Skip to content

माझ्या रागावर मला नियंत्रण मिळवायचंय !!

रागावर नियंत्रण हवेच!


विलास पवार


राग हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. तो आला तर कुणालाच जुमानत नाही. राग व्यक्त करणं आणि राग धरून ठेवणं यात फरक आहे. माणसाच्या मनाविरुद्ध एखादी गोष्ट घडली की, राग पटकन प्रकट होतो. त्याचप्रमाणे एखादी चूक दाखविली तरी राग येतो.

राग ही माणसाच्या स्वभावातील एक क्रिया आहे. माणूस कोणीही असो, त्याला राग येतच नाही असं कधी घडत नाही. मात्र तो आपण किती वेळ धरून ठेवतो आणि किती वेळात विसरतो यावर त्याचे फायदे – तोटे अवलंबून असतात. एखाद्यावर पातळीपर्यंत रागावल्यानंतर त्याच्या वर्तनात सुधारणा होण्यास मदत होते. चुका दुरुस्त होऊ शकतात. आपल्या अपेक्षांची पूर्तता झाली नाही तरी माणसाला राग येतो. त्यामुळे राग हा नाराजी प्रकट करण्याचा एक माध्यम ठरतो.

राग मनात धरून ठेवणं सर्वात घातक ठरते. त्याचा कधी ना कधी स्फोट होतोच, म्हणून तो व्यक्तही करता आला पाहिजे आणि विसरता पण आला पाहिजे. राग हा नियंत्रणात असला तर ठिक अन्यथा, त्याचे भयंकर परिणाम भोगावे लागतात.

राग प्रकट होण्यासाठी किमान दोन व्यक्तीं लागतात. त्यात ज्याच्यावर रागावलात ती व्यक्ती आणि राग काढणारी व्यक्ती या दोघांचे नुकसान होऊ शकते. एखाद्याला रागावर नियंत्रणच ठेवता येत नसेल तर लोक हळू हळू त्यापासून दूर जातात. परिणामी अशी व्यक्ती एकाकी पडते. आत्मकेंद्री बनते. लवकर राग येणे आणि उशिरापर्यंत धरून ठेवणं म्हणजे स्वत:चे नुकसान करून घेणे होय. अशी व्यक्ती अपयशाची धनी बनते तर ज्याला राग पटकन विसरता येतो, तो यशाचा धनी ठरतो.

राग विसरण्यासाठी मनाचा संयम आवश्यक असतो. असे संयमी जिवन जगण्यसाठी माणसाच्या वर्तनाला विधायक वळण देऊ शकतील असे छंद असणे गरजेचे असते. राग विसरण्यासाठी आपल्या आवडीच्या विषयात मन गुंतवून घेता आले पाहिजे.

जसे चित्रपट पाहणे, लेखन, वाचन करणे, कलाकुसरची कामे करणे, चित्रकला, गायन, संगीत आणि न्रुत्य कलेत गुंतून जाणे आवश्यक असते.

माणूस रागाच्या भरात आक्रोश करतो, आदळ आपट करतो, कधी कधी दुसर्‍यांना आणि स्वतःलाही वेदना देतो. वस्तूंची तोडफोड करतो आणि यातूनच कधी न भरून निघणारे नुकसान करून घेतो. काही लोक रागाच्या भरात बोलत नाहीत, अबोला धरतात मात्र आतुन कमालीचे अस्वस्थ असतात. अशा माणसाच्या हातून काय क्रुती घडेल याचा भरवसा नसतो.

म्हणून राग हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू मानला जातो. या शत्रूवर ज्याला विजय मिळविता येतो, तो विजेता ठरतो. काही लोक रागाच्या भरात घरातून निघून जातात, स्वतःला संपवून घेतात किंवा संपविण्याचा प्रयत्न करतात. केवळ रागावर नियंत्रण नसल्यामुळे ते टोकाचे पाऊल उचलतात. अशा लोकांना आयुष्याची किमत कळत नाही. संकटावर मात करण्याचे धाडस असले पाहिजे, अन्यायाविरुद्ध लढण्याची तयारी पाहिजे आणि राग पचविण्याची कला पाहिजे.

काही जण आत्महत्या करताना चिठ्ठी लिहून जातात कोणाला तरी सल्ला अथवा दोष देऊन जातात. पण त्यांनी आयुष्य संपविण्याचा घेतलेला निर्णय हाच त्यांचा मोठा दोष ठरत असतो.

म्हणून मित्रहो, जेव्हा राग अवाक्याच्या बाहेर जाईल, मनस्ताप होईल तेव्हा आपल्यातच काहीतरी खोट आहे, अशी समजूत काढून स्वतःचं सांत्वन करा. अवाक्याच्या बाहेर गेलेला राग फक्त एकच करू शकतो…

ते म्हणजे, स्वतःसकट समोरच्याचा सर्वनाश !


दैनंदिन जीवनाला त्रासले आहात का ?

क्लिक करा


आपले सुद्धा प्रेरणादायी लेख आम्हांला ९१३७३००९२९ या व्हाट्सएप क्रमांकावर पाठवा. आपल्या नावासकट अत्यंत नम्रपणे ते प्रकाशित केले जातील.

“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया !”

1 thought on “माझ्या रागावर मला नियंत्रण मिळवायचंय !!”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!