लग्ना अगोदर प्रत्येक जोडप्याचं लैंगिक समुपदेशन व्हायला हवं.
सोनाली जे.
पूर्वी असे खास समुपदेशक नव्हते. जे काही सल्ले , मार्गदर्शन मिळायचे ते घरातले वडीलधारी यांच्याकडून . मग ते त्यांच्या अनुभवातूनच असायचे. त्यात लैंगिक गोष्टीवर मार्गदर्शन आणि सल्ले देणारे असे फारच कमी होते. त्यावर मोकळेपणाने चर्चा तर खूपच दूरची गोष्ट होती.
हळूहळू शास्त्र प्रगत होत गेले. परदेशात एकेकटे राहणारे लोक, nuclear फॅमिली यातून एकंदरीतच वर्तन विषयक आणि , शैक्षणिक समुपदेशन ,लैंगिक समुपदेशन प्रगत होत गेले. त्याची गरज भासू लागली.
तरी ही सुरुवातीला लग्नानंतर येणाऱ्या अडचणी किंवा अगदी सांगायचे तर घटस्फोट याकरिता अर्ज दाखल केल्यावर नाते कायमचे तुटू नये म्हणून एक शेवटचा प्रयत्न समुपदेशन दोघांचे ही.
पूर्वी लग्न होण्या आधी बहीण , मोठी वहिनी किंवा आई , लग्न झालेल्या मैत्रिणी, तर मुलांच्या बाबत मोठा भाऊ , मित्र , वडील यांच्या कडून थोडी फार माहिती मिळे पण ती फार जुजबी. शास्त्रीय दृष्ट्या त्याला खरे तर कोणता आधार नसे. बरेचदा लग्नापूर्वी अनेक गोष्टी मध्ये तरुण तरुणी यांच्यात अज्ञान च असे.
खरे तर भारतात अतिशय सुंदर शिल्प निर्मिती अनेक मंदिरांवर केली आहे. अजंठा वेरूळ लेणी असतील किंवा आसाम मधली मदन मंदिर असेल ..खजुराहो मंदिर शिल्पाकृती. यातून पती पत्नी असेल किंवा अगदी l लैंगिक क्रीडा याला देवी देवता यांनीही पवित्र आणि अतिशय सुंदर मानले आहे. आणि ही शिल्पकृती ही त्या आनंद आणि रसिकता मानली गेली आहे. आणि गरज ही.
खरे तर पूर्वी पासून देव देवता यांचा आशीर्वाद म्हणजे साक्षात लैंगिक परिपूर्णता .. पण खरे तर आपण लोकांनी च या विषयावर बोलणे वाईट. कसे बोलणार. ही प्रायव्हेट गोष्ट असे करून दुर्लक्ष केले होते. पण आता लग्नानंतर जसजशा समस्या वाढू लागल्या. तसे तसे मार्गदर्शनाची गरज पडू लागली. लग्ना अगोदर प्रत्येक जोडप्याचं लैंगिक समुपदेशन व्हायला हवं याची गरज भासू लागली. याची काही कारणे ही बघू.
१. स्त्री आणि पुरुष रचना :
आपण शाळेत जरी शिकलो तरी ही प्रत्यक्षात आपल्याला खरेच ही रचना deep मध्ये माहिती नसते.
आणि जेव्हा लग्न म्हणजे शारीरिक आकर्षण ,ओढ असते. आणि मन आणि तन यांचे एकरूप होणे .अशावेळी सर्वसाधारणपणे शरीर रचना याची माहिती असणे ही basic गरज असते. आणि एक्स्पर्ट कडून समजल्यावर प्रत्यक्षात एकमेकांना त्रास न होता काळजी घेणे शक्य होईल.
त्यातला आनंद मिळविणे सोपे जाते.
२. काही गोष्टींचं अज्ञान च असते. किंवा मोठे जे सांगतील ते ..
बरेचदा लग्न म्हणजे फक्त शारीरिक आकर्षण , तृप्ती हेच समज असतात. परंतु सर्व प्रथम एकमेकांचे स्वभाव माहिती असणे गरजेचे असते. एकमेकांच्या भावना , आवडी निवडी हे माहिती असणे गरजेचे असते. मन , भावना , आवडीनिवडी या हळुवार बोलण्यातून , भेटीतून समजत असतात.
याकरिता एकमेकांना वेळ देणे खूप गरजेचे असते. दोन भिन्न लिंगी व्यक्तिमत्त्व जेव्हा भेटतात तेव्हा पहिल्यांदाच एकदम शरीर एकत्र येणे हे दोघांनाही मानवणारे नसते. त्यात आनंद आणि सुख यापेक्षा भीती निर्माण होईल .किंवा मग ती गोष्ट नकोशी वाटेल..
यापेक्षा लग्नापूर्वी एक एक्स्पर्ट व्यक्ती एकमेकांना जाणून घेण्या करिता मदत करते तेव्हा एकमेकांविषयी आकर्षण ही वाढते .समजून घेण्याची क्षमता वाढते. एकमेकांच्या मध्ये शारीरिक आकर्षण वाढवून ती ओढ टिकवायची असेल तर त्याची सुरुवात ही मनापासून च करायला पाहिजे. दोघांची मने जवळ आली , एकरूप झाली तर शारीरिक ओढ ही वाढत जाते. आणि त्यातून सुख , समाधान , शांतता वाढते. पुढील प्रजोत्पती करिता ही healthy वातावरण निर्मिती होते.
३. भीती , संशय :
लग्न ठरल्यानंतर पुरुष आपल्या मित्र मंडळी. जवळच्या सोबत आपल्या मनातल्या शंका , भीती विचरण्याकरिता घाबरतात. अनेकवेळा आपले मित्र आपली चेष्टा करतील आपण चेष्टेचा विषय बनू . म्हणून ही विचारण्याचे धाडस करीत नाहीत.
