Skip to content

समोर आनंदी जीवन असूनही ते कष्टाळू-दुःखाळू का वाटतं ??

समोर आनंदी जीवन असूनही ते कष्टाळू-दुःखाळू का वाटतं ??


सुलभा घोरपडे


आपल्यासमोर काय आहे त्यात काय नवीन बनविण्याची क्षमता आहे हे पहाण्याआधीच, दुसऱ्याकडे काय आहे हे पाहून तक्रार करणे तसेच माझी वस्तू तुझ्यापेक्षा कशी चांगली , मी तुझ्यापेक्षा कसा शहाणा ( शहाणी ) , हे दाखवण्यासाठी धडपड . आपल्या हातून फारस काही चांगले नाही घडले तर , आलेल्या अडचणी , मग परिस्थितीला तोंड देऊन मी एवढे केले , मी होते म्हणून ….दुसरी कोणी असती तर…असा सूर , खरंच अशी सारखी तुलना करून मी कोण तर , या सर्वापेक्षा हुशार हे पटवून देण्याची धडपड . फक्त तुलनेतच अस्तित्व शोधने , पण या पलिकडेही काहीतरी आहे तिथपर्यंत आपण जाण्याचा प्रयत्न करतो का?

तुलना हे न संपणार दुष्टचक्र आहे. त्यात अडकुन पडलो तर कोणतीही घटना घडली की त्याची तुलना आपण कशाशी करतो याच्यावर आपल्याला त्यातून सुख मिळणार की दुःख हे ठरत.

नवीन मारूती कार घेतली आणि त्याची तुलना आपण स्कूटर शी केली की मन सुखावते, पण लगेच समोरच्याची मर्सिडीज दिसली तर मन म्हणते’ मला पाहिजे ‘ आणि आपल्याकडे मर्सिडीज नाही म्हणून दुःख होते .

एखाद्या हाॕटेलात जेवायला गेलो , जेवण मागवले , खाल्ले पण लगेच , दुसऱ्या हाॕटेलात मागच्या वेळेच जेवण होते तसे हे जेवण नाही . म्हणजे काय तर ,तेव्हाच्या जेवणाची तुलना आत्ताच्या जेवणाशी करून , आत्ताच्या जेवणाची मजा घालवायची.

तुलना कशाला करायची ? आत्ता मजा आली ना? मग घ्यावा तीचा आस्वाद.

खरतर आपण कशाशी तुलना करायची , कोणती विशेषण वापरायची आपल्याच हातात असते ,

कोणत्याही गोष्टीत सुख वाटल आणि तुलना बदलली की , त्याच्यापेक्षा चांगल्या गोष्टीशी तुलना केली की झाले दुःख ! आणि दुःख झाले तर जे झालं त्याची तुलना “तरी बर तसं नाही झालं ” असे म्हणून त्याच्याहून वाईट घटनेशी तुलना केली की गेल दुःख .

तेव्हा असे वाटते , तुलना बदलली की ,खरंच चुटकीसरशी दुःख आपण नाहीस करू शकतो.


हसण्यासाठी जन्म आपला!

ग्रुप Join करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी 9137300929 हा क्रमांक आपल्या मोठ्या व्हाट्सएप समूहात ऍड करा.

“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

1 thought on “समोर आनंदी जीवन असूनही ते कष्टाळू-दुःखाळू का वाटतं ??”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!