकरिता तिचे वाहन. मोबाईल अजून लॅपटॉप अशा गरजेच्या वस्तू तिला घेवून द्यावे ज्यातून वेळ आणि energy बचत होईल. आणि ती energy योग्य ठिकाणी लावता येईल.

१७. Beauty parlour ची membership द्यावी. प्रत्येक स्त्रीची इच्छा असते की इतरांसारखे सुंदर दिसावे .. याकरिता कपडे जसे गरजेचे तसे तिने आहे ते सौंदर्य वाढवावे याकरिता beauty parlour ची मदत घेवून facial मधुन रिलॅक्स आणि त्वचा ही टवटवीत होते. तर Head massage , बाकी गोष्टी ही तिला फ्रेश ठेवण्यास मदत करतात. त्यातून आपण सुंदर दिसतो हे ही समाधान , आनंद वाढत असते.

१८. सगळ्यात महत्वाचे जरी पत्नी मिळवती असेल तरी तिचा पैसा तिला साठवू द्यावा. तिला महिन्याला खर्चाला रक्कम द्यावीच शिवाय काही गरज आहे का हे विचारून तिच्या सोबत ही शॉपिंग ला जावे. यातून आर्थिक support आहे हा मोठा आधार मिळतो.

१९ .काही functions , जवळची लग्ने जरूर attend करावी ..ज्यातून आपल्या सोबत पत्नी समाज आणि इतर गोष्टी मध्ये पत्नी लाही दर्जा आहे ..तिची इतरांशी ओळख करून देणे यातून विचार शेअर केले जातात. आणि मैत्री ही दृढ होते. बरोबरीच्या लोकात मिसळण्याची संधी मिळते.

२०. झोप / पत्नी ला ही झोपेची , विश्रांती ची गरज आहे हे लक्षात घेवून तिला वेळेत झोपण्यास प्रोत्साहित करावे आणि त्याकरिता मदत करावी. आणि एखाद्या दिवशी गाढ झोप लागली तर उठवू नये. तिची कामे असे म्हणून तसेच ठेवू नये. कधी कधी आपण मस्त वाफाळता चहा द्यावा.

२१ . मुलांची , वडीलधाऱ्या व्यक्तींची काळजी स्वतः घ्या..कधी कधी बायकोला बदल म्हणून मुलांचं काळजी घ्या. वडीलधाऱ्या व्यक्तींची काळजी घ्या. अभ्यास घ्या मुलांचा. शाळेत meeting ला जा.

रोजचा वाजणारा गजर सुट्टीच्या आदले दिवशी रात्री हळूच नकळत बंद करून ठेवावा. शांत झोपू द्यावे तिला. पत्नी ला जपणे, तिची काळजी घेणे पतीचे कर्तव्य आहे तसे पत्नीचे ही आहे. एकमेकांचा आनंद वाढावा याकरिता प्रयत्न करावेत .

उद्या सकाळी पत्नीची सकाळ आनंदीमय करायची असेल तर आदल्या रात्री पासून हे प्रयत्न जरूर करावेत. आणि मी तर म्हणेन केवळ एक दिवसाची सकाळ आनंदीमय करायची असे डोक्यात न ठेवता तिची रोजची सकाळ आनंदमयी करण्याकरिता रोजचे प्रयत्न असावे .

आयुष्य सुंदर आहे ..चिडचिड , वैताग न करता आयुष्य सुखी , आनंदी होईल याकरिता प्रयत्न करा. पत्नीची सकाळ आनंदीमय करायची असेल तर आदल्या रात्री रोजच तिला आनंदी क्षण जगू द्या. ताण तणाव यातून मुक्त राहण्याकरिता मदत करा. तिच्या भूमिकेत शिरा.एकमेकांना समजून घ्या , साथ द्या..प्रेम द्या प्रेम घ्या. आनंद द्या आनंद घ्या.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!