फाटलेल्या मनाची गोष्ट
धनंजय तावडे
(समुपदेशक)
25 वर्षाची मनिषा ( काल्पनिक नाव) लग्नाच्या १० दिवसानंतरच नैराश्य घेऊन आली.नववधूचा साज व हातावरची मेहंदी व तिचे भावी आयुष्याचे मोरपंखी स्वप्न अजुन कोवळे असताना तिला नैराश्य का आलं ?आपल्या भावनांचा बांध मोकळा करत ती बोलू लागली.तिच्या नैराश्याचं कारणही तेवढंच संवेदनशील होतं.
मनिषा लग्नाच्या २ वर्षापूर्वी एका मुलावर प्रेम करत होती.दोघेही भेटायचे.प्रेमाच्या गोष्टी तर कधी लग्नाचा रंगवलेल्या स्वप्नातल्या गोष्टी.पण जेव्हा ही भेटायचे चारचौघातच. तो मात्र अनेकदा जेव्हा तिला एकट्यात किंवा मित्राचा रूमवर बोलवायचा तेव्हा ती टाळायची. कदाचित तिला त्याच्या वाईट उद्देशाची जाणीव झाली होती. तिला वाटायचं जे काही करायचं ते लग्नानंतरच.
२ वर्षानंतर तिच्या मनात घर केलेल्या राजकुमाराशी तिचं लग्न झालं.ती खूप आनंदी होती ,ज्याचावर प्रेम केलं तोच तिचा जिवनसाथी झाला.चित्रपटात दाखवणार्या मधुचंद्राच्या रात्रीसारख ती स्वप्न रंगवत मोहरून गेली होती.दोघांनी सजवलेल्या बेडवर प्रवेश केला .दोघांचा समागम सुरू झाला.ती आपलं शरीर व मन त्याला समर्पीत करीत होती.तो तर जास्तच उत्तेजित होता आणि अचानक संबंध करतांना तिचं योनिपटल( हायमेन) फाटलं व रक्तस्त्राव सुरू झाला.वास्तविक ही अतिशय नैसर्गिक व सामान्य प्रक्रीया होती. पण ते पाहून त्याला प्रचंड आनंद झाला.त्याला झालेला आनंद तिला समजण्याआधीच त्याच अवस्थेत तो तीला म्हणाला.या करीताच मी तुला एकट्यात बोलवत होतो.तुझाशी सेक्स करून मला बघायचं होतं की तुझ कौमार्य (व्हर्जिन) आहे की नाही.त्याचे ते शब्द तिला भयानक बोचले.ज्याच्यावर मी जीवापाड प्रेम करून सर्वस्व अर्पण केलं तो अतिशय घाणेरड्या व संकुचित मानसिकतेचा निघाला.बोलतांना डोळ्यातील अश्रूंना आवरत ती स्तब्ध झाली.डोळे पुसत व स्वतः ला सावरत ती मला म्हणाली सर, त्या रात्री जर मला रक्तस्राव झाला नसता तर या माणसाने मला काय वागणूक दिली असती याची कल्पना न केलेली बरी.
२१ व्या शतकातही पुरूषाचा (व्हर्जिनिटी) कौमार्य बद्दलचा नकारात्मक विचार व दुष्टीकोन मनिषा सारख्या अनेक मुलींच्या आयुष्याला कुरूप बनवत आहे.
समाजातल्या अशा अनेक मनिषा आपल्या ईच्छा व भावना दाबून कधी कुणाजवळही आपलं मन मोकळं न करणाऱ्या सर्व स्रीयांना ही पोष्ट समर्पीत.
दैनंदिन जीवनाला त्रासले आहात का ?
आपले सुद्धा प्रेरणादायी लेख आम्हांला ९१३७३००९२९ या व्हाट्सएप क्रमांकावर पाठवा. आपल्या नावासकट अत्यंत नम्रपणे ते प्रकाशित केले जातील.
Nice