अहंकारी जोडीदार कधीही कुणाचा योग्य साथीदार होऊ शकत नाही.
टीम आपलं मानसशास्त्र
सध्या खरे तर लग्न होणे हेच अवघड झाले आहे.आणि आहेत ती टिकविणे मुशिकल झाले आहे. मुले आणि मुलीही शिक्षण आणि स्वतः कमवते आहेत. स्वतच्या पायावर उभे आहेत. आणि खरे तर आज काल प्रत्येकाला विचार स्वातंत्र्य आहे. घरामधून ही मुभा आहेत. बंधने कमी झाली आहेत . निर्णय स्वातंत्र्य आहे. मी कोणी तरी आहे. मी चांगली नोकरी करतो / करते .कमवती आहे. माझे भले बरे समजते मला. मला कोणाची गरज नाही . हा अहंकार निर्माण झाला आहे.
यातून एकमेकांना समजून घेण्याची क्षमता कमी झाली आहे . लग्नानंतर ही दोघा पैकी एक जरी स्वतः चे खरे करणारा / री असेल ,
मीपणा , मला असे वाटते, माझे ऐकावे, त्याला समजत नाही .तिला समजत नाही. असे काहीसे भाव असतात. एखादी गोष्ट मनाविरुध्द होत असेल तर आपल्या च मता वर , आपल्याच गोष्टींवर अडून राहतात. आम्हाला कोणाची गरज नाही असेच वर्तन आणि वागणे वाढत जाते.
पती आणि पत्नी दोघेही उच्चशिक्षित, आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्यामुळे कोणी कोणाचे ऐकायचे, समोरच्याने बदलावे, मी बदलणार नाही अश्या अहंकारामुळे नातेसंबंधामध्ये तणाव निर्माण होतो. जोडीदार यात ही उणे जास्त असते.
एक उच्च शिक्षित असतो. आणि दुसरा कमी शिक्षित , एखादा आर्थिकृष्टया कमावता तर दुसरा कमावता नसेल. तरी सगळे मीच करतो , माझ्यामुळे सगळे चालते हे अहंकार च. तर स्त्री जर प्रेम , आदर , माया, काळजी घेणाऱ्या या गुणांनी संपन्न असेल तरी ही तिची भावना जर अशी असेल की मीच सगळे करते. मझ्याचमुळे घरी सगळ्यांना खायला मिळते. म्हणून ती जर तिला पाहिजे तसेच वागू लागली ..तरी तो अहंकार .
मग जोडीदार एकमेकांना समजून घेताना प्रत्येक वेळी मीच का समजून घ्यायचे हा भाव ही असेल. किंवा आपला जोडीदार समजून घेवून सांगत असेल तरी एखाद्या गोष्टीवर मी पणाने अहंकाराने अडून च राहणे असेल.
अगदी स्वतः ला चे बरोबर , दुसऱ्याचे चूक असाच अट्टाहास. आपली ही कदाचित चूक असेल त्यामुळे समोरची व्यक्ती आखडूपणे वागत असेल असे वाटत च नाही. जाणवतच नाही . हम करे सो कायदा असे असते . मोडेन पण वाकणार नाही हा स्वभाव असतो. अशा व्यक्तींना समजून सांगितले तर त्यांचा अहंकार अजूनच दुखावला जातो.
रोहित आणि निशा यांच्या लग्नाला चार च वर्ष झाली होती. पण दोघात एकमेकांना दोघांनी समजून घेवून घेवून , एकमेकांची मने जपून आता दोघेही मीच का नेहमी नमते घ्यायचे असे म्हणून आता ठाम राहायला शिकले होते. कोणाची ही चूक असो मी आपनहून बोलणार नाही असे निशा म्हणायची रोहित ही असाच तिला तिचा अहंकार महत्वाचा तर मी का दरवेळी बोलू असे म्हणून दोघांच्यात अंतर वाढू लागले.दोघांच्या मधले भावनिक संबंध बिघडलेच पण त्यामुळे दोघांच्या मनात उगीच एक अढी निर्माण झाली.
रोहित आणि निशा दोघेही जॉब करणारे. एकदा रोहित ऑफिस मध्ये गेल्यावर अचानक त्याला कामासाठी पुण्यातून मुंबई ला जावे लागले. आणि तो कामाच्या घाई गडबडीत , ऑफिस मधल्या collegue सोबत ऑफिस ची गाडी घेवून च मुंबईला गेला. पुणे मुंबई चार पाच तास अंतर काम संपले की लगेच परत येणार होता.
मुंबई मध्ये पोहचल्यावर meeting होती लगेच. सगळे काम संपवून रात्री परत येताना निशा चा फोन आला . साडे आठ वाजले तरी कुठे आहेस. जेवायला येणार आहेस का तेव्हा रोहित ने तो मुंबई वरून निघाला just सांगितल्यावर निशा चा अहंकार दुखावला गेला ती त्याच्यावर फोनवरच चिडली तुला सांगावेसे वाटले नाही. मेसेज करावा वाटला नाही. त्याने तिला समजावून सांगण्याचा व्यर्थ प्रयत्न केला.
