Skip to content

चिडचिडे आणि रागीट लोकांची लैंगिक भूक ही जास्त असते का??

चिडचिडे आणि रागीट लोकांची लैंगिक भूक ही जास्त असते का??


टीम आपलं मानसशास्त्र


माणूस चिडचिड का करतो ? एखादी गोष्ट आपल्या मनाविरुद्ध झाली तर येणारी ही प्रतिक्रिया असतें . ही कायम टिकणारी असते असे नाही. ती परिस्थितीनुरूप बदलत जाणारी मनाची अवस्था असते. पण परत परत तीच परिस्थिती निर्माण झाली तर मात्र व्यक्ती सतत चिडचिड करू लागते.

व्यक्तीची चिडचिड , राग याला कारणीभूत आपल्या जवळच्या व्यक्ती ही असतात. कारण त्या आपल्या मनाविरुद्ध वागतात. आपली अपेक्षा एक असते आणि ते वागतात वेगळेच . सांगितले तरी ऐकून घेत नाहीत .

थोडक्यात व्यक्ती , वेळ , परिस्थिती यावर आपले कोणतेही नियंत्रण नाही याची जाणीव जेव्हा होते आणि ती परिस्थिती स्वीकारण्याची मनाची तयारी नसते. Accept करणे शक्य नसते. तेव्हा व्यक्ती हतबल होते आणि त्यातून त्या व्यक्तीची होणारी चिडचिड , राग हे म्हणजे या हतबलते चे प्रतीकच असते.

राग शांत करण्याचे अनेक मार्ग आहेत. जसे वेळ जावू देणे, शांत राहणे त्यांक्षणी, व्यक्ती ला समजून घेणे. कधी तरी त्याच्या अपेक्षा असतात त्याप्रमाणे वागणे. तर परिस्थिती बदल घडण्यासाठी प्रयत्न करणे.

त्याचप्रमाणे आपला राग , चिडचिड शांत करण्याकरिता आपल्या सोबत जवळची व्यक्ती असणे ही गरजेचे असते. कोणतीही परिस्थिती येवू देत मी सोबत आहे हा दिलासा , आधार यातून मिळत असतो. अशावेळी जवळचे मित्र मैत्रिणी यांच्या सोबत गप्पा मारल्या , त्यांच्या सोबत बाहेर गेले , कधी छोटी सहल तर खूप रिलॅक्स होते व्यक्ती.मनावरचे ओझे, आपली हतबलता divert होते.

तर त्याही जवळचा आपला जोडीदार आपल्या सोबत असेल , कधी कधी त्याचा तिचा खांदा ही डोके टेकायला असेल तरी ही खूप रिलॅक्स वाटते. सुरक्षित वाटतें

तसेच त्या क्षणी जर लैंगिक सुख मिळाले तर माणूस शरीराने जसा हलका होतो तसेच मनाने ही तो हलका होतो. मनावरचा ताण कमी होतो. यातून सगळे ताण तणाव , चिडचिड , राग हे बाजूला पडत असतात. कारण तेव्हा आपली व्यक्ती , आपल्या प्रेमाची , अतिशय जवळची आपल्या सोबत असते. आपल्या भावना समजून आपल्याला साथ देत असते. ती साथ आणि त्यातून लैंगिक संबंध यातून कोणतेही मोठे दुःख , त्रास , चिडचिड क्षणात शांत होते. यात मन आवडत्या गोष्टीत गुंतले जाते . त्यामुळे सतत चिडचिड , राग करणाऱ्या व्यक्तींना तो शांत करण्याचा मार्ग म्हणजे लैंगिक संबंध.

