आदळ-आपट करून कोणतंही नातं टिकत नाही.
सौ. मयुरी महेंद्र महाजन
पुणे(चिंतामणी चौक)
असं म्हणतात, की नात्यांची निव खूप नाजूक असते, तिला पदोपदी जपावे लागते ,वेळोवेळी त्याला तितक्याच प्रेमाने खत पाणी सुद्धा घालावे लागते, तरचं नात्याची निव मजबूत होत जाते खरं तर नाती प्रत्येकासाठी खूप खास असतात ,कारण आयुष्यात नाती आहेत ….तरचं त्या आयुष्यात आपलेपणा आहे, प्रेमाचा मुरत जाणारा ओलावा आहे ,कुणीतरी आपले आहे ही भावनाच माणसाला सुखावणारी असते…. प्रत्येक समस्येवर त्याची ताकद मात्र खूप मोठी ऊर्जा प्रदान करणारी असते ….
आपण प्रत्येक जण आपल्या जीवन प्रवासात कितीतरी नाती निभावत असतो, कधी ते मैत्रीच्या धाग्याने बांधले असेल ,जन्मदात्या आपल्या मातापित्यांशी बांधलेले असेल, ऊलत काय ,चुलत काय, जवळचे काय, दूरचे काय, पत्नी काय, भाऊ काय, बहिण काय, नवरा काय ,एवढेच काय जिथे राहतो तिथे शेजारी म्हणून सुद्धा त्यांच्याशी एक प्रकारचे बंध जोडले जातात आणि सर्वात महत्वाचं माणूस म्हणून आपल्यात असलेल्या माणुसकीने निभावलेले काही बंध…..
नात्यांच्या बंधनात जेव्हा दोन व्यक्ती एकत्र येतात तेव्हा आयुष्यभराचे जुळणारे बंध माणसाचा स्वभाव आणि विचार गुणानुसार त्या नात्यासाठी व्यक्तीचे प्रेम आदर भाव आपुलकी या गोष्टीला दिले गेलेले प्राधान्य त्या नात्याची बाजू भक्कम करत जातात कधी कधी रुसवे-फुगवे भांडण-तंटे होऊन सुद्धा जर त्या नात्याची निव पक्की असेल तर त्यामध्ये लाख संकटे जरी आली तरी ते नाते डगमगत नाही ….
प्रत्येक नात्याला खरं तर काही बेसिक गोष्टींची गरज असते त्या गोष्टी नात्यांमध्ये असतील तर नाते फुलायला बहरायला वेळ लागत नाही…
1 > नाते कुठलेही असो त्यामध्ये एकमेकांना समजून घेणे महत्त्वाचे आहे…
2 >प्रत्येक नात्याला प्रेमाची आवश्यकता असतेचं… त्यासाठी नात्याला बहरायला फुलायला तुम्ही खतपाणी घातलेचं पाहिजे…
3 > नात्यात तुझं माझं न म्हणता आपलं म्हणता आलं पाहिजे, बघा नात्याला अजून प्रेमाची पालवी फुटेल…
4 > नात्यांमध्ये अपेक्षा कमी आणि कर्तव्याला प्राधान्य दिले तर त्याला अजून रंग चढेल ..
5 > कुठलेही नाते निर्मळ भावनेतून तयार होते त्या भावनेला आपण विश्वासाच्या जोरावर जोपासले पाहिजे ….
आदळ आपटं करून कोणतंही नातं टिकत नाही …जर नात्याच्या सोनेरी क्षणांना आदळआपट करून आपण घालवणार असू तर त्या अवास्तवतेवर कुठलेचं नाते कधीच टिकत नाही, असं म्हणतात की भांड्याला भांडं लागतचं… म्हणजे जेथे दोन व्यक्ती एकत्र येतील तेथे वाद होणारचं…
पण नाते टिकवण्यासाठी जर आदळ आपट करण्याचा मार्ग स्विकारला जात असेल तर तो निव्वळ एक आपल्या मनाचा न सावरता येणारा तोल आहे…, जो आपण आदळआपट करून त्या माध्यमातून व्यक्त करत असतो परंतु लक्षात घ्या मित्रहो याचा त्रास आपल्यालाच होणार असतो कारण आपण आदळ आपट केल्याने दुसऱ्या व्यक्तीला त्याचा त्रास न होता आपण त्यामध्ये आपले नुकसान करून बसतो, परंतु आपल्या ते लक्षात येत नाही…
नाते मग ते कोणतेही असो प्रत्येक नात्याची एक विशिष्ट मर्यादा ठरलेली असते ,आणि ते नाते त्या मर्यादेत असेल तर त्याचे महत्त्व प्रत्येकासाठी असते अन्यथा ज्या नात्यांमुळे आयुष्य रंगत जाते तीच नाती मात्र ओझी वाटू लागतात नात्यांचे महत्त्व दोन्ही बाजूने तितकेच महत्त्वाचे हवे जितकी त्या नात्यांमध्ये गुंतवणूक झालेली असेल, अन्यथा एका व्यक्तीची पूर्ण गुंतवणूक असणे दुसऱ्याच्या अर्थी मात्र शुल्लक असेल तर मात्र एकतर्फी असणारे नाते टिकवणे जड जाते याचा अर्थ असा अजिबात होत नाही, की आपण कोणाला नात्यांमध्ये गुंतवणूक करायला भाग पाडले पाहिजे, कारण की जी व्यक्ती नात्यांचे मोल जाणते त्याला या गोष्टी सांगण्याची कधी गरजच भासत नाही….
आता तुम्हांला प्रश्न पडला असेल की नात्यांमध्ये गुंतवणूक करणे म्हणजे काय???!!!! नात्यांना त् पैशांची गुंतवणूक नाही तर विश्वासाची आणि आपल्या निस्वार्थ प्रेमाच्या गुंतवणुकीची गरज असते …त्यामध्ये नात्यांचा आदर भाव आपुलकी हे जसे वागण्यात असावे तसेच जाणीवेतसुद्धा असणे महत्त्वपूर्ण ठरते …..मान्य आहे आपल्याला नात्यांमध्ये,घडणारे घटना प्रसंग हे परिस्थितीनुरूप काही वेळेस खूप अडचणीत टाकणारे असतात…
परंतु त्या सर्व गोष्टींचा जर आपण राग मनात असू ,मनामध्ये त्याविषयी एक प्रकारची अढी ठेवत असू तर मात्र पुढे ते वाढत जाऊन आदळआपट करून आपल्या वर्तनातून बाहेर पडू लागतात त्यामुळे असलेला राग मनात ठेवलेली एखाद्याबद्दल अढी ही वेळीचं सावरली व खाली गेली …तर मात्र आपल्या वर्तणुकीतून नक्कीच आदळ आपट कमी होणारं…आपल्याला माहिती आहे वांग्यांचे तेल कांद्यावर काढून काही उपयोग होत नाही….
सांगायचे एवढेच मित्रांनो आपल्या वर्तनात आदळ आपट करण्याचे स्थान आपण आपल्या प्रेमाला, नात्याला ,आणि आपल्या माणसांना देऊया आणि नात्यांमध्ये असलेले आपले जग भरभरून जगूया….!!!
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


