Skip to content

आपली अति लैंगिकतेची भावना आपल्याला मोठ्या संकटात टाकू शकते.

आपली अति लैंगिकतेची भावना आपल्याला मोठ्या संकटात टाकू शकते.


सोनाली जे


अति तिथे माती . योग्य मात्रेत विष सुधा घेतले तर ते अमृतासारखे काम करते. हे उदाहरण एवढ्याच करिता की कोणत्याच गोष्टी चा अतिरेक झाला तर कदाचित त्यापासून त्रास किंवा अपाय होतो.उपाय म्हणून करायला जावे आणि अपाय होणार..ती गोष्ट संकटात टाकू शकते.

आपली अति लैंगिकतेची भावना आपल्याला मोठ्या संकटात टाकू शकते का?? नक्कीच हो. थोडी कारणे आणि उदाहरणे ही बघुयात. आणि कशी संकटात टाकतात ते ही.

१. अती लैंगिकतेची भावना का निर्माण होते : जी गोष्ट आपल्याला वेळेत मिळत नाही किंवा मिळतच नाही. आणि त्यातून ती मिळत नाही म्हणून ध्यास लागतो परत परत तीच गोष्ट हवी हवी आणि केली जाते ..जर मिळालीच तर ती भूक अतिशय असते आणि ती पूर्ण करताना अतिरेक होतो . उदा. वयस्क व्यक्ती जोडीदार नसेल तर एकाकी जगत असतो पण तरी हा शरीर धर्म ..ही गरज असतेच. बरेचदा मन मारावे लागते . पण नाहीच झाले तर मग अल्पवयीन मुलीवर , घरकाम करणारी असेल तिच्यावर वारंवार अत्याचार केले जातात.

तर काही वेळेस भूक लागते तेव्हा प्रचंड खात असतो. तरी काही वेळेस भूक भागत नाही. तर काही वेळेस थोड्या थोड्या वेळाने भूक लागते आणि तेव्हा खावे लागते. तसेच या लैंगिक भावना ही उद्दिपित होत असतात. काही लोकांमध्ये त्या कमी प्रमाणात असतात .तर काही लोकांच्यात त्या अती तीव्र असतात. आणि त्या पूर्ण झाल्या नाहीत तर अस्वस्थता , मनाची चलबिचल , निद्रानाश ही होतात.

२. अती लैंगिकतेची भावना काही वेळेस आपल्याला वेळ , काळ , परिस्थिती , समोर , जवळपास कोण आहे याची जाणीव ही नष्ट करून करून टाकतात. उदाहरण : आजकाल कॉलेज ची मुले मुली यांच्यात प्रेम , खरे तर आकर्षण असते .ती ओढ आकर्षण त्यांना मैत्री., जवळीकते मधून , स्पर्शातून टोकाची भूमिका घेण्यास भाग पाडते. पहिल्यांदा ओढीने , आकर्षण , काही तरी नावीन्य याने प्रस्थापित केलेले लैंगिक संबंध परत परत त्या भावना प्रबळ करतात .

आणि मग त्यातूनच कुमारी माता यासारखे प्रकार घडत असतात. काही वेळेस abortion , तर काही वेळेस जन्म द्यावाच लागतो आणि मग त्यांना कोण सांभाळणार हा प्रश्न . मग ती अनाथ आश्रम किंवा सार्वजनिक ठिकाणी सोडून देतात. त्या चिमुकल्यांचा काही दोष नसताना बेवारशी.

३. अती लैंगिकतेची भावना मानसिक संतुलन बिघडवून टाकते. मुळात ही भावना जेवढी तीव्र तेवढी पूर्ण झाली नाही की निराशा पदरी पडते. सततची निराशा पदरी पडली तर यातूनच मानसिक संतुलन बिघडते.

४. अती लैंगिकतेची भावना व्यसनाधीन बनविते : दारू किंवा बाहेरख्याली , चुकीच्या मार्गाला ही लावते. यातून व्यसने वाढत जातात च पण आपल्या शरीराला मोठी हानी पोहचवितात. आणि या व्यसनातून ती पूर्ण करण्याकरिता आर्थिक दृष्टया ही हानी होते .कधी कधी कर्ज बाजारी व्हावे लागते. तर कधी चोरी , गुंडगिरी किंवा मारामारी करून पैसे कमविले जातात आणि गर्जपूर्ती केली जाते.

५. लैंगिक भावना ही पोर्न व्हिडिओज , किंवा इतर सोशल मीडियावरून बघून अजून जास्त उद्दिपित होते . तेव्हा मग कधी probs वापरून ही जे कधी तरी शरीराला हानिकारक ही होवू शकतात. तेव्हा तजज्ञांमार्फत सल्ला मार्गदर्शन अथवा treatment घ्यावी लागते. तर कधी समलिंगी सेक्स ही गरज भागविण्यासाठी केले जाते. कधी सार्वजनिक ठिकाणी ही या लोकांना कंट्रोल करणे अवघड जाते. त्याचा परिणाम इतर लोकांवर होत असतो. समाज आणि कायदा यातून योग्य ती शिक्षा ही देतात.

६. प्रलोभन , गैरफायदा : जेव्हा एखाद्याला चांगले ओळखणारी व्यक्ती असते तेव्हा त्या समोरच्या व्यक्तीला या व्यक्तीचे गुण दोष ही चांगले माहिती असतात . आणि त्यातून विश्वासाने आपल्या या सवयी विश्यी सांगितले तर गैरफायदा घेण्याची शक्यता ही असते.
उदा. प्रशांत आपल्या या अती लैंगिक भावना महेश बरोबर शेअर करत असतो. तेव्हा महेश त्याला त्या पूर्ण करण्याची प्रलोभने देवून कधी पैसे उकळत असे. तर कधी त्याचा गैरफायदा इतर लोक , किंवा मैत्रिणी ही गोड बोलून गैरफायदा घेत.

७. प्रसंगी गुन्हेगार ही बनविते : अती लैंगिक भावना असलेल्या व्यक्तीच्या भावना पार्टनर किंवा त्याच्या संपर्कात असणाऱ्या व्यक्तीने पूर्ण केल्या नाहीत तर प्रसंगी राग , द्वेष , हवस पूर्णकरण्याकरिता तिचा वापर करून खून , मारामारी , जबरदस्ती ही केली जाते. जी इतरांना घातक असतेच पण समाज आणि कायदा यांच्या दृष्टीने आयुष्यभरासाठी बदनाम तर होतात , काही ठिकाणी वाळीत ही टाकतात. तोंडाला काळे फासून धिंड ही काढतात. याचा विपरीत परिणाम होवून आत्महत्या यासारखे प्रयत्न ही केले जातात.
किंवा इतरांना शिक्षा देताना स्वतः ही आत्मघात करून घेतात.

थोडक्यात कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच. लैंगिक भावना पूर्ती करताना ही त्यावर आत्म नियंत्रण असावं. आनंद , सुख आणि शांतता मिळावी. त्यातून आपल्याला किंवा इतरांना त्रास नको.

आयुष्य सुंदर आहे. लैंगिक भावना आणि त्यातून परिपूर्णता मिळत असते. सुख , समाधान शांती यांचा मार्ग म्हणले तरी चालेल . जे आपल्याला नवीन energy , उत्साह आणि प्रेरणा देत असते. फक्त त्याचा अतिरेक नको.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “आपली अति लैंगिकतेची भावना आपल्याला मोठ्या संकटात टाकू शकते.”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!