त्या दिवसानंतर दोघे ही खूप तुटक वागू लागले. असे काय मोठे झाले असे त्याला वाटले आणि ती यावर च की मला सांगितले नाही. हळूहळू अंतर वाढू लागले. बोलणे ही गरज असेल तेवढेच . भावनिक दुरावा आलाच पण आता शारीरिक दृष्ट्या जरी दोघांच्या पैकी एकाची इच्छा असेल तरी ते टाळू लागले. मलाच गरज का तिला / त्याला नाहीच का ? यातून शारीरिक संबंध ही बिघडत गेले.
त्यात निशा जास्त च अहंकारी होती. बरेचदा रोहित ने प्रयत्न केले पण निशा एकच एक गोष्ट धरून बसली. मला सांगितले नाही. त्यापेक्षा तिचा इगो जास्त दुखावला होता. आणि त्यामुळे आता ती कोणतीच गोष्ट करण्यास ती उत्सुक नसे . कायम तो चुकला यावर बोट ठेवून आपला अहम जपत होती.
शेवटी रोहित ही थकला तिच्या या अहंकारा पुढे नांगी टाकली त्यानें . त्याने त्याचे पोस्टिंग परदेशी करून घेतले .जाण्यापूर्वी एकत्र येण्याचा खूप प्रयत्न केला. पण प्रसंगी दुखावला गेलेला अहंकार याने निशा ने परत रोहित बरोबर कधीच जवळीक साधली नाही.
केवळ तिच्या अहांकरापोटी दोघे कायमचे दुरावले.
कुणाला रूपाचा, कुणाला ज्ञानाचा, कुणाला पदाचा तर कुणाला सत्तेचा अहंकार. साध्या शब्दात सांगता येईल की अहंकार म्हणजे मद, मस्ती, माज. अहंकारी माणसाजवळ विनम्रता नसते. मी म्हणजे मीच फक्त, हेच त्याच्या नसानसात भरलेलं असतं..
अहंकारात अहं म्हणजे मी प्रभावी असतो. व्यक्ती स्व-भोवती फिरते तेव्हा अहंकार पोसला जातो. हा ‘मी’ इतरांना तुच्छ मानू लागतो. एकटा पडतो. माणूस समाजनिष्ठ प्राणी आहे. एकटा जगू शकत नाही. ‘आम्हाला कोणाची गरज नाही. आमच्याजवळ सारे आहे’ असा अहंकार बाळगणारी माणसं विकृतीच्या जवळ गेलेली असतात.
‘मी’चं आपण होणं म्हणजे अहंकाराला थोडंसं दूर करणे. पण जेव्हा अहंकारी जोडीदार असेल तर तो कधीही कुणाचा योग्य साथीदार होऊ शकत नाही.कारण तो स्व मग्न असतो. स्वतः ला महत्व देत असतो. आपलाच विचार कायम स्वतः आणि इतरांनी करावी ही इच्छा आणि तसेच करत असतों.
कधी कधी अहंकार ही महत्वाचा असतो. कारण प्रत्येक वेळेसच समोरचा जोडीदार तुम्हाला गृहीत धरत असेल तर कधी तरी त्याला ही जाणीव होणे गरजेचे असते की तुम्हाला तुमचे ही अस्तित्व आहे. तुमचा ही स्व आहे.
प्रत्येक वेळी अहंकारी व्यक्ती आपलेच खरे करणारा जोडीदार स्वतः ही आनंदी , सुखी आणि समाधानी राहू शकत नाही. दुसऱ्याला ही आनंदी , सुखी आणि समाधानी ठेवू शकत नाहीं . कारण छोट्या छोट्या गोष्टीत ही सतत नाखूष , जोडीदारावर वर्चस्व गाजविण्याची सवय असलेला. आपल्याला च महत्व देणारा असल्यामुळे सतत त्याला सहन करणे शक्य होत नाही.
अहंकारी जोडीदार कधीही कुणाचा योग्य साथीदार होऊ शकत नाही. पण हाच अहंकार आयुष्यात काही तरी करण्यासाठी , नवीन ध्येय गाठण्याकरिता , इतरांनी डिवचले तर त्यातून प्रेरणा घेवून स्वतः ला सिध्द करणारे अहंकारी च असतात. पण अहंकाराचा अतिरेक किंवा विकृती होवू देवू नका.
आयुष्य सुंदर आहे. अहंकारी जोडीदार कधीही कुणाचा योग्य साथीदार होऊ शकत नाही.पण थोडा गरजे पुरता अहंकार ठेवून एकमेकांचे स्व जपा. आणि आयुष्य अजून सुंदर बनवा.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!



खंर आहे