लग्नापूर्वी हस्तमैथुन , स्वप्नदोष यांचा परिणाम , कधी गैरसमज , अर्धवट माहिती याचा परिणाम आपल्या वैवाहिक जीवनावर होईल याची भीती असते, संशय असतो . या गोष्टीतून अनेकदा तरुण हे नैराश्यात जातात. लग्नानंतर आपण शारीरिक संबंधात कमी तरी पडणार नाही ना ही चिंता , काळजी सतावत असते. याची भीती पण असते. त्यामुळे या सर्व बाबींवर एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीशी लवकरात लवकर चर्चा केल्यास मनातील भीती बऱ्याच प्रमाणात कमी होते.
४. विवाहपूर्व संबंध :
काही वेळेस भावनांच्या ओघात , आकर्षणात अनेकदा सध्याची पिढी लग्नापूर्वीच एक स्टेप पुढे जातात. असेच समजून की हाच आपला आयुष्याचा कायमचा जोडीदार असे गृहीत धरून पुढची पावले उचलली असतात पण काही कारणाने ते रूपांतर विवाहात होत नाही.
तर काही मुलांनी विवाहा पूर्वी एक नाही तर अनेक मुलींशी संबंध ठेवले असतात . याचे कारण काय तर आपले पौरुषत्व सिद्ध करून पाहण्यासाठी हे संबंध केल्याचं ही आढळलं. आज एचआयव्ही व एडसचे अनेक रुग्ण असलेल्या युगात हे संबंध फार धोक्याचे आहेत.
विवाहपूर्व संबंध आणि त्या संबंधातून काही परिणाम पुढील आयुष्यावर होतील का , ही निर्माण होणारी भीती दूर होण्याकरिता , मुला मुलींच्या मनात निर्माण झालेल्या शंका दूर करण्याकरिता योग्य समुपदेशनाची गरज असते.
आणि या गोष्टी आपल्या जवळच्या नातेवाईक किंवा मित्र मैत्रिणी यांच्या सोबत मोकळेपणाने बोलणे शक्य नसते. त्यांना त्यातले अनुभव किंवा शास्त्रीय माहिती , धोके यांची कल्पना नसते. त्यामुळे काही वेळेस आपल्या पार्टनर ला अंधारात न ठेवता , आपल्या बद्दल विश्वास आणि खात्री वाटणे ही गरजेचे असते.
५. पेहराव : –
बरेचदा विवाहानंतर जोडीदारांना attract करतील असे पेहराव ही महत्वाचे असते. कोणत्या प्रकारचे कसे पेहराव असावे याचे ही मार्गदर्शन हे ही लैंगिक समुपदेशनाचा एक भाग आहे.
६. काही गोष्टींची कल्पना :
लग्ना अगोदर प्रत्येक जोडप्याचं लैंगिक समुपदेशन व्हायला हवं , कारण काही गोष्टींची कल्पना असणे ही जरुरी असते. जसे लैंगिक संबंध प्रस्थापित झाल्यावर काही गोष्टी घडत असतात. शरीरात होणारे बदल. यामुळे एकमेकावर कोणतेही परिणाम होवू न देणे गरजेचे असते.
काही शारीरिक बदल माहिती नसतात. त्यामुळे अशावेळी घाबरून जाण्याची किंवा जोडीदाराला दोष देण्याची गरज नसते. तर काही गोष्टी नैसर्गिक घडत असतात. हे शास्त्रीय पद्धतीने समजणे गरजेचे असते.
७. काही गोष्टींची जबरदस्ती करू नये. :
लैंगिक संबंध प्रस्थापित करताना नवीन जोडपी एकमेकांना ओळखत नसतात त्यामुळे केवळ एकाला संबंध हवे आहेत आणि दुसऱ्याची मानसिकता , भावना अजून तशा पद्धतीने तयार झाल्या नसतील तर आनंद मिळण्याऐवजी जबरदस्ती , किंवा त्रास च होवू शकतो आणि नकारात्मक विचार वाढीस लागून परत चांगले आणि सुखकारक संबंध निर्माण होण्यास वेळ लागतो किंवा कायमचे मनात द्वेष , नावड ही निर्माण होते.
त्यामुळे दोघांची ही मनाची नाजूक अवस्था समजून घेवून हळुवार एकमेकांनी समजून घेवून मग ती नाती / संबंध develop करावेत .जेणेकरून आपल्या ही मनाचा विचार केला जातो याची खात्री पटेल आणि त्यातून विश्वास वाढत जावून संबंध दृढ होत जातील .
याकरिता मार्गदर्शन जरुरी असते. कारण पूर्वी कोणताच नसलेला अनुभव त्यामुळे काही चुका ही होवू शकतात.
लग्ना अगोदर प्रत्येक जोडप्याचं लैंगिक समुपदेशन व्हायला हवं. पण त्यासोबत खरे तर साधारण चौदा , पंधरा वर्षाच्या मुली आणि मुलांची वयात येण्याची जी प्रोसेस असते तेव्हा ही त्यांना समुपदेशन , लैंगिक संबंध याची माहिती देणे गरजेचे आहे. ही काळाची गरज आहे. नाती सुंदर होण्याकरिता आणि एकमेकांच्या शारीरिक तसेच मानसिक गरजा काय असतात , येणाऱ्या समस्या आणि त्यावर मात किंवा solution काढता येवू शकते याची माहिती असणे आणि हे समजून सांगणारे , विश्वास देणारे असेल तर नाती फुलण्यास मदत होते.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!



लेख खुप छान आहे