काही लोकांना सततचे डोक्याचे , मेंदूचे काम असते. तर काही आपले सैनिक जे सतत देशकरीता सतर्क असतात . त्यांना सतत मानसिक , शारीरिक ताण , त्रास सोसावा लागतो , तर खूप मेहनत करणाऱ्या व्यक्तींना ही शारीरिक आणि त्यातून मानसिक थकवा येतो. उत्साह आणि concentration कमी होते अशावेळी सुधा लैंगिक संबंध त्यांना खूप रिलॅक्स करत असतात. शांत करत असतात.

कारण तणावाच्या वातावरणातून , चिडचिड या वातावरणातून एकदम वेगळी , रोमँटिक असेल किंवा व्यक्ती मध्ये सदैव उत्साह निर्माण करणारे , सर्व काही विसरून नवीन चेतना निर्माण करणारे वातावरण निर्मिती होत असते.

पण जे लोक सततच चिडके असतात. राग राग करत असतात. थोडे ही मनाविरुद्ध होवून चालत नाही .या करिता कारणे ही असतात तो ज्या परिस्थिती मध्ये वाढला ते , त्याला लहानपणापासून छोट्या मोठ्या आनंदापासून वंचित राहावे लागले असेल . किंवा आनुवंशिकता ही असते. किंवा घरातले वातावरण , बघून बघून होणारा परिणाम .अशी अनेक कारणे असतात.

असे जे सततच चिडणारे लोक असतात त्यांना मात्र त्यांची लैंगिक भूक सतत भागवावी असे वाटते . कारण त्यातून वातावरण बदलत असतें . ती व्यक्ती स्वतः सुरक्षित समजत असते कारण आपली व्यक्ती तेव्हा सोबत असते. आणि सुख मिळवीत असते. आनंद देवाणघेवाण असते. शांती मिळतें .

तर काही वेळेस मनाची विकृती , obsessive compulsive behaviour होते. चिडचिड केली की ती शांत करण्याकरता लैंगिक भूक भागविणे हे चक्र सतत सुरू असतें .

चिडचिडे आणि रागीट लोकांची लैंगिक भूक ही जास्त असते का?? तर काही प्रमाणात हो आणि नाही हे सुधा. कारण ज्यांना योगा , मनाची एकाग्रता , meditation करणे जमते ते सगळ्यातून शांत राहतात. व्यायाम , प्राणायाम यातून ही स्वतः वर , भावांनावर नियंत्रण ठेवतात त्यांना लैंगिक संबंध त्यांची ती भूक ही आपल्या basic गरजा सारखी च असतें जसे अन्न , पाणी तसेच ही नॉर्मल भूक मग कधी कोणाची भूक कमी असतें , कोणाला सारखे खावे लागते . तर कोणी थोड्या थोड्या वेळाने थोडे थोडे खात असतें कोणी एकावेळी भरपूर खावून ही परत भरपूर खात असत .कोणी एकदा खाल्ले की तृप्त . असे च लैंगिक भूक ही त्यातच येते. Freud यांनी ही theory मांडली आहे जी आपण यापूर्वी ही अनेक लेखामधून वाचली आहे.

म्हणूनच लैंगिक भूक भागवून, इंद्रिय दमन करून जर आपण आपल्या चिडचिड, राग या भावना आणि त्रास तसेच कधी कधी होणारे मानसिक ताण , अतिशय बुध्दीचे कामाचे ताण, रिस्की काम , शारीरिक काम , यावर नियंत्रण मिळवता येणे शक्य असेल तर त्यात गैर काहीच नाही. उलट तुम्ही उत्साही , प्रसन्न आणि शांत होता. नव्या जोमाने परत कामाला लागत असता. सगळे विसरून जाता .परिस्थिती, व्यक्ती जी आपल्या हातात नाही त्यावर त्रास करून घेण्यापेक्षा मात करता.

आयुष्य सुंदर आहे. चिडचिड आणि राग टाळण्याकरिता आपल्याला कोणत्या गोष्टी शांत करतील , आनंद देतील त्या जरूर करा.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “चिडचिडे आणि रागीट लोकांची लैंगिक भूक ही जास्त असते का??”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!