Skip to content

पतीची किंवा पत्नीची गरज का आहे ? वाचा लेख!

पतीची किंवा पत्नीची गरज का आहे ? वाचा लेख!


सोनाली जे.


मी नेहमीच सांगत आले आहे की मनुष्य हा समाजशील प्राणी आहे.

मनुष्य हा सर्व प्रथम त्याच्या basic गरजा पूर्ण करत असतो. अन्न, वस्त्र , निवारा , आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी , नोकरी असेल व्यवसाय असेल , थोडक्यात आर्थिक सुरक्षितता आली की तो घर घेतो , कधी भाड्याचे असेल कधी स्वतः चे असेल.

त्यानंतर त्याला आपल्या सोबत कोणी असावे , मित्र मैत्रिणी , आपली जोडीदार असावी , आपले काळजी घेणारे ,भावना शेअर करता येतील असे सुख दुःखात साथ देतील असे आपले लोक सोबत असावेत , आपली जोडीदार यात जास्त जवळची , कायम सोबत राहणारी असते, आपण अथक प्रयत्नानंतर achieve केलेले यश सांगण्यासाठी त्याचे कौतुक करून घेण्यासाठी ही आपल्याच माणसाची साथ लागते . आपल्याला प्रोत्साहन मिळण्याकरिता , आपल्याला जगण्याची उमेद निर्माण होवून उत्साह वाढविण्याचे काम आपलीच व्यक्ती करू शकते. यातून जोडीदाराची गरज निर्माण होते.

आपण भारतासारख्या देशात राहतो, जिथे लग्न ही संस्कृती, संस्कार मानला गेला आहे. लग्न ही स्त्री आणि पुरुष यांना एकत्र येण्याची संधीच , किंवा कायदेशीर , समाजमान्य अधिकार मानले जाते.

आजकाल तरुण पिढीत आकर्षण , प्रेम , कधी प्रेम विवाह किंवा लिव्ह इन रिलेशनशिप सर्रास आढळून येते.

पतीची किंवा पत्नीची गरज का आहे ?

याविषयी थोडा विचार करूयात.

हा खूप च गहन प्रश्न आहे . कृष्णाने जसे आ करून आक्खे ब्रह्मांड दाखविले तसेच काहीसे म्हणले तरी.

१. Maslow या मानसशास्त्रज्ञ यांनी needs ची एक hierarchy केली आहे .त्यात basic needs जसे अन्न वस्त्र , निवारा या गरजा पूर्ण केल्या कि अर्थार्जन , नोकरी यातून स्थिरता आली की माणसाला आपलेपणाची गरज निर्माण होते. आपल् एकाकीपणे जगणे नकोसे वाटते आणि आपल्या जवळची आपली व्यक्ती असावी ही गरज , जोडीदाराची गरज निर्माण होते. बरेचदा मित्र मैत्रिणी यांच्या नात्यात मर्यादा येतात परंतु पती पत्नी यांचे नाते मुक्त आणि मोकळेपणा चे असते. एकमेकांशी विचार , भावना शेअर करण्यातून , शारीरिक दृष्ट्या एकत्र येवून दोघेही मानसिक ताण – तणाव यातून मुक्त होतात.मानसिक शांतता ही निर्माण करते.

अगदी आजकाल senior सिटिझन ही जोडीदारा साठी , केवळ आपलेपणाची सोबत असण्यासाठी विवाह बंधनात अडकतात . काही जणांचे जोडीदार हयात नसतील तरी परत तोच मानसिक आणि शारीरिक आधार मिळविण्यासाठी ते परत जोडीदाराची साथ शोधतात. आणि परत लग्नाच्या बेडीत अडकतात.

२. शरीराची गरज : अन्न , वस्त्र , निवारा , तहान , भूक या जशा शरीराच्या गरजा आहेत तसेच सेक्स ही शरीराची गरज आहे. Freud यांनी मनुष्याच्या प्राथमिक गरजा मध्ये जसे तहान , भूक तसे सेक्स ही मानवी शरीराची भूक , शरीराची गरज च आहे असे मांडले आहे.
आपल्यावर ज्या समाजात राहतो त्या समाजाची काही बंधने आहेत. नियम आहेत . रीती रिवाज आहेत , ते पाळावे च लागतात. त्यात पती पत्नी ने एकत्र येवून सेक्स ची गरज , भूक भागविणे हे समाजमान्य तर आहेच शिवाय कायद्याने ही मान्य आहे.

३. पती – पत्नी यांची गरज प्रजोत्पादन , सक्षम अशा पुढील पिढीची निर्मिती होण्याकरिता ही असते. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की कोणाचे आयुष्य चिरंजीवी नाही. रोज जन्म होतात तसे रोज मृत्यु ही. जन्म आणि मृत्यू यांचे circle चालू ठेवण्याकरिता , नवीन पिढी निर्माण करण्याकरिता पती पत्नी यांची भूमिका ही गरजेची असते.

आताची पिढी हे सुधा म्हणेल की त्याकरिता लग्न करण्याची काय गरज? कायदा , समाज ,कुटुंब व्यवस्था यांच्या नियमानुसार संस्कार , नियम , मर्यादा पालन , यांच्या चौकटीत बसून त्यांच्या मान्यतेनुसार पती पत्नीच्या अधिकृत संबंधातून निर्माण झालेली पुढची पिढी असावी असा नियम ..

लग्नापूर्वी किंवा लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये निर्माण झालेली पिढी यात अनेक समस्या निर्माण होवू शकतात. जसे की सांभाळ कोण करणार , जबाबदारी कोण घेणार ? आर्थिक भार कोण उचलणार? अगदी नाव कोणाचे लावायचे इथपासून समस्या असतात. बरेचदा यात जोडपी कोणत्याही बंधनात अडकलेली नसतात.मुक्त असतात. मग स्त्री ही सुधा काम करत असेल किंवा जरी नसेल तरी तिने का भार उचलावा मुलांचा ? पुरुषांनी तरी का ?

पुढे जावून स्त्री पुरुष यामध्ये असलेले नाते च जर टिकले नाही तर मुलांची जबाबदारी कोण घेणार ? कारण कायदा , समाज या कोणत्याच बंधनात ते अडकले नसतात. किंवा नातेवाईक यांची ही साथ नसते. म्हणजेच अनैतिक संबंध त्यातून निर्माण होणारी पिढी मानले जाईल ना.. पुढील पिढीला संस्कारक्षम कसे बनविणार ? जर स्वतः आई वडील त्यांच्यावर पाबंद ,मर्यादा , बंधने , नैतिक बंधने नसतील तर , उद्या मुलांची जबाबदारी दोघांनी झटकली तर ? पुढची पिढी संस्कारक्षम बनेल का ?

स्वैराचार , अनैतिक गोष्टी , व्यभिचार आणि इतर अनेक गोष्टी टाळण्याकरिता पती पत्नी या नात्याने एकत्र येणे गरजेचे असते.

४. परिपूर्णता येण्याकरीता : –

प्रत्येक व्यक्ती ही परिपूर्ण नसते. काही कमतरता , उणिवा प्रत्येकात असतात. तर काही चांगले गुण ही असतात. पण ती परिपूर्ण होण्याकरिता आपली /आपला जोडीदार असणे गरजेचे असते. ज्यातून दोघेही एकमेकांना समजून घेवून जिथे कमतरता असेल त्या दुसऱ्याने भरून काढणे यातून एकमेकात परिपूर्णता येते.

उदाहरण : बरेचदा पुरुष ऑफिस आणि इतर जबाबदाऱ्या पार पाडण्यात बिझी असतात तेव्हा त्यांचे नातेवाईक , इतर सण , किंवा शुभ कार्यक्रम या कडे दुर्लक्ष होते. अशावेळी पत्नी ती जबाबदारी समर्थपणे उचलते आणि नातेसंबंध सांभाळते. आई वडिलांची जबाबदारी उचलते, प्रेम , माया लावते. थोडक्यात एकमेकांचे गुण – दोष भरून काढण्याकरिता पती – पत्नी यांची गरज आहे.

५. मानसशास्त्रीय दृष्ट्या समतोल साधण्याकरिता : असे म्हणतात की लग्न न झालेल्या व्यक्तीचे विचार हे एकांगी असतात. जेव्हा आपलीच जवळची व्यक्ती सोबत असते तेव्हा ते विचार दोन्ही बाजूने करण्याची क्षमता वाढते.

६. घाबरून , भीतीपोटी , अनैतिक गोष्टी करण्यापेक्षा पती पत्नीच्या नात्यात , बंधनात अडकुन नैतिक गोष्टी करताना स्वतः मधला आत्मविश्वास ही वाढतो. चोरुन कोणती गोष्ट करत आहे याचे दडपण राहत नाही.

समाज प्रगल्भ होतो आहे आणि त्यातून कायदा ही. आपले जवळचे आई वडील , भाऊ ,बहीण आपल्याला आयुष्यभर पुरू शकणार नाहीत किंवा साथ देवू शकणार नाहीत तेव्हा दीर्घकालीन आपलेपणाची साथ, मानसीक आधार देण्याकरिता , शारीरिक गरजा समजून घेण्याकरिता , भावनिक समायोजन करण्याकरिता पती – पत्नी यांची गरज आहे.

आयुष्य सुंदर आहे. पती – पत्नी यांनी एकमेकांना अजून साथ देवून ते बहरून टाकावे.

 


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “पतीची किंवा पत्नीची गरज का आहे ? वाचा लेख!”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!